लहान बाळाची मालिश कोणत्या तेलाने व कशी करावी?

0
1619
लहान बाळाची मालिश कोणत्या तेलाने व कशी करावी
लहान बाळाची मालिश कोणत्या तेलाने व कशी करावी

नमस्कार मित्रांनो. आई होणे यासारखा दुसरा आनंद कुठलाही सांगा येत नाही. आईच्या हातात जेव्हा बाळ येत असते तेव्हा तिला जो आनंद झालेला असतो. तो खूपच मौल्यवान असतो म्हणजेच गगनात मावेनासा असाच असतो. परंतु आई झाल्यावर आई समोर भरपूर आव्हाने येत असतात. कारण आई होण्याची अगोदरच जीवन आणि आई झाल्यानंतरच जीवन या दोघांमध्ये खूप फरक आढळून येतो. आई झाल्यानंतर आईला तिच्या लहान बाळाची खूपच काळजी घ्यावी लागत असते. म्हणजेच सुरुवातीपासूनच बाळा काही लक्ष द्यावे लागत असते. अगदीच बाळाला स्तनपान करण्यापासून लहान बाळाची मालिश सगळ्याच गोष्टी आईला करावे लागत असतात.

बाळाला वेळोवेळी स्तनपान करणे बाळाला झोपू नये या सर्वच गोष्टी आईला व्यवस्थित प्रकारे करावा लागत असतात. आणि जर बाळाला जर झोप व्यवस्थित नाही लागली व जर बाळ चिडचिड करत असेल तर त्याचा त्रास आईलाच होत असतो. म्हणून बाळाला जर मालिश केली तर बाळाला व्यवस्थित झोप लागण्यास मदत होत असते. खरंतर जर तुम्ही बाळाला नियमितपणे मालिश केली तर त्याचे येतं आणि पाहिजे तुम्हाला जाणवून येतील. तुम्ही तुमच्या बाळाला नियमितपणे मालिश करायला हवी. मालिश केल्यामुळे मुलांना शांत झोप लागण्यासाठी देखील मदत होत असते. तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या दिनचर्येत मालिश चा समावेश आवर्जून करायला हवा. मालिश केल्यामुळे तुमचं बाळ हे स्वस्त राहण्यास देखील मदत होऊ शकते.

तर मित्रांनो आज आपण लहान बाळाची मालिश कोणत्या तेलाने व कशाप्रकारे करायला हवी याबद्दल जाणून घेणार आहोत. चला, तर मग लहान बाळाची मालिश नेमकी का करावी? तर मालिश चे महत्व देखील काय असते? व मालिश करण्यासाठी तुम्ही कोणत्या तेलाचा वापर करू शकतात? याबद्दल खालीलप्रमाणे जाणून घेऊयात.

मालिश करण्याचे महत्त्व काय असते ?

लहान बाळाचा जन्म झाल्यापासून आईला बाळाच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागत असते. बाळाला स्तनपान करण्यापासून बाळाची अंघोळ,बाळाची झोप, बाळाचं कपडे वगैरे सर्व व्यवस्थित असायला हवे याबद्दल सर्व आईलाच बघावे लागत असते. तसेच बाळाची मालिश केल्यामुळे देखील बाळाला खूप काही सारे फायदे होण्यास नक्कीच मदत होत असते. तर मालिश करण्याचे महत्त्व काय आहे याबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊया.

