लहान मुलांना हुशार कसे करावे

0
1633
लहान मुलांना हुशार कसे करावे
लहान मुलांना हुशार कसे करावे

नमस्कार मित्रांनो. कोणतेही पालक असो  त्यांना आपल्या लहान मुलांना हुशार बनवण्याची इच्छा असते. मूल जसे जन्मते तेव्हापासून ते त्यांची व्यवस्थित काळजी घेत असतात. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो कुठलाही भेदभाव न करता आपले मुलं हुशार कसे बनतील याकडे ते आवर्जून लक्ष घालत असतात. मग आपल्या मुलांना हुशार बनवण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असते. खरंतर आज कल हे कॉम्पिटिशन जग आहे. प्रत्येक जण आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष ठेवत असते. चलातर मग जाणून घेऊयात लहान मुलांना हुशार कसे करावे याबद्दल. 

तसेच आपल्या मुलाला प्रत्येक गोष्ट यायला हवी या देखील याकडे देखील आवर्जून लक्ष दिले जात असते. म्हणून मुलगा जसजसा मोठा होईल तेव्हा त्याला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे यासाठी पालकांनी सुरुवातीपासूनच लक्ष द्यायला हवे. मूल जेव्हा ना नसते तेव्हापासूनच त्याला काही छोट्या छोट्या गोष्टी या शिकवल्या गेल्या पाहिजेत. कारण आता एबीसीडी शिकवताना तर डायरेक्ट शिकवले तर त्याला अजिबात समजणार नाही आणि आणि एबीसीडी नेमक काय आहे हे देखील समजणार नाही. म्हणून मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम त्यांना मुख्य घटकांच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून शिकवायला हवे. तसेच आपले मूल हे हुशार असायला हवे यासाठी त्याच्यावर एकदम माहिती न लादता त्याला हळूहळू शिकवायला हवी.

घरात जर आई-वडिलांनी व्यतिरिक्त आजी-आजोबा असतील तर तेथील मुलेही लवकर चांगल्या गोष्टी शिकत असतात. कारण आजी आजोबा त्यांच्या नातवांना बर्‍याचशा गोष्टी शिकवत असतात. प्रत्येक आई-वडिल हे आपल्या मुलांचे पुढे जाऊन भविष्य कसे असेल याबाबत चिंतेत असताना दिसून येत असतात. आपल्या मुलांचे भविष्य पुढे जाऊन चांगलं राहावं यासाठी त्याला आपण आतापासूनच चांगल्या गोष्टी शिकवायला हव्यात असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते.

त्याच प्रमाणे लहान मुलांना  लहान वयापासूनच योग्य ते संस्कार देखील करायला हवेत. म्हणजेच चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी यामध्ये त्यांना फरक लगेच कळेल. तर मित्रांनो आज आपण लहान मुलांना हुशार कसे करावे? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग, लहान मुलांना हुशार कसे बनवावे? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

लहान मुलांवर सर्वप्रथम चांगले संस्कार करायला हवेत!

सर्वप्रथम, तर तुम्ही लहान मुलांना त्यांच्यावर चांगले संस्कार करायला हवेत. लहान मुलांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चांगले संस्कार करायला हवेत चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवीत. म्हणजे सकाळी उठल्यावर ब्रश करून आंघोळ वगैरे झाल्यावर प्रथम देवाच्या पाया पडायला सांगावे. त्यानंतर घरातली ज्येष्ठ मंडळी असेल त्यांच्या पाया पडायला सांगायला हवे. नंतर तुमच्या स्वतःच्या म्हणजेच आई-वडिलांच्या पाया देखील पडायला लावायला हवेत. अशामुळे लहान मुलांवर चांगले संस्कार घडत असतात.

वाचा  ताप येणे या समस्या वर काय खावे आणि काय खाऊ नये

हल्ली तर बाल संस्कार केंद्र देखील चालू केलेले आहेत. त्यामुळेदेखील लहान मुलांवर चांगले संस्कार घडत असतात. मुलींना नसतानाच त्यांच्याकडूनच श्लोक म्हणून घ्यायला हवेत. असे रोज केल्याने देखील ते श्लोक उत्तम प्रकारे बघू लागतात. तसेच त्यांना चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी यांमधील फरक कळवून दिला पाहिजे. आतापासूनच लहान मुलावर चांगले बाल संस्कार केले तर भविष्यात जर ते मोठ्या पदावर जरी गेले तरी संस्कार मात्र विसरणार नाहीत. म्हणून लहानपणापासूनच लहान मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत.

मुलांना हुशार बनण्यासाठी जास्तीत जास्त माहिती असणारी पुस्तके वाचायला द्यावीत!

