मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे

0
913
मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे
मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे. आपण आपल्या शरीराचे आरोग्य जपावे यासाठी आपण आहाराकडे व्यवस्थित लक्ष देत असतो. आहारामध्ये काय खाल्ल्यामुळे आपल्या प्रोटिन्स, विटामिन्स, कॅल्शियम, पोषक घटक, पोषकतत्वे मिळतील या गोष्टीचा विचार करूनच आपण उपयुक्त अशा पदार्थांचा समावेश करत असतो. त्याचप्रमाणे, स्वयंपाक करताना आपण कोणत्या भांड्यांचा वापर करावा, याबद्दल देखील आपल्याला माहिती असायला हवी. खरंतर आपण स्वयंपाक बनवण्यासाठी अथवा जेवण तयार करण्यासाठी जे भांडे वापरत असतो त्याचा परिणाम हा आपल्या तयार केलेल्या जेवणावर देखील दिसून येत असतो. म्हणून आपण जेवण बनवण्यासाठी योग्य त्या भांड्यांचा वापर देखील करायला हवा.

पूर्वीच्या काळी तर म्हणजेच प्राचीन काळापासून लोक मातीपासून तयार केलेल्या भांड्यांचा वापर करत होते. पूर्वीच्या काळी जग एवढे विकसित नव्हते. त्यामुळे लोकं मातीपासून भांडी तयार करीत. त्याचप्रमाणे, त्याकाळी गॅस शेगडी देखील उपलब्ध म्हणून चुल्हा तयार करून त्याचा वापर करत होते. शिवाय, मातीच्या भांड्यांचा वापर करून त्यावर जेवण बनवत असे. पूर्वीच्या काळी लोक आजारी देखील जास्त आजारी देखील पडत नव्हते. परंतु, हल्लीच्या काळात तर मातीच्या भांड्यांचा वापर सध्या होतांना दिसून येत नाही. हल्ली स्टीलची, ॲल्युमिनियम ची आणि नॉनस्टिक चे भांडे ही चांगल्या प्रकारे प्रचलित झालेली आहेत. त्यामुळे बायका आता सहज ॲल्युमिनियम, स्टील अथवा नॉनस्टिक ची भांडी वापरून त्यावर जेवण बनवत असतात.

यातील ॲल्युमिनियम चे भांडे जर तुम्ही वापरत असाल अथवा त्यावर तुम्ही नेहमीचे जेवण तयार करत असाल तर त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये तुम्ही काही बनवले तर बनवलेल्या जेवणाचे पोषक तत्व आहे नाहीसे होतात. म्हणजेच आपण जे काही जेवण तयार करत असाल तर त्या मधून आपला पोषकतत्व विटामिन्स वगैरे मिळत नाहीत ते त्यातच नष्ट होऊन जात असतात. शिवाय ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये रोज स्वयंपाक करत असाल जेवण तयार करत असाल तर पुढे जाऊन कॅन्सरच्या पेशी देखील शरीरात निर्माण होण्याची संभावना असते. म्हणून शक्यतो तुम्ही जर आणि मी आमच्या भांड्यांचा कमीत कमी वापर केला तर तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले ठरू शकते.

जर या ऐवजी तुम्ही मातीच्या भांड्यांचे उपयोग केला तर बनलेल्या जेवणातील पोषक तत्व हे तुम्हाला शंभर टक्के मिळण्यास मदत होऊ शकते. मातीच्या भांड्यामध्ये जेवण तयार केल्यामुळे अजून कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात या विषयावर माहिती जाणून घ्यायला हवी. तर मित्रांनो आज आपण मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  ओले खजूर खाण्याचे फायदे

स्वयंपाक तयार करण्यासाठी मातीची भांडी कशी वापरावी ?

सर्वप्रथम, तर आपण मातीचे भांडी  खरेदी करतांना ती व्यवस्थित तपासून घ्यावीत. ज्या ठिकाणी अथवा ज्या कुंभाराकडून आपण मातीची भांडी घेत असाल तर त्या ठिकाणी मातीची भांडी हे खालून वर आतून-बाहेरून व्यवस्थित प्रकारे बघून घ्यावी मातीच्या भांड्याला छिद्रे तर नाही ना वगैरे व्यवस्थित तपासूनच घरी आणावीत. मातीची भांडी घरी आल्यानंतर ती वापरण्यापूर्वी आपण एका भांड्यात पाणी घेऊन मातीची भांडी त्यामध्ये 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावीत. आणि त्यानंतर तुम्ही मातीचे भांडे मध्ये थोडासा पाणी घेऊन मंद आचेवर तापवून घ्यावेत जेणेकरून मातीचा वास देखील निघून जाण्यास मदत होत असतो.

