दही खाण्याचे फायदे व तोटे

0
870
दही खाण्याचे फायदे व तोटे
दही खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार, मित्रांनो दही खाण्याचे फायदे भरपूर आहेत. दही कोणाला आवडत नाही. अगदी लहानापासून सगळ्यांना आवडते. दुधा  पासून दही ची निर्मिती होते. दही अगदी चविष्ट आणि आंबट गोड अशी चव असते. आपण दही आपल्या स्वपांकपाक घरात वापरतो. दही पासून आपण ताक, मठ्ठा, चक्का, श्रीखंड, लस्सी, बेसनाची कढी  तसेच, इतर गोष्टींसोबत आपण दही खातो. जसे की दही वडे, दहीपुरी, मेंदू वडे, साबुदाण्याचे वडे, हे दही सोबत खायला अगदी चविष्ट आणि रुचकर लागतात. तसेच दह्या मधले गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी, फार फायदेशीर असतात. दही खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. पण ते काही जणांना माहिती नसतात.

तसेच दही ही दुधाची पासून बनवली जाते. त्यासाठी एका टोपात दूध कोमट करून, त्यामध्ये दही मुरण्यासाठी दुधामध्ये एक ते दीड चमचा दही कालवून घ्यावेत. रात्रभर तसेच राहू द्यावे. सकाळी ते टोप फ्रिजमध्ये ठेवावे. तुमची दही तयार खायला ! चविष्ट आणि रुचकर! तसेच दह्यामध्ये साखर टाकून खूप जणांना आवडते. तर काही जणांना नुसता दहीभात आवडतो. चला दही खायचे वेगवेगळे प्रकार आपण जाणून घेतले आहेत, आता आपण आज आपण दही आपल्या शरीरासाठी अजून कोण कोणत्या प्रकारे गुणकारी असू शकते ? व तिच्या मध्ये कोणकोणते गुणधर्म असतात ? ते जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात, की दह्या पासून होणारे फायदे व तोटे नेमके कोणकोणते आहेत ? 

दही पाण्यापासून तुमच्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, दही खाल्ल्याने शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणते ? तर चला जाणून घेऊयात ! 

वाचा  मूळव्याध होण्याची कारणे मूळव्याधीची मुख्य लक्षणे व उपाय

दही मधील गुणधर्म :

मित्रांनो, दही मधील गुणधर्म खूप जणांना माहिती नसतात. पण दही आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. दही मध्ये विटामिन डी, विटामिन- बी ट्वेल, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मिनरल्स, प्रोटीन यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे दही खाल्ल्याने, आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते :

हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, तसेच जागरण, अवेळी झोपणे, तसेच बाहेरचे जंकफूड खाणे, तसेच एका जागेवर सतत बैठे काम, तसेच स्त्रियांच्या तब्येती मध्ये, मासिक पाळीच्या तक्रारी मुळे, वजन वाढते. वजन वाढल्यामुळे आपल्या शरीराचा घेर हा पसरतो. अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात नियमित दही चा वापर केला, तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. दही मध्ये प्रोटीनचा मुबलक स्त्रोत असतो. तसेच तुम्ही जर एक वाटी दही सकाळी खाल्ली, तर तुम्हाला पोट भरल्यासारखे जाणवते, व तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

ज्या लोकांना सारखी आजारी पडण्याची समस्या असते, कितीही प्रयत्न केले, तरी ते आजारी पडतात. व्हायरल इन्फेक्शन लवकर होते, अशा व्यक्तींच्या शरीरात मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, जर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात नियमित दही चा वापर करावा. कारण दही खाल्ल्याने, तुमच्या शरीरातील प्रतिकार पेशींची मजबुतीसाठी मदत मिळते, व तुमच्या शरीरात होणारा बॅक्टेरिया, तसेच संसर्गजन्य आजार, हे दही खाल्ल्या पासून दूर होतात. शिवाय दातामधील संसर्ग म्हणजेच, जंतू हे दही खाल्ल्याने मारतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात दही खावीत. 

हृदयासंबंधी त्रास टळतो :

हो, तुम्हाला जाऊन आश्चर्य वाटेल. पण तुम्ही तुमच्या आहारात नियमित दही खाल्ले, तर तुमच्या हृदय संबंधित आजार हे टळतात, कारण दही हे आपले रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरते. तसेच आपल्या शरीरामध्ये वाढत्या चरबीचे प्रमाण रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. जर आपल्या शरीरात चरबी वाढली, तर आपल्याला हृदयविकाराचा त्रास होण्याची संभावना असते. त्यामुळे दही नियमित खाल्याने, आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण घटते व आपल्याला हृदय विकाराचा धोका टळतो. दही खाण्याचे फायदे हृद्यासाम्बंधीचे त्रास टाळण्यासाठी आपण करू शकतो.

वाचा  चेहरा साफ करण्यासाठी घरगुती उपाय व क्रीम

आपल्या दातांचे व हाडांचे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, तुम्ही तुमच्या आहारात दही खाल्ली, तर तुमच्या दातांचे व हाडांचे आरोग्य हे फार सुरळीत चालल्यास मदत मिळते. आता हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीत, काही जणांचे दात दुखतात, तसेच काही जणांची गुडघेदुखी, गुडघ्याच्या हाडांचा आवाज येणे, सारखे समस्या असतात. त्याला कारणीभूत म्हणजे शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता होय. जर तुम्ही तुमच्या आहारात नियमित दही चा उपयोग केला, तर तुम्हाला कॅल्शियम मिळेल. कारण दही मध्ये कॅन्सरचा स्त्रोत हा मुबलक प्रमाणात आहे. तसेच दही मध्ये विटामिन बी ट्वेल, तसेच विटामिन डी, हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात नियमित दही खावे. 

