बोर खाण्याचे फायदे व तोटे

0
1846
बोर खाण्याचे फायदे व तोटे
बोर खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया बोर खाण्याचे फायदे व तोटे. आपण नियमित विविध प्रकारच्या फळांचे सेवन करणे महत्त्वपूर्ण ठरते. रोज एकतरी फळाची सेवन आपण केले पाहिजे त्यामुळे आपले आरोग्य सुधारते. शिवाय बोरं यामधून आपल्याला आवश्यक ते जीवनसत्व, पौष्टिक तत्त्वे, पौष्टिक घटक मिळण्यास मदत होत असते. म्हणजे तर विविध प्रकार आहे तर एक तरी पण आपण दिवसातून खाल्लं पाहिजे. मित्रांनो, बोर नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटले की नाही ! बोरांचे नाव घेता बरोबर आपल्याला बोरांची चव लगेच आठवते. बोर खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. बोर हे आकाराने इवलेसे असले, तरी त्याचे अनेक गुणकारी फायदे आपल्याला होत असतात. बोरं यामध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात. शिवाय बोरं खाणे हे आपल्या शरीरासाठी गुणकारी देखील ठरते.

इवलेसे बोर परंतु फायदे आभाळाएवढे असे म्हणण्यास हरकत नाही. बोर यांचे झाड आपल्या दिसता बरोबर आपले हात ते तोडण्यासाठी आपोआप वळतात. बोर मधली तर त्यामध्ये देखील अनेक प्रकार असतात. शाम बोरं, गोड मोठे बोरं अनेक प्रकार बोरांचे सांगता येतील. बोर ह्याचा कोणताही प्रकार असतो परंतु फायदे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारचे होत असतात. बोर हे आंबट गोड चवीचे असल्यामुळे ते खायला देखील छान लागतात. काहीजण बोर तर एकदमच आवडीने खात असतात. तर मित्रांनो बोर या फळाचे सेवन केल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपण होऊ शकतात? याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. मित्रांनो आज आपण बोरं खाण्याचे होणारे फायदे व तोटे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग खाण्याचे फायदे व तोटे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

बोरं खाण्याचे होणारे फायदे :-

बोरं आकाराने जरी छोटे असले तरी फायदे आपल्याला भरपूर प्रमाणात त्याचे होत असतात. तर मित्रांनो, बोर खाल्ल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात. या विषया बद्दल आपण आता जाणून घेऊयात!

 • बोरांचे चव ही आंबट-गोड प्रकारचे असते मध्ये विटामिन सी चे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असते. बोर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. कुठल्याही प्रकारचा आजार असोत वा संसर्गजन्य रोग असो तर त्यापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही जास्तीत जास्त व मजबूत असावी लागते. बोराचे सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या क्षमतेने वाढण्यास मदत होऊ शकते.
 • बोरं मध्ये पौष्टिक घटक आढळून येतात ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात.
 • आपल्या शरीरामध्ये जर ऊर्जेचे प्रमाण हे चांगल्याप्रकारे असले तर त्यामुळे आपल्याला दिवसभराचा उत्साह टिकून राहतो शिवाय कुठले काम करायचे म्हटले तर लवकर थकवा येत नाही. बोरं खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जेचे प्रमाण हे चांगल्याप्रकारे वाढण्यास मदत होते शिवाय शरीराचा थकवा देखील जाण्यास मदत होऊ शकते.
 • बोर खाल्ल्यामुळे शरीराचा आराम हा व्यवस्थित प्रकारे होऊ शकतो. म्हणजेच पुरेशी झोप घेण्यास मदत होऊ शकते एक प्रकारे बोर खाल्ल्यामुळे निद्रानाश होत नाही.
 • बोर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे रक्ताभिसरण प्रक्रिया ही व्यवस्थित व सुरळीत चालू राहण्यास मदत होऊ शकते.
 • जर तुमच्या शरीराचे अतिप्रमाणात वजन वाढलेले असेल आणि ते तुम्हाला नियंत्रित करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही बोरांचे सेवन करायला हवे जेणेकरून तुमच्या शरीराचे वजन हे कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • बोर यामध्ये लोहाचे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत नाही म्हणजेच रक्त वाढण्यास मदत होऊ शकते.
 • बोर हा कॅल्शिअमचा स्रोत देखील मानला जातो बोर्डामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम चे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असेल तर संधिवात सारख्या समस्या पासून आपण दूर राहू शकतो व आपल्या शरीरातील हाडे बळकट व मजबूत राहण्यास देखील मदत होत असते.
 • अति कामाच्या लोढा मुळे सतत काम करण्यामुळे अनेकांना मानसिक टेन्शन येत असते. तर मानसिक टेन्शन दूर व्हावे तसेच डोकेदुखी पासून आराम मिळावा यासाठी तुम्ही बोरांचे सेवन करायला हवे. त्यामुळे तुमचे मानसिक टेन्शन जाण्यास मदत होऊ शकते.
 • बोर खाल्ल्यामुळे आपण कॅन्सरसारख्या रोगापासून देखील दूर राहू शकतो. कॅन्सर होण्यास ज्या पेशी कारणीभूत ठरतात तर अशा पेशी निर्माण होण्यापासून त्या रोखण्यासाठी बोर खाल्ल्यामुळे फायदा होऊ शकतो.
 • जर तुम्हाला त्वचे संबंधित चे विकार असतील, चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर त्यासाठी देखील बोरांचे सेवन हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
 • बोर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाचकरस तयार होत असतो म्हणजेच आपल्या शरीराची पचनसंस्था ही सुरळीत चालू राहण्यास मदत होऊ शकते अनेक वेळा आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पचना संबंधीचे विकार उद्भवतात जर अशा वेळेस तुम्ही बोरांचे सेवन करत असाल, तर तुमची पचनसंस्था ही चांगली सुरळीत चालू राहण्यास मदत होते. शिवाय, खाल्लेले अन्न देखील लवकर पचनास मदत होऊ शकते.
 • बोरांचे सेवन केल्यामुळे पोट साफ होण्याची समस्या देखील येत नाही बोरं खाल्ल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होऊ शकते.
वाचा  श्वास घेताना त्रास होणे या समस्येवर घरगुती उपाय 

