वेलदोडा खाण्याचे फायदे काय आहे जाणून घेऊयात

0
880
वेलदोडा खाण्याचे फायदे
वेलदोडा खाण्याचे फायदे

वेलदोडा खाण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. आपल्याला आपल्या तब्येत संबंधी काही त्रास उद्भवला तर आपण लगेच मेडिकलमध्ये जाऊन औषध घेत असतो. परंतु मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरात अशा वस्तू आहेत की ज्या वस्तूंचा आपण आपल्या तब्येतीसाठी देखील बऱ्याच प्रमाणात उपयोग करून घेऊ शकतो. आपली आई स्वयंपाक करण्यासाठी अनेक मसाले पदार्थ वापरत असते. तर अगदी स्वयंपाक घरातील काही मसाले पदार्थांचा उपयोग आपण आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी देखील करून घेऊ शकतो. स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारी अशी काही मसाले पदार्थ आहेत की ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा भरपूर प्रमाणात फायदा होत असतो. मसाले पदार्थ म्हटले की भरपूर प्रकारे त्याचे प्रकार येत असतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला ज्या विषयी सांगत आहे तो म्हणजे वेलदोडा. हो मित्रांनो, वेलदोडा हा आकाराने जरी लहान असला तरी त्याचे बहुगुणी उपयोग आहेत. वेलदोडा हा हिरव्या कलरचा असतो. तो आकाराने देखील खूपच छोटा असतो. परंतु वेलदोडा चे फायदे म्हटले तर हे फार मोठे मोठे असतात. म्हणतात ना “मूर्ती लहान परंतु कीर्ती महान”वेलदोडा हा आकाराने खूप छोटा असला तरी आपल्याला याचे बहुगुणकारी फायदे होत असतात.

      वेलदोडा याचा सुगंध देखील खूप छान असतो. वेलदोडा हा खाल्ल्यामुळे खूप फायदे होऊ शकतात. बरेच जण वेलदोडा चावून खात असतात कारण तोंडातील दुर्गंध असतो तो जाण्यास वेलदोडा खाल्ल्याने मदत होते. म्हणजे त्याचा आपण एक मुखवास म्हणून देखील उपयोग करू शकतो. अनेक जण शोप चे भांडे तयार करतात, तेव्हा एक कप्पा हा हमखास वेलदोडा यासाठी राखून ठेवतात. जेवण झाल्यावर बडीशेप खाण्याचे सोबत वेलदोडा देखील खायला जात असतो. वेलदोडा आपण चहा मध्ये टाकून घेतल्याने देखील गुणकारी फायदे होतात. फार पूर्वीच्या काळापासून वेलदोड्याचे उपयोग अनेक लोक करत आलेले आहेत. तर मित्रांनो आज आपण वेलदोडा खाण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, वेलदोडा खाल्ल्याने कुठल्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात? याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

वाचा  लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय

वेलदोडा खाण्याचे फायदे:-

आपल्या स्वयंपाक घरात मसाल्याच्या पदार्थांमधील अगदी सहजरित्या उपलब्ध होणारा एक पदार्थ होतो म्हणजेच वेलदोडा होय. मसाले म्हणून याचा उपयोग केला जात असतो त्याचप्रमाणे वेलदोडा खाण्याचे देखील  बहुगुणकारी फायदे आपण होऊ शकतात. तर मित्रांनो वेलदोडा खाण्यामुळे आपल्या कसे फायदे होऊ शकतात याविषयी आपण आता जाणून घेऊयात.

