डोळ्यासमोर अंधारी येणे

0
4585

नमस्कार, मित्रांनो जर आपले शारीरिक आरोग्य उत्तम व चांगले राहिले, तर आपल्याला अनेक आजारापासून दूर राहता येत. चला तर आज आपण जाणून घेऊया डोळ्यासमोर अंधारी येणे यावर काही घरगुती उपाय . जर आपल्या शरीराची आपण योग्य निगा राखली, इतर कोणतेही संकट आल्यावर आपण तत्पर राहतो. त्याचे इन्फेक्शन आपल्याला जास्त होत नाही, आणि जर तुम्ही मानसिक दृष्ट्या कमजोर तसेच शारीरिक दृष्ट्या अशक्त असाल, तर तुम्हाला अनेक संकटांना सामना द्यावा लागतो. त्याच्यामध्ये एक की डोळ्यासमोर अंधारी येणे, डोळ्यासमोर अंधारी आली की, कोणाला चक्कर येतात. काही खावेसे वाटत नाही. असें गळून पडल्यासारखे वाटते, मग डोळ्यासमोर अंधारी नेमक्या कोणत्या कारणांमुळे येते? हे अनेक जणांना माहिती नसते. त्यामुळे आपण एकच कारण म्हणतो, की आपण अशक्त आहोत, ते एक कारण आहेच, पण त्यामागील अजून काही कारणे आहेत, जी कोणाला माहिती नसतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत, की डोळ्यासमोर अंधारी येण्याची नेमकी कारणे कोणकोणते आहेत? आणि त्यावर काही घरगुती उपाय आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात. 

डोळ्यासमोर अंधार येण्याची कारणे?

डोळ्यासमोर अंधार येण्याची अनेक कारणे आहेत ते आज आपण जाणून घेऊया चला तर मग, 

 

  • जर तुम्ही अशक्त असाल, तर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. 
  • तसेच तुम्ही काही दीर्घकाळापासून आजारी असाल, तर तुम्ही कमजोर होऊन डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे सारखे समस्या होतात. 
  • जर तुमच्या  मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला, तर डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते, चक्कर येऊ शकतात. 
  • तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचे त्रास आहे, अशा लोकांच्या ही डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. 
  • तसेच तुम्हाला काही टेन्शन असेल, मानसिक ताण – तणाव असेल, अशावेळी डोळ्यासमोर अंधारी व चक्कर येऊ शकतात. 
  • तसेच ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, अशा लोकांना डोळ्यासमोर अंधारी येते, आणि चक्कर येतात. 
  • जर तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण म्हणजेच साखरेची पातळी जर कमी झाली, तर डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. 
  • जर तुमच्या हृदयाशी संबंधित रक्तवाहिन्यांमध्ये, काही बिघाड होतो, अशा वेळी तुम्हाला डोळ्याचे समोर अंधारी येते, आणि ते हृदयविकाराचे सुद्धा लक्षणे असू शकतात. 
  • तसेच ज्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता येते, अशा लोकांना डीहायड्रेशन होऊन, डोळ्यासमोर अंधारी व चक्कर येतात. 
  • तसेच ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो, त्यावेळी तीव्र डोके दुखून डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. 
  • जर तुम्ही अति उंच ठिकाणी गेले आहेत, त्या वेळी खाली बघून डोळ्यासमोर अंधारी येते. 
  • जर महिला प्रेग्नेंट असतील, तर डोळ्यासमोर अंधारी येते. 
  • जर तुमच्या कानात काही इन्फेक्शन असेल, किंवा काही शस्त्रक्रियेची वेळ आली असेल, अशा वेळी डोळ्यासमोर अंधारी व चक्कर येतात. 
वाचा  डोळा फडफडणे या समस्या ची लक्षणे आणि उपाय

डोळ्यासमोर अंधारी येण्याची लक्षणे?

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही डोळ्यासमोर अंधारी का येते? त्याची कारणे सांगितली आहेत. आता आपण त्याची काही लक्षणे जाणून घेऊयात! 

  • ज्यावेळी डोळ्यासमोर अंधारी येते, तेव्हा पूर्ण बॉडी व्हायब्रेट होते.
  • समोरचा तुम्हाला अंधुक – अंधुक दिसल्यासारखे वाटते. 
  • थरथरल्या सारखे वाटते. 
  • हाता पायाला मुंग्या येत आहे, असे वाटते. 
  • असे वाटते की, आपण आता खाली पडून जाऊ, 
  • डोकं गरगर व्हायला सुरुवात होते, 
  • पूर्ण शरीराला बधीरपणा आलेला वाटतो. 
  • तसेच थंडा घाम यायला लागतो. 
  • तर कधी कधी कोणाला डोळ्यासमोर अंधारी येते, तेव्हा मळमळल्यासारखे वाटते. 

