तोंडली खाण्याचे फायदे

0
1104
तोंडली खाण्याचे ते फायदे
तोंडली खाण्याचे ते फायदे

नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया तोंडली खाण्याचे फायदे. तोंडली ही भाजी सगळ्यांची आवडती असेलच. तसेच तोंडली घालून मसाला भात अगदी चविष्ट आणि रुचकर लागतो. तोंडलीची भाजी ही चवीला एकदम छान लागते. काहीजणांना तोंडली फ्राय करून त्यावर मीठ टाकून खायला आवडते, तर काहीजणांना तोंडलीची भाजी आवडते, तर काही जणांना कच्ची तोंडली खायला आवडते, तोंडलीच्या आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो. सहसा करून तोंडली ही भारतामध्ये पिकवली जाते. तोंडली चा वेल असतो, आणि वेलावर तोंडली येते.

तोंडली दिसायला अगदी सुंदर आणि मोहक असते. इतर भाज्यांसोबत आपण तिचा आपल्या आहारामध्ये समावेश केला, तर आपल्याला खूप सारे फायदे होतात. तोंडली मध्ये आपल्या शरीरासाठी लागणारे आवश्यक ते गुणधर्म असल्यामुळे, तिचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारात नियमित करावा. तर मित्रांनो काही जणांना तोंडली खाण्यापासून, त्यांच्या शरीराला होणारे फायदे माहिती नसते, तर आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की तोंडली खाण्याने तुमच्या शरीराला कोणकोणते फायदे होतात? चला तर मग जाणून घेऊयात !

तोंडली खाल्ल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे :

तोंडली खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात, तर मग ते नेमके कोणकोणते? त्याला तर मग जाणून घेऊयात. 

तोंडली मधील गुणधर्म :

मित्रांनो, तोंडली मध्ये आपल्या शरीराला लागणारे गुणधर्म असतात. तोंडली मध्ये आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन अ, क, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रथिने, खनिजे, मिनरल्स, बीटा कॅरोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, यासारखे गुणधर्म असल्यामुळे, तोंडली आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. 

वाचा  कानाच्या मागे गाठ येणे

तोंडातील अल्सर वर तोंडली फायदेशीर ठरते :

ज्या लोकांना सारखे सारखे तोंड येत असेल, तोंडात फोड होत असतील, अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारात तोंडली चा समावेश करावा. कारण तोंडली ही उष्णता कमी करण्याचे काम करते, तोंडात उष्णतेमुळे तुम्हाला छाले पडणे, तोंडातील अल्सर यासारख्या समस्या होतात. अशा वेळी तुम्हाला तोंडली कच्ची चाऊन, थुंकी बाहेर थुकून द्यावे. त्यामुळे तुमच्या तोंडाचे छाले, लवकर बरे होण्यास मदत मिळते. 

मधुमेही लोकांसाठी तोंडली फायदेशीर असते :

ज्या लोकांना मधुमेह असतो, अशा लोकांना त्यांच्या आहारावर फार नियंत्रण करावे लागतात. त्यांना त्यांच्या आहारात योग्य भाज्या, तसेच फळांचा समावेश करावा लागतो. अशावेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये तोंडली या भाजीचा समावेश करावा. कारण तोंडली मध्ये आवश्यक गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम ते करतात, व तुमच्या मधुमेहावर आराम मिळतो. 

तोंडली खाल्ल्याने वजन कमी होते :

हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल! पण तोंडली खाल्ल्याने वजन कमी होण्यास ते फायद्याचे ठरते. हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, सतत बैठे काम, तसेच अवेळी जेवणे, जागरण, पुरेशी झोप न होणे, ताणतणाव, बाहेरचे जंकफूड खाणे, बेकरी युक्त पदार्थ खाणे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्यामुळे तुमचे वजन वाढीचे समस्या होतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात तोंडली चा समावेश करावा. तोंडली मध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच त्यामध्ये 90 ते 95 टक्के पाणी असते. तोंडली मध्ये फायबर असते. त्यामुळे ते शरीरातील सर्व वाढत्या चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच तोंडली पाचक वअसते. तोंडली खाल्ल्याने तुम्हाला तुमच्या भुकेवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते. 

