सर्वात पहिले तर आज काल खूप लोकांचे केस पांढरे होतात तसेच याबद्दल बऱ्याच लोकांची तक्रार आहे. तरुण वयामध्ये देखील त्यांचे केस पांढरे होत आहे. मग त्यांनी काय करावं किंवा नक्की याची कारणे कोणती ? त्यांचे अजून वय झाले नाही तरी देखील केस पांढरे का होतात ? हे सर्व प्रश्न पडू लागतात. कारण बऱ्याचदा माणसांचे मुख्यता स्त्रीचे सौंदर्य त्यांच्या केसांवर असते आणि ते सौंदर्य जपण्यासाठी त्यांचे केस सुंदर व काळे असणे फार गरजेचे आहे. जेणेकरून ते अजून आकर्षक दिसतील यासाठीच अनेक स्त्रिया मेहंदी लावतात किंवा इतर काही शस्त्रक्रिया करतात जेणेकरून त्यांचे केस पांढरे होणार नाही. पण बरेच वेळेस फरक पडतोच असे नाही बऱ्याच वेळा अपयश देखील येथे किंवा प्रत्येकाच्या शरीरावर नुसार बदल घडत जातात. त्यामुळे कोणाची केस लवकर पांढरे होतात तर कोणाचे केस उशिरा पांढरे होतात पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. केस पांढरे पडत असल्यास काय करावे? चला तर मग यावर काही कारणे व उपाय देखील बघूया.
केस पांढरे होण्याची कारणे ?
आपण एक थोडक्यात केस पांढरे होण्याचे बद्दल माहिती घेतली. केस पांढरे पडत असल्यास काय करावे हेही आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी आता आपण याची कारणे जाणून घेणार आहोत. चला तर मग बघुया या घरची कारणे.
तान तनाव :
बरेच वेळेस कामाचा अति विचार केल्यास त्याचा मेंदूवर व डोक्यावर परिणाम होऊ शकतो तसेच पूर्ण शरीरावर देखील परिणाम होतो. बऱ्याच वेळा आपण कामांमध्ये खूप गुंतून जातो व आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. शरीराची ठेवत नाही म्हणून शरीराला गरजेची असणारी पोषक तत्व मिळतातच असे नाही. बऱ्याच वेळेस ताण-तणाव घेतल्यामुळे देखील केस पांढरे होण्याची शक्यता असते कारण आपण जर कामाचा ताण घेत राहिला तर त्याचा परिणाम पूर्ण आपल्या शरीरावर दिसून येऊ शकतो.
केमिकल्स चुकीचा वापर :
बरेच लोक केस काळी करण्यासाठी केमिकल्स वापर करता किंवा शाम्पूचा वापर करता. पण बरेच वेळा असं होतं की आपण त्या शाम्पू व किंवा त्या कंडिशनरवर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचत नाही यामुळे आपल्या केसांवर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. किंवा हर्बल युक्त व नैसर्गिक शंपू न वापरल्यामुळे देखील केस पांढरे होण्याची दाट शक्यता असू शकते. म्हणून शक्य तेवढे केमिकल्सचा वापर कमी करावा व कोणतेही प्रकारची पेस्ट केसांवर लावण्याआधी तील काळजीपूर्वक वाचावी व समजून घ्यावी त्यानंतरच कोणतीही गोष्ट केसांवर लावावी.
केस पांढरे होण्याची लक्षणे :
बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपली केस पांढरे पडणार आहे किंवा पांढरे होत आहे याची लक्षणे कशी ओळखावी तर आपण पुढील प्रमाणे बघणार आहेत चला तर मग बघुया.
