बाळाला स्तनपान करताना काय काळजी घ्यावी?

0
950
बाळाला स्तनपान करताना काय काळजी घ्यावी
बाळाला स्तनपान करताना काय काळजी घ्यावी

नमस्कार मित्रांनो. बाळाचा जन्म झाला म्हणजे सर्व काही व्यवस्थित झाला असे नसते. तर बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला एक तासाच्या आत आईचे दूध पाजणे अत्यंत आवश्यक असते. कारण सर्वप्रथम आईच्या दुधा मध्ये चीक जे असते बाळाला मिळणे अत्यंत आवश्यक असते. तसेच बाळाला दर दोन तासांनी दूध पाजणे अत्यंत आवश्यक असते. बाळ जरी झोपलेला असला तरी त्याला जागवून दूध  पाजायला हवे. आईने बाळाला योग्य रीतीने स्तनपान केल्यास बाळाची वाढ आणि विकास हे योग्य पद्धतीने होण्यास मदत होत असतो. तसेच बाळाला आईच्या दुधामधून सर्व काही पोषक घटक मिळत असतात. आणि वाला दुधामधून सर्वकाही विटामिन्स पोषक तत्व मिळायला हवे यासाठी आईने तिचा आहार देखील उत्तम प्रकारचा घ्यायला हवा. जेणेकरून तिच्या बाळाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही.बाळाला स्तनपान करताना ते योग्य पद्धतीने करायला हवे.

योग्य पद्धतीने, योग्य प्रकारे वेळोवेळी स्तनपान केल्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होत असते. यासाठी आईने बाळाला जेव्हा हवे तेव्हा स्तनपान करू द्यावे. परंतु सुरुवातीला बाळाच्या वेळा व्यवस्थित पाहूनच स्तनपान करायला हवे. बऱ्याच वेळा आईंना बाळाला स्तनपान कसे करावे याबद्दल पद्धती माहीत नसतात. म्हणजेच बाळाला स्तनपान कसे करावे स्तनपान करताना बाळाची कशी काळजी घ्यायला हवी याविषयी माहिती नसते. तर माणसं पण घटना कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी बाळाला स्तनपान कशा पद्धतीने करायला हवे याबद्दल देखील माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते. तर आज आपण बाळाला स्तनपान करताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग माना स्तनपान करताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

बाळाला स्तनपान किती महिने करायला हवे?       

स्तनपान कधी व किती महिने करायला हवे याबद्दल आपला माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते. सर्वसाधारणपणे स्तनपान किती महिन्यांपर्यंत करायला हवे याबद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात.बाळाला जन्म झाल्यापासून आईने बाळाला स्तनपान करणे अत्यंत आवश्यक ठरते. सुरुवातीस आईच्या दुधातून चीक निघत असतो तो बाळाला दिल्यामुळे बाळाची वाढ योग्य रीतीने होण्यास मदत होत असते. तसेच सुरुवातीस बाळाला स्तनपान हे दोन दोन तासात करावे. कारण बाळाचे पोट हे छोट्या आकाराचे असते त्यामुळे त्यांना सारखे सारखे भूक लागत असते. म्हणून सुरुवातीपासून तुम्ही बाळाला दर दोन तासाने दूध पाजणे आवश्‍यक ठरते. बाळ जरी झोपला असेल तरी त्याला जागवून दूध पाजायला हवे. नाहीतर बाळाचे तोंड कोरडे पडते आणि टाळूला जीभ चिकटण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीपासून बाळाला दोन तासाने दुध पाजायला हवे. बाळ जसजसे मोठे मोठे होत जाते तसतसे त्याची भूक देखील वाढत जाते. त्यामुळे मला हवे तेव्हा स्तनपान करू द्यावे.

वाचा  स्वप्नात भगवान बालाजी दिसणे शुभ की अशुभ!

