पोट कमी करण्यासाठी उपाय

0
1208
पोट कमी करण्यासाठी उपाय
पोट कमी करण्यासाठी उपाय

नमस्कार मित्रांनो. आजच्या धावपळीच्या जगामध्ये हल्ली कामाचा व्याप एवढा वाढला आहे की आपले आपल्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. रोज सकाळी लवकर उठून धावपळ करून काम आवरून ऑफिसला जायचे ऑफिसमध्ये गेल्यावर एवढा मोठा कामाचा व्याप त्यामुळे जेवण करायला काहिना तर वेळही मिळत नाही. आणि काही तर कामाचा व्याप असल्यामुळे जेवण घाईघाईने करतात. त्यामुळे आपण जेवण काय करतोय याकडे देखील लक्ष द्यायला वेळ नसते.या सर्व कारणांमुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडत असतो. तसेच काही जणांचे तर बैठे काम असते त्यामुळे जेवण झाल्यावर परत काम करायला बसा. चला तर मग बघुयात पोट कमी करण्यासाठी उपाय. 

यामुळे त्यांच्या शरीराला स्थुलत्व प्राप्त होते परिणामी पोट वाढण्याची समस्या उद्भवू शकते. पोट वाढणे,l म्हणजेच पोटाला चरबी चढणे अथवा स्थूलत्व प्राप्त होणे. तर काही लोक आहे गपागपा खातात ताटात येऊ द्या जे भेटले ते खात राहतात. परिणामी असे लोक देखील शरीराने स्थूल होत जातात व  त्यांच्या पोटाची देखील चरबी वाढत जाते. चुकीची जीवनशैली जेवण झाल्यावर तसेच बसून राहणे व्यायाम न करणे किती जण आहे जेवण झाल्यावर तासन तास मोबाईल मध्ये मग्न होऊन बसतात, तर काही लोक हे टीव्ही बघत बसतात. परिणामी, शरीरातील अन्नपचनाची क्रिया व्यवस्थित होत नाही आणि शरीराला स्थूलत्व प्राप्त होत जाते.

त्यांच्या खेळायला जडपणा येतो जातो. आणि वजन हे वाढत जाते. पण मित्रांनो ह्या सर्व चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर परिणाम होत जातो. म्हणून तुम्ही शरीराच्या आरोग्याकडे नियमित लक्ष दिले पाहिजे. तसेच वरील सर्वांमुळे पोटाची चरबी वाढत जाते. तर मित्रांनो आज आपण पोट कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. तसेच पोटाची चरबी वाढू नये म्हणून काय करावे? काय खावे? काय खाऊ नये? तसेच पोटाची चरबी वाढत असल्यास ती कशाप्रकारे कमी करता येईल? चला तर मग, मित्रांनो याविषयी आपण  खालीलप्रमाणे घरगुती उपाय जाणून घेऊयात.

पोटाची चरबी वाढण्यामागील कारणे कोणती असू शकतात?

मित्रांनो, बरेच लोक आहे चुकीची जीवनशैली चे अवलंबन करतात. बऱ्याच लोकांना घरगुती आण्णा सोडून बाहेरचे अन्न खाण्याची सवय असते. तर काही लोकांना नुसता फास्ट फूड म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटते! परंतु हे सतत व नियमित खाल्ल्यामुळे शरीरासाठी ते हानिकारक ठरू शकते. आणि या कारणामुळे देखील पोटाची चरबी वाढण्याचे प्रमाण वाढू शकते. तसेच पोटाची चरबी वाढणे मागील अजून कोणती कारणे असू शकतात हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  1. बऱ्याच लोकांना सतत काही ना काही गोड खावेसे वाटते. जेवण झाले की जेवणानंतर स्वीट डिश म्हणजेच काही तरी गोड पदार्थ खाण्यात येतो. परंतु जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित रित्या होत नाही म्हणजेच पचन क्रिया ही मंदावते. गोड पदार्थ हे पचण्यासाठी जड असतात त्यामुळे या पदार्थांचे पचन व्यवस्थित होत नाही परिणामी पोटाची चरबी वाढू लागते.
  2. बरेच लोक हे घरचे स्वादिष्ट अन्नपदार्थ टाळून बाहेरचे फास्टफूड खाण्यास गोड वाटते. परंतु सतत फास्ट फूड खाणे यामुळेदेखील पोटाची चरबी वाढू लागते. म्हणजेच पोटाचा घेर वाढतो.
  3. अनेक जणांना तळलेले पदार्थ खाण्याची खूप आवड असते. समोसा, कचोरी दिसली की तोंडाला लगेच पाणी सुटते. गरम गरम भजी, पापड खाण्यामध्ये अनेकांना रस वाटतो परंतु हे सर्व पदार्थ खाल्ल्यामुळे देखील शरीराचे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. परिणामी पोटाचा घेर वाढायला सुरुवात होते. परंतु हे  पदार्थ पचण्यासाठी जड असतात. यामुळे अन्न पचन क्रिया मंदावते.
  4. साखर व मैदा युक्त पदार्थांना खूप आवडीने खाल्ले जाते. परंतु मित्रांनो यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पदार्थ नियमित सेवन केल्यामुळे परिणामी त्याचे रुपांतर चरबीमध्ये होत जाते, आणि अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे पोटाचा घेर वाढू लागतो.
  5. सतत मांस खाणे, फ्रेंच फ्राईज, समोसे, बटाटा चिप्स तसेच ब्रेड पदार्थ यांसारखे सेवन करणे यांने  देखील शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढून पोटाचा घेर वाढू लागतो.
  6. डिलिव्हरी नंतर देखील बराच बायकांचे पोट सुटण्याची समस्या वाढते.
  7. अती मसाले युक्त पदार्थ खाण्यामुळे देखील पोटाची चरबी वाढू लागते.
  8. जेवण केल्यावर काहीही हालचाल न करता लगेच झोपी गेल्यावर देखील पोट वाढण्याची दाट शक्यता असते.
  9. तसेच सतत चिंता करत बसणे अधिक ताण तणाव असणे हे कारणे देखील पोटाची चरबी वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
  10. थायरॉईड असल्यामुळे देखील जाडपणा येण्याची शक्यता असते.
  11. शरीरातील काही बदलांमुळे म्हणजेच हार्मोन इन बॅलन्स आल्यामुळे देखील जाडपणा येत असतो.
  12. वाढत्या वयामुळे देखील पचन संस्था खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे देखील पोटाची चरबी वाढू शकते.
वाचा  चेहऱ्यावर तीळ, चामखीळ यासाठी काही घरगुती उपाय

 मित्रांनो, वरील सर्व कारणांमुळे शरीरातील चरबी वाढून परिणामी पोट सुटते, म्हणजेच पोटाचा घेरा वाढू लागतो. पोट सुटणे म्हणजेच पोटाचा घेर वाढल्यावर अनेक जण अडचणीत येतात. आणि जास्त वजन वाढल्यामुळे अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागत असते. पोटाचा घेर कमी व्हावा पोट कमी व्हावी यासाठी अनेक जण काही ना काही प्रयत्न करत असतात. पोटाचा घेर कमी व्हावा यासाठी योगासने खूप महत्त्वाचे ठरतात. तसेच नियमित आहारामध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे असते. तर मित्रांनो पोट कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करता येऊ शकतात. पोटाचा घेर कमी व्हावा यासाठी खालील प्रमाणे घरगुती उपाय तुम्ही करून बघू शकतात.

 

पोट कमी करण्यासाठी खालील तुम्ही प्रकारे घरगुती उपाय करून बघू शकतात.

मित्रांनो,पोट वाढणे पोटाचा घेर वाढणे ही समस्या एक ना अनेक जणांना उद्भवत असते. पोटाचा घेर कमी व्हावा यासाठी काय करावे? यांसारखे प्रश्न अनेकांच्या मनात  उपस्थित असतात. पोटाचा घेर कमी व्हावा यासाठी काही घरगुती उपाय करता येतील ते खालील प्रमाणे जाणून घेऊ.

आहारामध्ये पोषक तत्त्वांचा समावेश करून बघा.

मित्रांनो तुम्ही तुमच्या हा नियमित च्या आहारात योग्य त्या घटकांचा समावेश करून बघा. आहारामध्ये तेलकट-तुपकट पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही आराम मध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा तसेच मूग डाळ प्रथिनयुक्त आहार घ्यावा. तसेच जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळावेत. आहारामध्ये मैदा युक्त पदार्थ खाणे देखील टाळावे. तसेच जेवण करताना एक एक घास हा बारीक जाऊन खा त्यामुळे अन्न पचन क्रिया फायदा होत असतो. आहारामध्ये लोणची, पापड, जास्त खारट पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

चहा, कॉफी ऐवजी ग्रीन टी चे सेवन करून बघा.

मित्रांनो चहा कॉफी घेतल्याने शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत असते. म्हणून चहा कॉफी घेणे व जी तुम्ही ग्रीन टी घेऊन बघा ग्रीन टी घेतल्यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच ग्रीन टी घेतल्यामुळे पोट देखील साफ होण्यास मदत होत असते. ग्रीन टी घेतल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणून मित्रांनो तुम्ही चहा कॉफी घेण्यापेक्षा दिवसातून किमान एकदा तरी ग्रीन टी घेऊन बघा याने नक्कीच तुम्हाला फरक जाणून येईल.

वाचा  कानातील मळ काढण्यासाठी उपाय

कोमट पाण्यात मध घेऊन बघा.

