मनुके पाण्यात भिजवलेले खाण्याचे फायदे

0
868
मनुके पाण्यात भिजवलेले खाण्याचे फायदे
मनुके पाण्यात भिजवलेले खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो आज आपण बघणार आहोत मनुके पाण्यात भिजवलेले खाण्याचे फायदे काय आहेत, द्राक्ष सगळ्यांना आवडतात. तसेच ज्यावेळी द्राक्षे येतात, त्यावेळी अतिशय गोड लागतात. मग द्राक्ष उन्हाळ्याच्या दिवसात सुकवले जातात व त्यांचे रुपांतर होते त्यांना मनुका असे म्हणतात. पूर्वीच्या काळापासून मनुकांचा  वापर ड्रायफ्रूट्स, मिठाई, स्वीट्स, हलवा, शिरा तसेच विशिष्ट पदार्थांमध्ये केला जातो. मनुका टाकून त्या वस्तू बनवल्या, की त्याची चवही न्यारी लागते. तसेच मनुका अतिशय गोड व स्वादिष्ट असतात. तसेच आंबटचिंबट चवही असते. मनुके खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात.

अगदी मोठ्या पासून तर लहान मुलांना मनुके आवडतात मनूकयांचे दोन प्रकार असतात. एक लाल मनुका दुसरी काळा मनुका दोन्ही मनुके आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. मनूकयांमध्ये विटामिन ए, सी, के, असते ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच मनुका मध्ये लीनोलेनिक ऍसिड, पॉलिफेनॉल, एंटी ऑक्सिडेंट, फायबर, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह इतके सारे गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात मनूकयांचा वापर करा. मनुके खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहते. शिवाय आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच मनुके पाण्यात भिजवून खाल्ल्याने, आपल्याला खूप सारे फायदे होतात. चला तर मग आज आपण त्याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की  मनुके पाण्यात भिजवून खाल्ल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात! 

भिजवलेले मनुके खाल्ल्यामुळे होणारे फायदे?

मित्रांनो मनुके पाण्यात भिजवून खाल्ल्यामुळे, आपल्या शरीराला खूप फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी.

लहान मुलांचे पोट साफ होते

लहान मुलांना संडास साफ होत नाही. पोटात दुखते, तसेच दोन-तीन दिवस आड संडासला जातात, त्यावेळी संडास करताना, त्यांना अतिशय कडक होते, व त्रास होतो. अशावेळी तुम्ही लहान मुलांना एक ते दीड मूठभर मनुके पाण्यात भिजवून दररोज सकाळी द्यायचे.  त्यामुळे त्यांची संडास साफ होते. शिवाय पोटात दुखत नाही. तसेच संडास करताना त्रास होत नाही. 

अशक्तपणा जातो

बऱ्याच वेळेला काहीजणांना अशक्तपणा जाणवतो. तसेच एखाद्या महा आजारातून बाहेर निघाल्यावर म्हणजे कोरोना, टायफॉइड, मलेरिया, डेंगू, कावीळ, या सारखे आजारांमध्ये त्यांना अँटिबायोटिक टेबलेट्स, तसेच सिरप चे प्रमाण जास्त घेतल्यामुळे, त्यांच्या शरीरातील शक्तीही कमी होऊन जाते. त्यांना अशक्तपणा जाणवतो. थरथरल्यासारखे वाटते, अशा वेळी जर त्यांनी नियमित सात ते आठ मनुके पाण्यामध्ये भिजवून खाल्ले, तर त्यांच्या अशक्तपणा समस्या लवकर भरून येण्यास मदत होते. कारण मनूकयांनमध्ये झिंक चे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते व ते सशक्त होतात. 

वजन कमी होते

बऱ्याच वेळेला काही जण वजन कमी करण्यासाठी खूप औषधे व टॅबलेट घेतात, तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. असे जर त्यांनी दररोज 30 ते 40 ग्रॅम मनुके खाल्ले, तर त्यांचे वजन कमी होते. शिवाय मनुका मधील जीवनसत्वे, खनिजे, फायबर्स, विटामिन्स, मिनरल्स चे प्रमाण त्यांच्या शरीराला मिळते. 