  1. ज्या लोकांना अन्न अपचनाचा त्रास होत असेल, म्हणजेच अपचनाची समस्या येत असेल तर अशा लोकांनी जेवणानंतर एक वेलदोडा रोज खाल्ला पाहिजे. वेलदोडा खाल्ल्यामुळे अपचनाची समस्या दूर होऊन खाल्लेले अन्न लवकर पचन होण्यास मदत होत असते.
  2. अनेक जणांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो. सर्दी खोकल्याचा त्रास होऊ नये यासाठी रोज नियमितपणे एक वेलदोडा खाल्ला पाहिजे. वेलदोडा खाल्ल्यामुळे छातीमध्ये कफ होत नाही.
  3. बऱ्याच लोकांना मळमळ होणे, पित्त होण्याची समस्या येत असते तर अशावेळी तुम्ही तोंडामध्ये वेलदोडा चघळून खावा अथवा दाताने चावून खाल्ला पाहिजे. त्यामुळे, हा त्रास दूर होऊ शकतो.
  4. आपण जेवण केल्यानंतर दातांमध्ये अन्नकण अडकत असतात आणि जर जेवणानंतर ब्रश केला नाही तर यामुळे तोंडाचा दुर्गंध येऊ शकतो. तर तोंडाचा दुर्गंध येऊ नये यासाठी तुम्ही वेलदोडा चावून खाल्ला पाहिजे. म्हणजेच एक प्रकारे मुखवास म्हणून देखील आपण याचा उपयोग करू शकतो.
  5. थंडीच्या दिवसांमध्ये आपण चहामध्ये रोज एक वेलदोडा टाकून चहा बनवायला हवा. जेणेकरून, सर्दीच्या समस्या पासून आपण दूर राहू शकू व छातीमध्ये कप देखील जमणार नाही.
  6. अनेक जणांना पोटासंदर्भात तक्रारी होत असतात जसे की पोटात गॅस होणे. तरी यासाठी तुम्ही वेलदोडे जाऊन खाल्ले पाहिजे. यामुळे पोटात गॅस होण्याची समस्या येणार नाही शिवाय खाल्लेल्या अन्नाचे लवकर पचन होण्यास देखील मदत होईल.
  7. बरेच लोकांना  कोलेस्टेरॉलची समस्या येत असते. तर अशा वेळी तुम्ही नियमित वेलदोड्याचे सेवन करायला हवे. जेणेकरून याचा त्रास होणार नाही. वेलदोडा नियमित खाल्ल्यामुळे रक्तदाबाची समस्या देखील येत नसते.
  8. वेलदोडा खाल्ल्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी देखील जमत नाही. कारण अपचनामुळे व्यवस्थित पचन होत नाही व त्याचे रूपांतर हे चरबी मध्ये होत असते. म्हणून नियमित रोज एक वेळा चावून खाल्ला पाहिजे जेणेकरून खाल्लेले अन्न पचन होऊन त्याचे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमणार नाही.
  9. अनेक जणांना ॲसिडिटीची समस्या देखील होत असते. तर ॲसिडिटीच्या समस्या पासून दूर राहावे असे जर वाटत असेल तर रोज एक वेलदोडा चावून खाल्ला पाहिजे अथवा तोंडामध्ये चघळला पाहिजे. जेणेकरून, आपण ॲसिडिटी सारख्या समस्यांपासून दूर राहू शकतो.
  10. जेव्हा आपली आई गुलाबजामून बनवत असते, तर तेव्हा साखरेच्या पाकामध्ये वेलचीपूड देखील घालत असते. कारण यामुळे बनवलेल्या वस्तूला चव देखील येते आणि ते पचन होण्यास देखील मदत होत असते. म्हणूनच आई गुलाब जामुन बनवताना त्यामध्ये वेलची पूड घालत असते.
  11. बऱ्याच जणांना भूक न लागण्याची समस्या येत असते. म्हणजेच जेवण करावेसे वाटत नसते. जेव्हा अशी समस्या येईल तेव्हा तुम्ही नियमित वेलदोड्याचे सेवन करायला हवे. कारण, वेलदोडा खाल्ल्याने भूक जास्त प्रमाणात वाढत असते. म्हणूनच मित्रांनो रोज एक वेलदोडा चावून खाल्ला पाहिजे.
  12. वेलदोडा नियमीत दातांनी चावून खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन ची समस्या देखील येत नाही. म्हणजेच आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित प्रकारे चालू राहते.
  13. अनेक जणांना बीपीचा त्रास होत असतो त्यामुळे तुम्ही रोज एक वेगळा चावून खाल्ला पाहिजे नाहीतर पाण्यामध्ये वेलदोडा उपवन त्या पाण्याचे सेवन तरी करायला हवे.
  14. जेव्हा सर्दी खोकला झाला असेल तर अशा वेळेस तुम्ही सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये वेलदोडा व्यवस्थित उकळून घेऊन त्या पाण्याचे सेवन करायला हवे. यामुळे सर्दी देखील जाईल आणि खोकल्याची समस्या देखील होणार नाही शिवाय देखील होणार नाही.
  15. अनेक जणांना केस गळती या विषयी समस्या होत असते. जर तुम्हाला असे वाटत असेल की, आपली केस गळती होऊ नये, आणि आपले केस देखील लांब सडक व दाखवावे तर अशावेळी तुम्ही रोज रात्री दोन-तीन वेलदोडे हे चावून खायला पाहिजेत. नाहीतर एक ग्लास पाण्यामध्ये दोन वेलदोडे उकळून त्या पाण्याने सेवन करायला हवे. असे तुम्ही नियमित केल्यामुळे तुमची केस गळती लवकर थांबण्यास मदत होईल शिवाय केस देखील लांब सडक होतील.
  16. डोळ्या संदर्भात आपणास विकार उद्भवू नये, यासाठी देखील वेलदोडे खाल्ल्याने फायदे होत असतात.
  17. अनेक जणांना मुत्रविकार याची देखील समस्या असते तर यासंदर्भात त्रास होऊ नये यासाठी देखील तुम्ही नियमित वेलदोड्याचे सेवन करायला हवे.
  18. बऱ्याच जणांना पोट साफ न होण्याची समस्या येत असते. जर तुम्ही नियमितपणे एक ते दोन वेलदोड्याची सेवन करत असाल तर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत जाईल.
  19. अनेक वेळा सर्दी खोकला मुळे आवाज बसण्याची समस्या येत असते. अशावेळी तुम्ही वेलदोडा चावून अथवा चघळून खाल्ला पाहिजे.
  20. जर उलटीचा त्रास होत असेल आणि उलटी थांबत नसेल तर अशावेळी तुम्ही वेलदोड्याचे सेवन करायला हवे यामुळे लगेच उलटी थांबण्यास मदत होते.
वाचा  डोळ्यांची जळजळ होणे उपाय

छोटासा वेलदोडा पण वेलदोडा खाण्याचे किती फायदे होऊ शकतात, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. वस्तू छोटी असो वा मोठी असो प्रत्येक वस्तुनुसार त्याचे गुणधर्म वेगवेगळे प्रकारचे असतात. वेलदोडा खाण्यामुळे आपण अनेक प्रकारच्या समस्या पासून दूर राहू शकतो.

         तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून करू शकतात.

 

     धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here