केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय

0
580
केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय
केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय

आजकालच्या काळात प्रत्येक जण आपले सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या शरीराची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेत असतो जसे केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा . कारण की जर आपण आपल्या विविध अवयवांची व्यवस्थित काळजी घेतली तर त्यामुळे आपले सौंदर्य आणखी खुलून दिसण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मुख्य काम आपले केस करत असतात.

 लांब व दाट केस व त्याचबरोबर रेशीमदार केस असणे असे प्रत्येकालाच वाटत असते. कारण की असे केस असल्यामुळे आपण हवी ती केसांची विविध प्रकारे फॅशन करू शकतो व त्याचबरोबर आपण विविध हेअर कट देखील करू शकतो. पण बऱ्याच वेळा आपले आपल्या केसांवर दुर्लक्ष होते व ज्यामुळे आपल्याला विविध समस्या उद्भवतात किंवा विविध अडचणी निर्माण होतात.

बऱ्याच स्त्रियांना यामधील एक अडचण ही उद्भवत असते. ती म्हणजे केसांमध्ये कोंडा निर्माण होणे बऱ्याच लोकांना ही समस्या उद्भवत असते. या समस्येचे विविध कारणे देखील असू शकतात. बऱ्याच वेळा केस हे स्वच्छ नसल्यामुळे देखील केसांमध्ये कोंडा निर्माण होणे ही समस्या आपल्याला निर्माण होऊ शकते.

केसांमध्ये कोंडा निर्माण झाल्यामुळे आपल्याला केसांची हवी ती फॅशन त्याचबरोबर विविध हेअर कट आपण करू शकत नाही. आजकाल बर्‍याच लोकांना केसांमध्ये कोंडा निर्माण होणे ही समस्या उद्भवत आहे. बऱ्याच वेळा विविध केमिकलयुक्त तेलांचा व विविध गोष्टींचा वापर केल्याने देखील आपल्याला केसांमध्ये कोंडा होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

 पण जर तुम्हाला देखील या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही विविध घरगुती उपाय देखील करू शकतात. आपण विविध घरगुती उपाय केल्यामुळे देखील आपल्या केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. त्यामुळे आपण विविध घरगुती उपाय यांचा वापर करून देखील विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो.

केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय :-

जर तुम्हाला देखील केसांमध्ये कोंडा निर्माण होणे या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही देखील विविध घरगुती उपाय यांचा वापर करू शकतात. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की केसांमध्ये कोंडा निर्माण होणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो? चला तर मग बघूया!

वाचा  स्वप्नात बासरी दिसणे शुभ की अशुभ

केसांना दही लावावे :-

 जर तुम्हाला देखील केसांमध्ये कोंडा निर्माण होणे ही समस्या जर उद्भवत असेल अथवा निर्माण होत असेल तर तुम्ही या घरगुती उपायाचा वापर करू शकतात. केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर करण्यासाठी आपण केसांना दही लावले पाहिजे. कारण दही मध्ये उपलब्ध असणाऱ्या विशिष्ट पोषक तत्त्वांमुळे आपल्या केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. केसांना दही लावल्यामुळे आपले केस बळकट होण्यास आपल्याला मदत मिळते व त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा निर्माण झाला असेल तर तो कोंडा दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. आपण एक वाटी दही घेऊन त्यामध्ये थोडेसे तेल टाकावे व हे मिश्रण एकत्रित करून केसांच्या मुळाशी लावावे व हे मिश्रण केसांना जवळजवळ 25 ते 30 मिनिटे तसेच राहू द्यावे व नंतर केस हे स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावे. जर तुम्ही असे आठवड्यातून दोन दिवस केले तर तुमच्या केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते व त्याचबरोबर तुमचे केस देखील बळकट होण्यास तुम्हाला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे केसांना दही लावल्यामुळे आपल्या केसांमधील निर्माण झालेला कोंडा दूर होण्यास मदत मिळू शकते.

केसांना कांद्याचा रस लावून बघावे :-

आपण आपल्या स्वयंपाक घरात विविध पकवान तयार करण्यासाठी कांद्याचा वापर करत असतो या कांद्याचा वापर आपण विविध जेवणामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरत असतो. तसेच आपल्या विविध समस्या देखील दूर करण्यास हा कांदा आपल्याला मदत करू शकतो. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही आपल्या केसांना कांद्याचा रस लावू शकतात. कांद्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध जीवनसत्वामुळे व पोषक तत्त्वांमुळे आपले केस लांब होण्यास व केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. मिक्सर घेऊन त्यामध्ये कांदा बारीक वाटून घेऊन गाळणी मध्ये कांद्याचा रस काढून आपल्या केसांच्या मुळाशी हा रस लावावा व हे मिश्रण केसांवरती 30 ते 35 मिनिटे तसेच राहू द्यावे व नंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. असे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा केल्यामुळे आपल्या केसमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर होण्यास आपल्या मदत होऊ शकते. त्यामुळे हा उपाय आपल्याला फायदेमंद ठरू शकतो. 

वाचा  स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज दिसणे, शुभ की अशुभ!

त्यामुळे बरेच लोक त्यांच्या केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर करण्यासाठी जर विविध प्रयत्न करत असाल तर तुम्ही वरील या उपयांचा वापर करून तुमची हि समस्या दूर करण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. 

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा दूर करण्यासाठी आपण कोणकोणते विविध घरगुती उपाय यांचा वापर करू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here