ब्रोकली खाण्याचे फायदे

0
853
ब्रोकली खाण्याचे फायदे
ब्रोकली खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो, आज जाणून घेऊया ब्रोकली खाण्याचे फायदे. भाजी मंडळी मध्ये तुम्ही गेले असेलच, तेव्हा तिथे निरनिराळ्या भाज्या बघितले असतीलच ना! तिथे तुम्ही कधी ब्रोकली बघितली आहे का? आपली ही परदेशातून आपल्या देशात आणली गेलेली आहे. जशी काही फ्लावर ची जुडवा बहीणच! पण दोघांचे रंग वेगवेगळे आहेत, तसेच त्यांचे गुणधर्मही तसे आहेत. पण अनेकांनी ब्रोकली घेताना विचार केला असेल, की तिची चव कशी  असेल. पण ब्रोकली ची चवही फुलकोबी सारखीच असते.

ब्रोकली पासून आपण निरनिराळे खाद्यपदार्थ बनवू शकतो.जसे की ब्रोकोली सलाड, ब्रोकली ची भाजी, कधी कधी ब्रोकली उकळून त्यामध्ये मीठ टाकून काही जणांना खायला आवडते. मित्रांनो ब्रोकली खाण्यापासून आपल्याला खूप सारे फायदे होतात. तसेच तिच्या मधील गुणधर्म आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर ठरतात. तर मित्रांनो आज आपण ब्रोकली खाण्यापासून तुमच्या शरीराला नेमके कोणकोणते फायदे होऊ शकतात ? हे जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात ! 

ब्रोकली खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, ब्रोकली खाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते ? चला तर जाणून घेऊयात.

ब्रोकली मधील गुणधर्म :

ब्रोकली आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच तिच्या मधील गुणधर्मामुळे, आपल्या शारीरिक समस्येवर आराम मिळतो. ब्रोकली मध्ये कॅल्शियम, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, फाॅसफरस, विटामिन ए, सी, के, ऑंटी एक्सीडेंट यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. 

वाचा  कांद्याच्या रस चे फायदे

तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते :

बदलत्या जीवनशैलीमुळे, अवेळी खाणे, बैठे काम, अपूर्ण झोप, जागरण, तसेच तेलकट पदार्थ खाणे, जंक फूड खाणे, यासारख्या परिणाम आपल्या वजनावर होतो. आपले वजन वाढते. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ब्रोकली चा समावेश करा. हो ब्रोकली मध्ये फायबरचे प्रमाण असते, जर तुम्हाला वजन वाढीच्या समस्या असतील, तर त्यावर फायदेशीर ठरते. तसेच ब्रोकली खाल्ल्याने त्यामधील घटक द्रव्य तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुमच्या पचनाची संबंधित क्रिया ही सुरळीत होते, व वजन वाढीचे समस्या कमी होतात. तुम्ही बघितले असेल, की हल्ली डायट फूड मध्येही ब्रोकली समावेश केला जातो. 

तुमचा मेटाबोलिज्म सिस्टीम वाढण्यास मदत मिळते :

तुम्हाला शारीरिक थकवा, कमजोरी, अशक्तपणा यासारखे तक्रारी होत असतील, तर तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म सिस्टिम हा कमी होत जातोय, असे आहे. तर अशावेळी तुमच्या शरीरातील इम्यूनिटी पावर वाढवण्यासाठी, जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ब्रोकली चा समावेश केला, तर त्यामधील गुणधर्म तुम्हाला मिळतात. शिवाय मेटाबोलिज्म सिस्टीम वाढतो. 

हृदयविकाराचा धोका टळतो :

जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ब्रोकली ची सुरुवात केली, तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका टळू शकतो. खरंच कारण त्यामध्ये फायबर कॅरेटेनॉयड्स ल्यूटिन आणि पोटॅशियमचे प्रमाण असते, व ते आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करतात. शिवाय ते पचायलाही हलकी असते. शिवाय तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल सुरळीत ठेवण्याचे काम करते. 

त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण लवकर येत नाही :

हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, तसेच अयोग्य खानपान मुळे, तुमच्या चेहऱ्यावर त्याचा प्रभाव दिसतो. काही जणांचे वयाच्या अगोदर चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात, जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये हेल्दी फूड म्हणून ब्रोकली चा समावेश केला, तर तुम्हाला त्याने खूप सारे फायदे होतात. शिवाय ब्रोकली मधील घटक द्रव्य तुमच्या शरीराला मिळतात व तुमची त्वचा क्लीन नितळ आणि मुलायम बनवण्यास मदत मिळते. तसेच ब्रोकली मध्ये विटामिन सी असल्यामुळे, त्वचेला चकाकी येते. तसेच लवकर सुरकुत्या लवकर येत नाही. 

