झोपेत लाळ गळणे उपाय

0
1099
झोपेत लाळ गळणे उपाय
झोपेत लाळ गळणे उपाय

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत झोपेत लाळ गळणे यावर काही उपाय, धकाधकीचे जीवन त्यामुळे येणारा थकवा, तसेच अति प्रमाणात काम करण्यामुळे येणारा थकवा वैगरे इत्यादी. काही कारणामुळे आपण जेव्हा झोपतो तेव्हा एकदम शांत झोप लागत असते. काहीना एवढी शांत झोप लागते की सकाळीच जाग येते. परंतु, आपण झोपेत असताना लाळ गळते हे देखील आपल्या लवकर लक्षात येत नाही. जेव्हा ओठाच्या बाजूला आपल्याला ओले वाटते, तेव्हा आपल्या लक्षात येते की, झोपेत असताना आपली लाळ गळते. खरंतर आपल्या तोंडात लाळ तयार होत असते. ही एक सामान्य बाब आहे. कारण, तोंडतील लाळ ही आपल्या शरिरातील एक अविभाज्य घटक आहे.

तोंडातील लाळ यामुळे, आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. आपल्या आरोग्याच्या चुकीच्या सवयींमुळे देखील लाळ गळणे ही सवय देखील आपणास लागू शकते. लहान मुलाची लाळ गळणे हे तर स्वाभाविकच आहे. बराच वेळा जेव्हा लहान मुलांना दात येत असतात, तेव्हा त्याच्या तोंडातून लाळ गळण्याचे प्रमाण हे वाढत असते. परंतु, मोठ्यांच्या बाबतीत लाळ गळणे ही एक चुकीची सवय मानली जाते. जेव्हा आपण जागे असतो, तेव्हा आपल्या तोंडातून लाळ गळत नसते. कारण, तेव्हा लाळ ही तोंडात गिळली जात असते. परंतु, झोपेच्या दरम्यान आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा शिथिल झालेला असतो. त्यामुळे दिवसा आपल्या तोंडात तयार झालेकी लाळ ही आपण गिळून घेत असतो. परंतु, झोपेच्या वेळी तोंडातील लाळ हि न गिळता ती बाहेर येत असते. म्हणजेच ही क्रिया जेव्हा झोपेच्या दरम्यान होत असते, तेव्हा आपण तिला म्हणत असतो की लाळ गळणे.

      मित्रांनो, तोंडातील लाळ गळणे यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरू शकतात. आपल्या शरीराच्या आरोग्य बिघाडामुळे देखील लाळ गळणे ही सवय आपणास लागू शकते. लहान मुलांच्या तोंडातून लाळ गळणे याकडे दर्लक्ष केले जाते. कारण लहान मुलांच्या बाबतीत ती एक सामान्य गोष्ट म्हणून सोडली जाते. परंतु, मोठ्यांच्या बाबतीत ते हास्यास्पदच मानले जाईल. तर मित्रांनो, आज आपण झोपेत लाळ गळणे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.चला, तर मग झोपेत लाळ गळणे हे कोणत्या कारणांमुळे होऊ शकते? व त्यावर काय उपाय करता येईल? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवाल

झोपेत लाळ गळणे याची नेमकी कोणती कारणे असू शकतात?

     मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या बाबतीत झोपेत लाळ गळणे ही समस्या येत असते. परंतु, झोपेत असताना लाळ गळणे ही समस्या का येत असते? याबद्दल आपणास माहिती नसते.

     अनेक वेळा एखाद्या चुकीच्या पदार्थाचे सेवन झाल्यामुळे देखील आपल्या तोंडातून लाळ गळणे ही समस्या निर्माण होऊ शकते. जर एखादा गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर त्यामुळे देखील आपण झोपेच्या दरम्यान आपल्या तोंडातून लाळ गळण्याचे प्रमाण वाढत असते. अनेक वेळा आपल्याला सर्दी-खोकला या त्रासाला सामोरे जावे लागत असते. सर्दी खोकला झाल्यामुळे आपल्याला नाकाद्वारे श्वास घेण्यास त्रास होत असतो. आणि अशा वेळेस आपल्याला तोंडातून श्वास घ्यायला लागत असतो. तोंडातून श्वास घेताना देखील आपल्या तोंडातून लाळ गळणे ही समस्या उद्भवू शकते. जर आपल्याला टॉन्सिल संदर्भात जर समस्या असेल तर त्यामुळे देखील म्हणजेच टॉन्सिल्स वाढल्यामुळे देखील तोंडातून लाळ गळणे ही समस्या येऊ शकते.