सुरुवातीस सहा महिने बाळाला फक्त आणि फक्त स्तनपानच करू द्यावे. सहा महिन्याच्या आत बाळाला पाणी अथवा वरचे अन्न खाऊ देणे टाळायला हवे. कारण लहान बाळाची पचनक्रिया ही फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे जर तुम्ही सहा महिन्याच्या आत वरील अन्नपदार्थ खाणे सुरुवात केल्यास त्याला त्रास होऊ शकतो. म्हणून सहा महिने फक्त बाळाला आईने स्तनपान करू देणे आवश्यक ठरते. सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाला तुम्ही पाणी द्यायला सुरुवात करू शकतात तसेच वरील पातळ पदार्थ देखील खायला देऊ शकतात. बाळ जसजसे मोठे होत जाईल तसे त्याला थोडं घट्ट पदार्थ खाऊ घालण्याची देखील सवय करायला हवी. बाळ हे अडीच ते तीन वर्षापर्यंत होईपर्यंत त्याला तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा स्तनपान करू द्यावे. बाळाला स्तनपान करणे हे चांगलेच असते शिवाय त्याची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होत असते.

आईने बाळाला स्तनपान करताना कुठल्या प्रकारचे काळजी घ्यायला हवी ?

बाळाचा जन्म झाल्यापासून आईने बाळाला स्तनपान करणे अत्यंत आवश्यक असते. बाळ छोटे असते तसेच त्याला दात देखिल नसते त्यामुळे दूध पिणे हाच त्याचा आहार असतो. माला स्तनपान केल्यामुळे योग्य ते पोषक घटक विटामिन्स आईच्या दुधातून मिळत असतात. त्यामुळे बाळाची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होण्यास मदत होत असते. बाळ हसत खेळत वाटावे तसेच बाळाचा विकास आणि वाढ ही चांगल्या रीतीने व्हावे यासाठी बाळाला स्तनपान करणे अत्यंत आवश्यक ठरत असते. त्याचप्रमाणे आईने बाळाला स्तनपान करताना योग्य त्या प्रकारची काळजी देखील घ्यायला हवी. तर आईने बाळाला स्तनपान करताना कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याबद्दल आता आपण जाणून घेऊयात.

