रताळे खाण्याचे फायदे आणि नुकसान

0
1591
रताळे खाण्याचे फायदे आणि नुकसान
रताळे खाण्याचे फायदे आणि नुकसान

नमस्कार,  मित्रांनो आज आपण जाणून घेऊया रताळे खाण्याचे फायदे आणि नुकसान याबद्दलची माहिती. उपवास असला की आपल्या घरामध्ये उपवासाचे पदार्थ येतात. बटाटे, साबुदाणे, नायलॉन साबुदाणा, बटाट्याचे वेफर्स, शिंगाडे फळे तसेच तसेच रताळी हे पदार्थही येतात. रताळे हे उपवासाचे पदार्थ आहे. एक प्रकारे दुसर्‍या बटाट्याचे रूप आहे. रताळे हे खायला गोड असते. रताळ्याला कंदमूळ असेही म्हणतात. रताळ्या ला दुसरे नाव साखरू असेही म्हणतात. तसेच इंग्रजी मध्ये त्याला स्वीट पोटॅटो असे म्हणतात. तसेच हिंदीमध्ये त्याला शकरकंद असे म्हणतात. रताळे हे लालसर, पिवळसर, बदामी कलरची असते. हे भाजी मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध असते. तसेच त्याला गरिबांचा आहार असेही म्हणतात.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये रताळ्या उपवासात भरपूर प्रमाणात वापर केला जातो. कारण ते पचायला हलके व चवीला स्वादिष्ट असते. रताळ्या पासून आपण त्याची खीर, त्याचे चकत्या कापून तळून त्याचे वेफर्स, रताळ्याचे मिठाई,  रताळ्याचे लाडू, रताळ्याचा शिरा, त्याचा किस, रताळ्याची खीर, रताळ्याची भाजी, वेगवेगळ्या प्रकारे आपण रताळ्याची क्रिया करून अन्नपदार्थ बनवू शकतो. तर मित्रांनो, रताळी खाणे हे आपल्या शरीरासाठी फार फायद्याचे असते. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरासाठी फार लाभकारी असतात. पण हे अनेकांना माहिती नसते.

तर मित्रांनो, आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की रताळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात ? तसेच रताळे मध्ये कोण कोणते गुणधर्म असतात ? जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तसेच रताळे खाल्ल्याने तुम्हाला काही नुकसान होतात का ? हे आपल्याला माहिती नसते, चला तर मग जाणून घेऊयात! 

रताळे खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे ? 

रताळी खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  गुलाबाच्या फुलांची माहिती काय आहे जाणून घेऊया

रताळू मधील गुणधर्म :

मित्रांनो रताळु हे एक कंदमुळ आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात. रताळू मध्ये विटामिन जीवनसत्त्वे अ, क, कॅल्शिअम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, कार्बोदक, फायबर लोह, तांबे, जस्त, ऑंटीॲक्सिडेंट, खनिजे, मिनरल्स, बिटा केरोटीन फायबर हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे, त्याचे आपल्या शरीराला फायदे होतात. 

कॅन्सरचा धोका टळतो :

मित्रांनो, रताळ्या मध्ये आपल्या शरीराला लागणारे गुणधर्म असतातच, तसेच तसेच त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन हे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी जागृत होण्यापासून रोखता येते, त्या पेशींवर प्रतिबंध करता येते, त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात नियमित रताळे खाल्ल्यास तर तुम्हाला कॅन्सरचा धोका हा टळतो. 

हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते :

रताळे हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात. हल्ली वयस्कर लोकांचे हाडांमध्ये ठिसूळपणा जाणवणे, तसेच उठताना, बसताना हाडांचा  आवाज येणे, तसेच कमी वयामध्ये गुडघे दुखणे, सांधे दुखणे, यासारख्या समस्या भरपूर प्रमाणामध्ये बघावयास मिळतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित रताळे यांचा वापर करायला हवा. कारण रताळ्या मध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. तसेच त्यामध्ये कॅल्शियमचा पुरवठा मुबलक प्रमाणात असतो. आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम चा स्त्रोत हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित रताळे यांचा वापर करावा. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात :

हल्ली वाढत्या वजनावर आपण निरनिराळे औषधी घेतो, तरीही आपले वजन कमी होत नाही. वजन वाढीचे कारण म्हणजे, सतत बैठे काम बाहेरचे, जागरण, पुरेशी झोप न होणे, जंकफूड खाणे, मैद्याचे, बेकरी युक्त पदार्थ खाणे, तेलकट पदार्थांचे अति प्रमाणात वापर करणे, या साऱ्या गोष्टींमुळे तुमचे वजन वाढते. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये रताळ्याचा वापर करायला हवा. रताळू खाल्ल्याने, तुम्हाला त्यामधील गुणधर्म मिळतात. शिवाय ते पचायला हलके असतात, तसेच त्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात. त्यामुळे जर तुम्ही सकाळी रताळ्याचे पदार्थ खाल्ले, तर तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारखे जाणवते, व भूक लागत नाही, व वजन कमी होण्यासाठी ते फायद्याचे ठरते. 

वाचा  डाळिंबाच्या सालीचा वापर केल्या मुळे होणारे शरीराला विविध फायदे :

शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते :

उपवासाच्या दिवशी आपल्या शरीरात ऊर्जा टिकून राहावी, म्हणून जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये रताळु यांचा समावेश केला, तर तुम्हाला फायद्याचे ठरते. कारण रताळे यांमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा टिकून राहते. व आपल्याला थकवा आल्यासारखे, तसेच अशक्तपणा आल्यासारखे जाणवत नाही. 

रक्ताची कमतरता दूर होते :

तुम्ही तुमच्या हारामध्ये रताळू चे सेवन केले, तर तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.  तुमच्या आहारामध्ये रताळू नियमित खाल्ल्याने, तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास फायदेशीर ठरते. मदत होते रताळ्या मध्ये लोह, तांबे यासारखे गुणधर्म असल्यामुळे, शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत मिळते. 

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

रताळे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कारण रताळ्यामध्ये विटामिन अ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते. 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित रताळे यांचा उपयोग केला, तर तुम्हाला फायद्याचे ठरते. कारण रताळ्या मध्ये आपल्या शरीराला लागणारे आवश्यक गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या बाहेरच्या इन्फेक्शन वर, तसेच वायरल इन्फेक्शन वर प्रतिकार देणाऱ्या पेशी या वाढतात व तुम्ही निरोगी राहतात. 

पोटातील जळजळ थांबते :

अवेळी जेवणे, तसेच उग्र खाणे, यामुळे पोटात पित्त वाढणे, एसिडिटी, यासारख्या तक्रारी आपल्याला होतात. तसेच त्यामुळे आपल्याला उलट्याही होतात. त्यामुळे पोटात आग होते, जळजळ होते, अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात रताळ्याचा शिरा करून खायला हवा. त्यामुळे पोटातील आग व जळजळ ही कमी होते. कारण रताळे थंडावा देतात. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. 

रताळे खाल्ल्याने होणारे नुकसान :

मित्रांनो, वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही रताळे खाल्ल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितलेला आहेतच. पण म्हणतात ना! कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच खावी! जर तिचे आपण प्रमाणाच्या बाहेर सेवन केले, तर आपल्याला शारीरिक त्रास हे संभवतात. तसेच रताळ्याचे आहेत. रताळे हे प्रमाणातच खावे. प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्याने, आपल्याला त्याचा त्रास होतो. रताळे जास्त प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्याने, आपल्या पोटात दुखते, पोटात गॅसेस चे प्रमाण वाढते. तसेच ज्यांना रताळू खाल्ल्याने, काही अलर्जी होत असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला एकदा जरूर घ्यावा. 

वाचा  तुळशीची पाने खाण्याचे फायदे

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला रताळू खाल्ल्याने तुमच्या शरीराला नेमके कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच रताळू  जास्त खाल्ल्याने तुम्हाला कोणते नुकसान होऊ शकतात, तेही सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, व आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर मित्रांनो तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here