तर मित्रांनो, बोरांचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. बोर हे तर सर्वांनाच खायला आवडत असतात. बोर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या क्षमतेने वाढण्यास मदत होते ज्यामुळे आपण अनेक संसर्गजन्य रोगांपासून दूर राहू शकतो. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, तसेच त्यांची पचनसंस्था व्यवस्थित राहावी यासाठी तुम्ही लहान मुलांना देखील आवर्जून खायला दिले पाहिजे. मित्रांनो, बोर खाणे हे आपल्या आरोग्यासाठी तर फारशी फायदेशीर ठरते. परंतु, अति प्रमाणात त्याचे सेवन केल्यामुळे देखील आपल्या खेळाला नुकसान होऊ शकते. म्हणून बोरांचे आपण योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.

बोरं खाण्याचे होणारे तोटे :-

बोर खायला गोड आंबट, आकाराने छोटे परंतु, फायदे मोठे असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु मित्रांनो बोरांचे सेवन हे आपण योग्य प्रमाणातच करायला हवे जर त्याचे सेवन आपण अतिप्रमाणात केले तर त्यामुळे आपल्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच देखील होऊ शकतात व खाल्ल्यामुळे अति सेवन केल्यामुळे कोणते नुकसान होऊ शकतात याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊयात.

 • बोरं हे अति प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या शहरांमध्ये पित्ताची समस्या येऊ शकते. जर आपण एकाच वेळी जास्तीत जास्त आंबट पदार्थ खात राहिलो तर आपल्या शरीरातील आम्लाचे प्रमाण हे वाढत जाते शिवाय त्यामुळे आपल्याला उलट्या होण्याचा त्रास देखील होऊ शकतो आणि उलट्या वाढल्यामुळे, शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला चक्कर येण्याची समस्या देखील येऊ शकते.
 • अतिप्रमाणात बोर खाल्ल्यामुळे आपल्याला ॲसिडिटीची समस्या देखील निर्माण होऊ शकते. आपल्या शरीरात जास्तीत जास्त ऍसिडिटी जमू नये यासाठी आपण हे मर्यादेतच खाल्ले पाहिजेत अति सेवन त्याचे करू नये.
 • बोर खाल्ल्यावर आपण दुग्धजन्य पदार्थ खाणे शक्‍यतो टाळावेत. बोर हे चवीने आंबट वृत्तीची असतात. आणि आंबट पदार्थ खाल्ल्यावर जर आपण दूध घेत असाल तर त्यामुळे पोटात बिघाड होण्याची शक्यता असते. आणि पोट बिघडल्यामुळे पोटाचे विकार आपला होऊ शकतात. त्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो.
 • बोर तुम्ही उपाशी पोटी अजिबात खाऊ नका. जर काही न खाता जर सुरूवातीस तुम्ही बोरच खाल्ले तर त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते.
 • अतिप्रमाणात बोर खाल्ल्यामुळे तुम्हाला शरीराच्या त्वचे संबंधित देखील विकार येऊ शकतात. म्हणजेच त्वचे संबंधित ऍलर्जी येऊ शकते.
वाचा  उन्हाळ्यामध्ये कपडे कोणते व कशाप्रकारे घालावे

तर मित्रांनो, बोर ने हे तर आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते परंतु त्याचे सेवन हे मर्यादितच असायला हवे. जर आपण अति प्रमाणात त्याचे सेवन केले तर आपल्या शरीराला फायदा हा फारच कमी प्रमाणात होईल. परंतु, नुकसान हे जास्त होऊ शकतात. जर तुमच्या शरीराला आंबट पदार्थांची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही आंबट पदार्थांचे सेवन करू नयेत.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here