सूर्यनमस्कार करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

0
555
सूर्यनमस्कार करण्याचे फायदे
सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

 

 नमस्कार, मित्रांनो योगासन हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. तसेच तब्येतीकडे लक्ष देत नाही तसेच अवेळी खाणे, जागरण करणे, अपूर्ण झोप होणे,   जंकफूड खाने, या सर्वांचा प्रभाव आपल्या शरीरावर दिसतो. त्यामुळे आपल्याला सारखे आजारपण येते मनस्थिती चांगली राहत नाही चिडचिड होतो, अश्यावेळी आपण योगासने करायला हवेत. योगासने हे पूर्वीच्या काळापासून केले जातात योगासन केल्यामुळे आपण खूप साऱ्या समस्यांपासून दूर राहतो. योगासनांमध्ये प्रकार असतात. त्यामध्ये कपालभारती, सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, धनुरासन, नौकासन, वज्रासन, भद्रासन, ताडासन, वीरभद्रासन, असे अनेक व्यायामांचे प्रकार असतात, आणि त्यानुसार आपल्या शरीराला त्याचे फायदे होतात. व्यायाम केल्याने आपले शारीरिक ताणतणाव दूर होतात. आपले मन स्थिर राहते व आपले मन आपल्या ताब्यात राहते. तसेच शारीरिक विकार योगासने केल्याने दूर होतात. त्यात आज आपण जाणून घेणार आहोत, की सूर्यनमस्कार केल्याने आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, व सूर्यनमस्कार कोणत्या प्रकारे करावेत? कोणत्या वेळी करावे? चला तर मग जाणून घेऊयात सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

सूर्यनमस्कार केल्याने होणारे फायदे? 

मित्रांनो सूर्यनमस्कार केल्याने आपल्या शरीराला त्यापासून खूप सारे फायदे होतात. त्याबाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. 

तुमच्या शरीराची लवचिकता वाढते:

म्हणतात ना दिवसाची सुरुवात ही सूर्यनमस्कार ने करावीत. सूर्यनमस्कार केल्याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात. सूर्य नमस्कार म्हणजे बारा आसनांचा क्रम होय. जर तुम्ही नियमित सूर्यनमस्कार केला, तर तुमच्या स्नायूंची लवचिकता ही वाढते, त्या बारा आसनांमध्ये तुमच्या एक-एक स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे तुमचे शरीर तुम्हाला तंदुरुस्त असल्यासारखे वाटते. तसेच तुम्हाला उठतांना बसताना, त्याचा त्रास होत नाही. त्यासाठी तुम्ही नियमित सूर्यनमस्कार करायला हवा, सूर्यनमस्कार हा सकाळी उठून करावा. हे आहेत सूर्यनमस्कार करण्याचे फायदे जे खूप महत्वाचे आहेत.

तुमचे वजन कमी होते:

हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये, वजन वाढीच्या समस्या खूप बघावयास मिळतात. त्यांचे शरीर इतके जाड होते, की त्यांना धाप लागते. चालताना बोलताना घाम येतो, आणि शरीरात एकदाच फॅट जमा झाला, की त्यांनी आजारांना निमंत्रण दिल्यासारखे होते अशावेळी जर त्यांनी रोजच्या रोज व्यायाम केले, तर त्यांना फायदा होतो. त्यासाठी जरी त्यांनी रोज दिवसातून सूर्यनमस्कार एकदा जरी केला, तरी त्यांचे वजन कमी होण्यास मदत मिळते. सूर्यनमस्कार मध्ये पूर्ण शरीराचा चा व्यायाम होतो, स्त्रियांचे बाळंतपणानंतर वाढलेले शरीर सूर्य नमस्कार केल्याने कमी होते. कारण सूर्य नमस्कार दरम्यान सगळ्या स्नायूंना ताण पडतो. सुरुवातीचे काही दिवस त्रास होतो. पण एकदा ची सवय झाली, की तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सूर्यनमस्कार करता येत जाईल. व तुमचे वजन कमी होईल. हे आहेत सूर्यनमस्कार करण्याचे फायदे जे खूप महत्वाचे आहेत.

वाचा  पिंपळाच्या पानाचा वापर केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

मानसिक ताण तणाव कमी होतो:

दररोज तेच काम तेच ऑफिस यामुळे जसे धावपळ केल्यामुळे तुमचे मानसिक संतुलन हे चिडचिडे होते. तुमची राग-राग होते तसेच मुलांचे शाळेचे खर्च, घराचा खर्च, लोनचा खर्च, यासारख्या गोष्टींमुळे चिडचिड मनस्थिती होऊन जाते. अशावेळी आपले मन उदास होऊन जाते. जर तुम्हाला तुमच्या मनाला फ्रेश हवे असेल, तर तुम्ही जर सूर्य नमस्कार केला, तर तुमचा हा सगळा मानसिक ताण तणाव कमी होतो. तुमची मनस्थिती चांगली होते. तुमची सहनशीलता वाढते व तुम्ही एक एकाग्रतेने तुमचे काम करतात. त्यामुळे जर तुम्ही सकाळी उठून फ्रेश मनाने सूर्य नमस्कार केला, तर दिवस तुमचा चांगला जातो. हे आहेत सूर्यनमस्कार करण्याचे फायदे जे खूप महत्वाचे आहेत.

