भेंडी खाण्याचे फायदे

0
1099
भेंडी खाण्याचे फायदे
भेंडी खाण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया भेंडी खाण्याचे फायदे याबद्दलची माहिती. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे यामुळे आपले आरोग्य निरोगी राहू शकते. परंतु आज काल लोक फास्ट फूड खाण्याच्या नादात इतके लागले आहेत की, हिरव्या पालेभाज्यांचे नाव जरी काढले तरी तोंड वाकडे तिकडे करतात. बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे, नेहमी फास्टफूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे आजार जडू शकतात. म्हणून जे पदार्थ आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात अशा पदार्थांचे सेवन आपण जितके केले नाही इतके चांगले होईल. हिरव्या पालेभाज्या व हिरव्या फळभाज्या खाण्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात.

हिरव्या फळा बाजार म्हटले की त्यामध्ये अनेक प्रकार येतात. जसे की,कारले, गिलके, दोडकी, पत्ता कोबी, फुलकोबी, लाल भोपळा, भेंडी इत्यादी प्रकार होय. हिरव्या फळभाज्या मधून देखील आपल्याला अनेक प्रकारचे जीवनसत्व, प्रोटिन्स, मिनरल्स, लोह, फॉस्फरस यांचा पुरवठा होत असतो. ज्यामुळे, आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. हिरव्या फळभाज्या यातीलच एक प्रकार म्हणजेच भेंडी. भेंडी ही हिरव्या कलरची असून ती लांबट आकाराची असते. भेंडी ही खाणे तर खूपच आरोग्यदायी ठरते. भेंडीमध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते. लोहाचा पुरवठा आपल्या शरीराला झाल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपण होत असतात. लहान मुलांना देखील भेंडीची भाजी खाणे खूप आवडत असते. भेंडी की चवीने तर छानच लागते.

भेंडीच्या अनेक प्रकारच्या भाज्या बनवता येतात. शिवाय, मसाला भरून केलेली भेंडी तर चवीने खूपच स्वादिष्ट लागते काही जण तर भेंडीचे पाणी देखील बनवून खात असतात. शेतातली ताजी ताजी तोडून आणली भेंडी तर खूपच छान लागते. कोवळी भेंडी असेल तर, काही जण ती डायरेक्ट देखिल खातात. परंतु खाण्याआधी तिला स्वच्छ नमक च्या पाण्यात देऊन टाकावी. कारण, शेतामध्ये भाजीपाला खराब होऊ नयेत यावर कीड लागू नये यासाठी फवारणी केले जात असते म्हणून आपण कुठलीही भाजी आणली तर त्या अगोदर ती द्या नमक च्या पाण्याने स्वच्छ धुऊन टाकावी. आणि त्यानंतरच त्याचे सेवन करावे जेणेकरून तुमच्या पोटात केमिकल जाणार नाही.

वाचा  अक्कलदाढ माहिती

भेंडी खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. तर मित्रांनो, आज आपण भेंडी खाण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग भेंडी खाण्यामुळे आपल्या शरीराला कोण कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

भेंडी खाण्याचे होणारे फायदे :-

भेंडीचे सेवन केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मिळत असतात. भेंडी मध्ये हे जीवनसत्व असते शिवाय भेंडी मध्ये लोहाचे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते. भेंडी मधील पौष्टिक तत्वांचा आपल्या शरीराला पुरवठा होत राहिला तर अनेक विकारांपासून आपण दूर राहू शकतो. भेंडी खाल्ल्यामुळे कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

