नाक कान घसा विकार आणि उपचार जाणून घेऊयात काय आहेत ?

0
849
नाक कान घसा विकार आणि उपचार जाणून घेऊयात काय आहेत
नाक कान घसा विकार आणि उपचार जाणून घेऊयात काय आहेत

नमस्कार मित्रांनो आरोग्यम् धनसंपदा ! मित्रांनो आपण लहानपणापासून हे वाक्य ऐकत आलेले असतो. खरच प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे. आपल्या शरीराचे  प्रत्येक अवयव जपले पाहिजेत. आपल्या शरीराची पंचेंद्रिय हे जपले पाहिजेत. खरं तर पंचेंद्रिया शिवाय आपण कुठलेही काम व्यवस्थितपणे करू शकत नाही. डोळे, नाक कान घसा  , त्वचा , जीभ हे जर आपल्या शरीराचे अवयव व्यवस्थित असतील तर  आपण कुठलेही काम हे सहज रित्या करू शकतो. शरीरातील प्रत्येक अवयव उत्तम तर स्वास्थ्य उत्तम असेच म्हटले जाते. वाढते प्रदूषण समस्या तसेच  संसर्गजन्य रोग यांचा परिणाम लगेच हा शरीरातील  अवयवांवर होत असतो. जसे एखाद्याला सर्दी झाली की लगेच त्याचा संसर्ग त्याच्या बाजूच्या व्यक्तीला होतो. म्हणजेच की त्या व्यक्तीला देखील  सर्दी होऊ शकते.

तसेच एखादा व्यक्ती शिकल्यामुळे त्याच्या बाजूच्या व्यक्तीला देखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आपण आपले जेवढे जास्तीत जास्त आपली काळजी घेऊ तेवढे आपण इतर संसर्गापासून बचाव करू शकतो. मित्रांनो, आज आपण नाक कान घसा विकार आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नाक कान घसा या संदर्भात आपल्याला अनेक विकार हे संसर्गापासून देखील होत असतात. त्यामुळे आपण आपली स्वतःची जेवढे जास्तीत जास्त काळजी घेऊ तेवढे आपण या संसर्गापासून दूर राहू शकतो. तर नाक, कान, घसा संदर्भात कोणते विकार  होऊ शकतात, याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

नाक कान घसा यांचे विकार आणि त्यावरील घरगुती उपचार:

मित्रानो नाक कान घसा यांचे विकार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मानवी शरीर रचना हि सारखी नसते त्यामुळे नाक कान घसा यांचे होणारे विकार हि सारखे नसतात. या विकारां वरील काही घरगुती उपचार आपण जाणून घेणार आहोत जे खाली नमूद केल्या प्रमाणे आहेत.

कानाचे विकार आणि त्याचे उपचार:

कान संबंधित विकार 

 • मित्रांनो, आपले पंचेंद्रिय यापैकी  आणखी एक महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे कान. कान हे श्रवणाचे काम तर करतातच. पण, आपले एक सर्वसाधारण संतुलन साधण्याचे देखील काम देखील काम करत असतात. कानातून बरोबर प्रेमाने बघितले तर ते सामान्य आणि कानाला छोटी होल दिसते.
 • परंतु कानाच्या होल मध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना असते. याचा अंदाज आपण लावू शकत नाही. शरीरातील प्रत्येक अवयवाची रचना ही वेगवेगळ्या प्रकारचे असते. जोपर्यंत आपण काही समस्या उद्भवत नाही म्हणजेच जोपर्यंत कानाचे काम सुरळीत सुरू असते, तोवर आपले  कधीही कानाकडे लक्ष जात नाही.
 • ऐकू येतेय ना म्हणजे सगळे सुरळीत चाललेले आहे असा आपला सर्वसामान्य समज असतो.  पण काही त्रास असे असतात की त्यांच्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे ठरते. अगदी लहान मुलांमध्ये देखील सर्दी आणि यातून कान नेहमीच वाहताना आपल्याला दिसून येताना दिसते. तसे बघायला गेले तर सर्दी म्हणजे अगदीच सामान्य त्रास असे आपण म्हणत असतो. सर्दी साठी औषध नाही घेतले तर बरे व्हायला बराच कालावधी जातो आणि सर्दी साठी औषध घेतले तर सात दिवस बरे व्हायला लागतात, असे आपला अंदाज असतो.
 • पण बरेचदा असे नसते. लहान मुलांना सर्दी होऊन कान वाहणे सुरू झाल्यास याकडे दुर्लक्ष न करता लगेच कान, नाक,घसा तज्ञ डॉक्टरांकडे दाखवायला पाहिजे. कारण बरेचदा सर्दीमुळे कान व नाक यांना जोडणार्‍या नलिकेतून संसर्ग कानात जात असतो आणि यामुळे कानात पस तयार होऊ शकतो आणि त्यावेळेस उपचार न झाल्यास कानाच्या पडद्याला छिद्र पडून कान वाहने सुरू होऊ शकते.
 • कान फुटल्यावर उपचार झाले नाहीत तर छिद्र कायमस्वरूपी राहते. मग ऐकायला कमी येते. आणि सतत कान वाहण्याचा त्रास देखील सुरू होतो. तसेच  या नकारात्मक दबावामुळे कानात पाणी तयार होते आणि यामुळे बहिरेपणा येऊ शकतो. हे पाणी जर काढले नाही,तर कानाच्या पडद्याला आणि हाडाला नुकसान होऊ शकते. 
 • मित्रांनो, कान वाहने हा विकार दोन प्रकारच्या आजारांमुळे देखील असू शकतो. एका आजारात पडद्याला साधे छिद्र असते आणि अधून मधून संसर्ग होऊन कान वाहण्याचे प्रमाण खूप जास्त असते. या प्रकारात ऐकायला कमी येते. त्यामुळे आपण जितका लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे दाखवू तेवढा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
 • दुसऱ्या प्रकारात कान वाहण्याचे प्रमाण कमी असते. पण त्यात द्रवपदार्थ झाला घाण वास येत असतो. कधी कधी ते रक्तमिश्रितही असते. याव्यतिरिक्त कानाचे हाड सडण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली असते.
 • योग्य ते उपचार झाले नाहीत तर जीवाला धोका होऊ शकतो. म्हणजेच मेंदूमध्ये कानाचा जो पडदा असतो, त्याला संसर्ग होऊ शकतो. यासाठी वेळीच उपचार जर घेतले तर ते खूप फायदेशीर ठरू शकते. म्हणून मित्रांनो आपण कानाची वेळोवेळी तपासणी करत राहायला हवी. थोडा जरी त्रास असला तर लवकरात लवकर दाखवलेले बरे जेणेकरून हा त्रास गंभीर स्वरूपाचा आजार तुम्ही निर्माण करू शकणार नाही.
वाचा  बाळ रात्री रडत असल्यास काय कराल?

कान संबंधित उपचार

 • मित्रांनो, शरीरातील पंचेंद्रिय यांपैकी कान हा अवयव फार महत्त्वपूर्ण असतो. कारण, श्रवणाचे  काम आपण काना मार्फतच करत असतो. म्हणून आपण वेळोवेळी आपल्या कानाची काळजी घेणे खूप फायदेशीर ठरू शकते.
 • आपल्याला सर्दी झाली असेल तर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. आणि जर दुर्लक्ष केले तर कानापर्यंत याचे इन्फेक्‍शन होऊ शकते. म्हणजेच कानातून पाणी येणे वगैरे. आपल्या कानात एक हाडांची साखळी असते दीर्घकाळ कान वाहिल्यामुळे ती खराब झाली असेल तर नीट करता येऊ शकते.
 • त्यामध्ये सडलेले हाड काढून संसर्ग दूर करतात. कान कोणत्या प्रकारे वाहत असले तरी त्याचे निदान करणे गरजेचे ठरते. निदानानुसार योग्य उपचार करून घ्यायला हवेत. कान शरीराचा महत्त्वपूर्ण अवयव असून यावर योग्य वेळीच उपचार घेणे खूप फायद्याचे ठरू शकते. तुम्ही नाक, कान, घसा तज्ञ यांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घेऊ शकतात.

