अशोकाच्या पानांचे फायदे

0
1716
अशोकाच्या पानांचे फायदे
अशोकाच्या पानांचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघुयात अशोकाच्या पानांचे फायदे याबद्दलची माहिती. आपण निसर्गाचे  सानिध्यात  राहतो. अशा वेळी, आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडे, आपण नेहमीच बघतोय. त्यामध्ये काही झाडे ही औषधी वनस्पती असतात. तर काही शोच्या असतात. तर काही झाडे ही आपल्या शरीरातील व्याधींवर गुणकारी असून, त्याचे उपयोग आपण निरनिराळ्या गोष्टींसाठी करू शकतो. त्यामध्ये अशोकाचे झाड आहे, हे सगळ्यांना ठाऊक असेलच. अशोकाची झाडे उंच असते व त्याची पानं लांबसर असते.

आपल्या संस्कृती मध्ये काही लोक अशोकाच्या झाडाची पूजा करतात. त्यांचा असा विश्वास आहे, की अशोकाचे झाडाची पूजा केल्याने, आपल्या घरात सुख-समृद्धी नांदते. अशोकाचे झाड हे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला दिसतील, पण अशोकाचे झाड हे आपल्यासाठी कशा प्रकारे उपयोगी ठरू शकते? हे अनेकांना माहिती नसते. तर मित्रांनो अशोकाचे झाड हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, या बाबतीत आज, आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, की अशोकाच्या झाडाचे फायदे आपल्या आपण कशाप्रकारे करून घेऊ शकतो? 

अशोकाच्या झाडा पासून होणारे फायदे ? 

मित्रांनो, अशोकाच्या झाडापासून आपल्याला फायदे होतात. पण ते नेमके कोणकोणते? हे अनेकांना माहिती नसते. चला, तर मग जाणून घेऊयात. 

स्त्रियांच्या मासिक पाळी मध्ये अति रक्‍तस्राव होत असेल तर फायद्याचे ठरते :

बऱ्याच वेळेला महिलांना मासिक पाळी मध्ये खूप रक्तस्राव होतो. त्यावेळी त्यांनी अशोकाच्या झाडाच्या पानांचा काढा प्यायला हवा. त्यामुळे अतिरक्तस्राव हा कमी प्रमाणात होऊन, तुम्हाला त्याच्या वेदना आणि त्रासही कमी होतो. त्यासाठी तुम्हाला वीस ते पंचवीस अशोकाची पाने स्वच्छ धुऊन, गरम पाण्यात ते पाने उकळून, थोडे कोमट झाल्यावर ते प्यावेत. त्यामुळे तुम्हाला पाळी विषयी तक्रारी कमी होतात. 

वाचा  जांभूळ पावडर चे फायदे

थांबलेली पाळी लवकर येण्यासाठी :

काही स्त्रियांची मासिक पाळी अनियमित असते, तसेच वेळेवर येत नाही, अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये अशोकाच्या झाडाच्या पानांचा उपयोग करायला हवा. त्यासाठी त्यांनी अशोकारिष्ट पावडर ही अशोकाच्या झाडा पासुन बनवलेली असते, ही पावडर तुम्ही एक चमचा दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावेत. त्यामुळे तुमची पाळी सुरळीत येण्यास मदत होते. 

चेहऱ्यावरील काळे डाग पुटकुळ्या व मुरूम जाण्याचे फायदेशीर ठरतात :

बदलता आहार, तसेच बदलती जीवनशैली, याचा परिणाम आपल्या शरीरातील समस्येवर होतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह ही शुद्ध नसेल, तर तुम्हाला चेहऱ्यावर पुटकुळ्या, डाग यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी तुम्ही अशोकाच्या पानांचा वापर करू शकतात. त्यासाठी तुम्हाला सात ते आठ अशोकाची पाने यांची पेस्ट करून, त्यामध्ये चिमूटभर हळद घालून, व मध घालून, याची पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावावेत. त्यानंतर थंड स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. असे हप्त्यात दोन-तीन वेळेस जरी केले, तरी डाग जाण्याची मदत मिळते. शिवाय रंगही उजळतो. 

ओटी पोट दुखीवर फायदेशीर ठरते :

बऱ्याच जणांना ओटी पोटामध्ये दुखण्याचे समस्या असतात, अशावेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये अशोका च्या पानांचा वापर केला, तर त्यांना फायद्याचे ठरते. असे यावेळी त्यांनी अशोकाच्या झाडाची पाने, व थोडी साल यांना उकळून ते पाणी  कोमट झाल्यावर प्यावे. त्यामुळे ओटीपोटात वेदना कमी होतात. हा उपाय करताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हे घ्या. 

स्त्रियांच्या गर्भाशयाला आलेली सूज कमी होते :

अशोकाची झाडे स्त्रियांसाठी बहुगुणी असते. ते स्त्रियांच्या मासिक पाळी विषयी, तसेच गर्भाशयाच्या मधील गाठी असो, किंवा गर्भाशयामध्ये सुज आलेली असो, त्यासाठी फार रामबाण उपाय आहे. जर तुमच्या गर्भाशयाला सूज आली असेल, अशावेळी तुम्ही अशोकाची सालीची पावडर एक चमचा +अर्धा चमचा साखर +अर्धा ग्लास दूध+ व अर्धा ग्लास पाणी यामध्ये, मिश्रण करून, ते गॅसवर उकळावेत, ते मिश्रण अर्धे होईपर्यंत आटवावेत. त्यानंतर कोमट झाल्यावर, ते प्यावेत. त्यामुळे तुमच्या गर्भाशयाला आलेली सूज कमी होते. 

वाचा  लहान मुलांना उलटी होणे उपाय

मूळव्याध व वाताच्या त्रासावर आराम मिळतो :

अशोका च्या पानांचा मध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे, ते आपल्याला फायदेशीर ठरते. तसेच अशोकाच्या झाडाची साल ही फार बहुउपयोगी असते.  जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल यासाठी, तुम्हाला अशोकाच्या झाडाची सालीची पावडर एक चमचा, हे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून, ते पाणी कोमट झाल्यावर प्यावेत. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. शिवाय मूळव्याधीचा व वाताचा त्रास कमी होतो. 

त्वचेच्या ऍलर्जीवर फायदेशीर ठरते :

मित्रांनो, अशोकाची झाडे फुले, तसेच त्याची साल, अशोकाच्या पानांचे बरेचसे फायदे आपल्यला होत असतात.जर तुम्हाला तुमच्या शरीरावर काही  ॲलर्जी झाली असेल, त्या जागी खाज येत असेल, तसेच लालसरपणा आला असेल, अशा वेळी जर तुम्ही त्याचा वापर केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्हाला अशोकाच्या झाडाची सालीची पावडर, चिमुटभर तुप किंवा खोबरे तेल मिक्स करून, या तुमच्या जागेवर ॲलर्जी झाली, त्या जागेवर लावावेत. त्यामुळे त्याची दाह व जळजळ कमी होते व तुम्हाला आराम मिळतो. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशोकाच्या पानांचे तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करताना, तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेल्या उपायांमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, व आम्ही सांगितलेला लेख हा तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here