घरात खुप कटकटी खूप भांडणे होत असतील तर

0
2465
घरात खुप कटकटी खूप भांडणे होत असतील तर
घरात खुप कटकटी खूप भांडणे होत असतील तर

नमस्कार, प्रत्येकाचे घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे, असे वाटते प्रत्येकाला वाटते. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मानाने जगायला हवे. आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्त होऊन, आपले घर मस्त सुखासमाधानाने, हसून  विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की, त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल? असे का वागत असतील? ते  आपल्या घरात वाटत असेल, आणि तसेच जर आपल्या घरात झाले, त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते, घरात सारखी भांडणे होतात, कधी बायको, तर कधी नवरा, तर कधी सासू-सासरे, दीर-जाव तर कधी मुलांवरून, आपल्या घरात चिडचिड व्हायला लागली, तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर राग-राग होते. असे वाटते, की कुठेतरी निघून जायला हवे, कशामुळे? कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होत राहतात? याची कारण आपण अजूनही समजू शकलो नाही, त्यामागे काही वास्तुशास्त्र दोष असतो का? आपण घरात चांगले वागायला कमी पडतो का? असे मनात विचार करू लागतात. असे वाटते, या कटकटी आणि भांडणांपासून खूप दूर निघून जायला हवे. पण त्यावर ते सोलुशन नाही ना! त्यावर काही निवारण तर असेल ना, कोणत्या कारणामुळे असे होते, ते आज आपण जाणून घेऊयात. आम्ही तुम्हला येथे घरात खुप कटकटी खूप भांडणे होत असतील तर बद्दल माहिती येथे सांगितली आहे.

घरात खुप कटकटी खूप भांडणे होत असतील तर
घरात खुप कटकटी खूप भांडणे होत असतील तर

घरात भांडणे होत असेल तर ते कसे थांबवावे? 

हो, जर घरात भांडण होत असेल, तर तुम्ही त्यावर शांत चित्ताने विचार करावा, की नेमके कोणत्या कारणांनी भांडण होत आहे, आणि भांडण होत असेल, अशावेळी तुम्ही समोरच्यालाही समजावे, की तू का चुकतोय, कोणत्या कारणामुळे चुकले, उगाच वाद वाढवू नये. त्यांना समजावून त्यावर सोलुशन आहे. कोणताही विचार हा शांतचित्ताने करावा. असे समजावे. तसेच घरात सारखे भांडण होत असेल, त्यावेळी असे वाटते, कुठेतरी दूर निघून जावे. तर तसे करू नका. घरात वाद  कधीकधी नकारात्मक ऊर्जेमुळे, तसेच वास्तू दोषामुळे होतात. अशावेळी काही तोडगे आहेत. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

वाचा  लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत?

चला, तर मग घरात भांडणे व वाद होत असतील, त्यावर कोणते तोडगे करायला हवेत. 

घरात घंटानाद करावा

ज्या वेळी तुम्हाला वाटते, की घरात सारखे भांडणे होतात. चिडचिड होते,  अशावेळी तुम्ही जर संध्याकाळी देवाजवळ धूप, दीप व घरात घंटानाद केला, तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून घरात सुख-समृद्धी वाढेल. 

गंगाजल शिंपडावे

रोज सकाळी देवपूजा करावी. देव पूजा केल्यानंतर घरात धूप व गंगाजल शिंपडावे. म्हणजे तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढेल. 

घरात फ्रेश वाटेल असे फोटो लावावे

हो, आता तुम्ही म्हणाल की, घरातील कटकटींचा आणि फोटोंचा संबंध आहे बर,  तर हो घरात जर तुमच्या देवी-देवतांचे फोटो एकमेकांसमोर असेल, अशा वेळी गृह क्लेश होतो. तसेच घरांमध्ये महाभारत, रामायण, युद्धांचे असे फोटो असल्यास घरात कटकटी होऊ शकतात. अशावेळी तुम्ही ते फोटो लावू नयेत, तसेच तुम्ही घरात वाघ, चित्ता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात निसर्गाचे फुलांचे असे मन फ्रेश करणारे फोटो लावावेत. 

बेडरूम मध्ये राधा कृष्णाचा फोटो लावावे

राधा कृष्णाची जोडी तर आपल्याला माहितीच आहे. ते अतिशय गोड आणि सुस्वभावी होते. जर तुमच्या घरात पती-पत्नीमध्ये सारखे वाद होत असेल, अशा वेळी जर तुमच्या बेडरूम मध्ये, तुम्ही राधाकृष्णाचा फोटो लावला, तर तुम्हाला सुख- समाधानकारक व नवरा-बायकोमध्ये प्रेम वाढून, वैवाहिक जीवनात भांडणे व कटकटी नष्ट होतील. 

