नासपती खाण्याचे फायदे व तोटे

0
754
नासपती खाण्याचे फायदे व तोटे
नासपती खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार, मित्रांनो, आज जाणून घेऊया नासपती खाण्याचे फायदे व तोटे याबद्दलची माहिती. तुम्ही फळ बाजारांमध्ये जेव्हा गेले असाल, तेव्हा तुम्हाला निरनिराळे फळ दिसले असतीलच. त्यामध्ये तुम्हाला पेरू सारखे दिसणारे नासपती हे फळ दिसले असेलच.  पेरू आकाराने गोल असतो. नासपती हे थोडे लांबट असते. नासपती या फळाला इंग्रजीमध्ये पियर असे म्हणतात. नासपती हे फळ चवीला गोडसर- आंबट अशी असते. पिकलेले नासपती हे चवीला गोड असते. तर कच्चे नासपती हे थोडं चवीला आंबटगोड असते.

नासपती आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. नासपती मध्ये अम्लीय गुणधर्म असतात. नासपती हे थंड पदार्थ आहे. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. नासपती पासून आपण फ्रूट सलाड, ज्युस, जेली, नासपती चा दूध घालून ज्यूस, यासारखे पदार्थ करू शकतात. म्हणूनच लहान मुलांना नासपती हे फळ आवडते. नासपती खाल्ल्याने आपल्या शरीराला आरोग्यवर्धक गुण मिळतात. त्याच्या मध्ये गुणधर्म असल्यामुळे, आपल्याला वाताच्या समस्या वर आराम मिळतो.

तर मित्रांनो, आज आपण नासपती या फळाविषयी जाणून घेणार आहोत, की नाशपती फळ खाल्ल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे नेमके कोणकोणते ? आणि नासपती फळ खाल्ल्याने शरीराला होणारे तोटे नेमके कोणते ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

नासपती फळापासून, तुमच्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, नासपती हे फळ आपल्या शरीराला फायदेशीर असते. पण हे अनेकांना माहिती नसते. चला, तर मग जाणून घेऊयात, कोणकोणत्या प्रकारचे फायदे तुम्हाला होतात? 

नासपती फळांमधील गुणधर्म :

मित्रांनो, नासपती मध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, विटामिन्स सी, ऑंटीॲक्सिडेंट, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, तांबे, फोलेट, मॅगनीज, तसेच विटामिन बी कॉम्प्लेक्स, फिनोलेक्स संयुगे, यासारखे गुणधर्म असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. 

वाचा  सिताफळाच्या पानाचे फायदे

वजन कमी होण्यास मदत मिळते :

हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, अवेळी खाणे, पुरेशी झोप न होणे, जागरण, सतत बैठे, काम व्यायामाचा अभाव, तेलकट पदार्थ खाणे, तसेच बेकरी युक्त मैद्याचे पदार्थ खाणे, या साऱ्या गोष्टींमुळे तुमचे वजन वाढते. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नासपती फळांचा समावेश केला, तर तुम्हाला फायद्याचे ठरते. कारण नासपती मध्ये फायबर चे गुणधर्म असतात, आणि ते शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. तसेच नासपती फळ खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही, पोट भरल्यासारखे जाणवते. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यासाठी ते प्रभावशाली ठरते. 

मधुमेही लोकांसाठी फायदेशीर ठरते :

ज्या लोकांना मधुमेह असतो, त्या लोकांना त्यांच्या आहारावर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागते. त्यामध्ये त्यांना त्यांच्या आहारामध्ये योग्य भाज्यांचा, तसेच योग्य फळांचा समावेश करावा लागतो. अशावेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये नासपती हे फळांचा समावेश करायला हवा. नासपती मध्ये नैसर्गिक गोडवा असतो. तसेच नासपती खाल्याने, शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्यामुळे मधुमेहींसाठी नासपती फळ फायद्याचे ठरते. 

तुमची रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत मिळते :

काही लोकांना बाहेरची इन्फेक्शन लवकर होते, तसेच सतत आजारी पडतात. कारण यांना कारणीभूत म्हणजे, त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होय, अशावेळी त्यांनी त्यांची शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य फळे, योग्य भाज्यांचा आहाराचा समावेश करायला पाहिजे. अशा वेळी त्यांनी नाशपती या फळाचा त्यांच्या आहारात समावेश करायला हवा. कारण नासपती मध्ये  ऑंटीॲक्सिडेंट चे  मुबलक प्रमाण असते. त्यामुळे नासपती हे फळ तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायद्याचे ठरते. 

हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचे ठरते :

मित्रांनो, काही जणांचे वयाच्या अगोदरच, गुडघेदुखीचा त्रास सुरू होऊन जातो. तसेच हाडांमध्ये आवाज येणे, तर हाडांमध्ये ठिसूळपणा जाणवणे, यासारख्या गोष्टींचा त्रास होतो. त्याला कारणीभूत म्हणजे, शरीरात कॅल्शियमची कमतरता होणे, अशा वेळी तुम्ही कॅल्शियमयुक्त भाज्या आणि फळांचा समावेश करायला हवा. कारण की नासपती मध्ये कॅल्शियमचं स्त्रोत मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे नासपती फळ आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. 

वाचा  कोथंबीर चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

ॲनिमियाचा त्रास कमी होतो :

ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता होणे. त्यामुळे डोळ्यासमोर अंधारी येणे, थकवा जाणवणे, पूर्ण शरीर थरथर करणे, या सारख्या समस्या होतात. अशा वेळी तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आहारामध्ये नासपती या फळाचा ही समावेश करायला पाहिजे. कारण नासपती मध्ये लोह, तांबे यासारखे गुणधर्म असल्यामुळे, शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास ते फायद्याचे ठरते. 

तुमची पचनक्रिया सुधारते :

काहीजणांना अन्नपचन होण्याबाबत खूप समस्या असतात. त्यामुळे त्यांना ऍसिडिटी, अजीर्ण, सतत ढेकर येणे, यासारख्या त्रास संभवतो. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये नासपती या फळांचा समावेश करायला हवा. नासपती हे फळ खाल्ल्याने तुमची चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे पोटातील सगळी घाण बाहेर निघते. त्यामुळे तुमच्या पचन मार्गात येणारे अडथळे दूर होतात, फळांमुळे म्हणून तुमचे अन्नपचन क्रिया सुधारते. नासपती खाण्याचे चांगले फायदे पचनक्रिये साठी होतात.

हृदयाचे आरोग्य जपता येते :

मित्रांनो, नासपती हे फळ खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य जपता येते. कारण नासपती हे फळ आपल्या शरीरासाठी फायद्याचे ठरते. नासपती मध्ये  ऑंटीॲक्सिडेंट, पोटॅशियम, फायबर चे गुणधर्म असल्यामुळे, ते तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. शिवाय फळ खाल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत मिळते. नासपती एक फळ खाल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका हा 50 ते 60 टक्के टळतो. 

नाशपती फळ खाल्याने होणारे दुष्परिणाम :

मित्रांनो, नासपती खाण्याचे फायदे शरीरासाठी कसे होतात, हे वरील दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेले आहेतच. मित्रांनो नासपती चे प्रमाण अधिक झाल्यास, आपल्या शरीराला त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. तसेच नासपती फळ खाताना ही काळजी घ्यावी, नासपती हे फळ खाताना, त्याची वरची सालटे काढून, त्यांना बारीक चाऊनच खायला हवीत. कारण जाडसर खाल्ल्यामुळे, पोटात बिघाड होतो. त्यामुळे  पोटदुखी व तुमच्या पचनसंस्थेत बिघाड होण्याची समस्या होऊ शकतात. 

वाचा  स्वप्नात रेणुका माता दिसणे शुभ की अशुभ

तसेच नासपती हे फळ कापल्यावर लगेच खावेत, कारण त्याला कापून जास्त वेळ झाल्यास, नासपतीचा हवेशी संबंध आल्यामुळे, त्याचा रंग लालसर तपकिरी होतो. ज्या लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे, अशा लोकांनी नासपती या फळाचे सेवन करू नयेत. कारण नाशपती फळ थंड असते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नासपती खाण्याचे तुमच्या शरीराला होणारे फायदे नेमके कोणकोणते, तसेच नासपती हे फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने, तुम्हाला त्याचे कोणकोणत्या प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच तुम्ही नासपती हे फळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही खाऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, व आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here