डोळ्यांना पाणी येणे.

0
964
डोळ्यांना पाणी येणे
डोळ्यांना पाणी येणे

डोळ्यांना पाणी येणे

नमस्कार मित्रांनो. हल्ली कामाचा व्याप एवढा वाढला की त्या कामाच्या व्यापामुळे अनेक जणांचे आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. बऱ्याच जणांना ऑफिसमध्ये लॅपटॉप अथवा संगणकासमोर बसून काम करावे लागत असते. परंतु त्यातून पडणारा प्रकाश त्या डोळ्यांना अपायकारक ठरू शकतो आणि डोळ्यांना पाणी येणे सारख्या समस्या डोके वर काढता .तसेच अनेक जण हे मोबाइलचां सर्रास वापर करताना दिसून येतात. अगदी लहान मुले देखील मोबाईल खेळताना दिसून येतात. तर काही लहान मुलांना तर मोबाईल शिवाय जेवण जात नाही असे देखील झालेले आहे. परंतु लहान मुलांची डोळे तर अगदीच कोमल आणि नाजूक असतात त्यामुळे त्यांना मोबाईल पासून जितके दूर ठेवता येईल तितके दूर ठेवावे. कारण मोबाईल मधून निघणारा घातक प्रकाश हा डोळ्यांवर परिणाम करू शकतो.

उन्हाळा सुरु झाला म्हणजे उष्ण वातावरण आलेच. उष्ण वातावरणात बाहेर गेल्यामुळे देखील डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. सतत कॉल लॅपटॉप अथवा संगणका समोर बसून काम केल्याने त्यातील जास्तीचा प्रकाशा डोळ्यांवर परिणाम करत असतो. परिणामी डोळ्यातून पाणी देखील येऊ शकते. आणि बर्‍याच जणांना कालांतराने चष्मा देखील लागण्याची संभावना असते. तसेच नेहमीच्या आहारात योग्य त्या पोषक तत्वांचा घडत समावेश करणे देखील गरजेचे असते. डोळ्यांसाठी जेवढे जास्तीत जास्त काळजी घेतील तेवढे जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो आज आपण डोळ्यातून पाणी येणे या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग डोळ्यांतून पाणी येणे याबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

डोळ्यातुन पाणी येण्याची कारणे नेमकी कोणती असू शकतात ?

         मित्रांनो, डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत नाजूक असा अवयव आहे. त्यामुळे आपण डोळ्यांची जितकी जास्तीत जास्त काळजी घेऊ तितके आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले ठरते. अनेक जणांना डोळ्यातून पाणी येणे ही समस्या निर्माण होत असते. तर डोळ्यातून पाणी येण्याची नेमकी कारणे कोणती हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 • अनेक जणांना ऑफिसमध्ये लॅपटॉप अथवा संगणकासमोर बसून काम करावे लागत असते. त्यामुळे त्याच्यातून पडणारा प्रकाश हा डोळ्यांना अपायकारक ठरू शकतो. परिणामी डोळे लाल होणे थकवा येणे, तसेच डोळ्यातून पाणी येणे या समस्यांना सामोरे जावे लागत असते. सतत पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यातून पाणी येण्याची समस्या उद्भवते.
 • अनेक जणांना उष्णतेचा देखील त्रास होत असतो उन्हाळ्यामध्ये उष्ण वातावरण असल्यामुळे डोळे लाल होणे, डोळे जळजळ होणे, तसेच डोळ्यातून पाणी येणे हे देखील समस्या उद्भवत असते.
 • बाहेर गेल्यामुळे बाहेरील अतिसूक्ष्म धुळीचे कण डोळ्यात गेल्यामुळे देखील डोळ्यातून पाणी येऊ शकते.
 • अनेक जणांना कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याची सवय असते. तर कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यामुळे देखील डोळ्यातून पाणी येण्याची समस्या निर्माण होते.
 • काहीजणांना ऍलर्जीमुळे अथवा व्हायरल इन्फेक्शन मुळे देखील डोळ्यातून पाणी येत असते.
 • आजारी पडल्यामुळे तसेच विकनेस आल्यामुळे देखील डोळे गरम होऊन डोळ्यातून पाणी येण्याची शक्यता असते.
 • अस्वच्छ पाणी डोळ्यात गेल्यामुळे किंवा क्लोरीन युक्त पाणी यामुळेदेखील डोळ्यातून पाणी येण्याची समस्या निर्माण होत असते.
 • अनेक जणांना चष्मा लागलेला असतो. काहींचा नंबर कमी असतो तर काहींचा नंबर जास्त असतो  परंतु चष्मा लागलेला असल्यामुळे देखील चष्म्याचा वापर न केल्यामुळे देखील  डोळ्यातून पाणी येण्याची समस्या उद्भवते.
 • नेहमीच्या आहरा मध्ये योग्य त्या पोषक तत्त्वांचा,तसेच डोळ्यांसाठी उपयुक्त घटकांचा समावेश न केल्यामुळे देखील डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
वाचा  स्वप्नात चपाती दिसणे शुभ की अशुभ !

वरील प्रमाणे, सर्व कारणे ही डोळ्यातून पाणी येण्याची आहेत. वरील प्रमाणे निष्काळजी घेतल्यामुळे डोळ्यातून पाणी येण्याची  समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आपण जेवढे जास्तीत जास्त आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ तेवढे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

डोळ्यातून पाणी येऊ नये किंवा डोळ्यातून पाणी आल्यास कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी ?

       मित्रांनो, आपल्या शरीराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण योग्य प्रकारची काळजी घ्यायला हवी. तसेच, आपल्या प्रत्येक इंद्रियांची देखील काळजी घेणे आवश्यक ठरते. आणि त्यातच डोळे हे तर अवयव खूपच नाजूक असतात, त्यामुळे त्याची योग्य पद्धतीने काळजी आपल्याला घ्यायला हवी. मित्रांनो, डोळ्यातून पाणी येत असेल किंवा डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, हे आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 1. आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले व निरोगी राहावे यासाठी आपण मोबाईल, संगणक व लॅपटॉप यांचा जितका कमीतकमी वापर करता येईल, तितका कमीत कमी वापर करावा कारण की यातून  निघणारा प्रकाश हा आपल्या डोळ्यांसाठी अपायकारक ठरू शकतो.
 2. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारामध्ये गाजर आणि पपई यांचा देखील समावेश आवर्जून करावा यांनी डोळे चांगले राहण्यास मदत होते यातून डोळ्यांसाठी आवश्यक ते पोषक घटक मिळत असतात.
 3. डोळ्यांमध्ये अस्वच्छ तसेच क्लोरिन युक्त पाणी गेल्यामुळे देखील डोळ्यातून पाणी येत असते त्यामुळे डोळ्यांवर स्वच्छ पाण्याचा मारा करा आणि जर जास्त त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार करून घ्या.
 4. जर डोळ्यांमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स बसवलेली असेल तर कॉन्टॅक्ट लेन्ससह पाण्यामध्ये पोहणे शक्यतो टाळावे.
 5. तसेच बऱ्याच वेळा घराची साफसफाई करताना धुळीचे कण किंवा कचरा डोळ्याच्या आत जाण्याची शक्यता असते.  यामुळे देखील डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते किंवा डोळ्यातून पाणी येऊ शकते. आणि जर धुळीचा कण किंवा कचरा डोळ्याच्या आत गेला असेल तर डोळे कमीत कमी हलवा. हा कचरा अश्रुंसोबत आपोआप बाहेर निघून येऊ शकतो.
 6. तसेच खराब हातांचा स्पर्श देखील डोळ्यांना लावू नका यामुळे देखील डोळ्यातुन पाणी येण्याची संभावना असते.
 7. अनेकांना कसले ना कसले ऍलर्जी होत असते. आणि ऍलर्जीमुळे देखील डोळ्यातुन पाणी येण्याची शक्यता असते, असे झाल्यास तुम्ही डॉक्टरांना त्वरित दाखवावे.
 8. उन्हाळ्यात बाहेर सूर्यकिरणांमुळे देखील डोळ्यातून पाणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे थंड पाणी डोळ्यांवर मारावे. यामुळे डोळ्यांची जळजळ देखील कमी होते आणि डोळ्यातून पाणी येणे देखील बंद होऊ शकते.
 9. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले व निरोगी राहावे यासाठी तुम्ही नियमित आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करावा. यामुळे आवश्यक असे पोषक घटक, पोषक तत्व मिळण्यास मदत होईल.
 10. तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण करणे शक्यतो टाळावे.
 11. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा सूप यांचा समावेश करावा.
 12. डोळे निरोगी व चांगले राहावेत यासाठी डोळ्यांचे काही ठराविक व्यायाम करावेत. योगासने नियमित करावेत. डोळ्यांच्या आयबॉल साठी ठराविक व्यायाम करावेत. डोळ्यांचा व्यायाम केल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी देखील मदत होत असते.
वाचा  पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय?

मित्रांनो, वरील प्रमाणे तुम्ही सर्व प्रकारची काळजी घेतली तर डोळ्यातील होणारी जळजळ, तसेच डोळ्यातून पाणी येणे ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. जर तुम्हाला डोळ्यां संदर्भात अधिक त्रास होत असेल, तर तुम्ही योग्य वेळीच  डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यावा, म्हणजे भविष्यात होणारा त्रास तुम्हाला उद्भवणार नाही.

            मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

          धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here