आपल्याला जे जीवन बनवायचे असेल तर त्यासाठी प्रत्येक पदार्थासाठी मातीची भांडी ही वेगळ्या प्रकारची असावीत. जसे की तुम्हाला जर चपाती बनवायचे असेल तर चपातीसाठी मातीचा वेगळा तवा ठेवावा. जर तुम्हाला आमटी अथवा भाजी बनवायची असेल तर त्यासाठी स्पेशल मातीचे भांडे ठेवावे. त्याचप्रमाणे, भात बनवण्यासाठी देखील मातीचे एक वेगळेच भांडे ठेवावे. म्हणजेच प्रत्येक पदार्थांसाठी तुम्ही मातीच्या वेगवेगळ्या भांड्यांचा वापर करायला हवा. जर तुम्ही भाजी अथवा आमटी तयार केले मातीचे भांडे जर भात बनवण्यासाठी वापर करत असेल तर त्यामुळे मातीच्या भांड्यातील भाजीचे शोषलेले तेल हे भातामध्ये जाण्याची शक्यता असते.

खरं आपण ज्यावेळेस मातीच्या भांड्यामधे जो पदार्थ तयार करत असतो तर त्याचे तेल अथवा त्या पदार्थांची चवही मातीच्या भांड्यामध्ये शोषले जात असते कारण की बाकीच्या भांड्याला बारीक छिद्रे असतात त्यामुळे आपण जे पदार्थ बनवत असतो ते त्यामध्ये ते जमा होत असतात. म्हणून प्रत्येक पदार्था नुसार मातीचे देखील प्रत्येक वेगवेगळे भांडे असावे. मातीची भांडी स्वच्छ करताना आत्मवादी साफ करण्यासाठी तुम्ही साबणाचा तसेच ताराच्या कासणी चा अजिबात वापर करू नये. जर तुम्ही मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर केला तर त्यामध्ये साबणाचे पाणी मातीच्या भांड्यात जात असते आणि ज्या वेळेस तुम्ही नवीन पदार्थ बनवायला ते भांडे वापरतात त्यामुळे मातीच्या भांड्यात गेलेले साबणाचे पाणी हे त्या पदार्थांमध्ये मिसळण्याची शक्यता असते.

वाचा  हिवाळ्यात केसांची काळजी

त्यामुळे, तुमच्या शरीराला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून, मातीचे भांडे साफ करण्यासाठी तुम्ही साबणाचा अथवा घासणी चा वापर करणे शक्यतो टाळावे. मातीचे भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नारळाच्या शेंडीचा वापर करू शकतात.तसेच,  साबण या ऐवजी तुम्ही डाळीचे पीठ अथवा ज्वारीचे पीठ लावून त्याने भांडे साफ स्वच्छ करू शकतात. मातीच्या भांडी घासण्यासाठी जर तुम्ही तार्‍याच्या घासणी चा वापर करत असाल तर त्यामुळे मातीचे कण हे निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून ताराच्या घासणी चा वापर शक्यतो टाळावा. अजून एक दुसरी पद्धत म्हणजे, तुम्ही मातीच्या भांड्यात थोडेसे पाणी ठेवून ते गरम करून घ्यावे. असे केल्याने देखील तुमची मातीची भांडी स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते.

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे कोणते आहेत ?

जर तुम्ही स्टील, ॲल्युमिनियम अथवा नॉनस्टिकची भांडी ऐवजी मातीच्या भांड्यात जेवण तयार करत असाल, तर त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. स्वयंपाक करताना आपल्या वेळेची बचत व्हावी यामुळे तुम्ही सहज स्टीलचे व अल्युमिनीयम चे भांडे स्वयंपाक करत असतात परंतु मातीच्या भांड्यामध्ये जेवण करायला वेळ तरी लागत असले तरी मातीच्या भांड्यात आणशील झाल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे अपेक्षेला होत असतात. तर मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे आपल्याला कोणत्या प्रकारचे होऊ शकतात याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

  • मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केला, अन्न शिजवले तर त्यामुळे आपल्याला अन्नातील सर्व प्रकारचे पोषक घटक, पोषक तत्त्व मिळण्यास मदत होते. मातीच्या भांड्यात अन्न शिजवले तर जेवणाला एक प्रकारची चांगली चव देखील प्राप्त होत असते. त्यामुळे, असे जेवण करायला, खायला खूप छान लागते. शिवाय, त्यातून मिळणारे अनेक पोषक घटक, पोषक तत्व हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
  • मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला तर आपण जे काही पदार्थ शिजवतात व त्यातील सर्व प्रकारची विटामिन्स मिनरल सायन्स पोषक तत्वे हे आपल्याला मिळण्यास मदत होते. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्या मुळे त्यातील पोषक घटक हे कमी होत नाहीत ते जसेच्या तसे आपल्या खेळायला प्राप्त होत असतात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते खूपच फायदेशीर ठरत असतात. मातीचे भांडे वगळता इतर भांडणांमध्ये जर तुम्ही अन्न शिजवले तर त्यातून आपल्याला खूपच कमी प्रमाणात विटामिन्स पोषकतत्वे मिळत असतात परंतु मातीच्या भांड्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे आपल्याला मिळतात शिवाय मातीतील पोषक घटक देखील आपला मिळत असतात जी आपण खाण्यासाठी उत्तम ठरतात.
  • बऱ्याच लोकांना पोटात गॅस होण्याची समस्या येत असते. जर तुम्ही मातीच्या भांड्यांचा वापर हा जेवण बनवण्यासाठी करत असाल तर त्यामुळे तुम्हाला गॅसची समस्या देखील उद्भवणार नाही. कारण मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण हे पौष्टिक असते. शिवाय, त्यामुळे आपल्या शरीराला फायदाच होतो. आणि मातीच्या भांड्यातील जेवण केल्यामुळे आपल्या पोटामध्ये गॅस होण्याची समस्या देखील निर्माण होत नाही.
  • अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही मातीच्या भांड्यात अन्न खायला हवे जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही.
  • मातीच्या भांड्यात जेवण तयार करताना माणूस अन्न शिजवताना तेलाचा वापर देखील कमी प्रमाणात होत असतो. कारण मातीच्या भांड्यात कमी तेल लागत असते त्यामुळे आपल्याला त्यातून शुरी आणलं हे शंभर टक्के चांगल्या प्रकारे मिळत असते शिवाय त्यातील सर्व प्रकारचे घटक आपल्या शरीराला मिळत असतात.
  • बर्‍याच जणांना परत येण्याचा त्रास देखील होत असतो जर तुम्ही मातीच्या भांड्यात अन्न शिजवून ते खात असाल तर त्यामुळे तुम्हाला अन्न अपचनाचा त्रास देखील उद्भवणार नाही शिवाय तुमचे पचनक्रिया देखील व्यवस्थित सुरळीत चालू राहते.
वाचा  लहान बाळाचे कान फुटणे

तर, मित्रांनो मातीच्या भांड्यात स्वयंपाक तयार करणे म्हणजेच अन्न शिजवल्यामुळे त्यातून आपणास शंभर टक्के पोषक तत्वे, पोषक घटक मिळण्यास मदत होत असते. आणि शिजवलेल्या अन्नातून सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयर्न, प्रोटिन्स, पोषक घटक पोषकतत्वे हे आपल्या शरीरासाठी जसेच्या तसे मिळणे फार उत्तम ठरत असते. तर मित्रांनो, तुम्ही देखील अन्न शिजवण्यासाठी, स्वयंपाक तयार करण्यासाठी मातीची भांडी वापरून बघा यामुळे अनेक प्रकारचे फायदे तुमच्या होतील. शिवाय मातीच्या भांड्यामधे दही लावल्यामुळे दही खायला तर छान लागतात शिवाय त्यातील सर्व प्रकारचे पोषक घटक विटामिन्स आपल्या शरीराला मिळण्यास मदत असते.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here