पाय दुखणे ही समस्या व त्यावरील वेगवेगळे घरगुती उपाय

0
697
पाय दुखणे ही समस्या व त्यावरील वेगवेगळे घरगुती उपाय
पाय दुखणे ही समस्या व त्यावरील वेगवेगळे घरगुती उपाय

आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये विविध काम करत असतो ही अशी विविध कामे करत असताना आपल्याला कधीकधी काहीतरी आपल्या शरीराला लागते किंवा आपल्या शरीराला कोणतीही इजा होते पण बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण जर तुम्ही सुद्धा अशा गोष्टींकडे सतत दुर्लक्ष करत असाल तर भविष्यात आपल्याला त्याचे काही विपरीत परिणाम देखील भोगावे लागू शकतात.बऱ्याच वेळा शरीराचे अतिप्रमाणात हालचाल झाल्यामुळे किंवा कोणतीही इजा झाल्यामुळे शरीराला वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशाच वेगवेगळ्या समस्यांपैकी एक समस्या जी बऱ्याच लोकांना निर्माण होत असते ती म्हणजे पाय दुखणे.  बऱ्याच लोकांना पाय दुखणे ही समस्या निर्माण होत असते कधीकधी वयोमानानुसार देखील आपले पाय दुखू लागतात, पण जर तुमचे पाय सतत दुखत असतील तर आपण अशा समस्यांवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. जर आपण सतत पाय दुखणे या समस्येवर वेळीच उपचार केला नाही तर आपल्या शरीराला त्याचे नुकसान होऊ शकते.

आपल्या शरीराला जर विविध समस्या निर्माण होत असतील तर या समस्या निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे देखील असू शकतात. त्याचप्रमाणे सतत पाय दुखणे या समस्येची देखील काही विविध कारणे असतील, ज्यामुळे आपल्या शरीराला अशा विविध समस्या निर्माण होऊ शकतात. वयोमानानुसार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सतत पाय दुखणे ही समस्या जर आपल्याला होत असेल तर आपल्याला चालताना खूप वेदना होतात त्याच बरोबर उभे राहताना देखील आपला खुप त्रास होतो.

बरेच लोक पाय दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी वेगवेगळ्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या पेन-किलर्स चा वापर करतात. पण बराच वेळ या पेन-कीलर्सचा असा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला त्याची काही साईड इफेक्ट देखील होऊ शकतात, ज्यामुळे आपली ही समस्या आणखी वाढू देखील शकते त्यामुळे आपण पेन-किलर्स चा वापर न करता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन योग्य त्या गोळ्या-औषधी घ्यावी किंवा त्याच्यावर योग्य ते उपचार करावेत.

वाचा  लिंबू चेहऱ्याला लावण्याचे फायदे

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचा आपल्या शरीरात खूप मोलाचे स्थान आहे. या विविध अवयवांच्या मदतीने आपल्याला विविध कामे करण्यास खूप मदत मिळते त्याचबरोबर जर आपल्या शरीरातील एका देखील अवयवाला जर कोणती झाली तर त्याचे परिणाम किंवा मग त्याचे नुकसान आपल्या शरीरावरही होत असतात. त्यामुळे आपण अशा गोष्टी दुर्लक्ष न करता अशा वेगवेगळ्या समस्यांवर उपचार करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सतत पाय दुखणे या समस्येवर आपण कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय करून या समस्यांपासून आपण आराम मिळवू शकतो ? चला तर मग बघुया !

पाय दुखणे ही समस्या व त्यावरील वेगवेगळे घरगुती उपाय :-

  • पायाला तेलाने मालिश करून बघावी :-

खूप पूर्वीपासून तेलाचा वापर विविध कामासाठी केला जातो त्याचबरोबर या तेलाचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या देखील दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. तुम्ही ऐकलं असेल की आपले आजी-आजोबा देखील आपला हात किंवा पाय दुखणे या समस्यांवर तेलाने पायाला-हाताला मालिश कर असे सांगत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे तेलामध्ये उपलब्ध असणारे विविध घटक व त्याचबरोबर आपण तेलाने मालिश केल्यामुळे आपल्या स्नायूंवर पडलेला दबाव नाहीसा होण्यास आपल्याला मदत मिळते त्यामुळे जर तुम्हाला पाय दुखणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर तुम्ही पायाला तेलाने मालिश करून बघावी.

