गरोदर आहे हे किती दिवसात कळते

0
1563
गरोदर आहे हे किती दिवसात कळते
गरोदर आहे हे किती दिवसात कळते

नमस्कार, हल्लीच्या धावपळीच्या युगात, तसेच महागाई च्या दुनियेत, जो तो ज्याच्या त्याच्या करियरच्या मागे असतो. आणि असणारच, कारण आता महागाई इतकी  झाली आहे, की त्या मध्ये नवरा आणि बायको या दोघांनाही काम करावे लागते.  घराचा खर्च, घराचे मेंटेनन्स, लोन, सारख्या प्रॉब्लेम असला. त्या दोघांनी एकत्र मिळून सोडावे लागते. तसेच हल्ली जो तो लग्न करायच्या वेळेस सहसा करून मुलगी नोकरी ला असली, तरी चालेल असे म्हणतो. असणारच आणि आपण तसेही करतो, काही जणांच्या तसे नसते, काहीजणांना घरीच राहून वर फ्रॉम होम करून, काम करायला आवडते. तसेच काही स्त्रिया या हाउसवाइफ असतात. प्रत्येक लोकांचे असे म्हणणे असते, की लग्नानंतर आपण बाळाची प्लॅनिंग ही आपल्या बजेट वरून, तसेच कामाचे नियोजन आखूनच करायला हवी. अनेक स्त्रियांच्या मनात असते, की गरोदर पण राहिले हे कसे समजते? ते आज आपण जाणून घेणार आहोत कि गरोदर आहे हे  किती दिवसात कळते ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

तुम्ही (प्रेग्नेंट) गरोदर आहात हे केव्हा कळते ? 

लग्नानंतरची नवे फुलं उमललेली असताना, नवीन पाहुण्यांचे आगमन केव्हा होते ? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली असते !  तसेच आजी, बाबा, मावशी, मामा, सगळेच म्हणतात, की पाहुणे कधी येणार आहे तुझ्याकडे, त्यावेळी आपण थोडे लाजून आपल्या गालावर कळी येते. तसेच तो दिवस किती सुंदर असतो ना ! ज्यावेळी तुम्हाला कळते, की तुम्ही आई आणि बाबा होणार आहेत. खरंच तो आयुष्यातील अविस्मरणीय घटना असते. आज आपण बघणार आहोत की गरोदर आहे, हे केव्हा कळते. तर तुमच्या शारीरिक संबंधांनंतर एक ते दोन आठवड्यामध्ये तुम्ही गरोदर आहे  हे कळू शकते.

वाचा  केसांना फाटे आले असतील तर ? काही घरगुती उपाय !

तसेच स्त्रियांचे मासिक चक्र हे 21 ते 28 दिवसांचे असते, तुमचे हे चक्र चुकले, त्यावेळी तुम्ही प्रेग्नेंट आहात असेही असू शकते. तसेच काही जणांचे मासिक चक्र हे 32 ते 40 दिवसांची ही होऊ शकते. कधीकधी हार्मोन इंन बॅलेन्स, मानसिक थकवा, यामुळे हे मासिक चक्र चुकू शकते. त्यावेळी तुम्ही लगेच निदान लावू नका, की तुम्ही प्रेग्नेंट आहात. तुम्ही किमान सव्वा ते दीड महिना वाट बघावी. जर पाळी आली नाही, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकतात. तसेच घरच्या घरी पट्टी आणून, चेक करून दवाखान्यात जावे. 

प्रेग्नेंसी किट(पट्टी) वर कसे चेक करावे ? 

आता हल्ली मार्केटमध्ये, प्रेग्नेंसी चेक करण्याचे किट मिळतात. ते काही जास्त महाग नसतात, 50 ते 60 रुपयांपर्यंत मिळतात. ते तुम्ही आणून द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर, तुमची जी पहिली लघवी असते, ती घेऊन किट खोलून, त्या किट मध्ये गोल पॉईंट केलेला असतो, तेथे दोन थेंब टाकावेत. त्यानंतर दोन लाइनी असतात. एक लाईन निगेटिव्ह, आणि दुसऱ्या लाईन पॉझिटिव्ह, त्यावेळी पॉईंट मध्ये तुमची लघवी टाकतात, त्या वेळी तिथे पाच मिनिटे वाट बघावी. त्यानंतर तिथे एक लाईन त्यानंतर दुसरी रेड लाइन म्हणजेच दोघी लाइन जर लाल आल्यावर  तुम्ही प्रेग्नेंट आहात, असे समजावे. जर तुमच्या तिथे एकच लाईन आली, तर तुम्ही निगेटिव्ह, म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट नाहीत. म्हणजे तुमची हार्मोनल इंन बॅलेंस मुळे तुमची पाळी चुकली असेल, असे समजावे, आणि समजा दोन लाईन आलेत. तर  त्याच दिवशी, तुम्ही डॉक्टरांना त्वरित दाखवावे. 

तुम्ही गरोदर आहात त्याची कोणती लक्षणे असतात ?

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की तुम्ही गरोदर आहात, हे कसे चेक करावेत. आता आपण त्याची काही लक्षणे, जाणून घेणार आहोत. 

  • जर तुम्ही गरोदर राहिले, तर तुमची पहिले पाळी चुकते. 
  • तुम्हाला सारखे मळमळल्या सारखे वाटते. 
  • तर कोणाला उलट्या होतात. 
  • जेवण करावेसे वाटत नाही, 
  • तर काहीजणांना, काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. 
  • सारखे सारखे लघवीला जावेसे वाटते. 
  • तसेच तुमचे स्तन जड व कडक  असल्यासारखे वाटते. 
  • तोंडात कडू कडू असल्यासारखे, ही वाटते. 
  • तसेच चिडचिडेपणा होतो. 
  • तर काही स्त्रियांना या सगळ्यांचा काहीच त्रास होत नाही. 
वाचा  मुलांची उंची किती वयापर्यंत वाढते

डॉक्टरांना केव्हा दाखवावे ? 

ज्यावेळी तुमचे मासिक चक्र चुकते, त्यावेळी तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकतात. दवाखान्यात गेल्यावर ते तुमची प्रेग्नेंसी चेक करतात, व त्यामध्ये रक्त आणि लघवी यांचेही नमुने घेतात. आणि त्यावर ते तुम्हाला सांगतात, की तुम्ही गरोदर आहात की नाही, त्यावर तुमचे गरोदरपण समजते. तसेच तुम्ही घरी पट्टी आणून चेक केल्यावर, जर तेथे पॉझिटिव्ह लाईन्स आल्यात, तर तुम्ही दवाखान्यात दाखवून डॉक्टरांकडून ही चेक करून घ्यावे. कारण कधीकधी ते चुकीचेही येउ शकते. तसेच ज्या वेळी तुम्ही गरोदरपण म्हणजे प्रेग्नेंसी चेक करतात, त्यावेळी तुमचे रक्त लघवी चे नमुने घेतल्यावर खरे समजाते. मग त्यानुसार डॉक्टर तुम्हाला औषधी व गोळ्या व तुमचा आहार चालू करतात. 

गरोदरपणात काय काळजी घ्यावी ? 

जर तुम्ही गरोदर असतात, त्यावेळी तुम्ही तुमचे आहाराची व तब्येतीची काळजी घ्यायला हवी. कारण तुम्ही एका जीवनातून, दोन जीवांमध्ये निर्माण झालेले असतात. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, बीट, खजूर, यासारखे पदार्थ तुमच्या आहारात घ्यायचे. तसेच रोजच्या रोज नारळाचे पाणीही प्यायला हवेत. तसेच फळांचा जूस प्यायला हवा. तुम्हाला जे खावेसे वाटते ते आवर्जून खा. तसेच तुम्ही तिखट, मसालेदार पदार्थ व बेकरीचे पदार्थ खाणे, शक्यतो टाळावेत.

तसेच तुम्ही गरोदरपणामध्ये एखाद्या महान पुरुषाच्या व स्त्रियांचे पुस्तके वाचू शकतात. त्याने त्यांचे संस्कार तुमच्या बाळावर पडतात. तसेच तुम्ही मधुर संगीत एकावे. रोजच्या रोज व्यायाम गर्भवती महिलांसाठी असतात, ते  करावेत. तसेच रोजच्या रोज चालायला जावे. तसेच तुम्ही जास्तीचा प्रवास करू नये. तसेच तुमचे जेवण वेळेवर करायला हवे. कारण प्रेग्नेंसी दरम्यान ऍसिडिटी, सारख्या समस्या होतात. याची काळजी घ्यावी. तसेच तुमच्या शरीराला पुरेशी पाण्याची गरज आहे, तुम्ही दिवसातून नऊ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवे. तसेच जड वस्तू उचलून नका, ते धोकादायक असते. तसेच कठीण परिश्रम असणारे, काम करू नका. ही काळजी तुम्ही गरोदरपणात घ्यावी. 

वाचा  पायावर पुरळ येणे या समस्या ची लक्षणे व घरगुती उपाय :-

चला, तर आज आम्ही तुम्हाला गरोदरपण राहिले, म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात, हे कसे समजते, व कोणत्या वेळी समजते. तसेच गरोदर राहिल्यावर काय काळजी घ्यावी, हेही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                         धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here