स्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची माहिती

0
110
स्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची माहिती
स्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची माहिती

नमस्कार मित्रांनो. लहान मुले ही तर सर्वांनाच आवडतात. बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या सर्व जबाबदाऱ्या त्याच्या आई वडिलांवर पडत असतात. अगदी नुकतच जन्मलेला मुलापासून त्याचा सांभाळ करण्यापर्यंत बालसंस्कार देणे, त्यांचे शिक्षण, लग्न वगैरे सर्व जबाबदार आई-वडिलांना पार पाडाव्या लागत असतात. जर दोन पेक्षा अधिक मुले असतील तर आई वडिलांना सांभाळ करणे देखील कठीण जाऊ शकते तसेच, हम दो हमारे दो या नियमाचे देखील आपण पालन केले पाहिजे. घरात जर एक किंवा दोन मुलं असतील आणि त्यानंतर मूल नको असेल, अनावश्यक गर्भधारणा टाळायची असेल, तर यासाठी स्री नसबंदी शस्त्रक्रिया ही केली जात असते. कुटुंब नियोजनासाठी स्री नसबंदी किंवा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया या केल्या जात असतात. मुलं झाल्यानंतरही काही जणांना अनावश्यक गर्भधारणा होत असते, जर तुम्हाला असे नको असेल तर यासाठी तुम्ही स्री नसबंदी शस्त्रक्रिया करू शकतात. स्री नसबंदी शस्त्रक्रिया ही नेमकी काय असते ही शस्त्रक्रिया कोणी केली पाहिजे? कधी केली पाहिजे? याबद्दल आपण अवश्य जाणून घेतले पाहिजे.मित्रांनो, आज आपण स्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. फार पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया याबद्दल फारसे माहिती नव्हती. त्यामुळे एकाच कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक मुले जन्माला येत असे. शिवाय, काही घरांमध्ये तर सात किंवा आठ पेक्षाही मुले जन्म घेई. परंतु, असे झाल्यामुळे मुलांच्या आईच्या जीवाला देखील धोका असायचा. कधी कधी मुलं जन्मल्यानंतर बाळाच्या आईचा मृत्यू देखील होत असे. परंतु, हल्ली जसा जसा विकास होत गेला या घटना कमी होत गेल्या आणि आज पुरुष नसबंदी किंवा स्री नसबंदी या शस्त्रक्रिया स्वतः आवर्जून केल्या जात असतात. तर चला मग, स्री नसबंदी शस्त्रक्रिया याबद्दल माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

स्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची माहिती:-

कुटुंब नियोजनासाठी ही शस्त्रक्रिया अवलंबली जाते. जर घरामध्ये एक अथवा दोन मुले असतील आणि यापुढे संतती नको असेल, तर त्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जात असते. काही वेळा दोन मुले झाल्यानंतर ही अनावश्यक गर्भधारणा होत असते तर ही गर्भधारणा टाळण्यासाठी ही शस्त्रक्रिया आपण करू शकतो. कायमस्वरूपासाठी संतती नियमन यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. तसेच याला गर्भनिरोधक पद्धती असे देखील म्हटले जाते. ज्या व्यक्तींना घरामध्ये एक किंवा दोन मुले असतील आणि यापुढे मूल नको असेल तर अशा व्यक्तींसाठी ही शस्त्रक्रिया फायदेशीर ठरते एकदाही शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा ती खोलने कठीण असते. म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी घरातील व्यक्तींची संमती असणे फार गरजेचे ठरते

वाचा  सोलार कुकर का उपयोग करने के फायदे और नुकसान

<yoastmark class=

स्री नसबंदी शस्त्रक्रिया कशी केली जाते? : Stri Nasbandi Shastrkriya Kashi Keli Jate?

नसबंदी शस्त्रक्रिया या शस्त्रक्रियेमध्ये फॅलोपीएन ट्यूब म्हणजेच स्री बीज वाहक नलिका या बंद केल्या जात असतात. काही वेळा त्या रबरने बांधून बंद केल्या जातात तर किंवा दोऱ्याने बांधूनही बंद केल्या जात असतात. आणि त्यानंतर त्या थोड्या प्रमाणात कापल्या ही जात असतात. असे केल्यामुळे स्री बीज हे शुक्रजंतू पर्यंत पोहोचणार नाही म्हणजेच ते फलन होणार नाहीत. असे केल्यामुळे गर्भधारणा होणार नाही. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर यापुढे त्या स्त्रीला मुले होणार नाहीत. अशा प्रकारे अनावश्यक गर्भधारणा ही टाळता येईल. कुटुंब नियोजनासाठी ही शस्त्रक्रिया फार लोकप्रिय आहे. कुटुंबामध्ये एक किंवा दोन मुले असतील आणि गर्भधारणा करायचे असेल तर ही शस्त्रक्रिया केली जात असते. ही शस्त्रक्रिया ही पोट उघडून अथवा योनी मार्गे, किंवा दुर्बिणी मार्गे या तीन पद्धतीने केली जाऊ शकते. पोट फाडून ही शस्त्रक्रिया करणे ही जुनी पद्धत झाली. यामुळे अनेक प्रकारचे टाके देखील घातले जात असे. परंतु या विज्ञान प्रगत युगामुळे ही शस्त्रक्रिया करणे देखील फार सोपे झालेले आहे आणि यामुळे त्रासही वेदनाही फार कमी प्रमाणात होतात.

नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी स्री ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे फार गरजेचे असते. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी महिलेचे रक्त देखील योग्य प्रमाणात आहे की नाही ते तपासले जाते. तसेच ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी घरातील सर्वांची संमती आणि महत्त्वपूर्ण त्या महिलेची संमती असणे फार महत्त्वाचे ठरते या शस्त्रक्रियेमुळे होणारे फायदे आणि तोटे याबद्दलही शस्त्रक्रिया आधीच सांगितले जात असते. ही शस्त्रक्रिया करण्याआधी ती महिला गरोदर आहे की नाही याची देखील तपासणी केली जात असते महिलेच्या पाळी नंतर आठ ते दहा दिवसानंतर ही शस्त्रक्रिया करणे योग्य ठरते.

दुसरे मूल झाल्यानंतर म्हणजेच प्रसूती झाल्यानंतरही लगेच ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. काही महिला या सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यानंतरही ताबडतोब ही शस्त्रक्रिया करून घेत असतात. असे बरेच ठिकाणी होत असते. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर फिर तपासणी करणे देखील महत्त्वाचे ठरते कधीकधी ही शस्त्रक्रिया अपयशी देखील ठरू शकते परंतु असे फार क्वचित वेळाच घडत असते म्हणून फिर तपासणी करणे फार गरजेचे ठरते.

वाचा  तळपायात काटेरी भवरा होणे यावर उपाय

मित्रांनो, स्री नसबंदी शस्त्रक्रिया  करण्याची माहिती, तसेच ही शस्त्रक्रिया कशी केली जाते? कोणी करावी कधी केली जाते? याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.               

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here