रक्ताची कमी वाढते

काही जणांच्या शरीरात रक्त कमी असते. अशक्तपणा जाणवतो, अश्या वेळी त्यांनी त्यांच्या आहारात मनूकयांनचा वापर करायला पाहिजे. त्यांनी रोज सकाळी उपाशीपोटी भिजवलेले मनुके खाल्ले, तर शरीरात रक्ताची कमतरता ही पूर्ण होते. मनुका मध्ये फायबर, आयरन, झिंक, लोह यासारखे गुणधर्म असल्यामुळे शरीरात रक्ताची, कमतरता ही पूर्ण होते व तुमच्या शरीरात रक्त परिपूर्ण झाल्यामुळे, तुम्हाला अशक्त पण थकवा जाणवत नाही. 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

मनूकयांनमध्ये एंटी ऑक्सिडेंट चे प्रमाण असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे, तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया व बाहेरील इन्फेक्शन पासून तुम्हाला संरक्षण मिळते, तुम्ही निरोगी राहतात. त्यामुळे तुम्ही रोज रात्री  20 ते 30 ग्रॅम मनुके पाण्यामध्ये भिजवून, सकाळी उपाशीपोटी ते खाऊन, त्यावर ते पाणी प्यावे. त्याने तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते. 

वाचा  नासपती खाण्याचे फायदे व तोटे

ॲनिमियाचा त्रास होत नाही

बऱ्याच वेळेला स्त्रियांना ॲनिमियाचा त्रास होतो. कारण मासिक पाळी दरम्यान, त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाह जास्त प्रमाणात बाहेर गेल्यावर, त्यांना ॲनिमियाचा त्रास होतो. अशा वेळी जर त्यांनी मनुका चा वापर त्यांच्या आहारात केला, तर त्यावर त्यांना फायदे मिळतात. कारण यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, झिंक, पोटॅशियम, फायबर हे गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीरातील रक्ताची कमी दूर होते व तुम्हाला ॲनिमिया च्या त्रासावर आराम मिळतो. 

हृदयविकाराचा धोका टळतो

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण मनुकांचा वापर केल्यामुळे, तुमच्या हृदयाला जपता येते. म्हणजेच हृदयविकाराचा धोका टळतो. कारण     मनुकामध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते. पोटॅशियम हे  हृदयाला गती व चालना देते. तसेच मनुका खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. शिवाय रक्तामध्ये गुठळ्या होत नाही. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल मनुका खाल्ल्याने बाहेर निघतो, हृदयाला रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे तुमच्या हृदयाची गती सुरळीत राहते व तुम्हाला हृदयविकाराचा धोका टळतो. 

आम्लपित्ताचा त्रास कमी होतो

ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास आहे, ऍसिडिटी आहे अजीर्ण सारखे आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात मनुकांचा वापर करावा. त्यांनी 30 ग्रॅम मनुके 25 ग्रॅम बडिशोप पावडर, एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी त्या पाण्यामध्ये तुम्ही खडी साखर टाकून ते पाणी पिले, तर तुम्हाला आम्लपित्त, ऍसिडिटी यासारख्या समस्येवर आराम मिळतो. 

मनुका खाल्ल्याने अजून खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात, चला तर मग जाणून घेऊयात.

  • मनुका खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
  • तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवते. 
  • गॅसेस, आम्लपित्त सारखा समस्येवर आरामदायी आहे. 
  • मनुका खाल्ल्याने तोंडाला चव येते. 
  • हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. 
  • मनुका खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. 
  • मनुका खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमी पूर्ण होते. 
  • तसेच मनुका खाल्ल्याने पोट साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 
  • मनुका खाल्ल्याने सौंदर्य व केस केसांसाठी फायदेशीर ठरते. 
  • मनुका खाल्ल्याने दातांच्या समस्या दूर होतात. 
  • मनुका खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. 
  • मनुका खाल्ल्याने कॅन्सर चा धोका टळतो. 
वाचा  नाकातून रक्त येणे यावर काही घरगुती उपाय

भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने, काही साईड इफेक्ट होतात का?

भिजवलेल्या मनुका या शरीरासाठी फायदेशीरच असतातच. पण जर तुम्ही त्यांचे प्रमाण चुकवले, किंवा प्रमाणाच्या बाहेर खाल्ले, तर त्याचा त्रास हा आपल्याला होतो. कारण कोणतीही गोष्ट प्रमाणात खावीत. प्रमाणाच्या बाहेर कोणती गोष्ट गेली की त्याचा आपल्या शरीराला त्रास होतो. तसेच जर तुम्हाला मनूकयांनची ऍलर्जी असेल, तर तुम्ही डॉक्टरांना विचारून मनुके खावेत. तसेच मनूकयांनचे प्रमाण आहारात जास्त झाले, की तुम्हाला यासारख्या समस्या यांना तोंड द्यावे लागते. 

 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मनुके खाल्ल्याने, तुमच्या शरीराला होणारे फायदे सांगितले आहेत. तसेच आम्ही दिलेल्या माहिती मध्ये जर तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका – कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावे. 

धन्यवाद

खारीक खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here