मासिक पाळी येण्यासाठी उपाय
नमस्कार, मैत्रीणींनो, मासिक पाळी म्हणजे स्त्री च्या आयुष्यातील सर्वोत्तम घटक होय. स्त्रियांचे आयुष्य हे मासिक पाळी वर अवलंबून असते. जर मासिक पाळी वेळेवर येते, तरच तिचे शरीर हे सुदृढ व निरोगी असते. असे समजते, आणि जर मासिक पाळीचे कालचक्र जर बिघडले, तर स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक व मानसिक तक्रारी सुरु झाल्या अशी समजूत असते. मासिक पाळीचे चक्र हे दर महिन्याला 21 ते 28 दिवसाचे असते. काही स्त्रियांची मासिक पाळी ही अगदी वेळेवर येते, तर काहींची वेळ चुकते. म्हणजेच त्यांचे पाळी चक्र हे 28 ते 34 दिवसाचे असू शकते, किंवा 30 ते 40 दिवसापर्यंत ही होऊ शकते, हे त्याच्या त्याच्या हार्मोन्सवर अवलंबून असते, जर स्त्रियांनी त्यांच्या मासिक पाळीच्या कालावधीच्या, अगोदर शारीरिक काम जास्त केले असेल, तर हार्मोन्सइन बॅलन्स होतात, व मासिक पाळीची तारीख चुकते, त्यात एवढे घाबरण्यासारखे नसते, कधीकधी कालचक्र हे बिघडू शकते. तसेच काही स्त्रियांच्या गर्भाशयातील गाठी वगैरे झाल्यास, त्यांचे मासिक पाळीचे चक्र चुकू शकते, म्हणजेच त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम असेही म्हणता येते, मग त्यामुळे अनियमित मासिक पाळी होऊ शकते. तर काही स्त्रिया गर्भवती राहिल्यास, त्यांची मासिक पाळी चुकू शकते. अशी भरपूर काही कारण असतात, की त्यामुळे मासिक पाळी चुकू शकते. आज आपण बघणार आहोत, की तुमची चुकलेली व अनियमित मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी, तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकतात? चला तर मग जाणून घेऊयात मासिक पाळी येण्यासाठी उपाय!
मासिक पाळी कितव्या वर्षी येते?
हल्ली बदलत्या वातावरणामुळे, मासिक चक्र हे लहान मुलींच्या बाराव्या-तेराव्या वर्षी सुरू झालेले आहे, पूर्वी मासिक पाळीची वर्षे हे 14 ते 15 होते. आता 12 ते 13 व्या वर्षी मुलींची मासिक पाळी यायला लागली आहे. तर काही मुलींची अकराव्या वर्षी येते. हे शारीरिक हार्मोन्स बदलामुळे होते. काही मुली लवकर वयात येतात. पण त्यामध्ये घाबरून जाण्यासारखे कारण नाही. हे तुम्ही त्यांना मासिक पाळी आल्यावर त्याबाबतीत सगळी माहिती समजून सांगावी. त्यावेळी तुम्ही त्यांची मैत्रीण व्हावे. ज्यावेळी मुलींना मासिक पाळी सुरू होते, त्यावेळी त्यांची आपोआप चिडचिड होते, कारण त्यांचे खेळायची वय असते, त्यावेळी त्यांना मासिक चक्र चालू होऊन जाते, त्यामुळे त्या बाबतीत त्यांना समजावून शिकवावे. त्यांच्या मनाची स्थिती समजून घ्यावी, कारण हार्मोन बदल हा मासिक पाळी मध्ये होतो, त्या काळात मुलींची चिडचिड होते, ते त्यांना किळसवाणे वाटते. मग 2 ते 3 पाळी दरम्यान त्यांना याबाबतीत सगळी माहिती मिळाल्यावर, मग ते त्यांच्या त्यांच्या मासिक पाळी विषयी माहिती शिकून जातात. सुरुवातीला त्यांची मासिक पाळी ही एक ते दीड महिन्यांनी लेट येऊ शकते. नंतर ती हळू रेगुलर होण्यास मदत मिळते. तसेच जर काही मुलींची पाळी ही आलीच नाही, तसेच 16 ते 17 वर्षा पर्यंत वाट बघावी आणि आलीच नाही, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवून, त्याचे निदान करून घ्यावे.
मासिक पाळी उशिरा येण्यास, काय कारण असू शकतात?
मासिक पाळी उशिरा होऊ शकते, त्याची कारणे आपण आता जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात!
- जर महिलांनी अति काम केले, अति व्यायाम केला, त्यामुळे त्यांचे मासिक चक्र चुकवू शकते.
- तसेच हार्मोन इनबैलेंस मुळे मासिक चक्र चुकू शकतो.
- बदलत्या वातावरणामुळे, ही काही जणांचे मासिक चक्र चुकू शकतो.
- तसेच शारीरिक थकवा, मानसिक ताण आल्यामुळे, मासिक पाळी चुकू शकते.
- जर स्त्रिया शरीराने अशक्त असतील, तसेच शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्यांचे मासिक पाळी उशिरा येते.
- काही महिला या जर बाळाला दूध पाजत असतील, तर मासिक चक्र चुकू शकते.
- तसेच वजन जास्त असल्यामुळे मासिक चक्र चुकू शकते.
मासिक पाळी येण्यासाठी काही घरगुती उपाययोजना!
वरील दिलेल्या माहितीमध्ये, मासिक पाळी उशिरा का येते, त्याची कारणे आम्ही तुम्हाला दिलेली आहेतच, जर तुम्हाला मासिक पाळी वेळेच्या आधी किंवा वेळेवर आणायची असेल, तर त्यासाठी काही घरगुती उपाययोजना!
