लहान मुलांना कोणत्या लसी दिल्या जातात?

0
2229

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांना कोणत्या लसी दिल्या जातात? बाळाचा जन्म झाला म्हणजे सर्व काही झाले असे नसते. तर मित्रांनो, बाळाचा जन्म झाल्यापासून बाळाच्या प्रत्येक गोष्टींची काळजी ही घ्यावी लागत असते. अगदी आईला सुरुवातीपासून बाळाला व्यवस्थितरीत्या स्तनपान करणे देखील आवश्यक ठरत असते. बाळाचा जन्म झाल्यापासून बाळाच्या प्रत्येक बारीक-बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागत असते. बाळाचा जन्म झाल्यावर बाळ हे व्यवस्थित आहे की नाही बाळाच्या शारीरिक हालचाली व्यवस्थित आहेत की नाही हे सर्व बारीक तपासून घ्यायला हव्यात. तसेच बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला लसीकरण करणे हे देखील खूप आवश्यक ठरत असते. तसेच बाळाला लसीकरण कधी करावे? केव्हापासून करावे? याबद्दलची माहिती देखील डॉक्टर देत असतात. बाळाला लसीकरण का केले जात असते? लसीकरण करण्यामागील हेतू काय असतो? याबद्दल देखील बरेच डॉक्टर हे स्वतःहून समजावून सांगत असतात. बाळ हे स्वस्त राहावे, बाळाची वाढ हसत-खेळत व्हावी तसेच बाळाची वाढ आणि विकास हे व्यवस्थित व्हायला हवे यासाठी, बाळाला सुरुवातीपासूनच तुम्ही लसीकरण करणे अत्यंत आवश्यक ठरत असते. हल्ली आजच्या काळात तर सर्वजण म्हणजेच सर्वच पालक या बाबतीत खूप जागृत असलेले दिसून येताना देखील दिसत असतात. प्रत्येकाला वाटत असते आपले बाळ हे शारीरिक दृष्ट्या चांगले असावे तसेच मानसिक दृष्ट्या स्वस्थ असावे आणि बाळाला कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये यासाठी लसीकरणावर भर देत असतात. बाळाला लसीकरण केल्यामुळे आपले बाळ हे शारीरिक दृष्ट्या स्वस्थ राहण्यास मदत होत असते. तसेच आताच्या काळात तर खूपच व्हायरल प्रकारचे इन्फेक्शन निघालेले आहेत. तर हे व्हायरल इन्फेक्शन आपल्या बाळाला देखील होऊ नयेत, यासाठी आपण आपल्या बाळाला लसीकरण करणे खूप आवश्यक ठरत असते. बाळा महिन्यानुसार लसीकरण केल्यामुळे अनेक संसर्गजन्य रोगांपासून त्याचे संरक्षण होण्यास मदत होत असते. तर मित्रांनो,बाळाला लसीकरण हे केव्हा केली जाते?तसेच प्रत्येक महिन्यानुसार कोणते लसीकरण करणे आवश्यक ठरते? आणि लसीकरणाचे महत्त्व नेमके काय आहेत? याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग, लहान मुलांना कोणत्या लसी दिल्या जातात याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

सर्वप्रथम लसीकरणाचे महत्त्व जाणून घेऊयात!

      बाळाचा जन्म झाल्यापासूनच बाळाच्या लसीकरणाची सुरुवात होत असते. अर्थातच बाळाला लसीकरण केल्यामुळे बाळाला एक प्रकारे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळत असते. म्हणून प्रत्येक बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला लसीकरण करणे अत्यंत आवश्यक ठरत असते. बाळाचा जन्म झाल्यावर सुरुवातीला पहिल लसीकरण हे कधी व केव्हा करावं याबद्दल तुम्हाला डॉक्टरांकडून माहिती मिळत असते. नाहीतर डॉक्टर हेच स्वतःहून तुम्हाला बाळास लसीकरण करण्यास देखील सांगत असतात. लहान मुलांना जर लसीकरण वेळोवेळी करत गेले नाही तर त्यांचे गंभीर व संसर्ग जन्य रोगांपासून संरक्षण होत नसते. आणि जर तुम्ही मुलांना वेळोवेळी लसीकरण करत गेले तर त्यांचे गंभीर आजारापासून तसेच, संसर्ग जन्य रोगांपासून एकप्रकारे संरक्षण होत असते. त्याचप्रमाणे लहान बाळांना वेळोवेळी लसीकरण केले तर बालमृत्यूचे प्रमाण देखील घटण्यास मदत होत असते. म्हणजेच “लसीकरण देणे म्हणजेच संरक्षण देणे” असे  देखील म्हटले जात असते. खरं तर लसीकरण केल्यामुळे बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळत असते व ते सुरक्षित होत असते म्हणून बाळाला लसीकरण न चुकता करायला हवे. बऱ्याच वेळा लसीकरणामुळे सुमारे 85 टक्के ते 95 टक्के मुलांना रोगप्रतिकारक शक्ती मिळण्यास मदत होत असते. तर मित्रांनो लसीकरण करणे ही कुठली एक अंधश्रद्धा नसून लसीकरण केल्यामुळे बाळांना एक प्रकारे संरक्षण कवच मिळत असते. म्हणून तुमचे बाळ हे मस्त हसत-खेळत वाढावे, यासाठी तुम्ही तुमच्या बाळांना न चुकता वेळेवर लसीकरण करायला हवे.

वाचा  स्वप्नात सरडा दिसणे शुभ की अशुभ

बाळाचा जन्म झाल्यावर एक आठवड्याच्या आत बीसीजी लस द्यावी

लहान बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला बीसीजी लस देणे अत्यंत आवश्यक ठरत असते. बीसीजी लस ही क्षय रोगास प्रतिबंध करणारी लस असते. त्यामुळे बाळाचा जन्म झाल्यावर सर्वात प्रथम बीसीजी लस ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. तसेच जन्माला आल्यापासून ही लस लवकरात लवकर देणे अत्यंत आवश्यक ठरत असते. ही लस देताना ती बाळाच्या डाव्या खांद्यावर त्वचेच्या मध्ये इंजेक्शन देऊन दिली जात असते. ही लस दिल्यामुळे बाळाला क्षय रोग होण्यापासून त्याचा बचाव होऊ शकतो. बीसीजी हि लस दिल्यानंतर बाळाला चार ते सहा आठवड्यांनंतर एक छोटीशी गाठ येत असते. आणि ती गाठ ही नरम प्रकारची असते बर्‍याच वेळा त्या गाठी मधून दोन आठवड्यांपर्यंत पू येत असतो. त्यामुळे जास्त घाबरण्याचे कारण नाही जर असे झाले तर लस ही आपले काम करत आहे असे समजले जाते. आणि त्यावर कुठल्याही प्रकारचे मलम लावण्याची किंवा त्याला शेक देण्याची गरज नसते. दहा ते बारा आठवड्यानंतर एक छोटी खून त्या ठिकाणी उमटत असते. म्हणजेच ही उमटलेली खून बीसीजी लस घेतलेली असे असे दर्शवत असते. म्हणून सुरुवातीला तुम्ही बाळाचा जन्म झाल्यावर बीसीजी लस देणे अत्यंत आवश्यक ठरत असते. त्यामुळे, बाळाला एक प्रकारचे संरक्षण कवच मिळत असते.

बीसीजी नंतर ओ.पी.व्ही. लस दिली जाते

     बाळाला बीसीजी लस दिल्यानंतर ओ पी वी ही लस तोंडावाटे दिली जात असते. म्हणजेच बाळाच्या तोंडावाटे दोन थेंब ओ.पी.व्ही या लसीचे दिले जात असतात. तसेच बाळाच्या जन्मानंतर एक डोस व नंतर दर महिन्याला एक दोन असे एकूण पाच डोस हे बाळाला दिले जात असतात आणि त्यानंतर पुन्हा दीड वर्षाला व साडेचार वर्षाला एक डोस हा ओ. पी. व्ही. चा दिला जात असतो. ही लस दिल्यामुळे देखील बाळाचे संरक्षण होत असते.

वाचा  पोटावर झोपणे.

त्यानंतर ट्रिपल लस दिली जात असते

        लहान बाळाला ट्रिपल लस ही लस घटसर्प डांग्या खोकला व धनुर्वात या तीन रोगांविरुद्ध दिली जात असते. म्हणजेच घटसर्प डांग्या खोकला व धनुर्वात हेरोग बाळाला होऊ नये त्यामुळे ट्रिपल लस देणे अत्यंत आवश्यक ठरत असते. पिलास त्रिगुणी लस असेदेखील म्हटले जाते. ही लस देखील इंजेक्शन स्वरूपात मिळत असते. ही ट्रिपल लस लहान मुलांना दीड महिना, अडीच महिने व साडेतीन महिने या वयात दिली जात असते. ही लस दिल्यामुळे ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले जात असते त्या ठिकाणी बाळाला सूज येण्याची शक्यता असते. तसेच बऱ्याच वेळा गाठी देखील येऊ शकतात व ताप देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला तापेची गोळी देतील तसेच त्या ठिकाण बर्फाने शेक देण्यास देखील सांगतील. ही लस दिल्यामुळे बाळाला त्रास होत असतो त्यामुळे ते चिडचिड देखील करते आणि शांत देखील झोपू शकत नाही त्यामुळे दोन दिवस या लसीचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही बाळाची व्यवस्थित काळजी त्यावेळी घ्यायला हवी.