डोळ्यासमोर अंधारी येत असेल, अशा वेळी तुम्ही कोणते घरगुती उपाय करावेत?

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला डोळ्यासमोर अंधारी येण्याची कारणे, व त्यामागील लक्षणे सांगितलेले आहेत. आता आपण त्यावर कोणते घरगुती उपाय करू शकतो, ते जाणून घेऊयात! 

मीठ साखरेचे पाणी प्या

ज्यावेळी तुम्हाला वाटते आज थकल्यासारखे वाटते, गरगरल्यासारखे वाटते, अशा वेळी तुम्ही तुमच्या शरीराला एनर्जी यावी, म्हणून मीठ आणि साखरेचे पाणी मिक्स करून प्यावे, त्याने तुमच्या शरीरात एनर्जी आल्यासारखे वाटेल, व तुम्हाला डोळ्यासमोर अंधारी येणाऱ्या सारख्या समस्यान पासून तुम्ही वाचू शकतात. 

जास्तीत जास्त पाणी प्यावे

जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आली, तर तुम्हाला अशक्तपणा येणे, थकवा येणे, कमजोरी वाटणे, तसेच डोळ्या समोर अंधारी येणे, यासारख्या समस्या होऊ शकतात. कारण जर शरीरात पाण्याची कमतरता आली, तर तुम्हाला डीहायड्रेशन यांसारख्या समस्या होतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या शरीरासाठी किमान तीन ते चार लिटर पाणी प्यायला हवेत. त्याने तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी भरून निघेल, व तुम्हाला यासारख्या समस्येवर आराम मिळेल. 

रसदार फळांचा वापर करा

तुम्हाला अशक्तपणा सारखे व चक्कर येण्यासारखे वाटत असेल, अशावेळी तुम्ही रसदार फळांचा वापर करावा. जसे की शहाळ्याचे पाणी, एप्पलचा ज्युस, मोसंबी, संत्री चा ज्युस, टरबूज ज्यूस, यासारख्या फळांचा ज्यूस घेऊ शकतात. त्याने तुमच्या शरीरात एनर्जी राहते, शिवाय तुमच्या शरीराला अनेक विटामिन मिळतात. 

वाचा  मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी

विटामिन्स युक्त आहार घ्या

खरे, डोळ्यासमोर अंधारी येणे, म्हणजे तुमच्या शरीरात योग्य आहाराची कमी होय.

 जर तुम्ही तुमच्या शरीरात आहार घेतला, तर तुमच्या शरीरात विटामिन्स, मॅग्नेशियम, लोह, ओमेगा थ्री, ऑंटी एक्सीडेंट, विटामिन डी,फॅटी ऍसिड, फॉस्फरस, लोह, आर्यन हे घटक द्रव्य तुम्हाला मिळतील. 

जर तुम्ही तुमच्या शरीरासाठी योग्य आहार घेतला, म्हणजे की हिरव्या पालेभाज्या, प्रथिने युक्त पदार्थ, मोड आलेली पदार्थ, कारली, गाजर, काकडी, तसेच दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, असे पदार्थ तुमच्या आहारात असले, तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या एकदम तंदुरुस्त राहाल, व तुम्हाला चक्कर येणे, यासारखे भोवळ येणे,  डोळ्यासमोर अंधार येण्यासारखे समस्या, तुमच्या पासून कितीतरी हात लांब राहतील. करुन बघा, एकदम साधे आणि सोपे उपाय असतात. 

या पदार्थांपासून लांब राहा

तसेच तुम्ही तिखट मसालेदार, चायनीज, तुपकट, बेकरीचे प्रोडक्स, अति गोड पदार्थ, चहा, कॉफी, तसेच धूम्रपान करणे , तंबाखू सेवन करणे, यासारख्या पदार्थापासून लांब राहावेत. त्याने तुमच्या शरीरात अजून इन्फेक्शन होते, व जळजळ होते, व तुमच्या शरीरासाठी त्याचे फायदे नसून, तोटे जास्त आहेत. त्यासाठी तुम्ही योग्य आहार घ्यायला पाहिजे. 

व्यायाम करा

व्यायाम केल्याने तुमचे शरीर एकदम फिट आणि तंदुरुस्त राहते. जर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या शरीरासाठी पंधरा ते वीस मिनिटे व्यायाम केलाच, तरीही तुम्हाला शारीरिक कमजोरी हि येत नाहीत. शिवाय व्यायाम केल्याने, तुमच्या शरीरावरील व मनातील मानसिक तणाव हा बाहेर निघून जाण्यास मदत मिळते. तसेच त्याच्यामुळे तुम्हाला  चक्कर येणे यासारख्या समस्या तुमच्या पासून फार लांब राहतात. रोजच्या रोज जर तुम्ही फक्त सूर्यनमस्कार ही केला, तरी तुम्हाला यासारख्या समस्या वर आराम मिळेल. 

पुरेशी झोप घ्या

आपल्या शरीराला आरामाची गरज असते, जर तुम्ही तुमच्या शरीराला आराम दिला नाही, तर तुमचे शरीर हे बिघडण्यास सुरुवात होते. त्याला शारीरिक कमजोरी व्हायला सुरुवात होते. जर तुम्ही दिवसातून एक तास दुपारच्या वेळी शरीराला आराम द्यायचा आहे, तसेच रात्रीची सात ते आठ तास तुम्ही झोप घ्यावी. त्याने तुमचे शरीर एकदम उत्तम आणि सुदृढ राहते. जर तुमच्या शरीराला झोप नसेल, तर तुम्हाला चक्कर येणे, आजारी सारखे वाटणे, थकल्यासारखे वाटणे, असे शारीरिक व मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते. अगदी साधे सोपे नियम असतात. तेवढे तरी आपण पाळायला हवेत. 

वाचा  लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत?

सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरा

तुम्ही जर सकाळच्या कोवळ्या उन्हात, हिरव्या गवतावर चप्पल काढून चालायला जावे, त्यामुळे तुमच्या शरीराला विटामिन डी ची पूर्तता होते. कारण कोवळ्या उन्हामध्ये विटामिन डी असते, आणि ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पण तुम्ही सकाळच्या कोवळ्या म्हणजे तरी साडे आठ ते नऊ च्या कोवळ्या उन्हात फिरायला हवेत, त्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे जास्त होतात. आणि तुम्ही जर जास्त कडक उन्हात फिरले, ते उलट तुम्हाला चक्कर आणि यासारख्या समस्या जास्त प्रमाणात  मिळतात. 

डोळ्यासमोर अंधारी येत असल्यास कोणते नियम पाळावेत?

जर तुम्हाला डोळ्यासमोर अंधारी येण्याची समस्या असतील, तर अशा वेळी तुम्ही रोजच्या रोज नियम पाळायला हवेत. मग ते कोणते चला तर मग जाणून घेऊयात! 

 

  • कडक उन्हात जाऊ नये, आणि कामानिमित्त जावे लागल्यास डोक्‍याला, रुमाल व डोळ्याला गॉगल चष्मा लावावा. 
  • बाहेर जाताना नेहमी एनर्जी ड्रिंक, glucon-d पावडर, किंवा लिंबू पाणी प्यायला हवे. 
  • ज्यावेळी तुम्हाला वाटते, की डोळ्यासमोर अंधारी येते, अशा वेळी तुम्हीच साखर तोंडात घालावी व त्यावर पाणी प्यावे. 
  • सतत पाणी पीत राहावे. 
  • शांत झोपावे पुरेशी झोप घ्यावी
  • अति उंच ठिकाणी जाऊ नये. 
  • नियमित व्यायाम करावा, योगासने करावी. 
  • योग्य आहार घ्यावा. 

कोणत्या वेळी डॉक्टरांना केव्हा दाखवावे?

ज्यावेळी तुम्हाला डोळ्यासमोर अंधारी येते, त्यावेळी जर तुम्हाला जास्त गरगरल्यासारखे वाटत असेल, तसेच कोणला काहीही बोलायची क्षमता नसेल, तसेच तुम्हाला एक वस्तूचे दोन वस्तू दिसतील, व बेभान झाल्या सारखे वाटत असेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवावे. तसेच मळमळ होऊन चक्कर येत असताना, उलट्या होत असतील. तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे. कारण ते हार्ट अटॅक ची लक्षणे सुद्धा असू शकतात. 

चला, तर आज आम्ही तुम्हाला डोळ्यासमोर अंधारी येण्याची कारणे, लक्षणे व त्यावर काही उपाय सांगितलेले आहेत. तसेच त्यावर कोणती खबरदारी घ्यावी, हेही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही तुम्हाला डॉक्टरांना कोणत्या वेळी दाखवावे तेही, सांगितले आहे. आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये  सांगावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here