नमस्कार मित्रानो, कलिंगड खाण्याचे फायदे व तोटे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. कलिंगड हे फळ बऱ्याच जणांना आवडत असेल किंवा बऱ्याच जणांना आवडत देखील नसेल. पण उन्हाळा आला की सर्व लोकांचं लक्ष हे कलिंगडा कडे वेधले जाते. कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मध्ये तहान लागते शरीरामध्ये पाण्याची काम करत होते आणि हे सगळे भरून काढणारे एकमेव फळ म्हणजे कलिंगड हे फळ बरेच लोकांना आवडते. महिनाभरातून एकदा तरी थोडेसे का होईना पण कलिंगड खातोच.
लहान मुलेदेखील कलिंगड आवडीने खातात काही लोक कलिंगडाचा रस काढून थंड थंड रस पितात किंवा काही लोक कलिंगडाचे आईस्क्रीम बनवून खातात. कलिंगड हे आंब्या नंतर उन्हाळ्यामध्ये सर्वांचेच आवडणारे फळ आहे असे आपण म्हणू शकतो. कलिंगड खाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या शरीरामधील पाण्याची कमतरता कलिंगड सहज भरून काढतो.
आपण जर कुठे खेळायला जात असू किंवा कोणत्याही ठिकाणी बाहेर जाणार असू तर आपण त्या आधी कलिंगड खाल्ले पाहिजे. जेणेकरून आपल्याला डीहायड्रेशन चा धोका उद्भवणार नाही. तर मित्रांनो आजचा आपला हाच विषय आहे की आपल्या शरीराला नक्की कलिंगड खाल्ल्याने कोण कोणत्या प्रकारचे फायदे होतात चला तर मग बघुया.
Table of Contents
कलिंगड खाण्याचे फायदे :
आता आपण कलिंगड बद्दल थोडीशी माहिती जाणून घेतलेले आहे आता आपण जाणून घेऊया की आपल्या शरीराला कलिंगड खाल्ल्याने नक्की कोण कोणत्या प्रकारचे फायदे होतात चला तर मग जाणून घेऊया.
शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते :
आपल्या शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासते. डीहायड्रेशन सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कोणाला आवडणार नाही की आपण जर कामांमध्ये असताना आपल्याला चक्कर येणे किंवा आपला बीपी खाली पडणे असे समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागेल. याच प्रकारे जर तुम्हाला या समस्यांना तोंड द्यायचं नसेल तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये थोडे का होईना पण कलिंगड खावे.
कलिंगड मध्ये आपल्या शरीरामधील पाणी भरून काढण्याची क्षमता मोठ्या प्रमाणामध्ये असते. जेणेकरून तुमच्या शरीरामधील पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच जर तुम्ही कुठे खेळायला बाहेर जात असेल किंवा व्यायाम करायला कुठेही उन्हामध्ये बाहेर जात असेल तर बाहेर जाण्याआधी तुम्ही कलिंगडाचे सेवन करावे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये पाण्यात संचार टिकून राहिली.
हृदयविकाराचा धोका कमी होतो :
कलिंगड खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जर हृदय विकाराचा धोका उद्भवत असेल तर तो कमी होण्यास मदत होतो. कोणत्या प्रकारचे आपण बघूया आपण जर कलिंगडाचे सेवा नियमितपणे करत असू तर आपल्या शरीरामधील रक्ताचे संसार नियमित प्रमाणामध्ये होतो. तसेच आपल्या रक्ताचा नियंत्रण व रक्तदाब देखील नियंत्रण मध्ये राहण्यास मदत होते. यामुळेच हृदयविकाराचा धोका बर्यापैकी कमी होतो. तुम्हाला जर हृदयविकाराचा त्रास असेल तर तुम्ही नियमितपणे कलिंगडचे थोडे का होईना पण सेवन केले पाहिजे. जेणेकरून तुमचे स्वास्थ्य व तुमच्या हृदयविकाराचा धोका देखील कमी होण्यास मदत होईल.
मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते :
मलाच लोकांना मधुमेह असल्यामुळे त्यांना बरेच खाद्यपदार्थ खाता येत नाही तसेच बऱ्याच फळांमध्ये नॅचरल शुगर म्हणजेच नैसर्गिक साखर असते. त्याच्यामुळे आपल्याला ते फळेदेखील खाता येत नाही पण तुम्ही कलिंगडाचे सेवन केले तर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असला तरी तुम्ही ते फळ आरामात खाऊ शकतात कारण कलिंगड मध्ये इतर फळांच्या तुलनेने साखर कमी प्रमाणामध्ये असते. कलिंगड मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
त्वचा तेजस्वी राहते :
कलिंगड खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये पाण्याची काम करता भासत नाही आणि हेच एक मोठे कारण आहे तुमची त्वचा सुंदर आणि तेजस्वी राहण्याचे. कारण तुम्ही बघितला असेल की जे लोक पुरेश्या प्रमाणामध्ये पाणी पितात त्या लोकांचे त्वचा नेहमी तेजस्वी असते. त्या लोकांची त्वचा हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यामध्ये कधीही कोरडी पडत नाही. तुम्ही कलिंगडाचे सेवन करत असाल तर तुम्हाला पाण्याबरोबर पोषक तत्व देखील मिळतात. जेणेकरून तुमची त्वचा पुन्हा पूर्वीसारखी चमकदार व तेजस्वी राहील.
उत्तम ऊर्जेचे स्त्रोत :
कलिंगड हे एक उत्तम ऊर्जेचे स्त्रोत आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला व तुमच्या शरीराला कधीही ग्लुकोजची कमी पडणार नाही. त्याचबरोबर विटामिन्स आणि मिनरल्सची देखील कमी तुमच्या शरीराला भासणार नाही. कारण कलिंगड हे उत्तम ऊर्जा स्त्रोत आहे. त्याचबरोबर आपल्याला कलिंगडा पासून कॅलरीज व विटामिन्स मिळण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते :
जसे की आपण आधी बघितलं की कलिंगडामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच आपल्याला व आपल्या शरीराला डीहायड्रेशन होण्यापासून देखील वाचतो. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये रक्त नियंत्रण मध्ये राहण्यास देखील मदत होते. रक्ताच्या गाठी आपल्या शरीरामध्ये बनत नाही. शरीरामध्ये पायाच्या नखा पासून ते डोक्याचे केसांपर्यंत म्हणजेच पूर्ण शरीरामध्ये रक्त पुरवठा होतो.
कलिंगड खाण्याचे तोटे :-
आपण कलिंगडाची तर बघितले आता आपण जाणून घेऊया की कलिंगड खाण्याचे तोटे कोणकोणते आहेत चला तर मग बघुया.
अवेळी कलिंगड खाणे टाळा :
रात्रीच्यावेळी कलिंगड खाणे टाळा कारण रात्रीच्या वेळी कलिंगड खाल्ल्याने बहुदा तुमची पचन क्रिया मंद होऊ शकते. म्हणून कलिंगड चे सेवन करताना सकाळी किंवा दुपारी करावे तसेच कुठे बाहेरून आंबा येताना देखील तुम्ही कलिंगडाचे सेवन करू शकता.
कलिंगड प्रमाणामध्ये खावे :
तुम्ही जर कोणतीही गोष्ट प्रमाणामध्ये केली तर ती योग्यच असते पण जर एखादी गोष्ट प्रमाणाच्या बाहेर गेली तर ती तुमच्या शरीराला नक्कीच आणि पोहोचू शकते. कारण जर तुम्ही प्रमाणाच्या बाहेर कलिंगडाचे सेवन केले तर तुमच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढू शकते. मधुमेह असणारे लोकांनाही फार धोक्याचे ठरू शकते म्हणून कलिंगड हे प्रमाणामध्ये खावे. तसेच तुम्ही चारशे किंवा 500ग्राम पेक्षा जास्त कलिंगड खाल्ले तर तुम्हाला जुलाब देखील होऊ शकतात.
पित्ताशयाचा धोका :
वयस्कर लोकांनी जर कलिंगड जे सेवन केले तर त्यांना पित्ताच्या धोका उद्भवू शकतो. तसेच इतर सामान्य माणसालादेखील पित्ताशयाच्या धोका उद्भवू शकतो. जर प्रमाणाच्या बाहेर कलिंगडाच्या सेवन केले किंवा काही लोकांचे शरीर तर इतके संवेदनशील असते की त्यांनी जर थोडेसे देखील कलिंगड खाल्ले तरी देखील त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम दिसून येतो. म्हणून तुम्ही कलिंगडाचे सेवन करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरून तुमच्या शरीराला भविष्यात कोणताही प्रकारचा धोका उद्भवणार नाही.
तर मित्रांनो आज आपण बघितले ची कलिंगड खाण्याचे कोणकोणते फायदे आणि कोणकोणते तोटे आहेत. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !