नाकाला वास न येण्याची कारणे

0
1534
नाकाला वास न येण्याची कारणे
नाकाला वास न येण्याची कारणे

नमस्कार, जर घरात एखादा चमचमीत पदार्थ बघितला, तर तोंडाला पाणी सुटते, व त्याचे सुहासही, मनाला भावून जाते.  जर त्याचा सुवास आपल्याला मिळाला नाही, तर आपल्या मनात वेगळीच चक्र चालू होते. असे वाटते की, आपल्याला काही आजार तर नाही ना ! एवढा छान पदार्थ ठेवूनही आपल्याला वास येत नाही, त्यावेळी आपण फार चिंतेत होतो. अशा वेळी घाबरून जाऊ नका, कारण नाकाला वास येणे हे तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड झाल्याचे चिन्ह असते.  जेव्हा नाकाला वास येत नाही, त्यावेळी तुम्हाला चवही लागत नाही, कुठलाच पदार्थ तुम्हाला रुचकर लागत नाही. अशावेळी तुम्हाला जेवण करावेसे वाटत नाही, त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा थकवा, सारख्या समस्या उद्भवू शकतात.

तसेच बऱ्याच लोकांना आजारपणातून निघाल्यावर, नाकाला वास न येण्याची कारणे दिसून येतात. वाढत्या प्रदूषणामुळे आणि कोरोनासारख्या महामारी मध्ये आपल्याला सर्दी – पडसे, खोकला यासारख्या समस्या बघावयास मिळतात. अशावेळी कोरोना ने तर मनात एक भीती घातली आहे की, आपल्याला वास आला नाही, तर कोरोना झाला, असे समजायचे. पण ते तसे नसते. नाकाला वास न येण्याची अनेक कारणे असतात. ज्या वेळी तुम्ही प्रदूषणाच्या वातावरणात जातात, यावेळी धुळीची ॲलर्जी होऊन, तुम्हाला नाकाला वास येत नाही. तुम्ही घाबरून जाऊ नका, आज आपण बघणार आहोत, की नाकाला वास न येण्याची कारणे कोणती ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

नाकाला वास न येण्याची कारणे ? 

नाकाला वास न येण्याची बरीच कारणे आहेत, ती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग बघुयात ! 

  • उच्च ताप आल्यामुळे, नाकाला वास येत नाही आणि तोंडाला चवही लागत नाही. 
  • सर्दी व्हायरल फ्यू सारखे इन्फेक्शन झाल्यामुळे, ही नाकाला वास येत नाही. तोंडाला चव येत नाही. 
  • बाहेरची धुळीची ॲलर्जी झाल्यामुळे, नाकात वास येत नाही. 
  • तोंडाची चव गेल्यामुळे, ही नाकाला वास येत नाही. 
  • एखाद्या गंभीर आजारातून बाहेर निघाल्यावर, नाकाला वास न येणे, तोंडाची चव जाणे, जेवण न जाणे यासारख्या, समस्या आपल्याला बघावयास मिळतात. 
  • नाकाचे हाड वाढले असेल, तरी नाकाला वास येत नाही. 
  • कोरोना झाला, तर नाकाला वास येत नाही.
  • नाकाचे उंचवट्याच्या पोकळीत, जर सूज आली असेल, तर नाकाला वास येत नाही. 
  • नाकात पुळी वगैरे झाली असेल, तरी यासारख्या समस्या होऊ शकते. 
  • ज्यांना श्वास घेताना त्रास होतो, दम लागतो, अशा लोकांचा नाकाला वास येत नाही. 
वाचा  खसखस खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत?

नाकाला वास न आल्यास कोरोना होतो का ? 

हल्ली कोरोना सारख्या महामारी मध्ये सगळ्यांना कोरणा चे संकट पडले आहेत. साधी सर्दी जरी झाली, तरी मनात एक भीती घुसून जाते की, आपल्याला कोरोना तर नाही ? तसेच खोकला येणे, घसा खवखवणे, यावर सगळेच घाबरून जातात. पण त्यावेळी घाबरून जाऊ नका, कारण कोरोना वर इलाज आहे, आणि कोरोना टेस्ट केव्हा करावी ? ज्या वेळी तुम्हाला तीन ते चार दिवस  समजत तोंडाला चव येत नाहीये, सर्दी खोकला आहे, डोके जड पडले आहे, अंगात ताप आहे, अशावेळी तुम्ही कोरोना ची टेस्ट करू शकतात. तसेच जर तुम्हाला या गोष्टींमध्ये ठराविकच कारण असतील, तर अशावेळी तुम्ही समजायचे,  तुम्हाला बाहेरील, हवेमुळे व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. त्यावेळी तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करून घ्यावी. 

नाकाला वास न येण्याची लक्षणे

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला नाकाला वास न येण्याची कारणे सांगितले, आता आपण व नाकाला वास न येण्याची लक्षणे, जाणून घेऊयात. 

  • ज्यावेळी नाकाला वास येत नाही, त्यांची  तोंडाची चवही जाते. 
  • तुम्हाला सर्दी होते. 
  • अंगात ताप असतो. 
  • अंग कणकण करते. 
  • जेवणात चव लागत नाही. 
  • समोर ठेवलेल्या वस्तूंचा सुगंधाचा वास येत नाही. 

