सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे फायदे:-

0
894
सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे फायदे
सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदा होत असतो. निसर्गातील अनेक झाडे हे आयुर्वेदिक असतात. देवाने निसर्गाची इतकी सुंदर रचना केलेली आहे की निसर्गातील प्रत्येक घटकाचा आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात फायदा होत असतो. या निसर्गातील कुठलीही वस्तू ही व्यर्थ जात नाही. प्रत्येक वस्तूचे प्रत्येक घटकाचे एक ना अनेक फायदे होत असतात. त्यातीलच एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणजेच लिंबाचे झाड. सकाळी उठल्यावर लिंबू पाणी घेण्याचे फार फायदे आहे.

हो मित्रांनो,लिंबू याचे आपल्या शरीरासाठी एक ना अनेक प्रकारचे फायदे होत असतात. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लिंबूचे फारच महत्त्व आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीने आपल्या लिंबाचे खूप महत्त्वपूर्ण फायदे होत असतात. लिंबू हा तर सर्वांनाच ठाऊक असतो. अगदी सहज रित्या कुठे उपलब्ध होईल असा हा लिंबू. लिंबूचा आपल्या शरीराच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी देखील लिंबाचा उपयोग होत असतो.

अनेक जणांना केसान संदर्भात देखील समस्या येत असतात. जसे की केस अकाली पांढरे होणे, केस गळती, केस निस्तेज होणे, केसांना फाटे फुटणे, केसात कोंडा होणे अशा एक ना अनेक समस्या कशा संदर्भात येत असतात. तर या सर्वांवर ती रामबाण उपाय म्हणजेच लिंबू होय. “इवलुसा लिंबू परंतु फायदे बहुगुणी” मित्रांनो, नक्कीच असे म्हणण्यास हरकत नाही. कारण, लिंबू हा आकाराने छोटा असला परंतु, त्याचे फायदे बहुगुणकारी असतात. तसेच उन्हाळा म्हटला की लिंबू पाणी हे सर्वप्रथम लागते आणि उन्हाळ्यात लिंबाचे सरबत हे तर सगळ्यांनाच आठवते.

लिंबामुळे आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असते. लिंबा मध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त प्रमाणात असते जे आपल्या शरीरासाठी फार महत्वपूर्ण ठरत असते. खरंतर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति ही देखील लिंबूचे सेवनाने वाढत असते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. लिंबाचे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेवर देखील अनेक प्रकारचे फायदे होत असतात. म्हणजेच पिंपल्सचे डाग चेहर्‍यावर राहिल्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडत असतात. तर ते काळे डाग काढण्यासाठी देखील आपण लिंबाच्या रसाचा वापर करू शकतो.

वाचा  फणस खाल्यावर काय खाऊ नये ? Fanas khalyanantar ky khau naye

आणि केसांच्या त्वचेवर जो अतिरिक्त कोणता जमा होत असतो तो काढून टाकण्यासाठी देखील आपण लिंबाच्या रसाचा वापर करू शकतो. बरेच जण जेवणामध्ये लिंबाचे सेवन हमखास करत असतात. कारण यामुळे पचनक्रिया देखील वाटत असते. आणि काही जण जेवण झाल्यावर लिंबाचे पाणी देखील पीत असतात. सांगायला गेले तर लिंबापासून आहेत ना अनेक आपल्याला फायदे होत असतात. तर मित्रांनो,आज आपण सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे काय काय फायदे आपल्याला होऊ शकतात?  या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात !

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे कोणते फायदे होऊ शकतात ?

मित्रांनो लिंबूचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक ठरत असते. लिंबू मध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. लिंबू हा खाण्यास आंबट तुरट अशा प्रकारची चव लागत असते. लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. तर मित्रांनो सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे कोणते फायदे आपल्याला होऊ शकतात याबद्दल आता आपण जाणून घेऊयात! 

त्वचा तजेलदार  व चमकदार होऊ लागते :

मित्रांनो, जर तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्या पाण्याचे सेवन करत असाल तर तुमची त्वचा ही चमकदार दिसू लागते. असे तुम्ही नियमित केल्यामुळे तुमची त्वचा हे ताजीतवानी देखील दिसू लागते. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर ते देखील जाण्यास मदत होईल. अनेकांना चेहऱ्यावर मुरूम येण्याची समस्या असते तर ही समस्या देखील लिंबू पाणी कोमट पाण्यात आल्याने जाऊ शकेल. रोज सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरातील स्फूर्ती देखील वाढत असते. तसेच, आपली शरीरातील ऊर्जा वाढल्यामुळे पूर्ण दिवस हा फ्रेश वाटू लागतो. सकाळी उठल्यावर लिंबाचे पाणी पिल्यामुळे पूर्ण दिवसभर काम करण्यासाठी उत्साह आवश्यक असतो तो टिकून राहतो आणि थकवा देखील येत नाही.

