चेहऱ्याला हळद लावण्याचे उपाय व फायदे

0
1213
चेहऱ्याला हळद लावण्याचे उपाय व फायदे
चेहऱ्याला हळद लावण्याचे उपाय व फायदे

नमस्कार, मित्रांनो हळद ही सगळ्यांना माहिती आहे. आज आपण जाणून घेऊया चेहऱ्याला हळद लावण्याचे उपाय व फायदे.. प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये हळदीचे गुण असतातच.भाजीमध्ये विशिष्ट चव आणि रंग देण्याचे काम हळद ही करते. हळदीचे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. हळदीत अँटीसबॅक्टरियल, तसेच फंगल इन्फेक्शन वर मात करणारे गुणधर्म असतात. आपल्या शरीरातील कोणत्याही समस्येवर हळदीचा वापर केला जातो, हळद ही फक्त रुचकर पदार्थांतच नाही, तर आपल्या शरीरासाठी फार गुणकारी आहे. म्हणूनच तर कोणताही कार्यक्रम असतो. त्यामध्ये हळदी आणि कुंकू चा वापर केला जातो. तसेच लग्नामध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदी साठी खास फंक्शन ठेवतात.

म्हणजेच हळद लावण्याचा कार्यक्रम ठेवतात. हळद अंगाला का लावतात ? त्याचे गुणधर्म खूप जणांना माहिती नसतात. पण हळद लावल्याने तुमच्या शरीरावर कसली ऍलर्जी असेल, तर ती जाण्यास मदत मिळते. म्हणजेच एक अर्थ असा की हळद लावल्याने, तुम्हाला चर्मरोग विषयीच्या समस्या असतील, तर त्या निघतात व ती अँटिबायोटिक असल्याने तुम्हाला तिचे फायदे होतात. शिवाय हळदीने रंग उजळतो. तर मित्रांनो आज आपण हळदी विषयी माहिती जाणून घेणार आहोत, की हळद चेहऱ्याला लावल्यामुळे तुम्हाला होणारे फायदे नेमके कोण कोणते ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

चेहऱ्याला हळद लावण्याचे फायदे कोणते ? 

मित्रांनो, चेहऱ्याला हळद लावण्याचे अनेक फायदे आहेत. तर मग ते नेमकी कोण कोणते ? चला तर जाणून घेऊयात ! 

वाचा  झोपताना डोक्याची मालिश का करावी ? 

त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास फायदेशीर ठरते :

काहीजणांची त्वचा ही तेलकट असते. त्वचेला तेलकटपणा आल्यामुळे, मुरूम, पुटकुळ्या तसेच काळवंडणे, यासारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागते. खासकरून उन्हाळ्यामध्ये या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. तर तुम्ही हळद पावडर त्यामध्ये+ चना डाळीची पीठ+ लिंबुचा रस एकत्र करुन चेहऱ्याला हा पॅक पंधरा ते वीस मिनिटे लावल्यास, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघण्यास मदत मिळते. शिवाय डाग असतील, तर तेही जाण्यास मदत मिळते. 

पुटकुळ्या चे डाग जाण्यासाठी मदत मिळते :

काही जणांच्या चेहऱ्यावर फार फुटकुळ्या बघायला मिळतात. किशोर वयामध्ये चेहऱ्यावर पुटकुळ्या येणे हे स्वाभाविकच आहेत. तसेच हार्मोन्स इन बॅलन्स मुळे पुटकुळ्याचे प्रमाण वाढते. तसेच काही जणांना सवय असते, की पुटकुळ्या आल्या की लगेच फोडायच्या, त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडतात. अशा वेळी जर त्यांनी हळदीचा पॅक वापरला, तर त्यांना फायदा होईल. त्यासाठी त्यांनी हळद पावडर+ मध + मसूर डाळीचे पीठ +गुलाब जल यांचे एकत्र मिश्रण करून, चेहऱ्यावर तसेच पुटकुळ्या ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटे लावून ठेवावेत. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. असे हप्त्यातून दोन- तीन वेळेस केल्यास, चेहऱ्यावरील पुटकुळ्या चे डाग नाहीसे होतात. 

