मुलांची उंची किती वयापर्यंत वाढते

0
3019
मुलांची उंची किती वयापर्यंत वाढते
मुलांची उंची किती वयापर्यंत वाढते

मुलांची उंची

 तर आजकाल आपण बघत आहोत की प्रत्येकालाच आकर्षक दिसायचा आहे प्रत्येकाला सुंदर दिसत आहे आणि त्यामध्ये उंची क मोठी भूमिका बजावते. बऱ्याच वेळेस उंची कमी असल्यामुळे अनेक लोकांना वाटते कि ती आकर्षक दिसत नाही आहे किंवा त्यांचे तेवढे प्रभुत्व समोरच्यावर पडत नाही आहे. यामुळे बऱ्याच लोकांचा आत्मविश्वास देखील कमी होतो पण हे काही आपल्या हातात नसते प्रत्येकाच्या शरीराची वार वेगवेगळी असते. आता हेच बघा ना आपल्या हाताची बोटे देखील एक समान नाही मग प्रत्येक माणूस एकसमान कसा असू शकतो. कोणाची उंची कमी असू शकते किंवा कोणाची उंची जास्त असू शकते पण हा आपण आपली उंची वाढवण्यासाठी काय प्रयत्न जरुर करु शकतो.

                  आजचा मुख्य विषय म्हणजे मुलांची उंची कशी वाढवावी? आणि उंची कोणत्या वया पर्यंत वाढते. तर सर्वात पहिले म्हणजे आपल्याला मुलांची उंची थोडीफार वाढवता येऊ शकते ते म्हणजे सोपे व साध्या घरगुती उपायांनी तसेच त्यामध्ये काही व्यायाम देखील आहे जे तुम्ही रोजच्या रोज व घरच्या घरी केल्याने देखील तुम्हाला फरक जाणवू शकतो. याच प्रकारे आहारामध्ये देखील काय बदल केल्यास आपल्याला थोडाफार फरक जाणवू शकतो. आज याच विषयावर चर्चा करुया की मुलांची उंची वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो तसेच एक महत्त्वाचा मुद्दा देखील जाणून घेऊया की आपली उंची किती वयापर्यंत वाढते. चला तर मग जाणून घेऊया.

उंची किती वयापर्यंत वाढते

                 वैज्ञानिक अनुसार मुलींची उंची 18 वर्षे वयापर्यंत वाढते व मुलांची उंची किमान 21 वर्षापर्यंत वाढते पण बऱ्याच वेळेस याला काही अपवाद देखील ठरू शकतात. म्हणजेच बऱ्याच लोकांची उंची या वया आधी देखील थांबू शकते तर बऱ्याच लोकांची उंची या वयानंतर देखील वाढू शकते. कारण प्रत्येकाचे शरीर जसे वेगवेगळे असते तसेच प्रत्येकाच्या शरीरातील हार्मोन्स व शरीरात होणारे बदल देखील वेगवेगळे असतात ज्यामुळे आपल्या शरीराची उंची कमी जास्त असते.

वाचा  तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे व तोटे

मुलींची उंची वाढवण्यासाठी उपाय

                    साधारणता ५.४’ ते ५.६’  फुटची उंची आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे आणि प्रत्येकाला वाटते की आपली सरासरी उंची इतकी असावी. जेणेकरून आपण आकर्षक दिसेल चला तर मग जाणून घेऊया जर मुलींची उंची वाढवायची असेल तर आपण कोण कोणते उपाय करू शकतो.

मुलांची उंची वाढवण्यासाठी आहारामध्ये बदल करून बघा

                   बऱ्याच वेळेस आहारामध्ये बदल केल्यामुळे देखील आपल्या बऱ्याच समस्यांचे समाधान आपल्याला मिळू शकते. म्हणजेच आपण जर आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या व पोस्टीक पदार्थांचा समावेश केला तर जेणे करून आपली नुसते वजन वाढणार नाही तर आपली उंची देखील झपाट्याने वाढेल. कारण बरेच वेळेस फास्ट फूडचे सेवन केल्यामुळे वजन वाढते पण उंची वाढत नाही. पण तुम्ही जर का आहारामध्ये पालेभाज्या बरोबर दूध, दही, पनीर, अंडी, मास, मच्छी अशा पदार्थांचा देखील समावेश केला तर तुमची उंची वाढण्यास मदत होईल. पण आहारामध्ये बदल करताना याची काळजी घ्यावी कि आहारामधील बदल हा अठरा वर्षाच्या खाली असेल तर असा बदल करावा कारण 18 ते 21 वर्षानंतर मुला-मुलींची हाडे आडवी फुटायला लागतात ज्यामुळे त्यांचीच या वयामध्ये तुमची नाही वाढणार तर वजन वाढेल.

मुलांची उंची वाढवण्यासाठी कडधान्य समावेश करावा

                    आपल्या रोजच्या दिनक्रमात किंवा जेवणामध्ये कडधान्याचा समावेश करावा तसेच तुम्ही कडधान्याची उसळ देखील करून खाऊ शकता जेणेकरून तुमचे पोट देखील भरेल व तुमची उंची देखील वाढण्यास मदत होईल. तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचे कडधान्य खाऊ शकता पण मुख्यता मुंगचा समावेश तुमच्या आहारामध्ये केला तर तुमच्या शरीरासाठी ते फायदेशीर ठरेल.

मुलांची उंची वाढवण्यासाठी सोयाबीन आणि आवळा

                     सोयाबीन मध्ये 80 टक्के प्रोटीन असतो जे तुमच्या शरीराला याच्या विकासाकरता फार फायदेशीर ठरतात. तसेच आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणे मध्ये विटामिन असतात जे तुमचे केस व उंची वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरतात. म्हणून तुम्ही आठवड्यातून एकदा तरी सोयाबीनची सेवन केले पाहिजे तसेच तीन चार दिवसातून एक तरी आवळा खाल्ला पाहिजे.

वाचा  कडुनिंबाची पाने खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

मुलींची उंची वाढवण्यासाठी काही व्यायाम

                 आपण मुलींची उंची वाढवण्यासाठी काही उपाय बघितले किंवा त्यांचा शारीरिक स्वास्थ्य कसे असावे त्यांनी त्यांच्या आहारामध्ये काय समाविष्ट करावे हे जाणून घेतले. आता आपण जाणून घेऊया मुलींना उंची वाढवायची असेल तर ते घरगुती व घरच्या घरी कोणते व्यायाम करू शकतात तर मग जाणून घेऊया.

योगा करेल कमाल

                  तर योगा हा आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त मानला जातो कारण योगा मुळे बऱ्याच शरीराच्या समस्या दूर होतात व त्यांचे समाधान देखील लवकर मिळण्यास मदत होते. तसेच दिवसातून फक्त 30 ते 40 मिनिटे योग केला तरी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसून येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उंची वाढवण्यासाठी मुख्यता ताडासन आहे. जे तुम्ही सर्वांनी घरी नक्कीच करावे तर योगामध्ये सर्वात महत्त्वाचे अजून असे आसण आहेत जे तुम्हाला उंची वाढवण्यासाठी मदत करू शकता ते म्हणजे ताडासन उंची वाढवण्यासाठी हे सर्वात सोपे आसन आहे. तर सुरूवातीस तुम्ही ताठ उभे राहा त्यानंतर दोन्ही पाय एकमेकाला जोडून दोन्ही हात एकमेकाला जोडावे व दोन्ही हात डोक्याच्या वरच्या बाजूस नेऊन शरीर वरच्या बाजूस ढकलावे. तुम्हाला शरीरावर जेवढा ताण देता येईल तेवढा ताण देण्याचा प्रयत्न करावा. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला काही अजून  आसनांची नाव देणार आहोत जे असं तुम्ही घरच्या घरी करून तुमची उंची वाढवू शकता. पश्चिमोतांनासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन इत्यादी आसन जर तुम्ही घरी केले तर तुमची उंची वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर जर तुम्ही सूर्यनमस्कार देखील करत असाल तर तुमची उंची वाढण्यामध्ये कोणतीही प्रकारची बाधा येणार नाही.

सायकलिंग व रशीउडी, मल्लखांब

                  तर बऱ्याच लोकांना आढळून आले आहे की सायकलिंग केल्यामुळे त्यांची उंची ही झपाट्याने वाढली असं प्रत्येका सोबतच होतो असं नाही. पण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते म्हणून याचा सकारात्मक परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर दिसून येते फक्त फरक एवढाच असतो की कोणाला शरीरावर तो परिणाम जास्त दिसतो तर कोणाच्या शरीरावर परिणाम कमी प्रमाणात दिसतो. तसेच रशीउडी आणि मल्लखांब सारखे व्यायाम व खेळ खेळल्याने देखील मुलींची उंची वाढण्यास मदत होईल.

वाचा  गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व घरगुती उपचार

                    तर आज आपण जाणून घेतले मुलींची उंची वाढत नसतील तर त्याचे काय काय कारण असू शकतात. साधारणता मुलींची उंची कोणत्या वयापर्यंत वाढते याच बरोबर आपण बघितले जर मुलींची उंची वाढवायची असेल तर त्यांनी कोणकोणते कोणकोणते खेळ खेळले पाहिजे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here