मासिक पाळी येण्यासाठी पपई खा
पपई मध्ये कॅरोटीन असते, जे तुमची मासिक पाळी अनियमित असेल किंवा थांबलेले असेल, ते आणण्यास मदत करते. तसेच पपई हे उष्ण फळ आहे. मासिक पाळी येण्यासाठी पूर्वीच्या काळापासून पपईचा वापर केला जात आहे. तुम्हाला मासिक पाळी वेळेवर आणायची आहे, तर तुम्हाला सतत पाळी येण्याच्या सात ते आठ दिवस अगोदर पासूनच, पपई खायची आहेत. त्याने पाळी लवकर येण्याचे मदत मिळते.
मासिक पाळी येण्यासाठी हळदीचा वापर करा
थांबलेली मासिक पाळी, तसेच मासिक पाळी उशिरा येत असेल, अशावेळी जर तुम्ही रोज हळद कोमट पाण्यात टाकून ते पाणी सकाळी पिले, तर तुमचे मासिक चक्र हे रेगुलर होते. तसेच तुम्ही दूधात हळद टाकून ही पिऊ शकतात. त्याने थांबलेली मासिक पाळी लवकर येण्याची मदत मिळते.
मासिक पाळी येण्यासाठी गुळाचा चहा प्या
गुळ हा उष्ण असतो, जो मासिक पाळी लवकर येण्यासाठी, प्रभावशाली ठरतोय. जर तुम्ही पाळी येण्याच्या आठ दिवस अगोदर पासूनच, जर गुळाचा चहा पिले, तर पाळी वेळेच्या अगोदर येते. तसेच थांबलेली मासिक धर्म हा रेग्युलर होण्यास मदत मिळते. पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी गुळाचा चहा पिऊ नये, त्याने त्यांना उष्णतेचा त्रास होऊ शकतो.
मासिक पाळी येण्यासाठी कोरफडचा गर खा
कोरफडचा गर खाल्ल्याने मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होते, रोज सकाळी तुम्ही एक चमचा कोरफडचा गर व त्यावर कोमट पाणी पिले, की थांबलेला मासिक धर्म लवकर येण्यास, मदत मिळतेय.
मासिक पाळी येण्यासाठी अळीव खावे
अळूची चवही कडू असते, पण ती मासिक पाळी येण्यासाठी फार फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्हाला आळीव पाण्यामध्ये भिजवून, त्याचा सलाड करून खाऊ शकतात. तसेच तुम्ही अळीवची खीर करून खाऊ शकतात. अळीव खाल्ल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते, व मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते. तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांनी अळीव खाऊ नयेत, त्याने जुलाब होण्याची शक्यता असते.
मासिक पाळी येण्यासाठी अद्रक चा वापर
पाळी वेळे अगोदर येण्यासाठी, जर तुम्ही सात ते आठ दिवसापासूनच, अद्रक चा रस त्यात मध घालून यांचे मिश्रण एकत्र करून दिवसातून दोन वेळेस त्याचे चाटण केल्यास, पाळी लवकर येण्याची मदत मिळते. शिवाय तुम्ही अद्रक घालून, चहा ही पिऊ शकतात. त्याने पाळी लवकर येण्याची मदत मिळते.
मासिक पाळी येण्यासाठी कांद्याचा वापर करून बघा
कांद्याचा वापर केल्याने, तुमची थांबलेली मासिक पाळी लवकर येण्याची मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला कांद्याची सूप करून, त्यात गूळ टाकून घ्यावा, व ते चांगले शिजवून गरम गरम प्यावेत. त्यामुळे थांबलेली व अनियमित मासिक पाळी लवकर येते.
मासिक पाळी येण्यासाठी गाजराच्या बियांचा वापर करा
जर तुमची मासिक पाळी वेळेवर येत नसेल, तसेच भरपूर अंतरावर थांबून-थांबून येत असेल, अशा वेळी जर तुम्ही एक चमचा गाजराच्या बिया घेऊन, त्या सोबत एक चमचा गूळ घालून, ते एक ग्लास पाण्यात उकळून, रोज सकाळ-संध्याकाळ दोन टाईम तुम्हाला गरम-गरम प्यायचे आहे. त्याने तुमची थांबलेली मासिक पाळी लवकर येण्यासाठी, मदत होते. शिवाय मासिक पाळी मध्ये होणारा त्रास ही कमी होतो.
मासिक पाळी येत नसेल, तर डॉक्टरांना केव्हा दाखवावे?
बऱ्याच वेळेला, काही स्त्रियांचे एवढे उपाय करूनही मासिक चक्र येत नाहीत. मग अशा वेळी त्यांनी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवावे. कारण मासिक पाळी न येणे म्हणजे गर्भाशयाशी निगडीत काही समस्या होणे होय, आणि मासिक पाळीच्या कालावधी जास्त लांबला, तर गर्भाशयात काही इन्फेक्शन तर झाले नाही ना! या भीतीने काही महिला डॉक्टरांकडे जायला घाबरतात. पण असे करू नका, मासिक पाळीचा अवधी जास्त लांबत असेल, तर तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जाऊन, डॉक्टरांकडून सोनोग्राफी करून, त्याचे निदान करून घ्यावेत.
चला, तर मग मैत्रिणींनो आज आपण मासिक पाळी येण्यासाठी, काही घरगुती उपाय जाणून घेतलेले आहेतच. तसेच मासिक पाळी एवढे उपाय करूनही आली नसेल, तर तुम्ही ताबडतोब दवाखान्यात दाखवावे. तसेच आम्ही सांगितलेल्या, घरगुती उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद