ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर म्हणजे काय ? त्याचे फायदे

0
358
ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर म्हणजे काय ? त्याचे फायदे
ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर म्हणजे काय ? त्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आपले आरोग्य चांगले राहावे, यासाठी आहारामध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स युक्त पदार्थांचा, कॅल्शियम, मिनरल्स, आयन, प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर म्हणजे काय ? त्याचे फायदे कोणते आहेत, हे आपण आज या मध्ये बघणार आहे.

जर तुम्हाला आहारामधून एवढे सर्व पोषक तत्व व पोषक घटक मिळत असतील तर तुमची त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. शिवाय, अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून, मोठमोठ्या रोगांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.

अनेक वेळा तब्येतीची काळजी घेऊन देखील कुठल्या ना कुठल्या समस्येला आपल्याला सामोरे जावे लागत असते. समस्या कुठलीही असो, पण त्यासाठी रामबाण इलाज देखील आपण केला पाहिजे आणि जर त्यावर आपण आयुर्वेदिक उपचार केले तर अगदीच प्रभावी ठरेल.

मित्रांनो, आज आपण ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर म्हणजे काय? आणि त्याचे फायदे काय? याबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक जणांनी ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर या पद्धतीचे नाव ऐकलेले असेल, परंतु नेमकी ही पद्धत काय असते? ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर हे कशासाठी वापरले जाते? याबद्दल आपल्याला फारसे ठाऊक नसते.

तर मित्रांनो, आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि याचे काय फायदे असू शकतात? याबद्दलही जाणून घेणार आहोत. चला तर मग, ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर म्हणजे काय?  व त्याचे काय फायदे आपल्याला होऊ शकतात? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

ॲक्युपंचर म्हणजे काय?

ॲक्युपंचर या पद्धतीमध्ये बारीक सुयांचा वापर केला जात असतो. काही विशेष प्रकारांच्या आजारांवर ॲक्युपंचर ही पद्धती वापरली जाते. मित्रांनो, ॲक्युपंचर ही फार जुनी पद्धती आहे. फार प्राचीन काळापासून ही पद्धत चालत आलेली आहे. भारतामधील डॉक्टर पु. भ. लोहिया यांनी ही पद्धती प्रसिद्धीस होती.

वाचा  ज्येष्ठमध खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

ही पद्धती जरी भारतामधील असली तरी चीनमध्ये ही पद्धत खूप प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. चीनमध्ये देखील या पद्धतीचा वापर केला जातो. एखादा आजार झाल्यावर आपण ते गोळ्या औषधी घेऊन त्याला तात्पुरता बराच करत असतो. परंतु ॲक्युपंचर पद्धती मुळे आजार हा बिना औषधी शिवाय मुळापासून बरा केला जातो.

अनेक वेळा औषधी घेतल्यामुळे लिव्हर किडनी खराब होण्याची शक्यता असते. परंतु, या पद्धतीने मुळे ही समस्याच निर्माण होत नाही. शिवाय, आजार हा मुळापासून बरा केला जात असतो. ॲक्युपंचर पद्धतीमुळे अनेक प्रकारचे आजार बरे होत असतात. जसे की,

  • तीव्र डोकेदुखी जाण्यासाठी
  • अपचनाची समस्या जाण्यासाठी
  • मानसिक टेन्शन जाण्यासाठी
  • मोठ्या प्रमाणात नैराश्य आले असेल, तर ते जाण्यासाठी.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
  • गुडघेदुखी जाण्यासाठी
  • मान दुखी, पाठ दुखी जाण्यासाठी
  • कंबर दुखी जाण्यासाठी

ॲक्युपंचर या पद्धतीमध्ये शरीरातील विशिष्ट भागांवर बारीक निर्जंतुकीकरण सुया या टोचल्या जातात. आजारावर औषधी न वापरता निर्जंतुकीकरण सुया टोचून तो आजार हा मुळापासून बरा केला जात असतो. ॲक्युपंचर या पद्धतीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवली जात असते.

ॲक्युपंचर पद्धती चे फायदे

ॲक्युपंचर पद्धती यामध्ये औषधी शिवाय उपचार केला जात असतो त्यामुळे बरेच काही फायदे या पद्धतीमुळे होतात जसे की,

  • ॲक्युपंचर पद्धतीमुळे वेदना या कमी प्रमाणात होत असतात.
  • बरेच रोग आजार हे बिना औषधी शिवाय मुळासकट बरे केली जात असतात.
  • मानसिक टेन्शन ताण तणाव कमी करण्यासाठी ही पद्धती फार उपयोगी ठरते.
  • ज्या व्यक्तींना अनिद्राची समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी ही पद्धती अत्यंत उपयोगी ठरते.
  • शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील पंचर पद्धती अत्यंत प्रभावीपणे काम करते.
  • ॲक्युपंचर पद्धतीमुळे पचनाच्या समस्या दूर होतात. जर आपल्या शरीराचे पचनक्रिया ही व्यवस्थित सुरळीत असेल तर अतिरिक्त वाढलेले वजनही कमी होण्यास उपयोगी ठरते.
  • शरीरातील जळजळ कमी होण्यासाठी देखील या पद्धतीचा अत्यंत उपयोग होत असतो.
वाचा  पंचकर्म म्हणजे काय? पंचकर्म चिकित्सा करण्याचे फायदे.

तर मित्रांनो, ॲक्युपंचर पद्धती नेमकी काय आहे या पद्धतीमुळे कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आपण आता जाणून घेतलेले आहे.

ॲक्युप्रेशर पद्धती म्हणजे काय?

ॲक्युप्रेशर पद्धती हे देखील फार प्राचीन काळापासून चालत आलेली पद्धती आहे आणि आज देखील या पद्धतीचा वापर केला जात असतो. ही पद्धती देखील काही विशिष्ट प्रकारच्या आजारांसाठी एक उपचार पद्धती म्हणून वापरली जात असते. ॲक्युप्रेशर या पद्धतीमध्ये शरीरावरील काही विशिष्ट प्रकारच्या भागांवर दाब दिला जात असतो. म्हणजेच शरीरावरील काही विशिष्ट प्रकारचे पॉईंट्स वर प्रेशर देऊन या पद्धतीद्वारे उपचार केले जातात.

शरीरावरील मुख्य अंग जसे की, हात, पायांची तळवे यांवर विशिष्ट ठिकाणी प्रेशर देऊन रोग हा हा बरा करण्याचा प्रयत्न केला जात असतो. जसे की, जर तुम्हाला हृदय संबंधित समस्या असतील तर हृदयाचा प्रेशरबिंदू हा उजव्या पायाच्या तळ्यांमध्ये असतो तर त्या तळपायाच्या बिंदूवर प्रेशर दिले जाते आणि रोगाचे निदान केले जाते.

ॲक्युप्रेशर पद्धतीमध्ये हातांची बोटे, हात, अंगठे, पाय यांना उपकरणाच्या साह्याने सक्रिय केले जाते. शिवाय, या पद्धतीमध्ये काही ठराविक ठिकाणी मालिश देखील केली जात असते. ॲक्युप्रेशर पद्धतीमध्ये प्रेशर पॉईंट कोणत्या बाजूने असतात हे माहीत असणे गरजेचे ठरते.

ज्या ठिकाणी प्रेशर पॉईंट असतात तर त्या ठिकाणी प्रेशर देऊन त्यांना सक्रिय केले जाते. ॲक्यु पॉईंट ची मालिश करताना श्वास घेणे तसेच शांत राहणे गरजेचे ठरते. ॲक्युप्रेशर पॉईंट वर प्रेशर दिल्यामुळे मालिश केल्यामुळे संबंधित रोगाचे निदान हे व्यवस्थित रित्या केले जात असते. या पद्धतीमुळे अनेक प्रकारचे फायदे होतात.

ॲक्युप्रेशर पद्धतीचे फायदे:-

ॲक्युप्रेशर पद्धती ही नेमकी कशी असते आणि त्यामध्ये काय केले जाते याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे तरी या पद्धतीचे कोणते प्रकारचे फायदे आपण होऊ शकतात याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

  • ॲक्युप्रेशर पद्धतीमुळे गंभीर पाठदुखीचा त्रास हा जाण्यास मदत होऊ शकतो.
  • ॲक्युप्रेशर या पद्धतीमुळे लेबर पेन या समस्येवर देखील आराम मिळण्यास मदत होते.
  • मानसिक ताण तणाव, सतत चिंता करणे या समस्येवर देखील एक्यूप्रेशर पद्धतीमुळे निदान केले जाते.
  • शरीरातील अन्य प्रकारच्या समस्येवर ही पद्धती तर महत्त्वाची ठरते. शिवाय, शरीराच्या त्वचेवर देखील या पद्धतीचा खूप महत्त्वाचा फायदा होतो. सुरकुत्या जाण्यासाठी या पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होतो.
  • शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील एक्यूप्रेशर पद्धती फायदेशीर ठरते.
वाचा  मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्राव होण्याची कारणे, लक्षणे व उपाय

 मित्रांनो, ॲक्युप्रेशर पद्धतीमुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते परंतु, ॲक्युप्रेशर पद्धतीमध्ये प्रेशर पॉईंट जर माहीत नसतील किंवा चुकीच्या पॉईंट्स वर प्रेशर पडले तर यामुळे अनेक प्रकारचे नुकसान देखील होऊ शकतात. समस्येची निदान होणे ऐवजी ही समस्या वाढू देखील शकते. म्हणून तुम्ही योग्य त्याच प्रशिक्षकाचा सल्ला घ्यावा.

 मित्रांनो, ॲक्युपंचर पद्धती व ॲक्युप्रेशर पद्धती म्हणजे काय? व त्यांचे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात? याबद्दल आज आपण जाणून घेतले आहे.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून करू शकतात.

धन्यवाद.

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here