मित्रांनो, पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून व्यवस्थित मिक्स करून त्या पाण्याचे सेवन करून बघा. हा एक आयुर्वेदीक उपाय देखील मानला जातो. परंतु हा कोमट पाण्यात मत मिक्स करून त्या पाण्याचे सेवन तुम्ही उपाशीपोटी करायचे आहे. असे केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. कोमट पाण्यात मध मिक्स करून घेतल्यामुळे पोटातील अतिरिक्त चरबी जाण्यास मदत होते तसेच वजन देखील नियंत्रित राहू शकते.

झोप व्यवस्थित घ्या.

मित्रांनो, शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही पुरेपूर झोप घेणे आवश्यक ठरते. कारण आपण तणावरहित चिंता मुक्त असू तेव्हाच आपल्या आरोग्य देखील चांगले राहते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी देखील वाढत नाही. बरेच लोक हे रात्री उशिरापर्यंत जागरण करत असतात. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे शरीरातील हार्मोन्स इन बॅलन्स होतात. परिणामी शरीरातील चरबी वाढण्याचे प्रमाण वाढते तसेच पोटाची चरबी देखील वाढू शकते. म्हणून मित्रांनो नेहमी आनंदात रहा, तणावमुक्त राहा,हसत-खेळत कामे करण्याची सवय करा आणि चांगल्या आरोग्यासाठी पुरेपूर विश्रांती घ्या. यामुळे  आरोग्य देखील स्वस्त राहील. तसेच तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे अनुलोम-विलोम व ध्यान धारणा या योगासणाचा सराव केला पाहिजे.

लिंबूपाण्याचे सेवन करून बघा.

मित्रांनो शरीराचे वजन वाढत वाढलेले असल्यास अथवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही लिंबूपाण्याचे सेवन करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. लिंबा मध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक असते आणि शरीरासाठी हे खूप उपयोगी ठरते. रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्याचे सेवन केल्याने  शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होत असते. तसेच लिंबूपाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरावर देखील एक वेगळीच चमक येत असते. म्हणून मित्रांनो, पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही लिंबूपाण्याचे सेवन नियमित पणे करून बघू शकतात.

वाचा  मोड आलेले हरभरे यांचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

नियमित योगासनांचा सराव करून बघा.

मित्रांनो, शरीराच्या आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित योगासने करणे हे खूप फायदेशीर ठरते. नियमित योगासने केल्यामुळे शरीराचे अधिक वजन वाढण्यावर आळा घालता येतो. तसेच शरीर देखील सुडौल बनते. नियमितपणे योगासनांचा सराव केल्यामुळे शरीराची पाचक संस्था चांगली राहण्यास मदत होते म्हणजेच पचन क्रिया वाढते. तरी तुम्ही सकाळी उठल्यावर शुद्ध हवेमध्ये चालण्याचा व्यायाम करणे देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराला पुरेपूर ऑक्सीजन तर मिळतेच शिवाय वजन कमी करण्यासाठी देखील हा महत्त्वपूर्ण व्यायाम ठरतो. तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी कपालभाती हा व्यायाम देखील उपयुक्त ठरतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही कपालभाती हा व्यायाम नियमितपणे केल्यास अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवून बघा.

मित्रांनो, पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही पाणी पिण्याचे प्रमाण वाढवून बघा. पाण्याची कमी सेवन केल्यामुळे पोट साफ होण्यास त्रास होत असतो. तसेच शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे देखील अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढत असते. म्हणून मित्रांनो दिवसभरातून कमीत कमी तुम्ही आठ ते दहा ग्लास तरी पाणी पिले पाहिजे. अनेक जण हे घसा कोरडा पडल्यावर किंवा तहान लागल्यावरच पाणी पीत असतात, परंतु असे चुकीचे आहे. जास्त पाणी प्यायल्यामुळे जेवण कमी प्रमाणात जाते त्यामुळे वजन नियंत्रणात आणण्यासाठी पाणी पिणे योग्य ठरते. नेहमी पाणी पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते तसेच पचनक्रिया देखील सुधारते. तसेच भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरीराचे डीहायड्रेशन होण्यापासून बचाव होऊ शकतो. म्हणून मी त्यांना पोटाची चरबी कमी करण्यासाठी पाणी दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास तरी पिले पाहिजे.

जाणून घ्या : रांजणवाडी घरगुती उपाय 

मित्रांनो, वरील सर्व घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पोटाची अतिरिक्त चरबी कमी करू शकतात. तसेच वरील सर्व घरगुती उपाय करुन देखील तुम्हाला मदत होत नसेल तर तुम्ही योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेऊ शकतात. तसेच तुम्ही बाहेरील पदार्थ, जंक फूड खाणे टाळले पाहिजे. नेहमी घरात बनवले स्वादिष्ट पदार्थ खाणे योग्य ठरते तसेच  योगासन वर भर दिला पाहिजे. तुमची जीवनशैली ही नेहमीं तणावमुक्त असली पाहिजे. अजून माहिती साठी तुम्ही येथे पाहू शकता.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू धन्यवाद !!

            

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here