कानाचे ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी

0
3035
कानाचे ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी
कानाचे ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी

नमस्कार मित्रांनो. पंचमहाभूतांपासून आपले शरीर तयार झालेले असते. म्हणजेच आपल्या शरीराची पंचेंद्रिये ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे आपण वेळोवेळी यांची जेवढी योग्य काळजी घेऊन तेवढे आपल्या शरीराचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असते. पंचेंद्रिया मध्ये सर्वच इंद्रियांचे सारखेच महत्त्व असते. त्याचप्रमाणे कान हा देखील खूपच नाजूक अवयव आहे. बऱ्याच जणांना काना विषयी समस्या उद्भवत असतात. अनेक जणांना कान दुखी होने, कान ठणकणे अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. तर कित्येक जणांचे कानाचे ऑपरेशन देखील होत असते. मित्रांनो ऑपरेशन झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे यशस्वी होण्यासाठी कानाचे ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी माहित असणे गरजेचे असते.

योग्यवेळी जर आपण काना विषयी सतर्क राहिलो तर ऑपरेशनची वेळ देखील येऊ शकत नाही. म्हणून नियमितपणे आपण आपल्या पंचेंद्रिये यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. जर त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे धाव घेऊन आजार वाढण्याआधीच उपचार घेतले योग्य ठरू शकते. जेवढ्या पण स्वतःची आरोग्याची काळजी घेऊन आपला आरोग्य उत्तम राहण्यास देखील मदत होत असते. तर काही जणांचे कानाचे ऑपरेशन देखील झालेले असते. ऑपरेशन झाले म्हणजे सगळे व्यवस्थित झाला असेल नाहीतर ऑपरेशन नंतर देखील काही काळजी घ्यावयाची असते. तर मित्रांनो आज आपण कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे ? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, ऑपरेशन झाल्यानंतर काळजी कशी घ्यावी ? याविषयी खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

कानाचे ऑपरेशन करण्याची वेळ का येते ?

        मित्रांनो, कान हा आपल्या शरीराचा खूपच नाजूक असा अवयव आहे. त्यामुळे आपण हा कानाची जेवढी काळजी घेतो तेवढी आपल्यासाठी योग्य ठरेल. साधी सर्दी जरी झाली तरी काना विषयी समस्या उद्भवत असतात. अनेक वेळा साधे साधे आजार देखील गंभीर स्वरूप धारण करत असतात. अतिप्रमाणात सर्दी झाल्यामुळे, किंवा सतत सर्दी होत असल्यामुळे कानातून पाणी येऊ शकते. त्यामुळे कानातील पडद्याला इजा होऊ शकते त्यामुळे कानातील पडद्याला देखील होल देखील पडण्याची शक्यता असते. आणि यामुळेदेखील कानाचे ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. तसेच कानातील पडदा फाटल्यामुळे देखील ऑपरेशन करण्याची वेळ येत असते.

वाचा  गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय?

कानातून पु येणे अथवा कानातले छिद्र मोठे झाल्यास देखील ऑपरेशन करण्याची वेळ येत असते. ऐकायला कमी येणे यामुळे देखील कानाचे ऑपरेशन करण्याची वेळ येत असते. वारंवार सर्दी होत असल्यामुळे किंवा अतिप्रमाणात सर्दी झाल्यामुळे कानातील हाड असण्याची देखील शक्यता असते यामुळे कानाचे ऑपरेशन करण्याची वेळ येत असते. सर्दीमुळे नाक बंद होतात आणि श्वास घ्यायला त्रास होत असतो तसेच श्वास घेतो तेव्हा कानातल्या पडदे हे आत ओढले जातात त्यामुळे देखील कानांच्या पडद्यांना इजा होत असते आणि अशामुळे देखील काढण्याचे ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. मित्रांनो वरील सर्व कारणांमुळे कानाचे ऑपरेशन करण्याची वेळ येत असते. तसेच ऑपरेशन झाल्यानंतर देखील व्यवस्थितपणे कानांची काळजी घेतली गेली पाहिजे त्यामुळे ऑपरेशन हे सक्सेसफुल होते म्हणजेच यशस्वीरित्या पार पडते.

कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर कशाप्रकारे काळजी घ्यावी ?

