नमस्कार, मित्रांनो आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. तसेच आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही, जे पटेल ते खातो, जर तुम्ही अशाच गोष्टींचा वापर जर तुमच्या शरीरावर केला, तर तुमच्या शरीरावर चरबी होण्याची सुरुवात होऊन जाते. त्यामुळे तुमच्या पोटावर चरबी, हातापायांवर चरबी, तुमचे वजन वाढ, यासारख्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. तसेच ज्या वेळी तुमच्या पोटावर चरबी, तसेच वजन वाढते. अशा वेळी तुम्हाला खूप राग येतो, कोणतेही कपडे परफेक्ट बसत नाही.
कुठल्याही कार्यक्रमात जाण्यास अवघडल्यासारखे वाटते. पोटावर चरबी येण्याचे नेमकी कारणे, कोणती असू शकतात. ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, की पोटावरची चरबी नेमक्या कोणत्या कोणत्या कारणामुळे येऊ शकते.
पोटावर चरबी येण्याची कारणे
पोटावर चरबी येण्याची अनेक कारणे आहेत. ते आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात.
- तेलकट-तुपकट पदार्थ खाल्ल्याने, पोटावर चरबी येते.
- बाहेरील जंकफूड खाल्ल्याने, वजन वाढते शिवाय पोटावर चरबी येते.
- स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधित तक्रारी असल्याने, ही त्यांचे वजन वाढते व पोटावर चरबी येते.
- सतत बैठे काम केल्याने, पोट वाढीच्या समस्या होतात.
- साखर, मैदा यासारखे पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे ही पोटावरची चरबी जमा होते.
- डिलिव्हरी नंतर महिलांचे पोट वाढते, वजन वाढते. शिवाय पोटावर चरबी येऊ शकते.
- अनुवांशिक गुण असल्याने, ही त्या परिवारात सगळ्यांचे वजन, तसे चरबी वाढण्याचे प्रमाण असू शकते.
- हार्मोन इनबॅलेन्स होऊन, शरीरात चरबी व पोटावर येण्याचे प्रमाण होऊ शकते.
- ज्या लोकांची पचनसंस्था सुरळीत नसेल, त्यांना सारखे ऍसिडिटी कब्ज यासारख्या समस्या असतील, अशा लोकांच्या पोटावर चरबी येऊ शकते.
- व्यायामाचा अभाव यामुळेही पोटावरची चरबी वाढू शकते.
- तसेच मोनोपाॅजच्या वयात स्त्रियांचे वजन व पोटावर चरबी वाढू शकते.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय
वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहे की पोटावरील चरबी नेमक्या कोणत्या कारणांमुळे वाढते? तसेच आज आपण जाणून घेणार आहोत, की जर तुमच्या पोटावर कमरेवर चरबी असेल, तर तुम्ही कोणते पदार्थ खायला हवेत व कोणते घरगुती उपाय करायला हवेत, चला तर मग जाणून घेऊयात.
लिंबू पाणी प्या
लिंबू मध्ये विटामिन सी असते. तसेच लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे तुमच्या पोटावरील अनावश्यक चरबी जाण्याचे काम करते. त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाण्यात एक लिंबू पिळून + त्यात मध घालून पिल्याने, तुमच्या पोटावरील अनावश्यक चरबी हळू जाण्यास मदत होईल. हा उपाय फार प्रभावशाली आहे, हा पूर्वीच्या काळापासून केला जात आहे.
ग्रीन टी प्या
ग्रीन टी की नॅचरली असते. ती तुमचे शरीर डिटॉक्स करते. तसेच ग्रीन टी मध्ये अँटी एक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. तसेच ग्रीन टी तुमचे मेटाबोलिजम सिस्टीम वाढवतो. ग्रीन टी पिल्याने तुमचे पोटावरील चरबी तसेच शरीरावर जी अनावश्यक चरबी असेल, ती कमी करण्यास मदत करते.
गरम पाणी प्या
हो, जर तुम्ही रोजच्या रोज सकाळी उठल्यावर एक तांब्या पाणी पिले, तर तुमच्या शरीरावर चरबीचे प्रमाण कमी होईल. शिवाय तुमचे वजन वाढणार नाही. कारण सकाळी गरम पाणी पिल्याने, तुमची पोट साफ होते आणि शौचास साफ होते.
चालायला जा
हो, हे तर बिना खर्चिक उपाय आहे. “चालायला जाणे म्हणजे तुमचे शरीर निरोगी राहणे” जर तुम्ही तुमच्या शरीराला चाल ठेवली, तर तुमची शरीर हे सुदृढ राहील शिवाय वजन वाढी सारख्या समस्या तुम्हाला होणार नाहीत.
तसेच जर तुमच्या पोटावर अनावश्यक चरबी असेल, तर अशावेळी तुम्ही दिवसातून किमान तीन ते चार किलोमीटर चालायला हवे. त्याने तुमच्या मेटाबोलिजम सिस्टीम सुधारतो. शिवाय चालल्यामुळे पोटाचे स्नायूंना बळकटी येते. आणि वजन वाढ देखील होत नाही. वजन तुमचे स्थिर राहते, आणि चालल्याने तुम्हाला कोणतेही आजार तुमच्या पासून लांब राहतील.
