नारळाचे दूध त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी

0
1068
नारळाचे दूध त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी
नारळाचे दूध त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी

नमस्कार, मित्रांनो हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये अवेळी खानपान, तसेच चहा कॉफी चे प्रमाण जास्त घेतल्यामुळे, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. तसेच बाहेरील वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर व त्वचेवर त्याचे परिणाम होतात. त्यामुळे तुमची त्वचा काळवंडते, तर काही जणांची त्वचा तेलकट होते. तर काही जणांची केस गळतात. काही जणांची त्वचा रुक्ष होते, तसेच त्यावर मुरूम व काळे डाग पडतात. डोळ्याखाली वर्तुळे पडतात. यासारख्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. नारळाचे दूध त्वचा आणि केसांचा सौंदर्यासाठी फार उपयुक्त ठरते.

तुम्ही जर तुमच्या आहारात नारळाच्या दुधाचा वापर केला, तर त्यापासून बहुगुणी फायदे तुम्हाला मिळतात. नारळ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. एकाच नारळापासून आपण  वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीराला फायदे करू शकतात. एक तर नारळाचे पाणी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती, एनर्जी देण्यास मदत करते. तसेच खवलेल्या नारळाची चटणी, आपण त्याचा वापर करतो. तसेच नारळाचे दुध पासुन आपण स्वीट डिश, मिठाई, तसेच सोलकढी मध्ये त्याचा वापर करतो. तसेच नारळाचे खूप शुद्ध खोबरेल तेल, आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच खोबरेल तेल केसांना लावल्याने आपल्याला खूप फायदे होतात.

तसेच नारळाचे दूध हे आपल्या शरीरासाठी तसेच त्वचेसाठी फार फायदेशीर असते. नारळाच्या दुधामधील गुणधर्म आपल्या त्वचेला निखारण्यास मदत करतात. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. शिवाय त्यामुळे तुमच्या त्वचेचे आजार असतील, तर त्यावर ही फरक पडतो. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत, की नारळाचे दूध आपल्या त्वचेसाठी कशाप्रकारे फायदेशीर पडते? तसेच त्याचा वापर तुम्ही तुमच्या आहारात व तुमच्या सौंदर्यासाठी कशा प्रकारे करू शकतात ? चला तर मग जाणून घेऊयात.

नारळाचे दूध त्वचेसाठी कसे फायदेशीर ठरू शकते ?

मित्रांनो नारळाचे दूध आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे घेऊन येते. चला तर मग जाणून घेऊयात, की कोणत्या  प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकतात. 

वाचा  श्वास घेताना त्रास होणे या समस्येवर घरगुती उपाय 

नारळाच्या दुधातील गुणधर्म :

मित्रांनो नारळाचे दूध आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. नारळाच्या दुधात विटामिन ए, बी, सी, इ यासारखे गुणधर्म असतात. तसेच त्याच्यात निकोटीन, थायमिन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, प्रोटिन्स कार्बोदके, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, यासारखे गुणधर्म असतात. तसेच त्यामधील इतकी गुणधर्म असल्यामुळे, आपल्याला त्याचे खूप फायदे होतात. 

तुमच्या रुक्ष (कोरडी) त्वचेवर फायदे मिळतात :

 हो नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन सी यासारखे गुणधर्म असल्यामुळे, आपल्याला त्याचे फायदे होतात. नारळाच्या दूधामध्ये सिग्धता निर्माण करणारे गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल, ड्राय असेल, अशा वेळी जर तुम्ही त्याचा वापर केला, तर तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला नारळाचे दूध हे तुमच्या त्वचेवर लावायचे आहे, आणि त्याने मसाज करायचा आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेत नैसर्गिक मुलायमपणा येतो. शिवाय त्या दुधातील सिग्धता तुम्हाला मिळते. शिवाय त्वचा मुलायम व चमकदार होण्यास मदत मिळते. 

केसांसाठी फायदे होतात :

बदलत्या वातावरणामुळे, तसेच उष्ण दमट हवेमुळे, शरीरातील हार्मोन्स इनबॅलन्स मुळे, त्याचा परिणाम तुमच्यात केसांवरही होतो. त्यामुळे केस अकाली गळणे, कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा होणे, तसेच टाळूची आग होणे, यासारख्या गोष्टींवर जर तुम्ही नारळाच्या दुधाचा वापर केला, तर तुम्हाला त्याचे फायदे होतात. त्यासाठी तुम्हाला केस धुण्याच्या अगोदर एक तास नारळाचे दूध तुमच्या केसांना लावून ठेवायचे आहे, व त्याने केसांना मसाज करायचा आहे. तसेच तुम्ही नारळाच्या दूधामध्ये विटामिन ची कॅप्सूल ही टाकू शकतात.

कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी हे गुणधर्म असल्यामुळे तुमच्या केसांना त्यातील पोषक घटक मिळतात. तसेच केसांमधील कोंडा जाण्यासाठी, तुम्ही नारळाचे दुध आणि त्यामध्ये लिंबाचा रस घालून केसांना 15 ते 20 मिनिटे मसाज करावा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवावेत. तुम्हाला लगेच फरक पडेल. शिवाय केसांना मुलायमपणा येतो. तसेच केस तुटणे, यासारख्या समस्या कमी होतात. तसेच तुमचे केसांना मजबुती येते, आणि तुमचे केस काळेभोर चमकण्याची मदत मिळते. 

