वरचा ओठ फडफडणे खालचा ओठ फडफडणे म्हणजे काय?

0
3971
वरचा ओठ फडफडणे खालचा ओठ फडफडणे म्हणजे काय
वरचा ओठ फडफडणे खालचा ओठ फडफडणे म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो. मनुष्य असा प्राणी आहे की ज्यांना ज्यांना सर्व प्राण्यांमध्ये हुशार बुद्धिमान मानला जाते. त्याच्या होणाऱ्या प्रत्येक हालचाली या महत्त्वपूर्ण असतात. अगदी  कपाळावरील केशरचनेपासून हनुवटी पर्यंतच्या डोक्याच्या पुढील भागाचा चेहरा म्हणतात. त्यामध्ये कपाळ, डोळे,नाक, ओठ, गाल,हनुवटी यांचा समावेश होतो. चेहऱ्याच्या विविध भागांत रूप रस आणि गंध ज्ञानेंद्रियांची ग्राहक स्थाने आहेत. चेहऱ्यास रक्त पुरवठा हा भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्यावरील जखमा लवकर बऱ्या होतात. काही भागातील नीला कडपरा अंतर्गत म्हणजेच ज्या भागा मध्ये मेंदू असतो,अशा कवटीच्या भागाच्या आतील निलांशी जोडलेला असल्यामुळे तेथील रोग संक्रमण मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ, वरचा ओठ फडफडणे .

चेहऱ्यावरील स्नायूंची हालचाल आननतंत्रीकेच्या म्हणजेच मेंदूपासून निघणाऱ्या सातव्या मज्जेच्या शाखांतून येणाऱ्या संवेदना मुळे होते. हालचाली या भावना दर्शक असतात, काही व्यक्तींमध्ये चेहऱ्याच्या विशिष्ट हालचाली विशिष्ट भागापुरते मर्यादित असतात. पण,त्या सतत होताना आढळतात. जसे की डावी किंवा उजवी भुवई उडणे. चेहऱ्याच्या हालचाली अनेक प्रकारच्या होऊ शकतात जसे डोळा फडफडणे, गाल फडफडणे, पापणी फडफडणे इत्यादी. या फडफड करण्यामागील  काही शास्त्रीय कारणे देखील असतात. तर शास्त्राच्या भाषेत म्हटले तर यांचा वेगळाच अर्थ मानला जातो. तर मित्रांनो आज आपण ओठ फडफडणे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत वरचा ओठ फडफडणे आणि खालचा ओठ फडफडणे म्हणजे काय याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

ओठ फडफडणे म्हणजे काय ?

मित्रांनो,शरीराचे अवयव फडफडणे म्हणजे यामागे अनेक कारणे असू शकतात. शरीराचे अवयव अंग फडकणे ही एक सामान्य गोष्टी आहे. शरीरात काही अवयव फडकत असतात. शरीरात हार्मोन्स बदल मुळे देखील शरीरातील अवयव फडकू शकतात. परंतु, ज्योतिष शास्त्रामध्ये या गोष्टीला शकुन-अपशकुन याच्याशी जोडले गेलेले आहे. अनेक व्यक्ती तर या गोष्टींना अंधश्रद्धेचा भाग देखील मानत असतात. परंतु ज्योतिष शास्त्र प्रमाणे, काही अवयवांचे फडफडणे हे शुभ संकेत मानले जाते.

वाचा  श्वास घेताना त्रास होणे या समस्येवर घरगुती उपाय 

तर, काही अवयवांची  फडफड करणे हे अशुभ देखील मानले जाते. शरीरातील डोळा फडफडणे यामागे अनेक कारणेही ज्योतिष शास्त्र मध्ये सांगितले जातात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा वेगळा अर्थ हा सांगितला जातो.ज्योतिष शास्त्र प्रमाणे शरीराचा एखादा अवयव फडफडणे म्हणजेच एखादी शुभवार्ता समजू शकते किंवा धनलाभ होऊ शकतो अथवा घरात एखादे शुभ कार्य निश्चित होऊ शकते असे सांगितले जाते. ज्योतिष शास्त्र प्रमाणे असे सांगितले जाते की,  शरीरातील एखादा अवयव एफडफडल्यामुळे अशुभ संकेत मिळू शकतात किंवा एखादी  दुःखद वार्ता समजणे, धन हानी होणे,वाद होणे मानसन्मानाची हानी होणे अशा गोष्टी घडू शकतात, असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते.