  • बाळाचा जन्म झाल्यावर आईने बाळाला अंगावरचे दूध चालू करायला हवे. मग डिलिव्हरी नॉर्मल झाली असेल तर लगेच चालू करता येते. सिझेरियन पद्धतीने झालेली असेल तरीही लगेच अंगावरचे दूध एखाद्या व्यक्तीच्या सहाय्याने, अथवा नर्सच्या मदतीने तुम्ही चालू करू शकतात.
  • तसेच बाळाला पहिल्या तीन दिवसातील दूध म्हणजे पिवळसर जाड चिकाचे असते ते देणे आवश्यक असते यामुळे बाळाची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यास मदत होते तसेच जंतूंचा प्रादुर्भाव पासून बचाव होतो व बाळाच्या पोषणासाठी उपयुक्त असे हे दूध असते. म्हणून असे सांगितले जाते की डिलीवरी झाल्यावर बाळाला लगेच आईचे दूध पाजावे.
  • आईने बाळाला दूध पाजताना सर्वप्रथम तिची मनस्थिती चांगली ठेवायला हवी. आणि बाळाला दूध नीट मिळावे यासाठी स्तनाग्र आणि त्याच्या भवतालचा जो कासरगोड भाग असतो तो जास्तीत जास्त बाळाच्या तोंडात द्यायला हवा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त का भाग हा बाळाच्या तोंडात गेला आहे की नाही हे देखील व्यवस्थित प्रकारे आहे बघून घ्यावे. म्हणजेच बाळाची हनुवटी ही आईच्या स्तनाला चिकटलेली आहे का हे आईने बघून घ्यायला हवे.
  • आईने बाळाला तो रडेपर्यंत त्याला स्तनपान न देणे हे चुकीचे ठरते.
  • म्हणजेच बाळाच्या प्रतिक्रिया आईला ओळखता आल्या पाहिजेत.जसे की बाळ चुळबुळ करणे, माने इकडेतिकडे पहाणे व चोखण्याचा आवाज करणे तसेच, बाळाने हाताचा अंगठा चोखणे किंवा मोठा आ करून इकडे तिकडे बघणे म्हणजेच बाळाला भूक लागलेली आहे, असे आईने लगेच समजून घ्यायला हवे.
  • आईने बाळाला स्तन पण करण्यासाठी बाळाला प्रथम स्वतःकडे वळवले पाहिजे. म्हणजेच बाळाला आपल्या कुशीमध्ये घ्यायला हवे. आणि बाळाच्या आईला पूर्णपणे स्पर्श केला पाहिजे. तसेच बाळाचे डोके आणि शरीर हे एका सरळ दिशेने आहे का हे बघून घ्यायला हवे.
  • आणि बाळाची मान व पाठ हे योग्य पद्धतीने आधार द्यायला हवा.
  • तसेच आईने बाळाला दूध पाजण्याचा साठी बसताना स्वतःच्या मागे उशीचा आधार घेतला पाहिजे आणि जर बाळाला दूध पाजताना बाला व्यवस्थित पकडता येत नसेल तर उशीचा आधार घ्यायला हवा. जेणेकरून बाळाला स्तनपान करताना त्रास होणार नाही.
  • आईने बाळाला स्तनपान करताना एका वेळेला फक्त एका स्तनातील हे दहा ते पंधरा मिनिटे दूध पाजायला हवे. आणि अजून मला भूक असेल तर दुसऱ्या बाजूने वळवले पाहिजे.
  • तसेच बाळ हे पंधरा दिवसांचे होईपर्यंत बाळाला दोन दोन तासाने भूक लागत असते त्यामुळे त्याला वेळोवेळी स्तनपान करू द्यावे. आणि पंधरा दिवसांचे झाल्यानंतर त्याला दुध पिण्यावर वेळा काळाचे बंधन घालू नका कारण बाळ हे जसजसे मोठे होते तसतशी त्याची भूक वाढत असते त्यामुळे त्याला जेव्हा हवे तेव्हा स्तनपान करू द्यावे आणि बाळाला रात्री देखील स्तनपान करू द्यावे.
  • बाळ हे सहा महिने होईपर्यंत फक्त मातेचे दूध द्यायला हवे. सहा महिन्याच्या आत बाळाला कुठल्याही प्रकारचे वरचे दूध, पाणी, बदाम, फळांचा रस, तसेच ग्राईप वॉटर, बाळकडू इत्यादी गोष्टी देऊ नये. असे केल्यास तुमच्या बाळाला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. आणि ते देणे धोकादायक देखील ठरू शकते. म्हणून, शक्यतो बाळाला सहा महिने होईपर्यंत काही वरील पदार्थ देण्यास चालू करू नये.
  • बाळाला स्तनपान करताना बाळ हे दूध पिताना अधून-मधून थोडी हवा गिळत असते म्हणजेच बाळाच्या शरीरात बाहेरील हवा जात असते. त्यामुळे, ती हवा बाहेर काढण्यासाठी बाळाला स्तनपान करून झाल्यावर त्याला आपल्या खांद्यावर 15 ते 20 मिनिटे उभे धरायला हवे जेणेकरून बाळाला ढेकर निघण्यास मदत होईल म्हणजेच पोटाच्या आत गेलेली हवा बाहेर ढेकर स्वरूपाने निघेल.
वाचा  पोटात जंत होणे या समस्येवर घरगुती उपाय

आपल्या बाळाला आईने स्तनपान करताना वरील सर्व प्रकारची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. तसेच बाळाला स्तनपान करताना योग्य प्रकारे पकडायला हवे जेणेकरून त्यांना स्तनपान करताना त्रास होणार नाही. तर बाळाला वरील प्रमाणे सर्व प्रकारची काळजी स्तनपान करताना आई ने घ्यायला हवी.

