टमाटर चे फायदे

0
533
टमाटर चे फायदे
टमाटर चे फायदे

नमस्कार मित्रांनो. आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या फळभाज्यांचा समावेश आपल्या आहारात करणे फायदेशीर ठरते. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा देखील चांगले राहण्यास मदत होत असते शिवाय फळभाज्या खाल्ल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत. मित्रांनो, टमाटर हे तर सर्वांनाच माहित आहे. टमाटे हा लाल असून हे आकाराने गोलाकार अथवा लांबट गोलाकार असतात. आपण कुठल्या प्रकारचे भाजी बनवत असतो फोडणीचे वरण बनवत असाल तर त्यासाठी आपण टोमॅटोचा आवर्जून उपयोग करत असतो.

टमाटर न टाकता जर भाजी केली तर त्या भाजीला विशेष एवढी चव येत नाही परंतु जर टमाटर टाकून भाजी केली तर त्या भाजीची पौष्टिकता देखील वाढत असते. शिवाय भाजी ची चव देखील छान व स्वादिष्ट लागत असते. काही लहान मुलांना टमाटे खूपच आवडीने खायला आवडत असतात. टमाते खायला छान लागतात. त्याशिवाय, टमाटे खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला होत असतात. टमाटे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा देखील सुधारण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे टोमॅटो चा वापर आपण आपल्या चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठी देखील करू शकतो. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर टोमॅटोचे स्क्रॅप देखील करू शकतात.

टोमॅटोची स्क्रब केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी मदत होते. आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आपण टोमॅटो खाल्ला पाहिजे. टोमॅटोची सेवनाने कोण कोणत्या प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात हे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले रहावे शिवाय, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली वाढावी यासाठी तुम्ही टोमॅटोचे सेवन करायला हवे. तर मित्रांनो, आज आपण टमाटर चे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग टमाटे खाल्ल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

टमाटर चे फायदे:-

बरेच जण टमाटा आवडीने खात असतात. काहीजणांना टोमॅटो वर साखर अथवा नमक टाकून खाण्यास आवडत असते. टमाट्याचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी ते गुणकारी देखील ठरू शकते. भाजी मध्ये टमाटे न घातल्यामुळे भाजीला एक विशिष्ट चव येत नाही. जर तुम्ही कुठल्याही प्रकारची भाजी बनवत असाल, तर त्यामध्ये टोमॅटो हा हमखास घालतात. त्यामुळे भाजीची चव देखील वाढते आणि बनवलेले जेवण हे पौष्टिक व रुचकर लागते. टमाटर चे फायदे अजून कोणत्या प्रकारे होऊ शकतात ?  याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात !

  1. टमाटे यांचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या क्षमतेने वाढण्यास मदत होत असते. आपला इतर आजारापासून, संसर्गजन्य रोगांपासून बचाव व्हावा यासाठी आपल्या शरीरात संरक्षक कवच म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढणे अत्यंत आवश्यक ठरत असते. जर तुम्ही टमाटे नियमित सेवन करत असाल, तर त्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू लागते.
  2. टोमॅटोचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेला एक प्रकारे चमक येण्यास देखील मदत होत असते.
  3. बऱ्याच व्यक्तींना अपचनाची समस्या निर्माण होत असते. जेवण झाल्यावर त्यांच्या शरीर मध्ये अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पोटदुखीचे समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्ही नियमित टोमॅटोचे सेवन करत असाल, तुमच्या शरीरातील पचनक्रिया देखील चांगली व सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. शिवाय, खाल्लेले अन्न हे व्यवस्थित पचनास मदत होऊ शकते.
  4. टोमॅटोचे सेवनामुळे जीवनसत्व क व जीवनसत्व अ यांचा चांगल्या प्रकारे पुरवठा आपल्या शरीराला होत असतो. A जीवनसत्व हे आपल्या डोळ्यांसाठी फार फायदेशीर ठरत असते. A जीवनसत्व चा पुरवठा आपल्याला योग्य प्रमाणात होत राहिला तर आपले डोळे हे निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. शिवाय डोळ्यांचे विकार देखील उद्भवणार नाही.
  5. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची समस्या असेल किंवा चेहऱ्यावर मुरूम येण्याची समस्या आली असेल, तर त्यासाठी तुम्ही टोमॅटोचा उपयोग करू शकतात. टोमॅटो चेहऱ्यावर लावण्यासाठी एक टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुऊन तो मधोमध कापा. अर्धा मधोमध कापल्यावर त्यानंतर त्यावर बारीक केलेली साखर टाकून घ्या. आणि त्याने तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला गोलाकार मसाज द्या. हे एक स्क्रब प्रमाणे काम करेल. असे केल्यामुळे, तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी मदत होऊ शकते. शिवाय, चेहऱ्यावरील डेड स्किन देखील निघून जाऊ शकते. एक प्रकारे चेहऱ्याला गोलाकार मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग देखील उजळण्यास मदत होत असतो.
  6. टमाटा च्या साह्याने चेहऱ्यावर स्क्रब केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील रक्ताभिसरण प्रक्रिया ही देखील चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते. आणि टोमॅटो चेहऱ्यावरून गोलाकार पद्धतीने फिरवल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडणार नाहीत असतील तर त्या निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  7. तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडलेले असेल तर त्यासाठी देखील तुम्ही टोमॅटोच्या रसाचा वापर करू शकतात. टोमॅटोचा रस काढून कापसाच्या बोळ्यांमध्ये घेऊन ते कापसाचे बोळे डोळ्यांच्या अवतीभोवती अलगदपणे फिरवावेत आणि संपूर्ण चेहर्‍यावर व मानेवर देखील लावून घ्यावे. असे नियमित केल्यामुळे डोळ्याखालची-काळी-वर्तुळे निघून जाण्यास मदत होते. शिवाय, त्यामुळे चेहऱ्यावरील काळवंडलेला भाग देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते. तसेच मानेवरचा काळपटपणा देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  8. टोमॅटोचे सूप देखील अनेक जणांना सेवन करण्यास आवडत असते. नियमित टोमॅटोचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण निखिल वाढण्यास मदत होत असते. ज्यांना रक्ताची कमतरता भासत असेल शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असेल त्यांनी नियमित एक टोमॅटो सेवन केले पाहिजे त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण हे चांगल्या प्रकारे वाढू लागते.
  9. तसेच, टमाट्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामधील जे विषारी घटक असतील, तर ते निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  10. टोमॅटो मध्ये विटामिन ई चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होत असतो.तसेच नियमित टोमॅटोचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेला ओलावा टिकून राहतो.
  11. टमाट्या पासून तुम्ही कोशिंबीर बनवून देखील खायला हवी त्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला होऊ शकतात टमाटा, काकडी, कोथिंबीर, लसुन, दही, बीटरूट आणि चवीपुरते नमक हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यापासून कोशिंबीर बनवून खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही तर वाढतेच शिवाय यामध्ये अँटीऑक्सीडेंट प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो.
  12. नियमित टोमॅटो खाल्ल्यामुळे आपले केसांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होत असते. तसेच केसांना एक नैसर्गिक चमक येते. शिवाय केसांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते.
  13. टमाट्याचे सेवन केल्यामुळे मुत्राचे विकार देखील जडत नाहीत.
  14. तसेच टोमॅटो मध्ये विटामिन सी चे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे, आपण संधिवात सारखे समस्येपासून देखील दूर राहू शकतो नियमित टमाटे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची हाडे हे बळकट व मजबूत होण्यास मदत होते. विटामिन सी हे शरीराला पुरेसे मिळाल्यामुळे हाडे दुखण्याचा त्रास उद्भवत नाही.
  15. ज्या व्यक्तींची त्वचा ही तेलकट स्वरूपाची असते तर अशा व्यक्तींनी नियमित एक टोमॅटोची सेवन तरी करायला हवे. तेलकट त्वचेसाठी टोमॅटोची सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
वाचा  पायासाठी चप्पल कशी वापरावी

तर मित्रांनो टोमॅटो हे दिसायला खूप आकर्षित लाल रंगाचे तर असतातच शिवाय, टोमॅटोची सेवन देखील अनेक जण आवडीने करत असतात टोमॅटोचे सूप तर सर्वांनाच आवडत असते. आपल्या शरीरातील रक्ताची पातळी व्यवस्थित वाढण्यास टोमॅटोची मदत होते. टोमॅटो शिवाय जर भाजी बनवली तर त्या भाजी मध्ये काहीतरी अपूर्ण असल्यासारखे वाटते. म्हणजेच बेचव भाजीला चव आणण्याचे काम टोमॅटोमुळे होत असते.

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण हे व्यवस्थित असावे यासाठी तुम्ही लहान मुलांना आवर्जून टोमॅटो खायला द्यायला पाहिजे. ज्यामुळे त्यांचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आपण टोमॅटो चे फायदे, टोमॅटो खाल्ल्यामुळे किती प्रकारचे फायदे होऊ शकतात या विषयाबद्दल जाणून घेतले आहे. मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here