तेल थोडेसे गरम करून घेऊन ते आपल्याला जिथे पाय दुखत असेल त्या ठिकाणी त्याची चांगली तेलाने मालिश करावी. असे जर तुम्ही सतत दिवसातून दोन वेळा केले तर आपल्याला पाय दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यास तुम्हाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. त्यामुळे पायाला तेलाने मालिश केल्यामुळे पाय दुखणे ही समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

  • पायाला हळदीचा लेप लावून बघावा :-

जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे पाय सतत दुखणे ही समस्या निर्माण होत असेल तर त्यावर आपण पायाला हळदीचा लेप लावून बघावा. हळद ही आपल्या आयुर्वेदानुसार अत्यंत गुणकारी आहे असे मानले आहे. त्याचबरोबर हळदीचा वापर आपण स्वयंपाक घरातील विविध कामांसाठी तर करतच असतो पण त्याचबरोबर विविध प्रथम उपचारासाठी देखील हळदीचा वापर केला जातो कारण की हळदीमध्ये उपलब्ध असणारे विविध घटकांमुळे आपल्याआरोग्याशी निगडित विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे सतत पाय दुखणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण पायाला हळदीचा लेप लावून बघावा.

वाचा  पायाला चटका लागण्याची कारणे आणि उपाय

हळदीचा लेप बनवण्यासाठी आपण थोडेसे कोमट गरम पाणी घेऊन त्यामध्ये हळद टाकावी व त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यावी व नंतर हे मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर आपल्या पाय जिथे दुखत असेल त्या ठिकाणी हळदीचा लेप लावावा. पायला हळदीचा लेप लावल्यामुळे पायाच्या स्नायूंवर पडलेला दबाव हा दूर होण्यास आपल्याला मदत मिळेल, त्याच बरोबर जर पायाला कोणतीही इजा झाली असेल तर ती इजा देखील भरून काढण्यास हळदी आपल्याला मदत करत असते.

त्यामुळे जर तुमचे पाय सतत दुखत असेल तर आपण आपल्या पायांना हळदीचा लेप लावून बघावा जेणे करून अशा समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळू शकेल !

  • पाय दुखणे ही समस्या न होण्यासाठी स्ट्रेचिंग करून बघावी :-

बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पायाचा व्यायाम केल्यामुळे देखील पाय दुखणे या समस्येपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. पायाचे दुखणे थांबविण्यासाठी स्ट्रेचिंग केले पाहिजे. जर तुम्हाला देखील सतत पाय दुखणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण स्ट्रेचिंग करून बघावे. स्ट्रेचिंग केल्यामुळे आपल्या पायांच्या नसेवर आलेला कोणताही दबाव नाहीस होण्यास आपल्याला मदत मिळेल. त्याच बरोबर आपल्या पायाच्या नसा देखील मोकळे होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल.

त्यामुळे आपले पाय सतत दुखणे, अशा समस्या आपल्याला निर्माण होणार नाही. त्यामुळे आपण दररोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळेस पायांचे चांगली स्ट्रेचिंग केले पाहिजे जेणे करून पाय दुखणे या समस्येपासून आपल्याला आराम मिळू शकतो ज्यामुळे पायाचा व्यायाम देखील होईल व पाय दुखणे देखील कमी होण्यास मदत मिळेल.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.

आपण आज बघितले की सतत पाय दुखणे या समस्येवर आपण कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय यांचा वापर करून अशा समस्यांपासून आराम मिळू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा !

वाचा  दाढ दुखीवर उपाय स्वागत तोडकर

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here