असे म्हटले जाते की, “वाचाल तर वाचाल!”म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलांना जेवढे जास्तीत जास्त पुस्तके वाचायला दिली तेवढे  त्यांच्या ज्ञानात नवनवीन माहितीची भर पडत जाईल. यासाठी सर्वात प्रथम तुम्ही पुस्तके वाचायला देताना गोष्टींची पुस्तिके  यापासून सुरुवात करायला हवी. सुरुवातीला गोष्टींची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना वाचनाची गोडी निर्माण होत जाईल. आणि ते स्वतःहून नवीन नवीन पुस्तके वाचायला देखील मागत जातील. असे करत करत तुम्ही त्यांना नवनवीन शोध यांची माहिती असलेली पुस्तके वाचायला द्यायला हवीत. लहान मुले यांना जर वाचनाची गोडी निर्माण झाली तर त्यांना त्यांच्या ज्ञानात भर करून देता येईल. आणि ज्ञानात भर पडल्यामुळे त्यांना नवनवीन वस्तू शिकण्यास गोडी निर्माण होईल. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना हुशार बनवण्यासाठी जास्तीत जास्त माहिती असणारी पुस्तके वाचायला द्यायला हवीत.

मुलांना हुशार बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातले वातावरण हे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन युक्त ठेवले पाहिजे!

असे म्हटले जात असते की घरातील वातावरणाचा प्रभाव हा लहान मुलांवर लवकर पडत येत असतो. ज्या घरातील लोक हे नेहमी सतत काहीना काही गोष्टींमध्ये तत्पर असतील, सतत काही ना काही कामे करत असतील तर लहान मुले देखील त्यांचा बघून बघून शिकत असतात आणि ज्या घरामध्ये लोकं ही खूप आळस वाणी असतील किंवा नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन ठेवत असतील तर त्यांचे संस्कार हे त्यांच्या मुलांवर देखील पडत असतात.

वाचा  पोट साफ न होणे या समस्याची लक्षणे व घरगुती उपाय

म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना हुशार बनण्यासाठी नेहमी घरात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तसेच तुम्ही लहान मुलांना नवनवीन गोष्टी शिकवल्या पाहिजेत. अगदी एखादी खेळण्याचा तुटले असेल तर त्यातून काहीतरी नवीन देखील तयार करता येईल हे देखील शिकले पाहिजे. आणि लहान मुलांना असे शिकण्या बाबत आवड देखील निर्माण होते. तुम्ही, लहान मुलांना सतत काही ना काही नवीन नवीन गोष्टी बनवायला शिकवायला हव्यात. जेणेकरून ते त्यांच्या बुद्धीचा वापर करून अजून काही तरी नवीन नवीन गोष्टी, वस्तू बनवण्याचा प्रयत्न करू लागतील.

लहान मुलांना शिकवताना कठीण गोष्टी या सोप्या करून शिकवायला हव्यात!

लहान मुलांना तुम्ही शाळेत जाऊन शिकतील याची वाट न बघता घरातूनच शिकवायला सुरुवात करायला हवी. म्हणून लहान मुलांना सुरुवातीपासूनच तुम्ही छोट्या गोष्टी शिकवायला हव्यात. म्हणजेच सर्वप्रथम त्यांना तुम्ही एबीसीडी शिकणार असेल तर एबीसीडी शिकण्या आधी तुम्ही त्यांना लाईन्स कशा आपल्या पाहिजेत याची ओळख करून द्यायला हवी. त्यानंतर तुम्ही त्यांना बाजारातून एखादे पुस्तक विकत आणून त्यावर गिरवायला शिकवायला हवे. हल्ली तर बाजारात सर्व प्रकारचे पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना सर्वप्रथम लाईन्स कशा आखाव्या त्याची पुस्तके आणून देऊ शकतात. तसेच चित्र काढलेली व रंग भरण्याची पुस्तके देखील आणू शकतात.

तसेच डॉट जोडण्याची पुस्तके देखील आणून देऊ शकतात. म्हणजेच अशा छोट्या गोष्टींपासून लहान मुलं हे लवकर शिकत असतात. म्हणजेच त्यांना तुम्ही मोठे घटक शिकताना त्रास होणार नाही. जर लहान मुलांची लाईन्स काढण्याची सवय झालेले असेल तर त्यांना एबीसीडी लिहायला शिकणे कठीण जाणार नाही. तसेच तुम्ही एबीसीडी चे सॉंग्स देखील लहान मुलांना ऐकवायला हवेत. त्याचप्रमाणे तुम्ही छोट्या राईम्स देखील ऐकवायला हवेत. तसेच वन टू टेन काउंटिंग लहानपनासूनच शिकवायला हवी. यासाठी तुम्ही विविध खेळण्यांचा उपयोग करून कृतीयुक्त त्यांना शिकवू शकतात. तसेच झाडाचे पाणी आणून नाहीतर फुले आणून एका लाईन मध्ये ठेवून त्यांना काउंट करायला शिकवायला हवेत. जेणेकरून कृतीयुक्त सहभागातून त्यांच्या लवकर लक्षात राहील. अशा प्रकारच्या वेगळ्या गोष्टी तुम्ही कृतीयुक्त सहभागातून त्यांना शिकवायला हव्यात.

लहान मुलांना हुशार बनवण्यासाठी तुम्ही विविध खेळण्यांचा वापर करून देखील शिकवू शकतात!

खेळनी खेळणे प्रत्येक लहान मुलांना खूपच आवडत असते. अगदी लहानपणी देखील आपण त्यांना खुळखुळा पासून खेळायला सुरू करत असतो. तुम्ही तुमच्या लहान मुलांना हुशार बनवण्यासाठी विविध प्रकारची खेळणी घेऊन द्यायला हवीत. खेळांच्या माध्यमातून देखील लहान मुले नवीन नवीन गोष्टी बनवायला शिकत असतात. लहान मुलांना खेळणी खेळण्यासाठी तुम्ही एबीसीडी ची खेळणी घेऊन द्यायला हवीत. ज्यामुळे ते एबीसीडी ओळखायला आणि बोलायला देखील शिकतील. तसेच तुम्ही जोडणारी खेळणे देखील घेऊन द्यायला हवी.

वाचा  स्वप्नात चपाती दिसणे शुभ की अशुभ !

यातून ते नवीन नवीन वस्तू बनवण्याचे शिकतील. जोडण्याची खेळणे घेतल्यामुळे मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यास देखील मदत होत असते. कारण कोणती खेळणे जोडण्यासाठी ते त्यांच्या पद्धतीचा वापर करूनच वेगवेगळ्या आकाराची वस्तू बनवत असतात. म्हणजे येथे त्यांच्या बुद्धीचा विकास वृद्धिंगत होत असतो. तसेच तुम्ही त्यांना मातीच्या माध्यमातून देखील नवीन खेळणी बनवायला शिकवायला हवीत. म्हणजेच माती पासून खेळणी कशी तयार करायची अजून माती पासून तुम्ही काय काय बनवू शकतात हे देखील बनवून दाखवायला हवे. एकदा जर मुलांच्या लक्षात आलं तर ते स्वतःहून काहीतरी नवीन नवीन वस्तू बनवण्यात शिकतील. अशा प्रकारे तुम्ही विविध खेळांच्या माध्यमातून देखील तुमच्या मुलांना हुशार बनवू शकतात.

लहान मुलांना स्पष्ट बोलता येण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी जास्तीत जास्त बोलायला हवे!

बरेच लहान मुलगी अशी असतात की ते सर्व प्रकारचे गोष्टी तर शिकत असतात परंतु बोलण्याच्या बाबतीत मागे पडत असतात. म्हणजेच बोलण्याचा विकास त्यांच्या मध्ये फार कमी प्रमाणात होत असतो. म्हणून तुम्ही योग्य वेळेस लहान मुलांना बोलण्यास शिकवायला हवे. घरात जर ज्येष्ठ मंडळी असेल तर त्या घरातील लहान मुलेही खूप बोलकी देखील निघत असतात. तुमच्या मुलाचा देखील बोलण्याचा विकास व्हावा तुमच्या मुलाला स्पष्ट बोलता यावे यासाठी तुम्ही तुमच्या मुलांशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करायला हवा.

यासाठी तुम्ही तुमच्या मुलाशी विविध गोष्टींवर विविध वस्तूंवर गप्पा मारायला हव्यात. लहान मुलांकडून गोष्टी बोलून घ्याव्यात. तसेच तुम्ही लहान मुलांकडून कविता देखील म्हणून घ्यायला हव्यात. म्हणजेच की लहान मुलांना बोलण्यात अडथळा येऊ नये यासाठी तुम्ही त्यांच्याशी जास्तीत जास्त गप्पा मारायला हव्यात त्यांच्या बोलण्याचा विकास हा वृद्धिंगत करायला हवा त्यांच्याशी या गोष्टीवर देखील चांगल्या प्रकारे चर्चा करून घ्यायला हवी. जेणेकरून तुमचे मुलं हे बोललास घाबरणार नाही आणि स्पष्ट सुद्धा बोलू लागतील.

तर मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या मुलांना हुशार बनवावे असे वाटत असेल तर तुम्ही वरील सर्व गोष्टी आत्मसात करायला हव्यात आणि त्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या मुलांवर केला पाहिजे. तुमची मुले हुशार व्हावेत यासाठी तुम्ही त्यांना प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभागात सामील करून घ्यायला हवे. त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी, वस्तू बनवून घ्यायला हव्यात. तसेच त्यांना गोष्टी शिकवायला हव्यात आणि त्या बोलायला देखील लावायला हव्यात. थोडक्यात जेवढे तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार देणार, जेवढा नवनवीन गोष्टी शिकवणार तेवढी तुमची मुलं ही कॅप्चर करतील आणि त्यांच्या बुद्धीचा विकास देखील चांगल्या प्रकारे होत जाईल.

जाणून घ्या : लहान मुलांना एबीसिडी शिकवण्याची पद्दत

मित्रांनो, आज आपण लहान मुलांना हुशार कसे करावे, याबद्दल वरील प्रमाणे जाणून घेतले आहे. तसेच वरील प्रमाणे, आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here