वाचा  दुधी भोपळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

त्वचेवर काळे डाग असतील तर फायदेशीर ठरतात :

किशोर वयात येताना मुला-मुलींच्या त्वचेवर पुटकळ्या होतात. काळे डाग पडतात. मुरुमाचे डाग पडतात. तसेच त्यांना फोडल्यामुळे, त्याच्यावर चट्टे ही पडतात. अश्यावेळी जर तुम्ही नारळाचे दुधाचा वापर केला, तर तुम्हाला फायदे मिळतात. त्यासाठी तुम्हाला नारळाचे दूध+ मुलतानी माती +चिमुटभर हळद+ चंदन पावडर+ मध हे मिक्स करून, तो पॅक तुमचे चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावायचा आहे. असे हप्त्यातून तीन वेळेस जरी केले, तरी चेहऱ्यावरील पुटकुळ्या चे डाग हे जाण्यास मदत मिळते. शिवाय तुमची त्वचा चमकदार होते, आणि रंग ही उजळण्यास मदत मिळते. 

नारळाच्या दुधापासून तुम्ही घरगुती स्क्रब करू शकतात:

जर तुमची त्वचा काळवंडली असेल, तसेच त्यावर काळे डाग पडले असतील, तसेच ब्लॅक हेड्स, व्हाइट हेड्स असतील, अशा वेळी तुम्ही घरगुती नॅचरल स्क्रब करू शकतात. त्यासाठी तुम्हाला नारळाचे दूध घ्यावयाचे आहे. त्यामध्ये साखर टाकायची आहे, आणि त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ टाकायचे आहे, त्यांना एकजीव करून, नंतर ते तुमच्या चेहऱ्यावर पंधरा मिनिटे मसाज करायचा आहे. असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नॅचरली घरगुती स्क्रब होते, शिवाय तुमची त्वचा चमकण्याची मदत मिळते. तसेच त्वचेमधील ब्लॅक हेड्स व्हाइट हेड्स असेल, तर ते निघण्यास मदत मिळते. नंतर  स्क्रब केल्यानंतर, तुम्ही चेहरा स्वच्छ धुवावा. त्यानंतर  चेहऱ्यावर बर्फ लावावा. त्याने त्वचा चमकदार होते. 

त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी होतं :

हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. तसेच तेलकट-तुपकट पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात करतो. तसेच बाहेरचे प्रदूषणामुळे तुम्ही वयाच्या आधी लवकर म्हातारपण दिसायला लागतात. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण यायला लागते. अशा वेळी जर तुम्ही नारळाचा दुधाचा वापर केला, तर तुम्हाला फरक पडेल. कारण त्यामध्ये विटामीन यासारखे गुणधर्म हसल्यावर त्वचेला मुलायम पणा येतो. त्यासाठी तुम्ही नियमित करण्याच्या दुधाने चेहऱ्यावर मसाज करावा. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते. शिवाय चेहरा टवटवीत दिसतो व नॅचरली मॉइश्चरायझिंग काम होते. 

वाचा  ड्राई स्किन ची काळजी व त्यासाठी फेस वॉश

तुम्ही मेकअप रिमूव्हरसाठी त्याचा वापर करू शकतात :

हो, तुम्ही पार्टीला, कार्यक्रम ला जाण्यासाठी मेकअप करतात. तसेच घरी आल्यावर मेकअप करण्यासाठी, जर तुम्ही नारळाच्या दुधाचा वापर केला, तर तुम्हाला अगदी साधे आणि सोपे जाईल. व त्याचा त्रास होणार नाही. त्यासाठी तुम्हाला नारळाचे दूध त्यामध्ये कापसाचा बोळा घेऊन तुमच्या मेकअप काढायला फायदेशीर ठरते. त्यामुळे त्वचेला रॅशेश तसेच लाली ही येत नाही. आणि तुमचा मेकअप ही हळुवार निघण्यास मदत मिळते. 

नारळाचे दूध बनवण्याची पद्धत:-

नारळाचे दुध बनवण्यासाठी तुम्हाला ओला खवलेला नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला फोडून त्यामधील नारळ काढून, त्याला किसून, मिक्सरमध्ये धुऊन घ्यायचा आहे. त्यानंतर चाळणीच्या साह्याने, ते दूध गाळून तुम्हाला एका बॉटल मध्ये भरून ठेवायचे आहे. हे दूध फ्रीजमध्ये ठेवून, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकतात. तसेच नारळाचे दुध पिल्याने, तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. त्यामुळे नारळाचे दूध तुम्ही पिऊ ही शकतात.

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की नारळाचे दूध त्वचा, केसांसाठी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात. तसेच त्याचा वापर केल्याने त्यामधील कोणते गुणधर्म तुम्हाला मिळतात, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या, माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here