तुमची स्किन अगदी तरुण व टवटवीत दिसते:

रोजच्या धावपळीमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे तसेच अवेळी खानपान मुळे, त्याचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. तसेच वयाच्या पेक्षा आपण लवकर म्हातारे दिसायला लागतो. आपण आपल्या त्वचेची काळजी घेत नाही. जर तुम्ही नियमित योगासने केले तसेच सूर्यनमस्कार केले, तर तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो. शिवाय तुमच्या चेहऱ्यावर  नॅचरली ग्लो येतो व तुम्ही ताजेतवाने असल्यासारखे  वाटते. अगदी तरुण झाल्यासारखे होते. तसेच त्वचेमध्यील सैलसरपणा, सुरकुत्या असतात  त्या निघून जातात. त्वचा अगदी टवटवीत दिसते. तसेच सूर्यनमस्कार केल्याने तुमची बॉडी सुडोल होते. 

मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात:

हार्मोन्स इनबॅलेन्स तसेच प्रदूषणाचा प्रभाव, केमिकल युक्त गोळ्या खाणे यासारख्या गोष्टींमुळे स्त्रियांची मासिक पाळी लांबते. तसेच अनियमित होते व मासिक पाळी नियमित आली नाही, तर त्यांची शरीर वाढते, त्यांचे वजन वाढते, त्याची चिडचिड होते, तसेच त्यांना पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम या सारखे प्रॉब्लेम होतात. गर्भाशयामध्ये गाठी होतात. अशा वेळी जर त्यांनी नियमित व्यायाम केले, तर यासारख्या समस्येवर त्यांना आराम मिळतो. तसेच जर त्यांनी रोजच्या रोज दिवसातून सुरुवातीला दोन वेळेस जर सूर्यनमस्कार केले, तरी त्यांना फरक पडेल. त्यानंतर सूर्यनमस्कार करण्याची संख्या तुम्ही वाढवू शकतात.  पण ते नियमित करायला हवेत. त्यामुळे त्यांची पाळी रेगुलर येण्यासाठी मदत होते. 

वाचा  हिरडा खाण्याचे फायदे

सूर्य नमस्कार केल्याने अजून काही फायदे होऊ शकतात. 

  • सूर्यनमस्कार केल्याने, तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत नाही. 
  • नियमित व्यायाम केल्याने शरीर लवचिक बनते. 
  • गुडघे दुखी, कंबर दुखी चा त्रास होत नाही. 
  • मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. 
  • तुमचे सुलभरीत्या पोट साफ होते. 
  • ऍसिडिटी, अपचन, गॅसेस सारखे त्रास होत नाहीत. कारण सूर्य नमस्कार केल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. 
  • मणक्याचे दुखणे कमी होते. 
  • लहान मुलांनी सूर्य नमस्कार केला तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. 
  • तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार केला, तर तुमच्या शरीराला विटामिन डी ची कमतरता पूर्ण होते. 
  • तुमचे मन एकाग्र होते स्थिर राहते, त्यामुळे चिडचिड होत नाही. 
  • तसेच नियमित सूर्यनमस्कार केल्याने, शरीरातील पूर्ण अवयवांना तुमचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. 

मित्रांनो एवढे सारे फायदे सूर्यनमस्कार केल्‍याने मिळतात. मग आजपासूनच तयारीला लागा आणि रोज सूर्य नमस्कार करा व तुमची शरीर निरोगी बनवा. तसेच आता आपण जाणून घेणार आहोत, की सूर्यनमस्कार कोणत्या वेळी व किती वेळा करावा. चला तर मग जाणून घेऊयात! 

सूर्यनमस्कार करण्याची वेळ:

सूर्यनमस्कार हा शरीरासाठी फार फलदायी आहे. म्हणूनच तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार संपूर्ण भारत देशात आवर्जून केला जातो. तुम्ही जर नियमित सूर्यनमस्कार केला, तर तुम्ही निरोगी राहतात. शिवाय तरुण राहतात. तसेच लहान मुलांनी सूर्यनमस्कार केला, तर त्यांची एकाग्रता वाढते. बौद्धिक विकास होतो. सूर्यनमस्कार हा नेहमी सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात करायचा आहे. कारण सकाळचे सूर्य जर तुम्ही नियमित सूर्यनमस्कार केला, तर तुमच्या शरीराला विटामिन डी स्त्रोत परिपूर्ण मिळतो, तसेच सूर्यनमस्कार हा तुम्ही कितीही वेळा करू शकतात. पण सूर्यनमस्कार करताना, सुरुवातीला अगोदर एकदा, नंतर दोनदा,  अशी संख्या वाढवून करावेत. तुमच्या कॅपॅसिटी नुसार करावेत. तसेच सूर्यनमस्कार मध्ये बारा आसन  असतात. या बारा आसनांवर तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवाचा विकास होतो. 

वाचा  मन शांत ठेवण्यासाठी काय करावे या समस्येवर वेगवेगळे उपाय :-

सूर्यनमस्काराची बारा आसनांची नावे:

सूर्यनमस्कार मध्ये बारा आसन असतात. त्यांची नावे जाणून घेऊयात. 

  • प्रणामासन         
  • हस्त-उत्तासन
  • पादहस्तासन
  • अश्व संचालनासन
  • पर्वतासन
  • साष्टांग नमस्कार
  • भुजंगासन
  • पर्वतासन
  • अश्व संचालनासन
  • पादहस्तासन
  • हस्त-उत्तासन
  • प्रणामासन

मित्रांनो ही सूर्यनमस्काराची बारा नावे आहेत. 

चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सूर्य नमस्कार केल्यामुळे, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ते सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सूर्यनमस्कार कोणत्या करावे ते सांगितले आहेत. तसेच सूर्यनमस्काराची नावे सांगितलेले आहेत. तसेच जर तुम्हाला सूर्यनमस्कार करण्याच्या पद्धती बघायची असेल तर तुम्ही युट्युब वर ही बघू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                     धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here