वाचा  बेंबीत तूप टाकण्याचे फायदे.

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते :

मित्रांनो रोज सकाळी लवकर उठून सर्वप्रथम जर तुम्ही कोमट पाण्यातून अर्धा अथवा एक लिंबू पिळून त्या पाण्याचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी आहे ती चरबी जळण्यास मदत होत असते. म्हणजेच अनेक जण अपचनाचा त्रास होत असतो. अपचनाचा त्रास होऊ नये यासाठी जर तुम्ही लिंबूपाण्याचे सेवन करत असाल तर यामुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते व पचनक्रिया सुलभ झाल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चरबीत रूपांतर न होता ते व्यवस्थित पचते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी असेल तर ती देखील जळून जाण्यास मदत होत असते. त्यामुळे शरीराचे जास्त प्रमाणात वजन वाढलेले असेल ते देखील व्यवस्थित नियंत्रित होते. जर तुम्ही रोज लिंबूपाण्याचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीराचा आकार हा व्यवस्थित होत असतो. एक प्रकारे शरीरातील अतिरिक्त चरबी जळत असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते :

मित्रांनो, सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातून लिंबू पिळून त्या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होत असते. अनेक जण हे सारखे सारखे आजारी पडत असतात. सतत आजारी पडण्या मागील एक कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचे असेल तर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर नियमितपणे कोमट पाण्यातून लिंबूचे सेवन करायला हवे. लिंबू मध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते तसेच यामध्ये अँटीऑक्सीडेंट घटक देखील असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असते. आणि आपण विविध प्रकारच्या आजारांपासून देखील दूर राहू शकतो.

केसांचे आरोग्य चांगले राहते :

सकाळी उठल्यावर नियमितपणे कोमट पाण्यातून लिंबाचे सेवन केल्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य देखील व्यवस्थित राहण्यास मदत होते. केसान विषयी आपल्या अनेक तक्रारी येत असतात. जसेकी केस गळती होणे केसात कोंडा होणे अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर नियमितपणे कोमट पाण्यातून लिंबू चे सेवन करत असाल तर या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकतात. तसेच केसात कोंडा झाल्यास तुम्ही लिंबाचा रस केसांतील त्वचेला देखील लावू शकतात. यामुळे केसातील कोंडा जाण्यास मदत होते. तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी तुम्ही नियमितपणे लिंबूपाण्याचे सेवन करायला हवे. तसेच तुमचे केस हे मऊ व मुलायम होण्यासाठी देखील याचा उपयोग होत असतो.

वाचा  कारल्याचा रस पिल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

शरीराचे डिहायड्रेशन होण्यापासून बचाव होतो :

मित्रांनो, रोज सकाळी उठून कोमट पाण्यातून लिंबाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहते. उन्हाळा लागल्यावर बऱ्याच जणांना शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास देत असतो. जर तर तुम्ही सकाळी उठल्यावर लिंबाच्या पाण्याचे सेवन करत असाल तर, ह्या त्रासापासून तुम्ही दूर राहू शकतात. म्हणजेच शरीराचे पाण्याचे पातळी व्यवस्थित नियंत्रित राहण्यासाठी लिंबाच्या पाण्याचे सेवन केल्याने उपयोग होऊ शकतो. आणि त्यात जर अजून तुम्ही म्हणजेच लिंबाच्या कोमट पाण्यामध्ये अर्धा किंवा एक चमचा मत मिक्स करून ते पाणी पिल्याने त्याचे अजूनच जास्त चे फायदे शरीराला होत असतात. जर तुम्हाला तुमचे शरीर हे डीहायड्रेशन होण्यापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही नियमितपणे लिंबाच्या पाण्याचे सेवन करणे गरजेचे ठरते.

मित्रांनो, सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातून लिंबाचे सेवन केल्यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे तुमच्या शरीराला होऊ शकतात. तुमची त्वचा ही ताजीतवानी चमकदार होण्यास देखील मदत होत असते. तसेच शरीरात जर पाण्याचे प्रमाण व्यवस्थित असेल तर चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या देखील पडत नाहीत. शिवाय केसांच्या समस्येपासून देखील आपण दूर राहू शकतो. सकाळी उठल्या लिंबाचे पाणी सेवन केल्यामुळे भरपूर फायदे आपण आपल्या शरीरासाठी करून घेऊ शकतो. जर तुम्ही लिंबाच्या पाण्याचे सेवन करत नसाल तर वरील प्रमाणे माहिती जाणून आतापासून नक्कीच तुम्ही सकाळी उठल्यावर लिंबाच्या पाण्याचे सेवन करून बघू शकतात.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here