गोवर प्रतिबंधक लस

      जेव्हा बाळचे आठ महिने पूर्ण झालेले असते. तेव्हा,  बाळाला गोवर प्रतिबंधक लस ही देण्यात येत असते. बाळाला गोवर झाल्यामुळे निमोनिया व जुलाब यांसारखे आजार देखील होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे बाळ हे कुपोषित होण्याची शक्‍यता देखील वाढत असते आणि हे सर्व होऊ नये म्हणजेच हे टाळण्यासाठी गोवर प्रतिबंधक लस देणे अत्यंत आवश्यक ठरत असते. म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला आठ महिने पूर्ण झाल्यावर गोवर प्रतिबंधक लस देणे अत्यंत गरजेचे असते.

कावीळ प्रतिबंधक लस

       बऱ्याच वेळा लहान मुलांना कावीळ होण्याची शक्यता असते. तर मुलांना कावीळ होऊ नये यासाठी कावीळ प्रतिबंधक लस देण्यात येत असते. कावीळ झाल्यामुळे मुलांच्या यकृतावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आणि यामुळे गंभीर स्वरूपाचा आजार होऊ शकतो. म्हणून लहान मुलांना कावीळ प्रतिबंधक लस देणे अत्यंत आवश्यक ठरत असते.

वाचा  लहान मुलांना जुलाब होणे या समस्येवर घरगुती उपाय

मेंदूज्वर प्रतिबंधक लस

    मेंदूज्वर प्रतिबंधक लस लहान मुलांना देण्यात येत असते. बराच वेळ जंतूंमुळे मेंदूच्या आवरणाचा दाह आणि फुफ्फुसदाह हे खूप गंभीर प्रकारचे आजार ही लस न घेतल्यामुळे होण्याची शक्यता असते. आणि हा आजार टाळण्यासाठी मेंदूज्वर प्रतिबंधक लस लहान मुलांना देण्यात येत असते. मेंदूज्वर प्रतिबंधक लस ही दीड महिने, अडीच महिने व साडेतीन महिने किंवा एक वर्षाचा बूस्टर डोस या स्वरूपाने दिले जात असते. त्यामुळे हीलस घेणे आवश्यक ठरत असते.

एम.एम.आर.लस

       एम.एम आर. ही लस  गोवर, गालफुगी आणि रूबेला या आजारांविरुद्ध ही लस एकत्र देण्यात येत असते. ही लस देखील इंजेक्शन स्वरूपात लहान मुलांना दिली जात असते. ही लस 9 महिन्याच्या मुलाला 15 महिन्याच्या आणि चार ते सहा वर्ष या वयाच्या मुलाला इंजेक्ट स्वरूपात दिली जात असते. या लसीमुळे गोवरचा अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबंध होत असतो तसेच नऊ महिन्याच्या पहिल्या इंजेक्शन नंतर ही दुसरी लस म्हणून देखील दिली जात असते. त्याचप्रमाणे गालफुगी या आजारामुळे कधीकधी मुलांच्यात अंधत्व येण्याची शक्यता असते त्यामुळे या लसीचा त्यावरही उपयोग होत असतो. रूबेला किंवा जर्मन गोवर आजार जर मातेला गर्भावस्थेत दरम्यान मातेला झाल्यास तिच्या होणाऱ्या बाळावर याचा अतिशय वाईट परिणाम होत असतो. म्हणजेच त्यामुळे बाळाच्या हृदयात दोष निर्माण होण्याची शक्‍यता असते किंवा त्याला मोतीबिंदू होण्याची देखील शक्यता असते नाहीतर बाळाची वाढ आणि विकास खुंटत असते त्यामुळे या सर्वान विरुद्ध लढण्यास एम.एम.आर. लस दिली जात असते ज्यामुळे त्याचे संरक्षण होण्यास मदत होत असते.

        तर मित्रांनो, वरील प्रमाणे आपण जाणून घेतलेले आहे की लसीकरण केल्यामुळे त्याचे काय महत्त्व असू शकते? तसेच बाळाचा जन्म झाल्यास सर्वप्रथम कोणती प्रकारची लस दिली जात असते?आणि त्यानंतर बाळाला टप्प्याटप्प्याने कोणते लसीकरण केले जात असते? याबद्दल वरील प्रकारे आपण माहिती जाणून घेतली आहे. तुमच्या देखील लहान मुलांची वाढ आणि विकास ही चांगली व्हावी, तसेच बाळ हे शारीरिक दृष्ट्या स्वस्थ आणि मस्त राहावे यासाठी लसीकरण करायला हवे. तसेच प्रत्येक महिन्यानुसार टप्प्याटप्प्याने कोणती लस केव्हा दिली जात असते याबद्दल तुम्हाला डॉक्टरांकडून माहिती मिळत असते. आणि प्रत्येक वेळी बाळाला लसीकरण देणे अत्यंत आवश्यक ठरत असते. तसेच बाळाला प्रत्येक महिन्यानुसार टप्प्याटप्प्याने कोणते लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असते, याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यावयाची असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा संपर्क साधावा. जेणेकरून तुम्ही तुमच्या बाळाला योग्य वेळी लसीकरण करू शकाल.

        मित्रांनो, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 धन्यवाद.

लहान मुलांना शी होण्यासाठी उपाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here