  • मालिश केल्यामुळे बाळाचे स्वास्थ चांगले राहण्यास मदत होत असते.
  • बाळाचे सर्व स्नायूंना बळकटी मिळत असते.
  • मालिश केल्यामुळे आई व बाळ यांची मध्ये अतूट नातं निर्माण देखील होऊ शकते
  • बाळाला नियमित मालिश केल्यामुळे रक्ताभिसरण हे व्यवस्थित प्रकारे होत असते.
  • नियमित बाळाला मालिश केल्यामुळे मला झोप देखील शांतपणे लागत असते.
  • तसेच बाळाला नियमित मालिश केल्यामुळे बाळाचे चिडचिड करणे देखील नाहीसे होत जाते. कारण बाळाला मालिश केल्यामुळे बाळाची झोप की पूर्ण होत असते त्यामुळे त्याची चिडचिड देखील होत नसते.
  • बऱ्याच वेळा लहान बाळाला दात येताना खूप त्रास होत असतो परंतु जर बाळाची तुम्ही नियमितपणे न चुकता मालिश केली तरी यामुळे दातांचा त्रास हा खूपच कमी प्रमाणात होत असतो.
  • जर तुम्ही तुमच्या बाळाला नियमितपणे मालिश केली तर तुमच्या बाळाची पोटातील गॅस ची समस्या असते ती नाहीसे होण्यास मदत होत असते.
  • बाळाची तुम्ही नियमित मालिश केल्यामुळे बाळाला एक प्रकारे व्यायाम केल्यासारखा देखील जाणवत असते त्यामुळे त्याला हलके वाटू शकते. म्हणजेच एक प्रकारे बाळाचा तो व्यायामच होत असतो.
  • बऱ्याच वेळा लहान बाळांचे एकाच ठिकाणी सतत झोपल्यामुळे अंगदुखी होत असते तर लहान बाळाची तुम्ही मालिश केल्यामुळे त्याला मोकळी वाटते व बाळाची अंग दुखी देखील जाऊ शकते.
  • बाळाची तुम्ही नियमित मालिश केल्यामुळे बाळाला शांत झोप लागण्यास तर मदत होतेच शिवाय त्याला उठल्यावर देखील ताजेतवाने म्हणजेच फ्रेश वाटते.
  • बाळाची नियमित पणे मालिश केल्यामुळे बाळाच्या पोटातील अतिरिक्त हवाही बाहेर निघत असते तसेच बाळाचे पचन संस्था देखील व्यवस्थित प्रकारे होण्यास मदत होत असते. जेणेकरून बाळाचे पोट साफ होण्यासाठी देखील मदत होत असते.
वाचा  केसर चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे काय आहेत?

तुम्ही, जर तुमच्या बाळाची नियमितपणे योग्यप्रकारे मालिश करत असाल, तर वरील सर्व प्रकारचे फायदे तुमच्या बाळाला होऊ शकतात. म्हणून तुम्ही तुमचे बाळ हे शांत रहावे,बाळाची सततची चिडचिड कमी व्हावी, बाळाची वाढ व विकास हा योग्य रितीने व्हावा यासाठी, तुम्ही बाळाच्या दिनचर्येत मालीशचा समावेश आवर्जून करायला हवा. जेणेकरून वरील सर्व प्रकारचे फायदे तुमच्या बाळाला होऊ शकतील.

बाळाची मालिश कशाप्रकारे करायला हवी ?