दूध वाढवण्यासाठी आईने स्वतःच्या आहारात खालील प्रमाणे काळजी घ्यायला हवी:-

आईला बाळाला स्तनपान करावे लागत असते त्यामुळे आईने तिच्या आहारात देखील योग्य त्याच पोषक घटकांचा समावेश करायला हवा. सहा महिन्यांचे बाळ हे संपूर्ण आईच्या दुधावरच अवलंबून असते म्हणून आईला बाळाला स्तनपान करावे लागत असते त्यामुळे तिला दूध वाढवणे खूप गरजेचे असते. म्हणून आईने आहारामध्ये सर्व पोषक घटकांचा हिरव्या पालेभाज्यांचा दुग्धजन्य पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा जेणेकरून आईचे दूध वाढण्यास मदत होऊ शकेल. तसेच आईने तिच्या आहारामध्ये कोरड्या व सुक्या भाज्या न खाता पातळ युक्त भाज्यांचा समावेश करायला हवा. तसेच आईने तिच्या आराम मध्ये फळांचा समावेश देखील करायला हवा जेणेकरून बाळाला दुधातून सर्व प्रकारची विटामिन्स मिळण्यास मदत होऊ शकेल.

तसेच बाळाला पुरेपुर कॅल्शियम मिळावे यासाठी आईने देखील स्वतः दिवसातून दोनदा एक ग्लास भरून दूध यायला हवे. आणि दूध हे नुसते ना पिता त्यामध्ये शतावरी कल्प चे दोन चमचे पावडर मिक्स करून कोमट दुधातून घ्यायला हवे. जेणेकरून दूध देखील वाढण्यास मदत होईल. तसेच आईने तिच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज एक डिंकाचा लाडू खायला हवा. डिंकाचे लाडू मध्ये काजू, बदाम,खसखस, खारीक, खोबरे आणि डिंक या सर्व घटकांचा समावेश असायला हवा. जेणेकरून बाळाला आवश्यक तेवढे दूध देखील मिळेल आणि आईच्या कंबरदुखीचा तेथील त्रास त्याने कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे, आईने दिवसातून जास्तीत जास्त वेळा कोमट पाणी प्यायला हवे.

जास्त पाणी पीत राहिल्याने बाळाला देखील पाण्याची कमतरता भासणार नाही आणि दुधाचे प्रमाण देखील योग्य प्रमाणात वाढत राहील. म्हणजेच आईने तिच्या आहाराची जेवढे जास्तीत जास्त काळजी घेतली तितके आईचे दूध वाढण्यास मदत होईल. शिवाय,बाळाला देखील आवश्यक ते पोषक घटक व विटामिन्स मिळत राहतील आणि पाण्याची कमतरता देखील भासू शकणार नाही. आपले बाळ हे चांगले असावे तसेच, बाळाची वाढ आणि विकास हा चांगला व व्यवस्थित प्रकारे व्हायला हवा असे प्रत्येक आईला वाटत असते. त्यामुळे, वरील सर्व गोष्टींची काळजी आईने आपल्या आहारामध्ये नियमितपणे करायला हवी.

वाचा  कानाचा पडदा फाटला उपाय

तर मित्रांनो, बाळाला स्तनपान करताना आईने कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत तसेच आईला बाळाला स्तनपान करावे लागत असते त्यासाठी आईने तिच्या आहारामध्ये देखील चांगल्या गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा जेणेकरून बाळाला पुरेसे दूध भेटू शकेल. आणि आई-बाबा दोघेही स्वस्त राहू शकतील. याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतली आहे. तसेच बाळाला स्तनपान करताना कशा प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल तुम्हाला अजून सविस्तर माहिती जाणून घ्यावयाचे असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. 

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

 धन्यवाद !

        

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here