          मित्रांनो, कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर कानांची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक ठरते. ऑपरेशन झाल्यानंतर जर आपण काही चुका केल्या तर पुन्हा ऑपरेशनची वेळ येऊ शकते. म्हणून योग्य प्रकारे आपण ऑपरेशन झाल्यानंतर कानांची काळजी घेणे आवश्यक आहे. तर ती कशी घ्यावी हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  • कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर आंघोळ करताना योग्य त्या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक ठरते.
  • आंघोळ करताना कानामध्ये कापसाचे बोळे घालून अथवा व्हॅसलीन चा  बोळा घालुन मगच आंघोळ तुम्ही करू शकतात. त्यामुळे कानामध्ये पाणी जाऊ शकणार नाही.
  • पाणी कानात जाणार नाही याची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. तसेच पाण्याने कान देखील धुवू नये.
  • कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर खोकला शक्यतो टाळावा. कारण खोकल्यामुळे कानावर ताण पडत असतो.
  • कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर दहा ते वीस दिवस चांगला आराम करावा म्हणजेच कानांना विश्रांती द्यावी.
  • कानामध्ये इयरफोन घालने शक्यतो टाळावे.
  • जास्तीत जास्त गोंगाटाच्या ठिकाणी जाऊ नये, कानांना जेवढा आराम मिळेल तेवढे फायदेशीर ठरेल.
  • कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर धूम्रपान करणे शक्यतो टाळावे.
  • ऑपरेशन झाल्यानंतर जास्त वजन उचलणे व जड काम करणे टाळावे.
  • कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर थंड तसेच तिखट पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
  • तसेच गरम पदार्थ आणि कडक पदार्थ खाणे टाळावे.
  • कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर जास्तीत जास्त त्रास होत असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन दाखवावे. आणि योग्य तो सल्ला घ्यावा.
वाचा  पायाचा अंगठा दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय :-

मित्रांनो, वरील प्रमाणे कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर काळजी घेणे आवश्यक ठरते. आणि वरील प्रमाणे सर्व काळजी घेऊन देखील अधिक त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल.

कानाचे ऑपरेशन करायला साधारण किती खर्च येऊ शकतो ?

      मित्रांनो, आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा अगदी मौल्यवान आहे. त्यामुळे आपण यांचे जेवढे जास्तीत जास्त काळजी घेऊ, तेवढे आपल्यासाठी उत्तम ठरेल. बऱ्याच जणांना कानाचे ऑपरेशन करण्याची वेळ येत असते. काना विषयी अनेक समस्या उद्भवत असतात. कानातून पाणी येणे ऐकायला कमी येणे, कानाचा पडदा फाटणे किंवा कानाच्या पडद्याला होल पडणे वगैरे. इत्यादी एक ना अनेक समस्या उद्भवत असतात आणि त्यामुळे ऑपरेशन करण्याची वेळ येत असते. बर्‍याच जणांना हा प्रश्न देखील पडलेला असतो की कानाचे ऑपरेशन करण्यासाठी साधारण किती खर्च येऊ शकतो ? तर मित्रांनो, साधारणपणे कानाची  समस्याही वेग-वेगळ्या प्रकारचे असते. त्यामुळे प्रत्येक ऑपरेशन वेगवेगळ्या प्रकारे करावे लागत असते. त्यासाठी खर्च देखील हा कमी जास्त असतो. तसेच खाजगी रुग्णालयामध्ये कानाचा पडदा बदलण्याची शस्त्रक्रिया जर असेल तर त्यासाठी साधारण वीस हजार रुपये इतका खर्च येत असतो. मित्रांनो, जिल्ह्याच्या रूग्णालयात, सरकारी रुग्णालयांमध्ये काही योजनेअंतर्गत मोफत देखील शस्त्रक्रिया करून देण्यात येते. त्यासाठी काही कागदपत्रे जमा करावी लागतात. आणि खाजगी रुग्णालयात तर जास्तीत जास्त खर्च येत असतो. म्हणून ऑपरेशनची वेळ येऊ नये यासाठी स्वतः व्यवस्थितपणे काळजी घेणे आवश्यक ठरते.

     मित्रांनो, वरील प्रमाणे कानाचे ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी या विषयी आपण माहिती जाणून घेतली आहे. कानाचे ऑपरेशन झाल्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या प्रकारचे काळजी घेणे आवश्यक ठरते. यासाठी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला तुम्ही नक्की घ्या. वरील प्रमाणे आम्ही सांगितले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

वाचा  श्वास घेताना आवाज येणे कारण व उपाय

   

                  धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here