कारल्यासोबत काय खाऊ नये ? जाणून घ्या सोपे उपाय

0
9561
कारल्यासोबत काय खाऊ नये
कारल्यासोबत काय खाऊ नये

नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत कि कारल्यासोबत काय खाऊ नये. आपण आपल्या नेहमीच्या आहारा मध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश करत असतो आणि ते आपल्याच आरोग्याच्या दृष्टीने उत्तम देखील ठरत असते. आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये फळ भाज्यांचा, हिरव्या पालेभाज्यांचा, तसेच, फळांचे सेवन करणे अतिशय चांगले ठरत असते. ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. शिवाय, जर आपला आहार हा योग्य व व्यवस्थित असेल तर आपण अनेक आजारांपासून दूर देखील राहू शकतो.

हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यामध्ये अनेक प्रकार असतात. त्यातीलच एक म्हणजे ‘कारले’. हे आपल्या शरीरासाठी फार गुणकारी ठरत असते. आज आपण कारले खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. शिवाय ज्या लोकांना डायबिटीज ची समस्या असेल, तर अशा लोकांनी देखील कारले खाणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले ठरत असते. तसेच, डॉक्टर देखील डायबिटीज पेशंट ला कारले सेवन करण्याचा सल्ला देत असतात. एक प्रकारे कारल्याचे सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी मदत होत असते.

मित्रांनो, कारले हे आपल्या शरीरासाठी बहूगुणकारी ठरत असते. कारल्याचा रस करून पिल्यामुळे आपल्या पोटातील जंत असतील, तर ते देखील निघून जाण्यास मदत होत असते. तसेच डायबेटीस पेशंट ने कारल्याचा ज्युस चे नियमित सेवन करणे हे उत्तम ठरत असते, कारण त्यामुळे त्यांचे डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. कारल्याचे नियमित सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात परंतु, कारल्या सोबत आपण काय खाऊ नये? याबद्दल देखील आपल्या माहिती असायला हवी.  तर मित्रांनो, आज आपण कारल्या सोबत काय खाऊ नये? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग  कारल्या सोबत काय खाऊ नये? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

कारल्या सोबत काय खायला नको ?

मित्रांनो, कारल्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी ठरत असते. कारण, यामुळे आपल्या शरीराचे साखरेचे नियंत्रण व्यवस्थित राहत असते. जर आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये कारल्याचे सेवन करत असाल, तर अनेक प्रकारचे फायदे हे आपल्याला होतात. परंतु मित्रांनो, कुठलीही गोष्ट असो तिचे अति प्रमाणात सेवन करणे, आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकते. जसे की, कारले खाणे आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी तर फार उत्तम ठरत असते. परंतु, कारले हे उष्ण वृत्तीचे असते. कारले हे अतिप्रमाणात अथवा, जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे आपल्याला त्रास होण्याची शक्यता देखील असते. म्हणजेच कारले हे अति प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या लिव्हरला देखील त्रास होण्याची शक्यता असते. मासिक पाळीच्या दरम्यान कारले खाणे देखील उत्तम ठरत असते त्यामुळे त्रास हा कमी प्रमाणात होऊ शकतो.

गर्भवती स्त्रियांनी कारल्याचे सेवन हे नियमित करायला नको. जर तुम्हाला कारले खाण्याची इच्छा होत असेल, तर तुम्ही एकदम मोजकेच प्रमाणात खावे. परंतु, नियमित किंवा अतिप्रमाणात कारले खाल्ल्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. कारले बहुगुणकारी तर असतेच, शिवाय अधिक प्रमाणात कारले खाल्ल्यामुळे आपल्याला पोटात गॅस होण्याची शक्यता देखील निर्माण होत असते. जर तुम्ही रात्रीच्यावेळी कारल्याचे सेवन करत असाल, तर पोटामध्ये गॅस जमण्याची समस्याही अधिक प्रमाणात होऊ शकते.  तुम्ही रात्रीच्यावेळी कारले खाणे शक्यतो टाळायला हवे.