नाकाचे विकार अणि उपचार:

नाका संबंधित विकार

मित्रांनो, आपल्या पंच ज्ञानेंद्रियंपैकी एक महत्वपूर्ण म्हणजेच नाक होय. नाकामुळे आपल्याला गंधज्ञान करू शकते. गंधज्ञान म्हणजेच नाकावर द्वारे आपण सुगंध घेऊ शकतो. गंध ज्ञानासाठी आणि श्वासोच्छवासा साठी नाक उपयोगी असते शरीराच्या पाच ज्ञानेंद्रिये पैकी नाक हे एक महत्त्वपूर्ण  इंद्रिय असून श्वसन संस्थेतील एक भाग आहे. मित्रांनो नाकाची सुद्धा आपण वेळोवेळी योग्य त्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. नाका संबंधित सर्दी-पडसे हा विकार होतो. 

 • सर्दी होणे ही सामान्य बाब आहे परंतु, ती जास्त दिवस असणे याकडे दुर्लक्ष केल्यास वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. सर्दीमुळे श्वासनलिकादाह तसेच निमोनिया यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात याशिवाय नाक फुटणे म्हणजेच नाकातून रक्त येणे हा विकार देखील उद्भवू शकतो. 
 • आजकाल हवेतील प्रदूषणामुळे नाकांच्या विकारा मध्ये खूपच वाढ झालेली दिसून येते. नाकावाटे आपण श्वसन करत असतो आणि त्यातूनच आपल्या शरीराचे कार्य योग्य पद्धतीने सुरळीत ठेवण्यासाठी लागणारा प्राणवायू आपण शरीरात घेत असतो. त्यामुळे नाकाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
 • उन्हाळ्यामध्ये अति उष्णतेचे प्रमाण जास्त असते.  अतिउष्णतेमुळे वारंवार सर्दी होण्याचे प्रमाणही वाढते. उन्हाळ्याच्या दिवसात नाकामध्ये माळीन होण्याचे प्रमाण वाढते. म्हणजे नागपुडीच्या आत येणारे फोड. यामुळे वेदना होतात तसेच श्वसनाला  देखील  त्रास होतो. प्रामुख्याने हा उष्णतेत होणारा विकार आहे.
 • हा विकार झाल्यास साजूक तुपाचा एखादा थेंब रात्री झोपताना नाकात सोडल्याने श्वसन मार्ग मोकळा होतो. अतिउष्णतेमुळे नाक फुटणे ही देखील समस्या उद्भवत असते. यासाठी वेळीच उपचार घेणे आवश्यक ठरते. 
वाचा  गाजर खाण्याचे फायदे

नाका संबंधित उपचार

मित्रांनो, नाका संबंधित समस्या अनेकांना येत असते. त्यामुळे त्यामुळे जर तुम्ही वेळीच उपचार घेतले तर महत्त्वपूर्ण ठरू शकतील म्हणजेच आजार गंभीर होण्यापूर्वीच उपचार घेतलेला बरा. सर्दी झाली म्हणजेच नाक बंद होण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे कुठले उपचार घ्यावे ती ही आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. तसेच अति उन्हाळ्यामुळे देखील वारंवार सर्दी होण्याचे प्रमाण हे वाढत आणि उन्हाळ्यामुळे नाकफुटी चे प्रमाण देखील वाढत असते. तसेच नाक हे वेळोवेळी स्वच्छ करणे देखील गरजेचे असते. नाका संबंधित आपण खालीलप्रमाणे उपचार घेऊ शकतो.