घरात नटराजाची मूर्ती नसावी

हो, अनेक जणांच्या घरात नटराजाची मूर्ती असते, नटराजाची मूर्ती म्हणजे शिव चा अवतार असतो. जसा शिवतांडव करतो, तसे घरात तांडव होतात. भांडणे होतात,कटकटी होतात, अशा वेळी तुमच्या घरात नटराज ची मूर्ती नसावेत. 

बाथरूम मध्ये खिडकीत वाटी मध्ये मीठ ठेवावे

हो  बाथरूम किंवा टॉयलेट मधल्या खिडकीत वाटी मध्ये मिठाचे खडे ठेवावेत. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर येण्यास मदत मिळेल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याला अमावास्या किंवा पौर्णिमेला बदलू शकतात. त्याने तुमच्या घरातील कटकटी दूर होण्यास मदत मिळेल. 

वाचा  नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी? Non sticky bhandyat jevan kase banval

सकाळ संध्याकाळ भक्तीगीते लावावीत

जर तुम्ही सकाळी उठल्यावर, तुमच्या घरात भक्तीगीते व संध्याकाळी भक्तीगीते लावली, तर तुमच्या झोपेतून उठल्यावर जे अशुद्ध विचार असतात, ते बाहेर निघतात.  तुमच्या मनात फ्रेश वातावरण निर्माण होते, आणि घरात कटकटी, भांडणे होत नाही. तुमचे मन हे भक्ती गीतांवर रहाते. 

कापूर जाळावा

घरात कटकटी आणि भांडणे खूप त्रासदायक असतात. घरात असे वाटते की थांबू नये, बाहेर कुठेतरी निघून जावे. अशा वेळी जर तुम्ही घरात संध्याकाळी व सकाळी कापूर दाणी मध्ये कापूर जाळला. तर तुमच्या घरात फ्रेश वातावरण राहील. तुमच्या घरात वास्तुदोष यामुळे जी नकारात्मक ऊर्जा असते, ती बाहेर निघण्यास, मदत मिळते. व घरात सुख शांती समाधान राहते. 

घरात सारखे भांडण होत असेल, अशावेळी कसे वागाल? 

ज्या वेळी घरात कटकटी होत असेल, भांडणे होत असतील, सारखी चिडचिड होत असेल, तर घरात सगळ्यांचे मन जपायला हवेत. सगळ्यांची मनस्थिती समजायला हवीत. कोणत्या कारणांमुळे वाद होत आहे, ते समजून शांततेने विचार केला, तर कटकटी आणि वाद हे थांबण्यास मदत मिळते. तसेच त्यांना काय आवडते, काय नाही आवडत, याची काळजी आपण स्वतः घ्यायला हवी, आणि सारखे घरात तणावमुक्त वातावरण राहील, असे वागायला हवेत.

तसेच आठवड्यातून एकदा  गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जावे. जर बाहेर फिरायला जायला जमत नसेल, तर संध्याकाळी रात्रीचे वेळी तुम्ही शतपावली फिरायला जावे. त्यामुळे घरातील लोकांचे मन हे चांगले होतात, आणि भांडण व वाद होत नाही. तसेच घरात सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवेत. योग करायला हवेत, म्हणजे तुमच्या मनातील चिडचिड ही हळू नष्ट होते. तसेच सगळ्यांनी सकाळी उठून ओम चा उच्चार करायला हवा, ओम चा उच्चार केल्यामुळे तुमच्या मनातील सगळी नकारात्मकता, बाहेर निघायला मदत मिळते. 

 

जाणून घ्या :दाढ काढताना घ्यावयाची काळजी

 

वाचा  पायाला सतत खाज येणे या समस्या समस्येची कारणे व घरगुती उपाय :-

चला, तर आज आम्ही तुम्हाला घरात सारखी कटकटी आणि भांडणे होत असल्यास, काय करावे, आणि त्यावर कोणते तोडगे आहेत, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही तुम्हाला सांगितले आहे की, घरात भांडणे होत असेल, त्यावेळी तुम्ही कसे वागावे. तेही सांगितलेले आहेत. जर आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करूनही, तुम्हाला फरक पडत नसेल, अशा वेळी तुम्ही एखाद्या वास्तुशास्त्रज्ञला बोलवून, तुमच्या घराची तपासणी करून घ्यावी. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. तसेच आम्ही येथून देखील रेफेरेंस घेतलेला आहे. 

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here