खोबरेल तेल लावण्याचे फायदे

0
829
खोबरेल तेल लावण्याचे फायदे
खोबरेल तेल लावण्याचे फायदे

खोबरेल तेल या आपल्या सर्वांच्याच घरी सहज उपलब्ध असते. बरेच लोक ते केसांना देखील लावतात. तर काही लोकं तेल लावत नाही कारण आजकालची तरुण पिढी असा विचार करते की तेल लावल्याने त्यांची खूप तेलकट दिसतील. त्यांच्यामुळे तरुण पिढी आज-काल खोबऱ्याचे तेल लावत नाही आहे. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का आपले पूर्वज खोबऱ्याचं तेल डोक्याला रोज आंघोळ झाल्यानंतर का लावत असे. वयस्कर माणसे आपल्याला देखील सांगतात की आंघोळ झाल्यानंतर खोबऱ्याचे तेल केसांना लावा.

तसेच खोबऱ्याचं तेल नक्की आपल्या केसांवर लावल्याने केसांना लावून मसाज केल्याने आपल्याला कोण कोणत्या प्रकारचे फायदे होतात आणि खोबऱ्याचे तेल हे आपण नियमितपणे का लावले पाहिजे. याची देखील उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आज आपला विषय आहे की खोबऱ्याचे तेल लावल्याने आपल्या शरीरावर कोण कोणते फायदे होतात. कारण खोबऱ्याचे तेल हे फक्त आपण केसांना लावू शकतो असे नाही खोबर्याच्या तेलाचा वापर आपण आपल्या शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो. हेदेखील आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला इतर ठिकाणी म्हणजेच आपल्या शरीराच्या इतर अवयवांना खोबर्याच्या तेलाचा फायदा कोणकोणत्या प्रकारे होतो चला तर मग जाणून घेऊया.

आपण घरी खोबऱ्याचे तेल बनवू शकतो का ?

आपण खोबर्याच्या तेला बद्दल थोडीशी माहिती तर बघितली आता आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया की आपण घरच्या घरी खोबऱ्याचे तेल बनवू शकतो का? चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

बर्‍याच गृहिणींचा हा प्रश्न आहे की आपण खोबऱ्याचे तेल घरच्या घरी बनवू शकतो का? कारण की जर आपण नारळाचे तेल घरच्या घरी बनवले तर ते शुद्ध नारळाचे तेल आपल्याला वापरता येईल. तर होय आपण घरच्या घरी खोबऱ्याचे तेल हे बनवू शकतो. ते कसे? ते आपण बघू या सुरुवातीस आपण खोबर्याच्या दोन वाट्या घ्यावा त्यानंतर त्या वाट यांचे बारीक बारीक तुकडे करावे. ते तुकडे एका भांड्यामध्ये काढून घ्यावे. त्यानंतर त्याच्या मध्ये थोडे पाणी टाकून ते खोबरे दहा मिनिटे बोलून राहतील अशा अवस्थेमध्ये ठेवावे. 

वाचा  डोळ्यांसाठी उपयुक्त व्यायाम कोणते ?

त्यानंतर ते खोबरे मिक्सरमध्ये टाकावे आणि बारीक वाटून घ्यावे. जेणेकरून आपण कोकोनट मिल्क म्हणजेच खोबऱ्याचे दूध काढू शकू. बऱ्याच लोकांना कोकोनट मिल्क म्हणजे काही माहिती नसेल. तर मिक्सरमध्ये आपण खूपच चांगला वाटून झाल्यानंतर ते एका गाळणी मध्ये काढून घ्यावे. त्यानंतर गाळणीवर पाणी टाकून ते खोबरे गाळणी वर फिरवावे. जेणेकरून गाळणी च्या खाली कोकणात मिल्क जमा होईल.

तर खोबरे वाटून झाल्यानंतर तुम्हाला दुधासारखा पदार्थ बघायला मिळेल त्यालाच आपण कोकोनट मिल्क म्हणजेच खोबऱ्याचा दूध म्हणतो. त्यानंतर ते आपण करतो फ्रिजमध्ये ठेवून द्यावे. नंतर ते फ्रीजमधून भांडे काढावे आणि त्यानंतर त्या कोकोनट मिल्क वर वरच्या भागास जी पातळ साय म्हणजेच मलई आलेली आहे ती आपण काढून घ्यावी. त्यानंतर एका कढईमध्ये ती मलाई टाकावी आणि उरलेले कोकोनट मिल्क तुम्ही कशासाठी देखील वापरू शकता. म्हणजे सोलकडी किंवा इतर पदार्थांमध्ये वापरू शकता. 

तर आपण मलाई एका कढईमध्ये काढून घेतल्या नंतर मंद आचेवर ती साय ठेवावी. जेणेकरून खोबरा आणि तेल वेगळे होण्यास सुरुवात होईल. साधारण पंचवीस ते तीस मिनिटानंतर तुम्हाला शुद्ध खोबऱ्याचे तेल दिसेल. त्या नंतर ते तेल गाळून घ्यावे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. तर अशा प्रकारचे मे घरगुती पद्धतीने शुद्ध खोबऱ्याचे तेल बनवू शकता.