शास्त्रानुसार वरचा ओठ फडफडणे आणि खालचा  खालचा ओठ फडफडणे याचे संकेत :-

शरीराचे अवयव फडकवण्याची एक विशेष गोष्ट म्हणजे सामान्यतः शरीराच्या उजव्या बाजूच्या अवयव फडकल्यास शुभ फळ प्राप्त होतात, असे हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगितले जाते. तर डाव्या बाजूकडील ओठ फडकणे हे अशुभ मानले जाते,  असे  देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगितलेले आहे. स्त्रियांच्या बाबतीत डाव्या बाजूचे अवयव फडकने हे शुभ मानले जाते तर  उजव्या बाजूचे अवयव फडफडणे हे अशुभ मानले जाते, असे देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगितले गेलेले आहे. तर ज्योतिष शास्त्र प्रमाणे वरचा ओठ फडफडल्यास काय होऊ शकते ? आणि खालचा ओठ फडफडल्यास काय घडू शकते? याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  • ओठ फडफडणे म्हणजेच एखादी आवडती वस्तु भेटण्याची संकेत आहे, असे सांगितले जाते.
  • जर तुमच्या ओठांचा उजवा कोणा फडफड करत असेल तर अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत असे मानले जाते.
  • वरच्या ओठांचा उजवा कोणा फडकल्यास धनयोग हा मित्रांकडून होऊ शकतो.
  • जर ओठांचा डावीकडील कोणा फडफड करत असेल तर आवडती वस्तू हरवण्याची योग तयार होतात.
  • वरचेवर ओठ फडफडणे म्हणजे आवडत्या भोजनाचे योग आहे, असे सांगितले जाते.
  • खालचे ओठ  फडफडणे म्हणजेच प्रियकराकडून सुख मिळेल,असे सांगितले जाते.
  •  ओठांची उजवी बाजू फडफडणे म्हणजे अचानक धनलाभाचे योग येतील.
  • दोन्ही ओठ फडफडणे म्हणजे खालचा आणि वरचा फडफडत असेल तर भाग्य लवकरात लवकर उजळेल आणि धनप्राप्ती होईल असे सांगितले जाते.
वाचा  सतत आळस येणे.

 मित्रांनो, आपण घरातल्या वरिष्ठ मंडळी कडून शरीराचे अवयव फडकल्यास कुठले संकेत मिळू शकतात, याविषयी ऐकलेली असते. शरीराचा एखादा अवयव फडफडल्यास हे असे होऊ शकते हे तसे होऊ शकते या गोष्टींविषयी आपण ऐकलेले असते. आपले महत्वाचे काम असले तरी आपण घराच्या बाहेर पडत नाही कारण आपला वाटते ऑफिस मध्ये काहीतरी वाईट होणार, इंटरव्यू मध्ये पास नाही होणार, आज मला पैसे नाही मिळणार, काही जरूरी काम असेल तर ते नाही होणार, असे समजून आपण आपल्या घराच्या बाहेर पडण्यास देखील घाबरत असतो. कारण की आपल्याला वाटते की काहीतरी अपशकुन होणार.

पण, असे काही नसते. कारण, हा सगळा आपल्या मनाचा खेळ असतो. आपल्याला वाटते की, हे अशुभ आहे किंवा तर ते शुभ आहे पण, आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. काय शुभ आणि  काय अशुभ हे आपल्या मनाचे खेळ असतात. परंतु, मित्रांनो शरीराचा एखादा अवयव फडफड करत असेल तर त्यामागे काही शरीरातील बदल असू शकतो किंवा वैज्ञानिक कारण असू शकते. शरीरातील प्रत्येक अवयव फडफडणे मागे काहीतरी शास्त्रीय कारण असते.त्यामुळे आपण आपला जेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवू तेवढे आपल्यासाठी चांगले ठरू शकते.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

     

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here