त्रिफळा चूर्ण घ्या
त्रिफळा म्हणजे तीन फळांचा संगम. त्रिफळा मध्ये आवळा हरड आणि बेहडा ही तीन फळे असतात. जे तुमच्या शरीरातील पचन संस्था सुरळीत करायचे काम करतात. तसेच त्रिफळा हे तुमच्या शरीरातील घाण डिटॉक्स करतात. त्रिफळा चूर्ण पिल्याने तुमचे वजन देखील कमी होते. शिवाय रक्ताभिसरण सुरळीत होते. त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदातील महत्त्वाचे स्थान आहेत. जर तुम्ही रोजच्या रोज सकाळी व संध्याकाळी एक चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यात पिले, तर तुमचे वजन देखील झपाट्याने कमी होते. शिवाय पोटावरती अनावश्यक चरबी ही कमी होते.
योग्य आहार घ्या
हो, अगदी लहान मुलांना सांगण्यासारखे आहे. आता आपण मोठे झालो आहे, आपल्याला काय चांगले काय वाईट, हे देखील समजते. जर तुम्ही जंकफूड, तसेच बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ, तसेच मैद्याचे, बेकरीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले, तर तुमचे वजन देखील वाढते, व पोटही सुटते, पोटाचा घेर कमरेचा घेर वाढतो,
अशा वेळी जर तुम्ही योग्य फळे खाल्ली किंवा भाज्या खाल्ल्या, तर तुमचे वजन नियंत्रणात राहते. तुम्ही तुमच्या आहारात जसे, की सफरचंद, संत्री, लिंबू, कलिंगड, पपई, अशा फळांचा समावेश तुमच्या आहारात केला, तर तुमचे वजन देखील कमी होते. शिवाय तुम्ही दिवसभरामध्ये काकडी, पत्ताकोबी, गाजर, टमाटर, दही यांचा सलाड करून खाऊ शकतात.
तसेच तुम्ही भाज्यांमध्ये हिरव्या पालेभाज्या खा. कारण त्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल, शिवाय वजन देखील कमी होईल. तसेच तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी, खायला हवेत, याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल.
तसेच तुम्ही तुमच्या दोन वेळेच्या जेवण मध्ये अंतर ठेवायला हवेत. दिवस दिवसभर खाय खाय करायला नको पाहिजे, तसेच तुम्ही सकाळचे जेवण अकरा वाजता व संध्याकाळचे जेवण सात वाजता, हा नियम पाळून तुमच्या आहार घ्यायला हवा. त्याने तुमचे वजन देखील वाढणार नाही.
सूप पिऊन बघा
ज्यावेळी तुम्हाला भूक लागते, समजा दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी अशा वेळी जर तुम्ही टमाट्याची सूप किंवा ग्रीन भाज्यांचे सूप, मक्याचे सूप यासारखे, सुप पिलेत, तर तुमचे पोट भरल्यासारखे वाटते व पोटावर चरबी येण्याचे प्रमाण कमी होते.
पुरेसे पाणी प्या
तुम्ही रोजच्या रोज दिवसाला तीन ते चार लिटर पाणी पिले, तर तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. कारण पाणी पिल्याने पोट भरल्यासारखे वाटते. तसेच तुमचे वजनही वाढत नाही. जर तुमच्या शरीराला पुरेसे पाणी राहिले, तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहणार, शिवाय डीहायड्रेशन सारख्या समस्या तुम्हाला होणार नाही. तसेच दिवसभर पाणी तुम्हाला घोट-घोट प्यायचे आहे. त्याने तुमचे वजन व पोटावरची चरबी यासारख्या समस्या तुमच्या पासून खूप लांब राहतील.
नियमित व्यायाम करा
हो, नियमित व्यायाम केल्याने तुमचे शरीर सुदृढ व उज्वल राहते. तुम्ही तुमच्या दिवसाचे टाइम टेबल आखावे, त्यामध्ये सकाळ – संध्याकाळ दोन टाईम व्यायाम करावा. अशा वेळी तुम्ही कोणता व्यायाम करावा? तर तुम्ही दोरी उड्या, स्विमिंग, तसेच सूर्य नमस्कार, कपालभारती, तसेच धनुरासन, भुजंगासन, नौकासन तसेच पोटाचे व्यायाम असलेले, तुम्ही करू शकतात.
त्याने तुमची पोटावरील चरबी कमी होते. तसेच तुम्हाला अजून काही व्यायाम युट्युब वर हि मिळतील, जर तुम्ही नित्यनियमाने व्यायाम केले, तर तुमचे पोटावर अनावश्यक चरबी राहणार नाही. शिवाय वजन वाढ देखील होणार नाही.
राईच्या किंवा तिळाच्या तेलाने मालिश करा
जर तुमच्या पोटावर चरबी असेल, अश्या वेळी जर तुम्ही रोजच्या रोज पोटावरील चरबी वर राईचे किंवा तिळाच्या तेलाने मालिश केली, तर तुमच्या स्नायूतील ढिलेपणा, लवकरात लवकर मोकळा होऊन , चरबी कमी होण्यास मदत मिळेल.
जाणून घ्या : उंची वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करणे गरजेचे आहे
चला, तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी, काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करूनही, तुम्हाला फरक वाटत नसेल. तर तुम्ही एखाद्या डायट स्पेशलिस्ट कडे दाखवून तुमचा आहार व दिवसाचा आराखडा तयार करून घ्यावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. अजून माहिती साठी येथे जाणून घेऊ शकता.
धन्यवाद !!