  • ज्यावेळी तुम्ही कारल्याचे सेवन करत असाल, तर कारल्या सोबत तुम्ही लोणचं खाणे हे शक्य टाळायला हवे. अनेक जणांना जेवणासोबत, भाजी सोबत लोणचं खाण्याची सवय असते. परंतु, ज्यावेळी तुम्ही कारल्याचे सेवन करत असाल त्यावेळी तुम्ही लोणच्याचे सेवन करणे शक्यतो टाळावे. कारले आणि लोणचं हे विरुद्ध प्रकारचा आहार मानला जातो. कारल्या सोबत लोणचं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. परिणामी, पोटात बिघाड होण्याची शक्यता संभावना असते.
  • कारल्याची भाजी चे सेवन करताना तुम्ही करल्यासोबत दुधाचे सेवन करणे शक्यतो टाळला हवे. ज्यावेळी तुम्ही कारल्याची भाजी चे सेवन करत असाल, कारल्याचा रस घेत असाल तर त्याआधी दूध पिणे अथवा कारल्या सोबत दूध घेणे अथवा कारले खाल्यानंतर दूध घेणे शक्यतो टाळायला हवे. कारण, कारले आणि दुध हा एक विरुद्ध आहार मानला जातो. जर तुम्ही कारल्या सोबत दूधाचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुम्हाला स्कीनची एलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण शरीराला खाज येणे, खाज आलेल्या ठिकाणी लालसर होणे, पोटामध्ये गॅस तयार होणे, पोटात बिघाड होणे इत्यादींसारख्या समस्येला सामोरे जावे लागत असते म्हणून शक्यतो तुम्ही  कारल्यासोबत दूध घेणे टाळायला हवे.
  • कारल्यासोबत तुम्ही खीर, पनीर खाणे शक्य टाळायला हवे. कारण कारल्यासोबत पनीर अथवा बासुंदी, खीर खाणे हा एक विरुद्ध आहार आहे. जर तुम्ही कारल्या सोबत दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत असाल तर यामुळे तुमच्या त्वचेला खाज येण्याची दाट शक्यता असते. शिवाय आपल्या शरीरातील पचनसंस्थेवर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी, खाल्लेले अन्न हे व्यवस्थित  पचन होत नाही.
  • कारल्या सोबत तुम्ही मुळा खाणे हे देखील शक्यता टाळायला हवे. कारले आणि मुळा जर तुम्ही एकत्रित खात असाल तर या दोघांमधील घटक एकाच वेळी एकत्रित झाल्यामुळे हे तुमच्या शरीराला हानीकारक ठरू शकतात. जर तुम्ही कारल्या सोबत मुळ्याचे सेवन करत असाल, तर त्यामुळे तुम्हाला श्वसना संदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजेच, एक प्रकारे श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होण्याची संभावना असते. शिवाय, कारल्या सोबत मुळ्याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला हृदया संदर्भात देखील समस्या निर्माण होऊ शकतात.
  • मित्रांनो, कारल्यासोबत तुम्ही शक्यतो दही खाणे शक्यतो टाळायला हवे. कारल्या सोबत तुम्ही चुकूनही दही खाऊ नका. जर का करल्यासोबत तुम्ही दहीचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरावर पांढरे डाग पडण्याची शक्यता असते. शिवाय तुमच्या त्वचेला एक प्रकारे एलर्जी देखील निर्माण होऊ शकते. म्हणजेच कारले खाण्याचे सोबत तुम्ही जर दही खाल्ले तर एक प्रकारे तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते.
वाचा  चेहऱ्याला हळद लावण्याचे उपाय व फायदे

 तर मित्रांनो, कारल्या सोबत काय खायला हवे, काय खायला नको? याबद्दल, आपण माहिती जाणून घेतलेली आहे. विरुद्ध आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. विरुद्ध आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराला व अवयवांना इजा पोचू शकते. जर तुम्ही विरुद्ध आहार घेतला तर तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होण्याची संभावना असते. शिवाय, कारले खाण्याचा फायदा होण्या ऐवजी त्याचे गंभीर परिणाम हे आपल्याला होऊ शकतात. म्हणून तुम्ही तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जेवढा जास्तीत जास्त विरुद्ध आहार घेणे टाळले,  तेवढे तुमच्या शरीरासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. कारल्यासोबत काय खाऊ नये? या विषयी तुम्हाला अजून माहिती हवी असेल अथवा सल्ला घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टर यांच्याकडून घेऊ शकतात.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

 

धन्यवाद !

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here