मटन खाल्यानंतर काय खाऊ नये?

0
1948
मटन खाल्यानंतर काय खाऊ नये
मटन खाल्यानंतर काय खाऊ नये

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मटन खाल्यानंतर काय खाऊ नये.  मोजकेच लोक हे शाकाहारी असतात. मांसाहार करायला अनेक जणांना आवडत असते. कालांतराने आजकाल सर्वजण मांसाहार जेवणाकडे जास्त होताना देखील दिसून येत असतात. आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले टिकून राहण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारच्या विटामिन्स, मिनरल्स,प्रोटीन्स, पोषक घटक, पोषक तत्त्वांची आवश्यकता ठरत असते. त्यासाठी आपण सर्व प्रकारचे पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाण्यावर देखील भर द्यायला हवा शिवाय काहीजण मांसाहारी पदार्थ देखील आवडीने खात असतात.

 मांसाहारी म्हणजेच मासे, चिकन, मटण, कोळंबी, मच्छी एक ना अनेक प्रकार यामध्ये येत असतात. बऱ्याच लोकांना तांबडा रस्सा हा देखील खूपच खायला आवडत असतो. मटण, तांबडा रस्सा झणझणित असेल तर ते लोक आवडीने खात असतात. मटन खाल्ल्यामुळे तुम्हाला अनेक काही महत्वाचे पोषक घटक यातून मिळत असतात. शिवाय ज्यांची तब्येत ही फारच नाजूक वृत्तीची असते किंवा ज्यांना वजन वाढवायचे असेल तर अशा लोकांना मांसाहारी पदार्थ खाण्यास दिला जात असतो. मटन याचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी चांगले ठरत असते.

शिवाय मटन खाल्ल्यामुळे आपल्याला कॅल्शियमचा स्रोत देखील चांगल्या प्रकारे मिळत असतो. मटन याचे तुम्ही अनेक प्रकारचे डिशेस बनवून खाऊ शकतात. मटणाचा तांबडा झणझणीत रस्सा, लहान मुलांसाठी मटणाचा पिवळा रस्सा, मटन बिर्याणी एक ना अनेक प्रकार हे बनवून खाऊ शकतात शिवाय ते खायला देखील छान लागत असतात. परंतु मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही मटण खात असाल त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी या पाळल्या पाहिजेत. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही मटणाची सेवन करत असेल त्यावेळेस त्याच्या सोबत काही पदार्थ खाणे शक्यतो टाळायला हवे त्यालाच आपण विरुद्ध आहार घेण्यास देखील म्हणू शकतो. योग्य वेळेस आपण योग्य गोष्टी खाल्ले पाहिजे.

जसे की तुम्ही, मास, मच्छी, मटण खात असाल, तर त्यासोबत इतर पदार्थ खाणे जेवढे टाळ डोळे तुमचे आरोग्य चांगले राहू शकेल. तर मित्रांनो ज्यावेळी आपण आहार घेत असाल, समजा मटन खात असाल तर त्यासोबत आपण कुठल्या गोष्टी खाणे टाळायला हवे? याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. तर मित्रांनो, आज आपण मटन खाल्यानंतर काय खाऊ नये? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, मटन खाल्ल्या नंतर काय खाऊ नये या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  नाकावर तीळ असणे शुभ की अशुभ

मटन खाल्यानंतर काय खायला नको ?

मित्रांनो, बरेच लोकांना मांसाहारी पदार्थ खायला खूप आवडत असतात. मांसाहारी पदार्थ म्हटले तर अनेक प्रकार त्यामध्ये येत असतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे मटन होय. मटन यापासून देखील अनेक डिशेश तयार होत असतात. तांबडा लाल झणझणीत रस्सा, पिवळा रस्सा, मटन बिर्याणी इत्यादी वगैरे. लोक त्यांच्या आवडीनुसार मटणाच्या डिशेस बनवून खात असतात. परत मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही मटण खात असाल त्यावेळेस काही गोष्टी या कटाक्षाने पाळल्या पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही मटण खात असाल तर अशावेळी तुम्ही काही पदार्थाचे सेवन त्यासोबत करू नये.