रंग उजळण्यास मदत करते :

वाढत्या प्रदूषणामुळे चेहरा हा काळवंडतो. त्यावेळी तुम्ही तुमच्या चेहर्यासाठी हळदीचा वापर करू शकतात. हळदीत अँटीसबॅक्टरियल गुणधर्म असते. तसेच ती रंग उजळण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्हाला नींबू+ त्यात हळद पावडर + मध यांचे मिश्रण करून, चेहर्‍यावर त्याने पंधरा मिनिटे मसाज करावा, व चेहरा तसेच दहा मिनिटे राहू द्यावा. नंतर थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. असे तुम्ही आपल्यातून तीन ते चार वेळेस केल्यास, तुमचा रंग उजळण्यास मदत मिळते. 

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी फायदेशीर ठरतात :

हळदी अँटीसबॅक्टरियल, फंगल इन्फेक्शन वर मात करण्यास गुणकारी आहेत. चेहऱ्यावर अनावश्यक केस असतील, तर तुम्ही दही+ हळद+डाळीचे पीठ त्यामध्ये+ गिलीसरीन यांचे मिश्रण एकजीव करून, हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिट लावून, नंतर सुकल्यावर, त्याला हळुवार मसाज करावा. तुमच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस निघण्यास मदत मिळते. शिवाय रंग उजळतो, त्वचा मुलायम होते. 

वाचा  कोथिंबीरीचे फायदे

चेहरा नैसर्गिक मुलायम व चमकदार होतो :

जर तुम्ही नियमित सकाळी अंघोळीच्या अगोदर, अर्धा तास अगोदर कच्चा दुधामध्ये+ हळद +लिंबूचा रस घालून, त्या दुधाने चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे मसाज केला, तर चेहऱ्यावरील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. शिवाय नैसर्गिक मुलायमपणा येतो. तसेच चेहरा चमकदार होतो, आणि घरगुती नॅचरली क्लिन्जर तुम्ही करू शकतात, आणि चेहऱ्यावर त्याचा ग्लो येतो. 

चेहऱ्यावर जखम असल्यास फायदेशीर ठरते :

जर तुम्हाला चेहऱ्यावर जखम असेल, तर अशावेळी तुम्ही हळदीचा वापर करावा. कारण हळदीमध्ये अँटीसबॅक्टरियल गुणधर्म असतात. तसेच फंगल इन्फेक्शन वर मात करण्याची क्षमता असते. अशावेळी तुम्ही खोबरेल तेल आणि हळद एकत्र करून, तुम्हाला ज्या ठिकाणी जखम आहे, त्या ठिकाणी हा लेप लावावा. तसे केल्याने तुमची जखम लवकर भरून निघण्यास मदत मिळते. शिवाय त्याचे डाग पडत नाही. 

सुरकुत्यांचे प्रमाण लवकर येत नाही :

जर तुम्ही हळदीचा पॅक नियमित चेहऱ्यासाठी केला, तर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण लवकर येत नाही. त्यासाठी तूम्हाला ओली हळद वाटून, त्यामध्ये चंदन पावडर, गुलाब जल मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे, असे केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण येत नाही. 

वांग चे डाग असतील, तर फायदेशीर ठरते :

वाढत्या वयामध्ये खूप जणांना चेहऱ्यावर वांग चे डाग दिसतात. तसेच शरीरातील हार्मोन्स इन बॅलन्स झाल्यामुळे ही चेहऱ्यावर वांगाचे डाग येतात. अशा वेळी जर तुम्ही हळदीचा दूध नियमित पिले, तर ते जाण्यास मदत मिळते. कारण हळदीचे दूध, नियमित पिल्याने तुमचे रक्त शुद्ध होते. शिवाय शरीरातील प्रॉब्लेम कमी होतात. तसेच तुम्ही हळद आणि दूध एकत्र करून वांग्याच्या डागावर नियमित लावल्यास, ते कमी होण्यास मदत मिळते. 

कोरडी त्वचेसाठी फायदेशीर ठरते :

हिवाळ्यामध्ये खूप जणांची त्वचाही कोरडी पडते. अक्षरशः पांढरे रॅशेश उमटतात. अशावेळी जर तुम्ही दुधाची साय आणि हळद पावडर यांचे मिश्रण एकजीव करून, चेहर्‍यावर नियमित लावले, तर तुमची त्वचा मुलायम व चमकदार होण्यास मदत मिळते. 

वाचा  पोटावर खाज येणे यावर घरगुती उपाय काय आहे

चला, तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर हळद लावण्याचे, तुम्हाला कोणकोणते फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेली माहिती, तुम्हाला आवडली असेल, तर आम्हाला नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here