नाकाला वास येत नसल्यास कोणते घरगुती उपचार करावा ? 

आज आपण वरील दिलेल्या माहितीमध्ये जाणून घेतले आहे, की नाकाला वास येण्याची कारणे व लक्षणे. आता आपण जाणून घेणार आहोत, की नाकाला जर वास येत नसेल, तर त्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात ! 

आल्याचा वापर करून बघा :

आल हे औषधी वनस्पती आहे. आल्याचा चहा हा तुमच्या शरीरासाठी अतिउत्तम असते. आल मध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. जर तुमच्या नाकाला वास न येण्यासारख्या समस्या तसेच तोंडाची चव न लागण्यासारख्या समस्या, असतील, अशावेळी तुम्ही जर अद्रक चा चहा पिला, तर यासारख्या समस्या वर आराम मिळू शकतो. तसेच तुम्ही अद्रक चा रस किसून, त्यात मध टाकून, त्याचे चाटण केल्यास, तुमच्या तोंडाची चवही येईल. 

वाचा  राजकुमारासारखे राजासारखे गरीबा सारखे जेवण ?

तुळशीच्या पानांचा वापर करावा :

हो, तुळशीची पाने ही  ऑंटीसेप्टीक, अँटिबायोटिक गुणधर्मांनी भरलेली आहेत. ज्यावेळी  तुम्हाला कोणतेही व्हायरल इन्फेक्शन होते, अशावेळी जर तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर केला, तर तुम्ही फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला तुळशीची पाने आठ ते दहा घेऊन, ती गरम पाण्यात उकळून, त्यात काळे मिरेपूड, अद्रकचा कीस टाकून, त्याचा काढा करून, तो दिवसातून तीन वेळेस प्यायला हवेत. याने तुमच्या नाकाचा सुवास येण्यास मदत होईल. शिवाय तोंडाची चव गेली असेल, तीही परत येईल. तसेच तुम्ही तुळशीच्या रसाचे काही थेंब नाकात टाकू शकतात, त्याने तुम्हाला फरक पडेल. 

ओव्यांचा वापर करून बघा :

ज्यावेळी तुम्हाला सर्दी पडसे, सारख्या समस्या असतील. अशा वेळी जर तुम्ही ओव्यांचा वापर केला, तर तुम्हाला फरक पडेल. तसेच तुम्हाला तोंडाला चव न लागणे, वास न येणे, असे समस्या असतील. अशाही वेळी तुम्ही ओवांचा वापर करू शकतात. त्यासाठी तुम्ही ओवा तव्यावर गरम करून, त्याची वाफ घ्यावी. तसेच ओवा जर तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळेस कच्चे चावून खाल्ले, तर तुमच्या तोंडाला चव व  नाकाला वास येण्याची क्रिया सुरळीत होते, तसेच ओवा तुम्ही रात्री एक ग्लास पाण्यात भिजवून, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कच्चे खावे आणि ते पाणी पिऊन घ्यावे  त्याने तुम्हाला फरक पडेल. 

एरंडेल तेलाचा वापर करून बघा :

हल्ली सर्दीमुळे तसेच आजारपणातून निघाल्यावर, तसेच औषधी उपचार जास्त प्रमाणात झाल्यामुळे, तुम्हाला वास न येणे, तोंडाची चव जाणे, सारख्या समस्या होतात. जर तुमच्या नाकाला वास येत नसेल, अशा वेळी जर तुम्ही एरंडेल तेल वापरले, तर तुम्हाला फायद्याचे ठरेल. त्यासाठी तुम्हाला एरंडेल तेलाचे काही थेंब नाकपुड्यात टाकावे, असे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळेस केल्यास तुम्हाला फरक पडेल. 

लसणाचा वापर करून बघा :

पूर्वीच्या काळापासून घरगुती उपचारांमध्ये, सर्दी-पडसे सारख्या समस्यावर, लसुन हा वापरला जातो. जर तुम्हाला सर्दी-पडसे, तसेच नाकाला वास न येणे, तोंडाची चव जाणे, यासारख्या समस्या असतील, तर तुमच्या आहारात तुम्ही जरूर लसुन चा वापर करावा. कारण लसुन मध्ये  ऑंटीसेप्टीक गुणधर्म असतात. ते तुमचे व्हायरल इन्फेक्शन वर मात करण्याची क्षमता ठेवतात. जर तुम्ही लसणाची पाकळी तेलात तळून खाल्ली, तर तुम्हाला तोंडाची चव येते, तसेच घशातील इन्फेक्शन असेल, तर ते लवकर मोकळे होण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही नाकाला वास येत नसेल, अशा वेळी, जर लसणाचा रस दोघं नाकपुड्याच्यामध्ये लावला, तर तुमच्या नाकाला  वास न येण्याची समस्या लवकरात लवकर दूर होईल. 

वाचा  सुंदर व निरोगी केसांसाठी घरगुती उपाय

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की नाकाला वास न येण्याची कारणे, त्याची लक्षणे, तसेच नाकाला वास न आल्यास तुम्हालाला कोरोना तर नाहीना ? यासारख्या समस्या वर आम्ही तुम्हाला माहिती दिली आहेत. तसेच आम्ही काही घरगुती उपचार ही दिले आहेत. जर हे घरगुती उपचार करूनही, तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना जरूर दाखवावे. तसेच आम्ही दिलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here