  • भेंडीमध्ये अ जीवनसत्त्व हे चांगल्या प्रकारे असते जर आपल्या जीवनसत्त्वांचा पुरवठा चांगल्या प्रकारे झाला तर आपल्या डोळ्यांचे आरोग्य हे निरोगी राहण्यास मदत होत असते शिवाय आपली दृष्टी तेज होण्यास देखील मदत होते. ज्यांना डोळ्या संबंधीचे विकार असतील, तर त्यांनी भेंडीचे नियमित सेवन करायला हवे की ज्यामुळे त्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.
  • भेंडीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होत असते. भेंडी मध्ये लोह चांगल्याप्रकारे असते. भेंडीचे सेवन केल्यामुळे लोहाचा आपल्या शरीराला पुरवठा होऊन रक्त हे वाढण्यास मदत होऊ शकते.
  • भेंडी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होत असते. भेंडी मध्ये असे काही घटक असतात, यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे व्यवस्थित राहण्यास मदत होते या लोकांना डायबेटीजची समस्या असेल, अशा लोकांनी भेंडीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
  • नियमित भेंडीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण राहून आपण डायबिटीस सारख्या समस्येपासून देखील दूर राहू शकतो.
  • भेंडी बाजारातून आल्यानंतर तिला पहिले स्वच्छ नमक च्या पाण्यात धुऊन टाकावे जेणेकरून त्यावर मानले केमिकल हे निघून जाण्यास मदत होऊ शकते जर भेंडी न धुता तुम्ही त्याचे सेवन केले तर त्यामुळे तुमच्या पोटात केमिकल जाण्याची शक्यता असते ज्यामुळे पोटाचे विकार जडू शकतात. म्हणून कुठली भाजी असते ती सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि त्यानंतर त्याचा वापर करावा.
  • भेंडीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराचे वजन हे नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराचे अतिरिक्त वाढलेले वजन कमी होण्यास देखील मदत होऊ शकते.
  • भेंडी मध्ये क जीवनसत्व हे देखील चांगल्या प्रमाणात असते. जर आपल्या शरीराला क जीवनसत्वाचा पुरवठा झाला, तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या क्षमतेने वाढण्यास मदत होते. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही योग्य प्रमाणात असायला हवी. त्यासाठी तुम्ही लहान मुलांना भेंडीची भाजी बनवून खायला द्यायला हवी. लहान मुलांनी जर भेंडीचे सेवन केले तर त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्याप्रकारे वाढण्यास मदत होते शिवाय, रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याकारणामुळे आणि संसर्गजन्य आजारांपासून ते दूर राहू शकतात.
  • अनेक वेळा बाहेरचे सतत अन्न खाल्ल्यामुळे, जंकफूड खाल्ल्यामुळे तर आपल्या शरीरातील आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमतात. भेंडीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास देखील मदत होत असते.
  • भेंडीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील पाचक क्रिया ही चांगली सुरळीत राहण्यास मदत होते. जर आपल्या शरीराची पचन संस्था ही चांगली व सुरळीत चालू राहीली, तर त्यामुळे आपल्याला पोटाचे विकार देखील उद्भवणार नाहीत.
  • भेंडी नियमित खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूचा विकास देखील चांगल्या प्रकारे होत असतो शिवाय, मेंदूचे कार्य देखील चांगल्या प्रकारे सुरू राहण्यास मदत होऊ शकते.
  • भेंडी खाल्ल्यामुळे आपण कॅन्सल झाल्यास या आजारांपासून देखील दूर राहू शकतो. आपल्या शहरांमध्ये जे विषारी द्रव्य जमत असतात पदार्थ जमत असतात त्यामुळे बाहेर पडतात त्यामुळे आपण कॅन्सरसारख्या रोगाने पासून देखील दूर राहू शकतो.
  • भेंडीचे सेवन केल्यामुळे आपले पोट साफ होण्यास देखील मदत होत असते. जर आपले पोट व्यवस्थित साफ राहिले तर आपल्याला पोटदुखीचा त्रास देखील उद्भवत नाही.
  • भेंडीचे नियमित सेवन केल्यामुळे आपण हृदय रोगा पासून देखील दूर राहू शकतो. मेंढीचे सेवन केल्यामुळे हृदयरोग यासारख्या समस्या पासून आपण दूर राहू शकतो शिवाय हृदयाचे कार्य देखील व्यवस्थित सुरळीत चालू राहते.
  • गर्भवती महिलांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी त्यांना रक्त वाढीच्या गोळ्या दिल्या जात असतात. बाळापर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित व्हावा, शिवाय आई व बाळ या दोघांना रक्त मिळावे यासाठी त्यांना रक्त वाढीसाठी गोळ्या दिल्या जात असतात त्याचप्रमाणे जर त्यांनी भेंडीचे सेवन केले तर त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील चांगल्या प्रमाणे वाढण्यास मदत होत असते तर गर्भवती महिलांनी देखील भेंडीचे आवर्जून सेवन करायला हवे ज्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो.
  • भेंडीचे सेवन केल्यामुळे आपले केस निरोगी राहण्यास मदत होत असते. भेंडी तील पौष्टिक घटक व पौष्टिक तत्त्व मुळे आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहते शिवाय केसान विषयीच्या समस्या देखील जाण्यास मदत होऊ शकते.
  • भेंडीचे नियमित सेवन केल्यामुळे आपण संधिवात सारख्या समस्येपासून देखील दूर राहू शकतो. अनेक जण संधिवाताचे समस्या येत असते हाडे दुखीचे समस्या उद्भवते. जर तुम्ही नियमित भेंडीचे सेवन करत असाल, तर त्यामुळे तुमच्या शरीरातील हाडे बळकट व मजबूत होण्यासाठी मदत होते. आपल्या शरीरातील हाडे बळकट व मजबुत असतील,तर आपण हाडांच्या आजारांपासून दूर राहू शकतो शिवाय संधिवात ही समस्या देखील येत नाही.
वाचा  तळपायाला घाम येणे

तर मित्रांनो, भेंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी किती चांगले व भेंडी खाण्याचे फायदे, याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे.तर तुम्ही देखील भेंडीचे नियमित सेवन करायला हवे. भेंडीची सेवन केल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण तर चांगल्या प्रकारे वाढते शिवाय रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढण्यास मदत होते. तर मित्रांनो तुम्हीदेखील तुमच्या आरोग्यासाठी भेंडी जरूर खायला हवी.

मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here