खोबऱ्याचे तेलाचे फायदे :-

आपण खोबऱ्याचं तेला बद्दल थोडी माहिती बघितली. कसे शुद्ध खोबऱ्याचे तेल घरगुती पद्धतीने कसे बनवावे हे देखील आपण जाणून घेतले. आता आपण बघुया की खोबर्याच्या तेलाचे आपल्या शरीरावर कोणकोणते फायदे होतात.

केसांची वाढ :

 आजकाल बरेच लोक केसांना तेल लावत नाही त्यामुळे तुमचे केस हे दिवसानुदिवस म्हणजेच कडक होतात. तर तुम्ही केसांना नियमितपणे खोबऱ्याचं तेल लावले तर तुमच्या केसांची वाढ उत्तम होण्यास मदत होईल. तसेच केस देखील चमकदार बनतील. खोबऱ्याचा तेलामध्ये इतकी शक्ती असते की ते आपल्या केसांच्या मुळापर्यंत जाऊन त्याला पोषण देते. ज्यामुळे तुम्हाला जर केस गळती किंवा केस विरळ होणे अशा समस्या असतील तर त्या समस्यादेखील हळूहळू कमी होण्यास मदत होईल. तुम्ही जर खोबर्याच्या तेलाचा वापर सुरू केला तर तुम्हाला देखील जाणून येईल की तुमचे केस गळती ही कमी झालेली आहे. तुम्ही आंघोळ झाल्यानंतर दहा मिनिटांनी लावू शकता.

वाचा  नाकातून पाणी येणे यावर काही उपाय

त्वचा कोरडी पडत नाही :

हिवाळ्यामध्ये जर तुम्ही खोबर्‍याचे तेल हे तुमच्या त्वचेला लावले तर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर ती पडणार नाही. तसेच त्वचेमध्ये एक मॉइस्चरायझर चे काम देखील खोबऱ्याचे तेल करते. तसेच जर तुमच्यावर देखील हिवाळ्यामध्ये ओठ फुटत असतील तर ओठांना देखील खोबऱ्याचं तेल तुम्ही लावू शकता.

मेकप रिमूवर :

स्त्रियांसाठी मेकअप रिमूव्ह करण्यासाठी देखील खोबरेल तेल याचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही खोबऱ्याचा तेलाच्या मदतीने तुमच्या पापण्यांवर चा किंवा चेहऱ्यावरचा मेकअप काढू शकता. त्यासाठी तुम्ही खोबऱ्याचे एक ते दोन थेंब कापसामध्ये घेऊ शकता किंवा टिशू पेपर मध्ये घेऊ शकता. पण सर्व प्रकारच्या मेकअप साठी खोबऱ्याचे तेल वापरू नये याची काळजी घ्यावी.

केसातील केमिकल्स दूर होते :

बऱ्याच स्त्रिया केसांना मेहंदी लावत केमिकल युक्त कंडिशनर लावतो त्याच्यामुळे आपले केसांमध्ये केमिकल जमा होते. जर तुम्ही खोबरेल तेल ने केसांची मसाज केली तर ते केमिकल्स दूर होण्यास मदत होईल. तसेच मसाज केल्यामुळे तुमच्या डोक्या मधील रक्ताभिसरण देखील चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होईल आणि याचाच फायदा तुमच्या केसांवर देखील दिसून येणे.

जखमेवर देखील लावू शकता :

जर तुम्हाला जखम झाली असेल तर तुम्ही त्यावर जे खोबरेल तेल लावले तर ती जखम लवकरात लवकर सुकण्यास मदत होते. ती जखम लवकर सुकली तर ती जखम लवकर बरी होण्यास देखील मदत होते. तसेच त्या जखमेच्या चट्टा त्या ठिकाणी नाहीसा करायचा असेल तरीदेखील तुम्ही तिकडे खोबर्याच्या तेलाचा वापर करू शकता.

सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स रामबाण उपाय :

जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असेल तर तुम्ही खोबर्याच्या तेलाचा वापर करून सुरकुत्या कमी करू शकता. त्याचबरोबर लोकांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल पडतात ते घालण्यासाठी तुम्ही तिकडे खोबरेल तेलाने मसाज करू शकता. जेणेकरून तुमचे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल. याच प्रकारे तुम्हाला जर कमी असेल तर पुरेशी विश्रांती देखील घेणे गरजेचे आहे.

वाचा  डोळ्यावर पडदा येणे या समस्या ची कारणे आणि घरगुती उपाय :-

तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले खोबरेल तेल चे फायदे याच बरोबर आपण शुद्ध खोबऱ्याचे तेल घरच्या घरी व घरगुती पद्धतीने कसे बनवावे. हे देखील बघितले तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here