तुमच्या बाळाचे स्वास्थ हे चांगले राहावे तसेच तुमच्या बाळाची होणारी जी चिडचिड आहे ती कमी किंवा नाहीसे व्हावे तसेच, तुमच्या बाळाला शांत झोप लागावी आणि त्याची वाढ आणि विकास हा चांगला व्हावा, असे तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या बाळाची नियमित मालिश करायला हवी. परंतु लहान बाळाची मालिश करताना नेमकी ती कशी करावी ? याबद्दल देखील आपल्याला जाणून घेणे आवश्यक असते. तरी लहान बाळाची मालिश करताना कशी करावी याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • सर्वप्रथम तुम्ही बाळाला मालिश करण्यासाठी योग्य जागा निवडायला हवी. म्हणजेच घरात एकदम गोंधळ ठिकाणी जर बाळाला मालिश करत असाल तर बाळाचे चित्त सर्व तिकडेच असेल आणि तो मालिश करताना तुम्हाला पाहिजे तेवढे योग्य प्रतिसाद देणार नाही. कारण आपण बाळाला मालिश करताना त्याच्याकडून योग्य त्या शरीराच्या हालचाली करून घेत असतो तर त्याची सर्व चित्त जर गोंधळ कडे असेल तर बाळ योग्य तो प्रतिसाद देणार नाही.
  • बाळाची मालिश करताना तुम्ही जर अंगठी, बांगड्या वगैरे घातले असेल तर ती काढून ठेवायला हवी. नाहीतर मालिश करताना बाळाला ती लागण्याची शक्यता असते.
  • बाळाचे मालिश करताना तुमच्या हातांची नक्की ही काढून घ्यावीत. कारण बऱ्याच वेळा मालिश करताना हातांच्या नखांचा ओरखडा बाळाला लागण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही सुरुवातीस काळजी घेतलेली बरी.
  • मालिश करताना बाळाला सर्वप्रथम पुढच्या बाजूने करायला हवी. म्हणजेच तेल कोमट करून सर्वप्रथम बाळाच्या नाभीवर एक थेंब टाकावा. सर्वप्रथम मालिश तुम्ही बाळांच्या पायांची करायला हवी. पायापासून मालिश करून बाळाच्या तळपायांना पर्यंत सुरुवातीला मालिश करावी.
  • नंतर बाळाच्या पोटाला मालिश करावी. बाळाची मालिश करताना एकदम जोरात करू नये, तर हात अगदी हळुवारपणे फिरवावेत. जेणेकरून बाळाला देखील बरे वाटेल. बाळाच्या पोटाची मालिश करताना हात हे पोटाच्या मध्ये भागून गोलाकार पद्धतीने फिरवावेत. आणि हळुवारपणे त्याठिकाणी मालिश करावी. जेणेकरून बाळाच्या पोटाचा व्यवस्थित प्रकारे व्यायाम होऊन बाळाचे पोट साफ होण्यास त्रास होत नाही.
  • यानंतर तुम्ही बाळाच्या चेहऱ्याची मालिश करायला हवी. यासाठी बाळाच्या चेहऱ्याला थोडं बोटांच्या साह्याने तेल लावून हळुवारपणे बाळाच्या चेहऱ्याला मसाज द्यावा. म्हणजेच माझ्या चेहऱ्याची मालिश करताना हात हळुवार पद्धतीने गोलाकार फिरवावा. तसेच बाळाच्या नाकाला खालून वर अशा प्रकारे मालिश करावी. जेणेकरून बाळाच्या नाकाचा आकार देखील व्यवस्थित येण्यास मदत होत असते. तसेच बाळाच्या कानांना कपाळा पाटीला म्हणजे चेहऱ्याच्या सर्व वरच्या भागाला व्यवस्थित हळुवारपणे मालिश करावी.
  • तसेच तुम्ही बाळाच्या हातांची देखील मालीश हळुवार पद्धतीने करायला हवी. बाळाच्या तळहाताची देखील तेल लावून व्यवस्थित प्रकारे मालीश करायला हवी.
  • यानंतर बाळाला मागच्या बाजूने मालीश करायला हवी. त्यासाठी तुम्ही बाळा पालथे पाडून घ्यावे. आणि सुरुवातीला बाळाच्या पाठीची मालीश हळूवारपणे करायला हवी. पाठीची मालिश करताना सर्वप्रथम बाळाला तेल टाकुन वरून खाली अशा प्रकारे मालीश करायला हवी. यामुळे बाळाचे रक्ताभिसरण व्यवस्थित प्रकारे होऊन बाळाला शांत झोप लागू शकते.
  • त्यानंतर बाळाच्या खालच्या पायाची मालिश करत तळव्या पर्यंत मालिश करायला हवी. असे केल्याने बाळाला बरे वाटत असते.
  • नंतर बाळाला सरळ करून बाळाच्या टाळूवर थोडे कोमट तेल टाकून हळुवार पद्धतीने मालीश करायला हवी. बाळाची टाळू हे अगदी नाजूक आणि कोमल असते त्यामुळे बाळाची टाळू ची मालिश करताना एकदम हळूवारपणे करायला हवी. फक्त तेल टाकले आणि हात थोडसं गोलाकार फिरवले तरी चालेल. परंतु, बाळाच्या तळूची जास्त मालीश अजिबात करू नका.
  • बाळाची मालिश सुरु करताना सर्व प्रथम बाळाला ते आवडणार नाही. सुरुवातीला मालिश करताना बाळ तुम्हाला योग्य तो प्रतिसाद देणार नाही. परंतु तुम्ही जर बाळाचे मालिश नियमितपणे करत गेलात तर त्याला देखील मालिश करायला आवडत जाईल. आणि योग्य तो प्रतिसाद बाळ देऊ शकेल. तसेच बाळाचे मालिश करताना तुम्ही बाळाच्या हाताची व पायाची मालिश करताना त्याच्याकडून योग्य त्या प्रकारे व्यायाम करून घ्यायला हवा. सायकल चालवताना पाय कसे फिरतात असे पायांची हळुवारपणे मालिश बाळा कडून करून घ्यायला हवी.
वाचा  पायाचा अंगठा दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय :-

तर, मित्रांनो मला ची बाळाची मालिश करताना ती कशा प्रकारे करायला हवी ? आणि कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी ? हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. नक्कीच मालिश केल्याने बाळाला शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते. म्हणून तुम्ही तुमच्या बाळा नियमितपणे मालिश करायला हवी.

मालिश करण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करणे आवश्यक आहे ?