झोप न लागल्यामुळे किंवा झोप अपूर्ण राहिल्यामुळे देखील तोंडातून लाळ गळणे ही समस्या येऊ शकते. तसेच, काहींना झोपेत बडबड करायची सवय असते, तर झोपेत बडबड करण्याच्या दरम्यान देखील तोंडातून लाळ गळणे ही समस्या येऊ शकते. एखाद वेळेस जर अपचन झाले अथवा आपले पोट साफ न झाले तर या कारणामुळे देखील झोपे दरम्यान तोंडातून लाळ गळणे ही समस्या येऊ शकते. अतिरिक्त ताण तणाव मानसिक तणाव डोकेदुखी इत्यादी सर्व कारणांमुळे देखील झोपेत तोंडातून लाळ गळणे ही समस्या येऊ शकते. तोंडातून लाळ गळणे ही समस्या येण्यामागची कारणे कोणती आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत तर तोंडातून लाळ गळणे ही समस्या येऊ नये यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

झोपेत लाळ गळणे यावर कोणते उपाय करता येतील?

      लहान मुलांच्या बाबतीत तोंडातून लाळ गळणे ही समस्या सामान्य मानली जाते. कारण, लहान मुलांना ज्यावेळी दात येत असतात, त्यावेळी त्यांच्या तोंडातून लाळ गळणे स्वाभाविकच आहे. परंतु, मोठ्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडली तर ते हसण्यासारखे होते. म्हणून झोपेत असताना तोंडातून लाळ गळू नये, यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो?  तर ते कोणते याबद्दल आता आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • जर तुम्हाला सारखे सारखे अपचन होत असेल अथवा पोट साफ न होण्याची समस्या होत असेल तर तुमच्या तोंडातून लाळ गळणे ही समस्या येत असते. त्यामुळे तुम्ही तुळशीची पाणी चाऊन खाल्ले पाहिजे. तुळशीचे पाने चावून खाल्ल्यावर त्यावर थोडे पाणी पिले पाहिजे त्यामुळे तुमची तोंडातून लाळ गळणे ही समस्या जाऊ शकते.
  • जेवण झाल्यानंतर एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडीशी आवळा पावडर टाकून ती व्यवस्थित एकत्रित करून घ्यावी आणि त्यानंतर एकत्रित झाल्यावर त्या पाण्याचे सेवन करावे असे केल्यामुळे तुमची झोपेत तोंडातून लाळ गळणे यापासून सुटका होण्यास मदत होऊ शकते. तसेच, जर तुम्ही आवळा पावडर पाण्यामधून घेत असाल जेवणानंतर तर ऍसिडिटी या समस्येपासून देखील तुमची सुटका होण्यास मदत होऊ शकते.
  • ज्या व्यक्तींना झोपे दरम्यान तोंडातून लाळ गळणे ही समस्या येत असेल त्या व्यक्तींनी तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्या पाहिजे. यामुळे त्यांची तोंडातून लाळ गळणे या समस्येपासून सुटका होऊ शकते.
  • जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर त्यामुळे देखील झोपे दरम्यान तोंडातून लाळ गळणे समस्या येत असते. तरी तुम्ही सर्दी व खोकला यासाठी व्यवस्थित उपचार घ्यायला हवेत. जेणेकरून तुमच्या तोंडातून लाळ गळणे ही समस्या बंद होऊ शकते.
  • झोपेच्या दरम्यान जर तुम्ही एकाच बाजूवर सारखे सारखे झोपत असाल तर तुम्ही बाजूदेखील चेंज करत राहायला हवे. जेणेकरून, तुमच्या तोंडातून लाळ गळणे ही समस्या येऊ शकणार नाही.
वाचा  वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामाचे प्रकार

तर मित्रांनो, झोपेच्या दरम्यान तुमच्या तोंडातून लाळ गळत असेल, तर वरील प्रमाणे उपाय तुम्ही करू शकतात. काही घरगुती उपचार केल्यामुळे तुमच्या तोंडातून लाळ गळणे हे बंद होऊ शकते. जर झोपेच्या दरम्यान तुमच्या तोंडातून लाळ गळत असेल, तर ते योग्य वेळी थांबवणे बरे ठरते नाहीतर, ते हास्यास्पद देखील होत असते. अथवा एक प्रकारची सवय देखील जडू शकते. म्हणून आपण योग्य वेळीच उपचार करणे आवश्‍यक ठरते. तसेच, वरील प्रमाणे उपाय करून देखील तोंडातून लाळ गळणे ही समस्या जात नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

     मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे व तोटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here