अन्नपचनाची क्रिया सुरळीत होते :

मित्रांनो, तोंडली ही पाचक असते. ती चयापचयाची क्रिया सुरळीत करते. त्यामुळे ज्या लोकांना सारखे अजीर्ण, ऍसिडिटी, अपचन, पोटात गॅसेस होणे, ढेकर येणे यासारखे त्रास संभावत असेल, तर अशावेळी त्यांनी त्यांच्या आहारात तोंडली चा समावेश करावा. कारण तोंडली ही अन्नपचनाची क्रिया सुरळीत करते. 

वाचा  जवस भिजवून खाण्याचे फायदे कोणते ?

बद्धकोष्ठतेचा त्रास आराम मिळतो :

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, अशा लोकांनी त्यांच्या आहारात तोंडली चा समावेश करावा. बद्धकोष्ठतेचा त्रास होणाऱ्या लोकांना मलावरोध करताना खूप त्रास होतो. तसेच शौचास साफ न होणे, पोटात दुखणे, गुब्बारा धरणे, यासारख्या समस्या त्यांना होतात. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारात तोंडली खाल्ली, तर त्यांना यासारख्या समस्येवर आराम मिळतो. 

रक्‍तशुद्धीसाठी फायदेशीर ठरते :

तोंडलीमध्ये लोह आयर्न यासारखे गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यासाठी ते फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये तोंडलीच्या समावेश करावा. तोंडली खाण्याचे फायदे शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी होते.

हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

हल्ली काही जणांची गुडघेदुखी, हाडांमध्ये ठिसूळपणा येणे, यासारख्या समस्या लवकर प्रमाणात बघायला मिळतात. त्याला कारणीभूत म्हणजे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होय. अशावेळी तुम्ही कॅल्शियमयुक्त आहार तुमच्या आहारात घ्यायला हवा. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये तोंडलीच्या समावेश करावा. कारण तोंडली मध्ये विटामिन क तसेच कॅल्शियमचा पुरवठा मुबलक प्रमाणात असल्यामुळे, हाडांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते. 

मुखशुद्धीसाठी फायदेशीर ठरते :

तोंडली खाण्याचे फायदे मुखशुद्धी साठी होते. ज्या लोकांच्या तोंडाचा वास येत असेल, अशा लोकांनी त्यांच्या आहारामध्ये तोंडली चा समावेश करावा.तोंडली ही पाचक असते, तसेच मुखशुद्धीसाठी फायदेशीर ठरते. अशावेळी त्यांनी तोंडली कच्चे खाऊन, ती थुंकी व लाळ बाहेर थुंकून द्यावेत. त्यामुळे तुमचे मुखशुद्धी होते. 

तोंडाला चव येते :

दीर्घ आजारातून बाहेर निघाल्यावर, तसेच औषधींचा जास्त वापर केल्यामुळे, तापातून बाहेर निघाल्यावर, तोंडाची चव जाते. अन्नपदार्थ कोणतीही रुचकर लागत नाही. अशावेळी तुम्ही आहारामध्ये तोंडली याचा समावेश करावा. तोंडली ही त्यांना पदार्थाला चव देण्याचे काम करते व तुमच्या तोंडाला चव येते. 

तोंडली खाल्याने होणारे दुष्परिणाम ? 

मित्रांनो, तोंडली आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते, हे आम्ही तुम्हाला वरील दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेले आहेतच. पण ज्या लोकांची मोठी शस्त्रक्रिया झालेली असते, अशा लोकांच्या शरीरामध्ये औषधांचे गुणधर्म असतात. अशा लोकांना तोंडली चा वापर करू नयेत. कारण  तोंडली ही रक्त पातळ होण्याची क्रिया करते. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनी, तोंडलीचा वापर त्यांच्या आहारात करू नयेत. तसेच, ज्या लोकांना तोडली खाण्यापासून ऍलर्जी असेल, अशा लोकांनी त्यांचे व आहारात तोंडली चा वापर डॉक्टरांना विचारूनच करावा. 

वाचा  उशिरा गर्भधारणा होण्याची कारणे व उपाय

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तोंडली खाण्याचे फायदे, तुमच्या शरीराला नक्की कोण कोणते होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच तोंडली कोणत्या लोकांनी खाऊ नयेत, तोंडली खाण्याने होणारे दुष्परिणाम ही सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, व मित्रांनी दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here