शास्त्रीय संगीत ऐकण्याचे फायदे

0
675
शास्त्रीय संगीत ऐकण्याचे फायदे
शास्त्रीय संगीत ऐकण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो गाणे ऐकायला मला खूप आवडते. तुम्हाला आवडते का? गाणे ऐकणे म्हणजे प्रत्येकाची आवड असते. यामुळे आपला मूड एकदम फ्रेश होऊन जातो. काही जणांना धांगडधिंगा, तर काही जणांना पार्टीचे, तर काही जणांना शांत, तर काही जणांना बडबडी गीत आवडतात. तसेच गाणे ऐकताना अगदी शांत मधुर सुंदर अशी गाणी ऐकायला हवी. तर मग ते कसे? जसे की शास्त्रीय संगीत! शास्त्रीय संगीत ऐकल्याने, आपल्याला खूप सारे फायदे होतात. वाटलं आश्चर्य, खरंच ! शास्त्रीय संगीत ऐकल्याने, तुम्हाला खूप बहुगुणी फायदे होतात. अगदी काहीही न करता, फक्त संगीत ऐकणे, हे पण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

तुम्ही बघितलं असेल, पूर्वीच्या काळी पूर्वजांकडे रेडीओ असायचा, त्यावर सकाळी आणि संध्याकाळी एक तास शास्त्रीय संगीताचा लागायचा. काही जणांना त्याची हसू यायचे, पण खरंच सांगतो, गाणे ऐकण, आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते, तसे त्यामध्ये जर शास्त्रीय संगीत ऐकले तर आपल्यासाठी खूप फायद्याचे असते. आज आपण त्याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की शास्त्रीय संगीत एकट्याने आपल्याला असे कोणते फायदे होतात बरं? चला तर मग जाणून घेऊयात! 

शास्त्रीय संगीत ऐकल्याने होणारे फायदे ? 

मित्रांनो, शास्त्रीय संगीत ऐकल्याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात. तर मग ती नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊया. 

मन एकाग्र राहण्यास मदत मिळते :

बदलत्या जीवनशैलीमध्ये, वाढत्या कामाचा तान यामुळे, आपले मन एकाग्र राहत नाही. तसेच आपल्या मनाची द्विधा मनस्थिती होऊन जाते, आपण हे करू का? ते करू? या गोष्टींमध्ये आपण अडकून बसतो. अश्यावेळी जर तुम्ही शांत चित्ताने मन लावून, डोळे बंद करून, शास्त्रीय संगीत ऐकले, आणि त्यामध्ये तुम्ही मग्न झाले, तर तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो. तुमचे मन अगदी स्थिर होते, व तुमच्या मनावर तुमचा ताबा मिळवता येतो, आणि तुमचं मन एकाग्र होते. तुम्हाला कोणताही विचार घेताना, अगदी शांत चित्ताने विचार करता येते. त्यामुळे अशा वेळी तुम्ही नेहमी संगीत ऐकावेत. 

वाचा  मांड्या कमी करण्याचे उपाय

चिडचिड होत नाही :

ज्या लोकांची कशान-कशावरून ही चिडचिड होण्याची सवय असते, सारखा राग येतो, सारखी चिडचिड होते, त्यामुळे आपला परिणाम आपल्या शरीरावर पडतो. आपल्या शरीरातील रक्त गरम होते, डोके गरम होते, त्यावेळी जर तुम्ही शांत बसून, शास्त्रीय संगीत ऐकले, तर तुम्हाला चिडचिड पणा कमी करण्यास मदत मिळते. व तुमचे मन शांत राहते. 