 • मित्रांनो, जर तुमचे नाक जर सर्दीमुळे बंद झाले असेल, तर कानात कापसाचे बोळे घालावेत. तसेच गरम पाण्याच्या पिशवीने  कपाळाला देखील शेकावे.  साजूक तुपाचे थेंब नाकात घातल्याने देखील नाक मोकळे होण्यास मदत होऊ शकते.असे साधे सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकतात.
 • तसेच तुम्ही गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता त्याने देखील नाक मोकळे होण्यास मदत होऊ शकते. आणि सर्दी चे प्रमाण देखील कमी होत जाते.
 • जास्त उष्णतेमुळे वारंवार सर्दी होण्याचे प्रमाणही वाढत असते. जास्त तापमान  असल्यास रुमालावर निलगिरी तेलाचे थेंब टाकून त्याचा वास घेतल्यास बरे वाटते.  
 • उष्णतेमुळे होणारी सर्दी असेल, तर पाणी जास्तीत जास्त प्या. जेणेकरून सर्दी होऊ शकणार नाही.
 • अतिउष्णतेमुळे नाक  फुटणे म्हणजेच, नाकातून रक्त येत असेल तर मान खाली करून मस्तकावर आणि कपाळावर गार पाणी मारावे. असे केल्याने रक्त वाहने थांबते. तसेच गादीवर डोके थोडे वरच्या बाजूला  करून दोन-तीन मिनिटे तसेच झोपल्या मुळे देखील रक्त वाहने थांबत असते. 
 • नाक स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करताना नाकावर थोडे पाणी मारून स्वच्छ ठवता येते.
 • जर तुमच्याकडून नाकात कोणतीही वस्तू गेल्यास तुम्ही स्वतः न काढता डॉक्‍टरांकडे जाऊन योग्य त्या सल्ल्याने अथवा उपचाराने काढून घ्या.
 • जर तुमच्या नाक फुटी मुळे नाकातून रक्त येत असेल आणि नाकातून आलेले रक्त प्राथमिक उपचारांनी थांबत नसल्यास, डॉक्टरांकडे तातडीने जा आणि योग्य तो सल्ला घेऊन उपचार करून घ्या. 
 • नाकामध्ये कोणतेही औषधी द्रव्य म्हणजेच नाकात टाकायचा स्प्रे असेल तर तो  परस्पर घालू नका.  डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य तो उपचार तुम्ही घेऊ शकतात.

घश्याचे विकार अणि उपचार:

घश्याचे विकार

 • मित्रांनो, घसादुखी हे लक्षण मुलांपासून प्रौढांपर्यंत आढळून येणारे लक्षण आहे. अशी कुठलीही व्यक्ती नसेल की ज्याला घस्यासंदर्भात त्रास होत नसेल. घशा संदर्भात अनेक विकार आढळून येतात. जसे की घसादुखी.
 • घसा दुखणे याला कारणीभूत असणारे जीवाणू व तसेच विषाणू यांसारखे भरपूर प्रमाणात सूक्ष्म जीव आहेत. तीव्र डोकेदुखी संक्रमण किंवा  पुनरसंक्रमण होण्याचा धोका खूप अधिक गर्दीत असलेल्या जागेत  राहणाऱ्या मुलांमध्ये खूप सामान्य आहे. अशा जागाची उदाहरण म्हणजे, गर्दीच्या ठिकाणची जागा किंवा खराब आवास परिस्थिती असलेले ठिकाण होय.
 • सर्वसामान्य कारण म्हणजे फ्लू किंवा सामान्य सर्दी जिवाणू आणि विषाणू यांपासून होणारे संक्रमण. याद्वारे व बहुतांशी संक्रमित व्यक्तीच्या नाकातील किंवा लाळेतील गळतीमुळे एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीत पसरतात. गर्दीचे ठिकाण, घाण व अस्वच्छ पद्धतीने अन्न पदार्थ हाताळणे, रासायनिक पदार्थांना अनावरण, धूर आणि खाज कारक पदार्थ घसा दुखीची कारणे ठरू शकतात. घसा दुखी मध्ये घास गिळणे कठीण होते. यासह ताप व डोकेदुखी सारखी लक्षणे आढळून येतात.
 • घसा दुखी ची समस्या असल्यास कोणत्याही औषधोपचारा शिवाय बरी करता येऊ शकते. पण अनेक व्यक्तींना जंतुनाशक म्हणजेच व औषधोपचार घेऊनच घसादुखी ची समस्या दूर करता येऊ शकते. साधी सर्दी झाली झाली तरी घसा दुखी चे समस्या उद्भवू शकते.
 • आणि घसा दुखी चे समस्या झाली म्हणजेच जेवण करताना घास गिळणे कठीण जाते. घसा दुखी चे समस्याही जास्त प्रकारे उद्भवल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लवकरात लवकर उपचार घेतला पाहिजे ज्यामुळे ही समस्या जास्त गंभीर आजाराचे स्वरूप धारण करणार नाही. कशा संदर्भात आपण काही साधे सोपे उपाय करू शकतो. कशा संदर्भात काळजी घेणे हे आपल्या हातात आहे.
वाचा  छाती वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा

घश्यासंबंधित उपचार

मित्रांनो, घसा संबंधित आजार होत असतील तर आपण काही घरगुती उपाय करून देखील उपचार घेऊ शकतो. तसेच घसा विकार हा जास्त गंभीर स्वरूपाचा असेल, तर तुम्ही नाक घसा तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेऊन उपचार घेऊ शकतात. तसेच आपण घशाची नियमित काळजी देखील घेतली पाहिजे. काही साधे सोपे उपचार आपण कशा संबंधात करू शकतो ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

 • सर्दी झाल्यास घसा संबंधित त्रास होत असतो. त्यासाठी आपण कोमट पाण्यामध्ये एक चमचा  मीठ टाकून  त्या पाण्याच्या गुळण्या करू शकतो. असे दिवसातून दोन वेळा केल्याने घशाला आराम मिळतो. कशा संदर्भात त्रास उद्भवत असल्यास तुम्ही एकदम गरम पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
 • आणि तसेच एकदम तिखट आंबट पदार्थ खाणे देखील टाळावे. घसा दुखत असल्यामुळे जेवण जात नसल्यास तुम्ही सूप घेऊ शकतात. घसा दुखत असल्यामुळे ताप येण्याची शक्यता असते म्हणून डॉक्टरांकडे वेळेत जाऊन उपचार घेऊ शकतात. तसेच कशा संदर्भात त्रास होत असल्यास भरपूर वेळ विश्रांती घ्या. त्यामुळे तुमच्या आवाजाला ही आराम मिळू शकतो.
 • कशा संबंधित त्रास होत असल्यास सिगरेटचा धूर उदबत्ती आणि जास्तीत जास्त वास असणारे पदार्थ यांपासून लांबच राहा. कशा संदर्भात त्रास होत असल्यास घरगुती पद्धतीने तुम्ही काढा घेऊ शकतात. अथवा आलं युक्त चहा घेऊ शकतात. तसेच एक चमचा मध आणि अर्धा चमचा आल्याचा रस एकत्र करून घेऊ शकतात. यामुळे देखील तुमच्या कशाला आराम मिळू शकतो.

असे साधे सोपे उपाय करून देखील जर तुम्हाला योग्य ती मदत होत नसेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे फायदेशीर ठरेल.

मित्रांनो वरील प्रमाणे आपण नाक कान घसा संबंधित विकार आणि त्यावरील काही उपचार याविषयी माहिती घेतलेली आहे. नाक कान घसा संबंधित जर तुम्हाला विकार असेल तर आजार गंभीर होण्याआधी वेळीच डॉक्टरांच्या मदतीने योग्य तो उपचार घ्या. वरील प्रमाणे आम्ही सांगितले माहिती तुम्हाला कसे वाटेल हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून करू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here