पोट साफ होण्यास फायदेशीर ठरते :

दही मध्ये ऑंटी बॅक्टेरियल गुणधर्म, कमी करण्यास मदत करते तसेच दही मध्ये लॅक्टोज बॅक्टेरिया हा गुणधर्म असतो, त्यामुळे आपल्या पोटातील आतड्यांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे आपल्याला पोट साफ होण्यास मदत मिळते. दही खाण्याचे फायदे पोटाच्या विकारावर रामबान उपाय देतात.

आपले सौंदर्य निखारण्यास मदत मिळते :

हो, दही चा वापर अगदी पूर्वीच्या काळापासून सौंदर्य निखारण्यासाठी फायदेशीर ठरतो. जर तुम्ही नियमित दही खाल्ली, तर त्याचा प्रभाव तुमच्या स्क्रीनवर म्हणजे त्वचेवरही पडतो. त्यामुळे तुमची त्वचा अगदी मुलायम होते. तसेच केसांच्या आरोग्यासाठी ही दही खाणे फायदेशीर असते. कारण दही मधले पोषक घटक आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे आपले आरोग्य दही खाल्ल्याने चांगले राहते. 

केसांना दही लावून बघा :

दही ही केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर तुमच्या केसांमध्ये इन्फेक्शन झाले, तसेच कोंडा झालाय, केस गळतीची समस्या आहे, केस रूक्ष आहेत, अश्या वेळी जर तुम्ही तुमच्या केसांना दही लावली, तर अगदी मुलायम होतील. त्यासाठी तुम्हाला दही+त्यामध्ये आवळा पावडर+ शिकेकाई पावडर+ रिठा पावडर यांचे मिश्रण, एकजीव करून केसांना एक ते दीड तास लावून ठेवावेत. त्यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा तसेच रूक्ष स्किन जाण्यास मदत मिळते. तसेच केस वाढीसाठी फायदेशीर ठरते. तसेच केसांना चकाकी येते, केस अगदी मुलायम होतात. 

वाचा  टाळूला फोड येणे

चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी फायदेशीर ठरते :

बदलत्या जीवनशैलीमध्ये, वाढत्या प्रदूषणामुळे चेहर्यावर, डाग, पुटकुळ्या, तसेच त्वचा काळवंडते, अशावेळी जर तुम्ही दहीचा पॅक वापरला, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला दोन चमचे दही +त्यामध्ये चिमूटभर हळद +त्यामध्ये बेसन यांचे मिश्रण एकजीव करून, चेहर्‍याला 20 मिनिटे लावून ठेवावे, त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी मदत मिळते. शिवाय रूक्ष असेल तर ती जाण्यास मदत मिळते. हा पॅक नियमित हप्त्यातून तीन वेळेस लावल्यास, तुमच्या चेहऱ्यावर ही चमक येते. 

दही खाताय ! पण ज्यांना हा त्रास असेल, त्यांनी खाऊ नयेत. 

मित्रांनो दही खाणे हे शरीरासाठी फायदेशीर असते, पण, दही खाल्ल्याने काहींना त्रास होतो. 

  • ज्या लोकांना सर्दी, कफ, खोकला यासारखे त्रास होत असेल, तर त्यांनी त्यांच्या आहारात दही चे प्रमाण हे शक्यतो टाळावेत. 
  • ज्यांची कफ प्रवृत्ती आहे, अशा लोकांनी ही त्यांच्या आहारात दही कमी खावीत. 
  • ज्या लोकांना कसली ऍलर्जी असेल, तर त्यांनी दही खाण्याचे डॉक्टरांना विचारूनच खावेत. 
  •  तसेच ज्या लोकांना व्हायरल इन्फेक्शन, फूड पॉयझनिंग झालेले आहे, अशा लोकांनी दही त्यावेळी त्यांच्या आहारात खाऊ नयेत. 
  •  दही दोन दिवसाच्या वर खाऊ नये. कारण तिच्यातील आंबटपणा जास्ती वाढतो, त्यामुळे आपल्याला पित्त सारख्या समस्या होऊ शकतात. 
  • तसेच नॉनव्हेज पदार्थांसोबत दही खाऊ नये, त्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याची संभावना असते. 
  • तसेच दुधाबरोबर दही खाऊ नये, त्यामुळे , पोट खराब होऊन जुलाब होऊ शकतात. 
  • ज्या लोकांना दमा, अस्थमा यासारखे आजार आहे, यांनी त्यांच्या आहारात डॉक्टरांना विचारूनच दही घ्यावी. 
  • तसेच दही खाल्ल्यावर झोपू नये, त्यामुळे वजन वाढू शकते. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तुमच्या आहारात दही खाण्याचे फायदे, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे होतात. तसेच दही खाल्ल्याने तुम्हाला काय तोटे होऊ शकतात. तेही सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला शंका असतील, तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच दही खावेत. तसेच आम्ही सांगितलेली माहिती, तुम्हाला आवडली असेल व त्यामध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका वाटत असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

 धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here