नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेऊया संत्र्याची साल चेहऱ्याला लावण्याचे फायदे. फळे खाणे, हे आपल्या शरीरासाठी तसेच आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. फळांमधील विटामिन्स आणि गुणधर्म आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर ठरतात. तसेच फळांमध्ये विटामिन सी युक्त फळे खाल्ल्याने, आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. फळांमध्ये संत्र्याची साल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपण नेहेमी संत्री खातो, मोसंबी खातो, आणि त्यांचे टरफले फेकून देतो. पण मित्रांनो संत्र्याची साल आपल्या शरीरासाठी, आपल्या चेहर्यासाठी फार फायदेशीर असतात. हे अनेकांना माहिती नसते, त्यामध्ये भरपूर पोषक घटक द्रव्य असतात.
जे आपले चेहऱ्याचे सौंदर्य तेजस्वी व मुलायम बनवतात. त्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा भरभरून उपयोग करू शकतात. तर मग तो कशाप्रकारे व कशा रीत्या त्याचा वापर करावा, याबाबतीत अनेक जणांना माहिती नसते. चला, तर मग जाणून घेऊयात, की संत्र्याच्या सालीचा उपयोग चेहर्यासाठी कशाप्रकारे करता येतो? आणि त्याने कोणकोणते फायदे होतात? ते जाणून घेऊया !
संत्र्याची सालीची पावडर कशी तयार करावी ?
मित्रांनो, हे अगदी सोपे आहेत. संत्र्याची साली ची पावडर तयार करणे, अगदी सोप्या प्रकारे तुम्ही करू शकतात. त्यासाठी ज्यावेळी तुम्ही संत्री खातात, त्यावेळी त्याच्या साली एका ताटामध्ये भरून, तिला उन्हाळ्यामध्ये कडकडीत उन्हात पाच ते सहा दिवस वाळवून घ्यावीत. त्यानंतर मिक्सर ग्राइंडर मध्ये त्याची भुकटी करून ठेवावे, म्हणजेच पावडर करून ठेवावीत, व झाकण बंद डब्यांमध्ये फ्रीजमध्ये ठेवावेत. तीचा वापर तुम्ही कोणत्याही वेळी करू शकतात.
संत्र्याच्या सालीचा वापर चेहर्यासाठी कशा प्रकारे होतो ?
संत्र्याच्या सालीचा वापर तुम्ही चेहर्यासाठी निरनिराळे प्रकारे करू शकतात. चला, तर मग जाणून घेऊयात, की कशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
स्क्रब करू शकतात :
संत्र्याच्या सालीचे मध्ये विटामिन सी ची मात्र मुबलक प्रमाणात राहते. तसेच त्यामध्ये फायबरचा स्त्रोत मजबूत असल्यामुळे, ते चेहर्यासाठी फार फायदेशीर ठरते. जर तुमच्या चेहऱ्यावर मृदु त्वचा तसेच काळपटपणा आला असेल, अशा वेळी तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर घरगुती स्क्रब म्हणून करू शकतात. त्यासाठी तुम्हाला दूध एक चमचा+ संत्र्याच्या सालीची पावडर+ मध घेऊन ते पाच मिनिटे भिजवून ठेवावेत. त्यानंतर चेहऱ्याला सर्कुलेशन पद्धतीने, गोलाकार असा 15 ते 20 मिनिटे मसाज करून, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. त्यामुळे तुमचे चेहऱ्यावरील त्वचा लवकर निघते. शिवाय काळपटपणा आला असेल, तर तोही कमी होतो.
रंग उजळतो :
हल्ली धावपळीमुळे, तसेच वाढत्या प्रदूषणामुळे, तुमच्या चेहऱ्यावर त्याचे परिणाम होतात. त्यामुळे तुमचा रंग उन्हाने काळा होतो. अशा वेळी जर तुम्ही संत्र्याच्या सालीचा पावडरचा वापर केला, तर तुम्हाला त्यापासून खूप सारे फायदे होतात. त्यासाठी तुम्हाला नियमित हप्त्यातून तीन वेळेस, एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर+ त्यामध्ये मध+ चिमुटभर दूध+ चिमुटभर हळद- तसेच + एक चमचा चंदन पावडर, यांचे मिश्रण एकजीव करून, चेहर्याला पंचवीस ते तीस मिनिटे लावून ठेवावेत. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. असे तुम्ही केल्यास तुमचा रंगही उजळतो, शिवाय त्याच्या मुलायम व चमकदार होण्यास मदत मिळते.
चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी फायदेशीर ठरते :
शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, तसेच मासिक पाळीची अनियमितता, तसेच तरुण वयामध्ये येणाऱ्या, किशोरवयीन मुलांच्या मुलींच्या चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या, काळे डाग चट्टे पडतात. अशा वेळी जर त्यांनी घरगुती वापरामध्ये संत्र्याच्या सालीचा पावडरचा वापर केला, तर त्यासाठी ते फायदेशीर होते. त्यासाठी त्यांनी संत्र्याची साल त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ+ हळद- थोडं दूध यांचे मिश्रण एकजीव करून, ज्या ठिकाणी डाग आहेत, त्या ठिकाणी लावून ठेवावेत. असे तुम्ही नियमित केल्यास, चेहऱ्यावरील काळे डाग जाण्याचा मदत मिळते. शिवाय मुरूम व पुटकुळ्या कमी होतात.
डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात :
बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे, थकव्यामुळे, डोळ्याखाली काळी वर्तुळे भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. अशा वेळी जर तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्हाला गुलाब जल+ संत्र्याच्या सालीची पावडर ? काकडीचा रस+ कोरफड जेल यांचे मिश्रण एकजीव करून, नियमित डोळ्यांच्या खाली, काळी वर्तुळावर लावल्यास हप्त्यातून असे तीन वेळेस केल्यास, तुमचे डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात. किंवा संत्र्याच्या सालीची पावडर, गुलाब जल यांचे मिश्रण एकजीव करून, डोळ्याखाली वर्तुळ वर लावले, तरी त्यामुळे तुमचे डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी होतात.
सुरकुत्या कमी होतात :
हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोन्स बदलामुळे, वाढता ताणतणाव, या साऱ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर पडतो. त्यामुळे लवकर कमी वयात काही त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण दिसून येते. असे जर तुम्ही तुमच्या सौंदर्याच्या वापरासाठी संत्र्याच्या सालीचा वापर केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्ही नियमित हप्त्यातून दोन वेळेस संत्र्याच्या सालीचा पावडरचा लेप लावायला हवा.
त्यासाठी पावडर एक चमचा+एक चमचा बेसन पीठ+ चिमूटभर हळद+ अर्धा चमचा गुलाबजल+ अर्धा चमचा दूध +तीन ते चार थेंब मध यांचे मिश्रण एकजीव करून, हा पॅक नियमित लावल्यास, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या यांचे प्रमाण कमी होते. शिवाय तुमची त्वचा चमकदार व मुलायम होण्यास मदत मिळते. हा उपाय फार प्रभावशाली आहे करून बघा.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडरचे चेहर्यासाठी तुम्ही कशा प्रकारे उपयोग करू शकतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच जर कोणाला संत्रीच्या सालीपासून ऍलर्जी असेल, तर त्यांनी त्याचा वापर करताना, एकदा डॉक्टरांना विचारून घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेले तुम्हाला आवडला असेल, व आम्ही सांगितलेल्या लेख मध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर मित्रांनो तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत.
धन्यवाद !