डिलिव्हरी नंतर मासिक पाळी केव्हा येते

0
1714
डिलिव्हरी नंतर मासिक पाळी केव्हा येते
डिलिव्हरी नंतर मासिक पाळी केव्हा येते

डिलिव्हरी नंतर मासिक पाळी

नमस्कार, मैत्रिणींनो ज्यावेळी आपली प्रसूती होते, त्यावेळी आपण एका बाळाला जन्म देतो. त्यावेळी आपले मन त्याच्यातच लागून जाते, प्रसूती झाल्यावर आपण बाळाची देखभाल करतो, तसेच त्याला आपल्या दुधा मार्फत योग्य आहार देतो, प्रसुतीनंतर जेव्हा बाळांतीन बाळाला दुध पाजते, त्यावेळी त्याला तिच्या दुधातून पोषक विटामिन्स युक्त आहार बाळाला मिळतो, पण ती एका चिंतेत राहते, की माझी पाळी आली नाही, तर मी गरोदर तर नाही राहणार ना पुन्हा. तर आज आपण बघणार आहोत  अनेक स्त्रियांना डिलिव्हरी नंतर मासिक पाळी केव्हा येते या बाबतीत शंका असतात.    

ज्या वेळी डिलिव्हरी होते, तेव्हा सव्वा महिना नॉर्मल अंगावरून रक्तस्राव हा बाळंतिणीला जातोच. पण त्यानंतर तिची पाळी येते, केव्हा येते काही जणांची तर एका महिन्यातच येऊन जाते, तर काही बाळांतीन यांची मासिक पाळी तीन ते चार महिन्यानंतर, तर काहींची नऊ महिन्यानंतर, जर काही काहीच्या वर्षभरानंतरही येऊ शकते, हे तुमच्या बाळाला दूध पाजणे, यावर अवलंबून असते. ज्यावेळी तुम्ही बाळाला स्तनपान करतात. त्यावेळी तुमची पाळी उशिरा येते. अनेकांच्या मनात शंका असते, की पाळी इतक्या उशिरा का येते? कोणत्या कारणामुळे येते? ते आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात! 

डिलिव्हरी व मासिक पाळी म्हणजे नेमके काय? 

जेव्हा एखादी स्त्री एका बाळाला जन्म देते, त्यावेळी तिची डिलिव्हरी होते. डिलेवरी म्हणजे एका जिवातून दोन जीवांची निर्मिती होणे.  तुम्ही प्रेग्नेंट असतात, असे वेळी तुमची पाळी चुकते. त्यानंतर ती डिलिव्हरी झाल्यावरच येते. डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला अधिक रक्तस्राव होतो. त्यामध्ये नऊ महिन्याचे साठलेले रक्त हे बाहेर निघते. त्यानंतर तुम्हाला दिड ते सव्वा महिन्यापर्यंत नॉर्मल अंगावरून जाऊ शकते, त्यानंतर ती रक्तस्राव थांबते. तर त्यानंतर तुमची पहिली पाळी येते, काही महिलांच्या मनात शंका असते, की पाळी एवढे उशिरा का येते? कोणत्या कारणामुळे येते? तर डिलिव्हरी नंतर पाळी ही कधी कधी महिन्याभरानंतर ही येऊ शकते, पूर्वी माझी आजी म्हणायची की, डिलिव्हरी नंतरची पहिली पाळी येते ती न्हानी  पलटवायला येते, त्यानंतर तिच्या मध्ये एक दीड महिन्याचा गॅप होतो, पण जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल, बाळाला दूध पाजत असाल, तर त्यावेळी तिचा कालावधी शक्यतो, लांबणीवर जातो. ज्यावेळी तुम्ही बाळाला वरचा आहार, सुरू करतात, त्यावेळी बाळाचे स्तनपान हे कमी प्रमाणात होत जाते, त्या वेळी डिलिव्हरी नंतर पाळी येते. कारण स्तनपान करताना, तुमच्या शरीरातील विशेष घटक द्रव्य, दुध तयार करण्यामध्ये जातात, त्यामुळे तुमची पाळी उशिरा ही येऊ शकते. 

वाचा  लहान मुले तणावात आहे हे कसे ओळखावे

डिलिव्हरी नंतर ची मासिक पाळी कशी येते? 

सहसा करून डिलिव्हरी नंतरची पाळी ही काहीजणांना वेदनाशक होऊ शकते. तर काही जणांना अगदी नॉर्मल अंगावरून गेल्यासारखे होते. तर काही जणांची अंगावरून अतिशय काळसर रक्त जाते, तर काहींच्या अंगावर गाठी जातात. हे ज्याच्या त्याच्या शरीरात रचनेवर अवलंबून असते. तसेच बाळाच्या दूध पिणे यावरही अवलंबून असते, त्यामध्ये घाबरण्यासारखे काही कारण नसते, आणि समजा तुम्हाला अतिशय प्रमाणात रक्तप्रवाह जात असेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवावे. तसेच डिलीवरी नंतर पहिली पाळी आल्यावर, दुसरी किंवा तिसरी पाळी मध्ये अनियमित मासिक चक्र ही होऊ शकते, जर तुमच्या पाळीनंतर चे चक्र जास्त लांबणीवर असेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवून द्यावे. 

चला, तर मग मैत्रिणिनो आज आम्ही तुम्हाला, डिलिव्हरी नंतर पाळी केव्हा येते, व कोणत्या कारणांनी, उशिरा येऊ शकते, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही त्याला माहितीमध्ये, जर तुम्हाला शंका वाटत असेल, तर तुम्ही डॉक्टरांनाही विचारू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या, माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                      धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here