तर मित्रांनो मटन खाल्ल्यावर तुम्ही काय खायला नको किंवा मटणासोबत कोणते पदार्थ खाणे शक्यतो टाळा हवे याबद्दल आपल्या माहिती असायला हवी. तर मटण खाल्ल्यानंतर अथवा मटणासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • ज्या वेळेस तुम्ही मटन खात असाल त्यावेळी त्याच्यासोबत तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करायला नको. मटन खाताना तुम्ही ताक अथवा खीर यांचे सेवन अजिबात करू नये कारण, मटन आणि ताक, खीर हा विरुद्ध आहार मानला जातो. शिवाय, असे विरुद्ध पदार्थ एकाच वेळी पोटात गेल्यामुळे त्याच्या त्रास हा आपल्याला होऊ शकतो. हा विरुद्ध आहार केल्यामुळे शरीराला एक प्रकारे खास निर्माण होण्याची शक्यता असते. शिवाय कालांतराने अंगावर पांढरे डाग पडण्याची देखील समस्या येऊ शकते.
  • मटन खाल्यानंतर तुम्ही दुधाचे सेवन अजिबात करायला नको. मटन म्हटले तर ते गरम प्रवृत्तीचे असते आणि दूध हे थंड प्रवृत्तीची असते. गरम आणि थंड हे एकाच वेळी गेले तर त्याचा त्रास हा शरीराला अधिक होतो. शिवाय गरम आणि थंड यांचा प्रभाव हा पचनसंस्थेवर देखील पडतो. त्यामुळे आपल्या शरीरातील पचन संस्था या मध्ये बिघाड होऊन खाल्लेले अन्न पचनास जड जाते शिवाय हे दोघे एकत्र झाल्यामुळे मळमळ होण्याचा त्रास देखील होऊ शकतो शिवाय उलट्या देखील होऊ शकतात आणि शरीराला एक प्रकारे फोड देखील येऊ शकतात.
  • मटन खाल्ल्यानंतर जर तुम्ही मध याचे सेवन करत असाल तर यामुळे देखील तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. मटन खाल्ल्यानंतर जर तुम्ही मधाचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या हृदयाला धोका पोहोचू शकतो. म्हणजेच हृदया संदर्भाचे आजार तुम्हाला येऊ शकतात.
  • मटन खाल्ल्यानंतर शक्यतो तुम्ही चहा पिण्याचे देखील टाळायला हवे. मटन हे गरम प्रकृतीचे असते. आणि त्यात जर अजून तुम्ही चहा याचे सेवन करत असाल, तर त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे ॲसिडीटी होण्याची शक्यता असते. म्हणजे, ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून मटन खाल्यानंतर तुम्ही चहा घेऊ नये.
  • बऱ्याच लोकांना कुठलाही पदार्थ खाल्ला की त्यानंतर सिगरेट अथवा बिडी ओढण्याची सवय असते. तर मटन खाल्ल्यानंतर देखील तुम्ही बीडी पीने अथवा सिगरेट ओढणे शक्यतो टाळायला हवे. यामुळे, तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
  • मटन खाल्ल्यानंतर आपण दही देखील खाऊ नये. मटन हे गरम प्रवृत्तीचे असते. शिवाय, दही ही थंड प्रवृत्तीची असते. तसेच मटणासोबत दहीचे सेवन देखील करू नये. थंड आणि गरम हे एकच वेळ शरीरात जात असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि मटण खाल्ल्यानंतर जर तुम्ही त्याचे सेवन करत असेल तर त्यामुळे तुमच्या अंगावर सफेदडाग  होण्याची शक्यता असते म्हणजे एक प्रकारे स्किन ऍलर्जी येऊ शकते.
  • मटन खाल्ल्यानंतर ते पचण्यासाठी भरपूर कालावधी लागत असतो. म्हणून, मटण खाल्ल्यानंतर तुम्ही शक्यतो काही गोष्टी खाणे जेवढे टाळले तेवढे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. शिवाय, मटन खाल्ल्यानंतर तुम्ही थोडी शतपावली करणे देखील योग्य ठरेल कारण, मटन पचण्यास थोडे जड जात असते. मटणाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी थोडे चालणे महत्त्वाचे ठरू शकते.
  • मटणासोबत अथवा मटन खाल्यानंतर पनीरचे देखील सेवन करणे शक्यतो टाळायला हवे. एक तर तुम्ही मटन खायला हवे, नाहीतर पनीर तरी. परंतु, दोघे एकत्र नाहीतर एकामागे एक तर अजिबात खाऊ नये. कारण हे दोघं शरीरांमध्ये एकत्रितरीत्या जमा झाले तर त्यामुळे, तुमच्या आरोग्याला त्याचा त्रास होऊ शकतो.
वाचा  उशिरा गर्भधारणा होण्याची कारणे व उपाय

तर मित्रांनो, जर तुम्ही मटन खात असाल मटणाचे विविध प्रकारचे डिशेस बनवून खात असाल, तर ते आवडीने खातो परंतु त्या सोबत विरुद्ध आहार अजिबात घेऊ नका. मटणासोबत किंवा मटन खाल्ल्यानंतर तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. कारण, यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. मटणासोबत दुग्धजन्य पदार्थ खाणे म्हणजेच हा एक विरुद्ध आहार आहे आणि जर आपण विरुद्ध आहार घेत असाल तर त्यामुळे अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. म्हणून शक्यतो तुम्ही मटण ज्यावेळी खात असाल तर तेव्हा त्याचे सेवन करा. त्यासोबत विरुद्ध आहार घेऊ नका. मटन खाल्ल्यामुळे तर अनेक प्रकारचे फायदे तुमच्या शरीराला होत असतात. फक्त त्यासोबत विरुद्ध आहार घेणे टाळायला हवे.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here