बाळाचे नियमितपणे मालिश केल्यास बाळाला खूप सारे फायदे त्याचे होऊ शकतात. बाळाची नियमित मालिश केल्यामुळे बाळाच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया वाढते. बर्‍याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की बाळाची मालिश करण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करायला हवा? बाळाची मालिश करताना कोणत्या तेलाने केल्याने बाळाला बरे वाटेल? भाना मालिश करण्यासाठी कोणते तेल वापरल्यामुळे बाळाचा कलर हा गोरा होण्यास मदत होईल? म्हणजेच असे एक ना अनेक प्रश्न बाळाच्या आईंना पडलेला असतो. उत्तर बाळाच्या मालिश साठी कोणते तेल वापरावे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

बाळाच्या मालिश साठी नारळ तेल वापरून बघा.

     बाळाची मालिश करताना तुम्ही नारळाचे तेल वापरू शकतात. नारळाचे तेल हे नैसर्गिक असते. त्यामुळे नारळाचे तेलाचा बाळाच्या मालिश साठी वापर केल्यास त्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट देखील होऊ शकणार नाही. नारळाचे तेल हे खूपच हलक्या प्रकारचे असते त्यामुळे ते  बाळाच्या त्वचेत देखील मुरण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे बाळ नारळाच्या तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. नारळाचे तेल बाळाच्या मालिशसाठी वापरणे खूप फायदेशीर देखील घडत असते. आणि या तेलाच्या वापरामुळे बाळाची त्वचा देखील मऊ होण्यास मदत होत असते.

बाळाच्या मालिश साठी मोहरीचे तेल वापरून बघा.

बाळाचे मालिश करण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा देखील उपयोग करू शकतात. मोहरीच्या तेलाचा वापर यामुळे बाळाचे शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होत असते. मोहरीच्या तेलाने बाळाची मालिश केल्यामुळे बाळाला आवश्यक ती ऊब मिळत असते. मोहरीचे तेल हे खूपच चिकट असते त्यामुळे तुम्ही थोडं नारळाचे तेल मिक्स करून देखील बाळाचे मालिश करू शकतात. मोहरीच्या तेलाने बाळाचे मालिश केल्यामुळे बाळाची त्वचा ही एकदमच मऊ व मुलायम होण्यास मदत होत असते.

वाचा  राजकुमारासारखे राजासारखे गरीबा सारखे जेवण ?

बाळाची मालिश करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करून बघा.

एरंडेल तेलाने तर तुम्ही बाळाची मालीश देखील करू शकतात. एरंडेल तेल आम्ही तुम्ही थोडेसे खोबऱ्याचे तेल देखील मिक्स करून या तेलाने मालिश करू शकतात. एरंडाच्या तेलामध्ये विटामिन ई चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. आणि जे त्वचेसाठी खूपच आवश्यक ठरत असते. बाळाला विटामिन ई पुरेपूर मिळावे यासाठी तुम्ही बाळाची मालिश करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करून बघू शकतात.

बाळाचे मालिश करण्यासाठी तुम्ही बाळा बदामाचे तेल वापरून  बघा.

मालिश करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल वापरू शकतात. बदामाच्या तेलात विटामिन ई चे प्रमाण हे मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे बाळाची त्वचा ही अगदी मऊ आणि मुलायम देखील होण्यास मदत होत असते. बदामाच्या तेलामुळे बाळाच्या त्वचेचे संरक्षण होण्यास देखील मदत होत असते. बदामाच्या तेलामुळे  बाळाला मालिश केल्यामुळे आराम चांगल्या प्रकारे मिळू शकतो. म्हणून तर मी बाळाला झोपी चांगले यावे यासाठी तुम्ही बदामाच्या तेलाने बाळाचे मालिश करून बघा.

बाळाचे मालिश करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करून बघा.

बाळाच्या मालिश साठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकतात. आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये देखील विटामिन ई चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही तुमच्या बाळाला ऑलिव्ह ऑईल नियमितपणे मालिश  केल्यामुळे तुमचे बाळ आहे गोरे देखील होऊ शकते. म्हणजेच या तेलाच्या मालीश मुळे बाळाची त्वचा ही गोरी होण्यास मदत होऊ शकते. तर नक्कीच तुम्ही तुमच्या बाळाचे मालिश करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करून बघू शकतात.

मित्रांनो, वरील प्रमाणे तुम्ही तुमच्या बाळाची मालिश करण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करू शकतात ? त्याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेले आहे. तसेच बाळाची मालिश करताना कशा पद्धतीने करायला हवी ?आणि बाळाची मालिश का करायला हवी ? म्हणजेच मालिश चे महत्त्व नेमके काय आहेत? हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. याविषयीची अजून तुम्हाला जास्तीची माहिती जाणून घ्यावयाचे असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here