टेन्शन कमी होते :

आता वाढलेल्या जबाबदाऱ्या, हल्ली लवकर कमी वयात तुमच्या अंगावर येतात. तसेच  मुलांच्या शाळेच्या फी च टेन्शन, घराचा हप्ता, कर्ज, आपल्या डोक्यावर राहते. अशावेळी टेन्शन घेऊन, आपल्या त्याच्या शरीरावरही परिणाम होते. टेन्शन घेतल्यामुळे तुम्हाला हृदयविकाराच्या, उच्च रक्तदाब, बीपी वाढणे किंवा कमी होणे, हायपर टेन्शन, सारख्या समस्या होतात. अशावेळी तुम्ही टेन्शन न घेता, दिवसभरातून एकदा तरी शांत आपल्यासाठी एक तास किंवा अर्धा तास आपल्यासाठी द्यावा. शांतचित्ताने मधुर असे शास्त्रीय संगीत लावावेत, आणि त्यामध्ये डोळे बंद करून गुंतून जावे. त्यामुळे तुमच्या डोक्यातील टेंशन मनावरील भार हळू कमी होतो आणि आपल्याला बीपी उच्च रक्तदाब हृदयविकार याचा धोका यासारख्या गोष्टी टळतात.  आपण निरोगी राहण्यास मदत मिळते. 

शांत झोप लागते :

काही जणांना झोपेच्या फार समस्या असतात. झोप लागत नाही. गोळी घेतल्याशिवाय, तर झोप लागणे अशक्यच आहे. पण झोपेच्या गोळ्या नियमित घेणे, हे शरीरासाठी घातक ठरू शकते. बऱ्याच वेळेला खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला झोप लागत नसेल, अशा वेळी जर तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकले तर तुम्हाला झोप लागेल, तुम्हाला खोटं वाटत असेल, तर तुम्ही ट्राय करून बघा. शास्त्रीय संगीत ऐकल्याने तुम्हाला शांत चित्त झोप लागते. 

नकारात्मक विचार दूर होतात :

काही वेळेस आपली चिडचिड होते, टेन्शन असते, राग येतो, म्हणून कधी नाराज असते, अशा गोष्टींमुळे आपण डिप्रेशन मध्ये जाण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात. त्यावेळी मनावरही त्याचा परिणाम होतो. अशा वेळी मनात नको ते विचार येतात. अशा वेळी जर तुम्ही शांत चित्त शास्त्रीय संगीत नियमित एकले, तर तुमच्या नकारात्मक ऊर्जा यांचा नायनाट होतो, व शरीराला व मेंदूला सकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव मिळतो. मनात एक उत्साह आणि एनर्जी येते. 

वाचा  झोपेत ठसका लागणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

रोग्यांसाठी फायदेशीर ठरते :

जर तुम्हाला समजा काही आजार झाला आहे, किंवा एखाद्या आजारातून तुम्ही बाहेर निघाले, अशा वेळी दवाखान्यातली तेच विचार तेच अनुभव मनावर परिणाम करतात. अशा वेळी जर तुम्ही शांत चित्ताने संगीत नियमित ऐकले, तर तुमच्या मनात उत्साह वाढवणार्‍या घटना घडतात. मनात एनर्जी येते व तुम्ही हसमुख होतात, रागापासून दूर होतात. तसेच संगीत ऐकल्याने  तुमच्या शरीरातील अवयवही तुम्हाला प्रोत्साहन देतात व तुम्ही निरोगी राहण्यास मदत मिळते. 

शास्त्रीय संगीत कोणत्या वेळी एकावे ? 

मित्रांनो, शास्त्रीय संगीत ऐकायला वेळ ही नसते. हे संगीत तुम्ही कोणत्याही वेळी ऐकू शकतात. पण मात्र ऐकताना तुम्हाला एका शांत चित्त ठिकाणी बसावे. तुमच्या आजूबाजूला कोणी नसावेत.  तुम्ही एकदम शांत डोळे लावून बसावे. तसेच जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात बसले, तर तुमच्या मनात उत्कृष्ट प्रतिसाद तुम्हाला मिळतो. मनात चांगले भावना येतात. इतरांविषयी प्रेमाने आणि गोडीने बोलावे, असे वाटते. राग आपण विसरतो. तसेच त्याचा परिणाम आपल्या मित्रमंडळींना, परिवाराला तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या अनेकांना होतो. आपण चांगले वागले, की समोरच्याला आपल्या सोबत चांगले वागतात, हा अनुभव येतो. 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला शास्त्रीय संगीत ऐकल्याने, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात, हे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेले माहिती, तुम्हाला आवडली असेल, तसेच त्यांनी सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here