वाचा  दाढ दुखीवर उपाय स्वागत तोडकर

कॅन्सरच्या आजारापासून बचाव होऊ शकतो :

मित्रांनो, ब्रोकली तुम्ही जर तुमच्या आहारात नियमित खाल्ली, तर तुम्हाला कॅन्सरच्या आजारापासून दूर राहता येते. कारण ब्रोकली, ही पचायला हलकी, शिवाय डाएट फूड मध्ये तिचा वापर करतो. शिवाय त्याने वजन वाढत नाही, शिवाय शरीर डिटाॅक्स होते. तसेच ब्रोकली खाल्ल्याने तुम्हाला कोलन कॅन्सर शिवाय लंग्स कॅन्सर होण्याचे चान्सेस सुद्धा टळतात. 

तुमच्या हाडांचे व दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

हो, जर तुमच्या हाडांचा आवाज येत असेल, तर हाडं ठिसूळ होत असतील, तसेच दात दुखी च्या समस्या असतील, दात लवकर पडत असतील, अशा वेळी तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होय. अशा वेळी तुम्ही कॅल्शियम युक्त पदार्थ तुमच्या आहारात घ्यायला हवेत. तसेच ब्रोकली मध्येही कॅल्शियम असते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकली खाल्ली, तर तुम्हाला कॅल्शियमचा स्त्रोत पूर्णपणे मिळतो. शिवाय हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी ब्रोकोली खाण्याचे फायदेशीर ठरते. 

तुमच्या पचनक्रियेस फायदेशीर ठरते :

ब्रोकली आपल्या शरीरातील पचन क्रिया साठी फायदेशीर असते. तसेच ब्रोकली खाल्ल्याने तुमच्या शरीरातील घाण डिटॉक्स होते. तसेच ब्रोकली खाल्ल्याने पचन मार्गात येणारे अडथळे दूर होतात. तसेच त्यांना अल्सर यासारखे त्रास आहे, अशा लोकांना त्यांच्या आहारात समावेश करावा. कारण ती पचायला हलकी असते. 

मधुमेही लोकांसाठी फायदेशीर ठरते :

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना त्यांच्या आहारात पौष्टिक गुणधर्म युक्त भाज्याचा समावेश करावा लागतो. तसेच त्यांना काही पथ्य पाळावे लागतात. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये ब्रोकली खाल्ली, तर त्यांना त्याच्यातले गुणधर्म मिळतातच, शिवाय त्यांना पचनाची संबंधित तक्रारीही दूर होतात. तसेच ब्रोकली मध्ये ऑंटीॲक्सिडेंट गुणधर्म असतात, तसेच ब्रोकली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे ब्रोकली ही मधुमेही लोकांसाठी फायदेशीर ठरते. 

ब्रोकली खाल्ल्या पासून होणारे काही नुकसान :

ब्रोकली आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पण म्हणतात ना, कोणतीही गोष्ट ही प्रमाणात खावे. प्रमाणाच्या बाहेर खाल्याने, त्याचा त्रास होतो. तसेच  ब्रोकली खाताना प्रमाणात खावे, तसेच ज्या गर्भवती महिला त्यांनी त्यांच्या आहारात समावेश कमी प्रमाणात करावा. तसेच तुम्हाला आवडत असेल तर डॉक्टरांना विचारून खावी. तसेच मध्ये फायबरचे प्रमाण असते. ज्या लोकांना पोट जड असल्यासारखे वाटत असेल, पोटफुगी ची समस्या आहे, त्यांनी त्यांच्या आहारात ब्रोकली कमी खावे. तसेच रक्त पातळ होण्याची टेबलेट्स घेत असतील, अशा लोकांनी ब्रोकली ही कमी खावे. कारण ब्रोकली ही रक्त गोठण्याची क्रिया करते. 

वाचा  गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय?

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला ब्रोकली खाण्याचे फायदे सांगितले आहेत. तसेच ब्रोकली आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असतेच. पण जर तुम्हाला कसली अलर्जी असेल, तसेच ब्रोकली खाण्यापूर्वी तुम्ही एकदा डॉक्टरांना विचारून नक्की खावी. तसेच आम्ही सांगितलेल्या लेखामध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तसेच आम्ही सांगितलेल्या लेख तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगावेत. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here