पुढील प्रमाणे तुम्ही तुमच्या पांढर्या केसांची लक्षणे ओळखू शकता :
जर तुमची केस तुटत असतील किंवा केस ड्राय होत असतील म्हणजेच कोरडी पडत असतील तर समजावे की तुमची केस लवकरात लवकर पांढरे होणार आहेत. तसेच केस कमकुवत झाल्याने देखील आपल्याला एक संकेत मिळू शकतो की आपली केस पांढरे होण्याच्या मार्गावर आहेत. याच प्रकारे आपल्या शरीरामधील काही कॅल्शियम, विटामिन्स कमी झाल्यामुळे देखील आपल्या केस पांढरे होऊ शकतात अशी बरीचशी लक्षणे आहेत केस पांढरे होण्याची ज्यावरुन तुम्ही ओळखू शकतात की तुमची केसं नक्की पांढरी होत आहे की नाही.
केस पांढरे झाल्यावर काय करावे ?
सर्वप्रथम म्हणजे सुरुवातीस केस पांढरे होत असेल तर तुम्ही तुमचा शाम्पू किंवा तेल बदलून बघावे तसेच तुमचे केसे जर खूप छोट्या प्रमाणामध्ये पांढरे होत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता. पण जर तुमचे केस मोठ्या प्रमाणामध्ये पांढरे होत असतील तर तुम्ही एकदा तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तसेच केसांना मेंदी देखील लावू शकता पण त्यानंतरही तुमचे केस जर थोड्या-थोड्या दिवसांनी किंवा खूप कमी कालावधी मध्ये पांढरे पडत असतील तर ही गंभीर बाब आहे. असे झाल्यास काही घरगुती उपाय करून बघावे जे आपण पुढे बघणार आहोत.
केस पांढरे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?
केस पांढरे होऊ नये म्हणून आता आपण कोणत्या प्रकारे काळजी घेऊ शकतो ते आपण बघणार आहोत तसेच आपण काही उपाय देखील बघणार आहोत चला तर मग बघुया.
शुद्ध आहार घ्या :
तुमची केस जर तरुण वयामध्ये पांढरी होत असेल तर नक्कीच तुमच्या आहारामध्ये कोणत्यातरी प्रकारचे त्रुटी आहेत. म्हणजेच तुमच्या शरीराला कॅल्शियम, विटामिन योग्य पद्धतीने भेटल्याने केस लवकर पांढरे होऊ शकतात. म्हणून सर्वप्रथम तुम्ही पालेभाज्या व फळांचे सेवन करावे दिवसभर मधून एक किंवा दोन फळं सोयीनुसार खाऊ शकता. तसेच आवळा केसान करता फार लाभदायी ठरतो म्हणून एक ते दोन चमचे आवळ्याचा रस देखील तुम्ही पिऊ शकता.
पुरेशा प्रमाणात झोप घ्या :
बऱ्याच वेळेस आपण शांत विश्रांती न घेतल्यामुळे किंवा पुरेशी विश्रांती न घेतल्यामुळे देखील केस पांढरे पडू शकतात. म्हणून सर्वप्रथम कितीही ताण तणाव असला तरी पुरेशा प्रमाणामध्ये जो घ्यावी व मेंदू शांत ठेवावा. यामुळे तुमचे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येईल व तुमचे केसांवर देखील याचा फायदाच होईल.
केसांची काळजी कोणत्या प्रकारे राखाल :
जर तुम्हाला केस निरोगी व चांगले ठेवायचे असेल तर सर्वप्रथम केस स्वच्छ ठेवले पाहिजे. त्यानंतर केसांना शुद्ध नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावले पाहिजे जेणेकरून केस कोरडी पडणार नाही. तसेच आंघोळ केल्यानंतर देखील केस ओले ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारचे मेहंदी किंवा केमिकल्स ते चालू वर लावण्याआधी ते नीट वाचून समजून लावावे.
तर आपणास पांढरे केस होत असल्यास त्याची थोडी माहिती बघितली, कारणे बघितली तसेच त्यावर कोणकोणत्या प्रकारे आपण उपाय करू शकतो व केसांची काळजी देखील कोणत्या प्रकारे घेऊ शकतो याची देखील आपण माहिती घेतली. तुम्ही तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !