नमस्कार मित्रांनो हल्लीची जग हे विकसित जग बनलेले आहे. त्यामध्ये जो तो त्यांच्या विचारावर निर्भर असतो. तसेच आत्ताचे लहान मुलांमध्ये त्यांचे शारीरिक व बौद्धिक विकास कितीतरी पटीने वाढलेला आहे. आताची मुलं ॲक्टिव असतात. बोलण्यात हुशार असतात. तरबेज असतात. बुद्धिवान असतात, त्यांना आताचे दुनियेत मोबाइल, कम्प्युटर्स चे सगळे ज्ञान मिळते. परंतु त्यामुळे लहान मुलांना मोबाईल चे व्यसन लागण्याची शक्यता असते. आपल्या काळात असे काही नव्हते, आपले शाळा, घर, बाहेर, मैदानातील खेळ, शेतातले काम, विहिरी वरची पाणी काढण्याची मजा, यासारख्या गोष्टी आपल्यात होत्या. त्यावेळी, आपण आजीकडून गोष्टी ऐकायचे, विटी दांडू, फुटबॉल, क्रिकेट, लिगोर्ची, कबड्डी, लंगडी, पकडा-पकडी, आंधळी-कोशिंबीर, नदीकी- पहाड, माझ्या मामाच पत्र हरवले, यासारखे मैदानी खेळ आपण खेळायचे.
पण हल्लीची मुलं इंटरनेटच्या दुनियेत आहेत. त्यामुळे ते मोबाईलवर गेम खेळणं, कॉम्प्युटर गेम्स खेळणं, ऑनलाइन गेम खेळणे, यासारख्या गोष्टींमध्ये गुंतून गेलेले आहेत. तसेच त्यामागील कारण म्हणजे पालकांचे मुलांकडे लक्ष नसणे होय. खरंच आपण हल्ली धावपळीच्या युगामध्ये, आपण लवकर मुलांच्या हातात मोबाईल घेऊन देतो, आणि, मोबाईलच्या नादात त्यांना खाऊ घालतो, त्या वेळी ते काय खात आहे, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. मोबाईलच्या नादात जेवण करतात. तसेच रडायला लागला, की आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो. कुठे बाहेर जायचे, मोबाईल देतो. कोणी पाहुणे आले, की लगेच मोबाईल देतो.
यासारख्या गोष्टींमुळे मुलांना एक मोबाईल चे व्यसन लागलेले म्हणावे. मग अशावेळी मुलांना मोबाईल नाही दिले, की ते जिद्दपणा करतात. सारखे रडतात. आक्रोश करतात, तसेच मोबाईल मध्ये जास्त गुंतल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी येणे यासारख्या गोष्टी घडतात. अशा वेळी लहान मुलांना मोबाईल चे व्यसन असेल तर ते कसे सोडवावे ? याबाबत आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
मोबाईलचे व्यसन लागले हे कसे ओळखावे ?
मित्रांनो लहान मुलांना मोबाईल चे व्यसन लागले हे लगेच समजते, चला तर मग जाणू या त्याची कारणे ?
- मुलांना मोबाईल नाही दिला, की ते चिडचिड करतात.
- आपल्याला अटी घालतात, मोबाईल नाही दिला, तर मी हे करणार नाही.
- जेवायला नखरे करतात.
- मोबाईल नाही दिला, की खूप रडतात.
- आपल्याशी बोलत नाही. राग राग करतात.
- संपूर्ण घरात आरडाओरडा करतात.
- अभ्यास करायला नाही म्हणतात.
- मोबाईल नाही भेटला, की त्यांची चिडचिड होते, त्यामुळे त्यांना तापही येऊ शकतो.
मोबाईलच्या नादात मुलांना होणाऱ्या समस्या ?
- मुलांना मोबाईल चे व्यसन लागल्यास त्यांच्या डोळ्यातून सारखे पाणी येते.
- काही वेळेस तीव्र डोकेदुखी च्या समस्या हे होतात.
- तसेच मोबाईलच्या नादात मुले जेवत नाही.
- त्यांच्या अन्नपदार्थात लक्ष राहत नाही, त्यामुळे ते त्यांच्या अंगी लागत नाही. तसेच अन्नपदार्थ जाडसर खाल्ल्यामुळे, त्यांना अपचन सारख्या समस्या होऊ शकतात.
- मुलांना लवकर चष्मा लागतो.
- मुलांना डोळ्यातून पाणी येते, तसेच चष्म्याचा नंबरही वाढतो.
- मुलांची मोबाईल मध्ये गंमत बघत बघत सारखी पाठ दुखते, कंबर दुखते.
- मोबाईलचे नादात मुले एकाच जागेवर बसून राहतात, त्यामुळे त्यांचे वजनही वाढते.
- त्यांच्या मनाच्या स्थितीमध्ये सारखे- सारखे बदल घडतात, ते कधी कधी चिडचिड करतात, तर कधी हसतात, तर कधी राग राग करतात.
- तसेच मोबाईलच्या नादात त्याचा परिणाम झोपेवर ही होतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे मुलांना शारीरिक थकवा येतो.
- मोबाईल सारखा बघितल्यामुळे, डोळ्याखाली काळी वर्तुळे ही येतात.
मुलांना मोबाईलच्या दुनियेतून कसे बाहेर आणावे ?
मित्रांनो, आपण एकदाच मुलांना मोबाईलची सवय लावली, आणि त्यांच्या हातातून जर मोबाईल घेतला, की त्यांचा खूप राग-राग होतो. मग खूप पालकांना त्यांच्या मुलांची चिंता वाटू लागते, मग अशावेळी तुम्ही त्यांना मारायचे नाही. त्यांना शांतपणे समजून घ्यायचे. त्यांच्या मनातून मोबाईल चे भाव काढून टाकायचे, त्यांना हळू समजवायचे. तसेच मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगायचे. चला तर मग अजून काही माहिती जाणून घेऊयात.
अगोदर तुम्ही स्वतः मध्ये बदल करा :
हल्लीची मुलं खूप हुशार झालेले आहेत. ते दुसऱ्याचे अनुकरण लवकर करतात. त्यासाठी जर तुम्ही मुलांना मोबाईल चे व्यसन असेल, आणि जर तुम्हाला त्याचे व्यसन सोडायचे असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वतःला तुमच्यामध्ये बदल करून घ्यावा लागेल. कारण मुलं हे तुमचे अनुकरण करत असतात. कारण मोबाईल वर तुम्ही तासन्तास बोलत असणार, किंवा मोबाईलवर वेबसीरिज बघत असणार, किंवा तुम्ही सिरीयल बघत असणार, तर ते तुमची गंमत बघतात, आणि मग त्यांनाही त्यामध्ये उत्सुकता वाटते, त्यांनाही वाटते की, मी मोबाईल वर काहीतरी बघू! काही तरी खेळू ! या सारख्या गोष्टी त्यांना करावेसे वाटतात.
मान्य आहे, आता ची दुनिया मोबाईलची दुनिया आहे. तुम्हाला मोबाईल वरच ऑफिसचे काम, तसेच बँकिंग माहिती, सगळ्या कामाची माहिती, डिटेल्स, आपल्या मोबाईल मध्ये असतात. पण ती करताना तुम्ही घराबाहेर करा, कारण जर तुम्हाला मुलांची मोबाईलची सवयी मोडायची आहे, तर आधी तुम्हाला स्वतः मध्ये बदल करावा लागेल. तसेच तुम्ही साधा बटनाचा मोबाईल त्यांच्यासमोर वापरा, ऑफिसच्या कामाचा मोबाईल तुम्ही बाहेर किंवा मुलांच्या नजरेस येता कामा नये, अशा वेळी वापरावा. मुलांसमोर साधा मोबाईल वापरल्याने, त्यांनाही त्यात रस राहणार नाही, ते त्यांच्या कामात राहतील.
मुलांना मोबाईलचा तासाची सवय लावू नका :
तुम्हाला जर मुलांची मोबाईलचे सवयी मोडायची आहे, तर तुम्ही मुलं मोबाईल खेळत असताना त्यांच्या हातातून हिसकावून घेतात, आणि सांगतात, आता नाही भेटणार. दिवसातून फक्त संध्याकाळी एक तास भेटेल. मग त्यांना माहिती असते, की मोबाईल आपला केव्हा ना केव्हा तरी भेटणार आहे. त्यामुळे त्यांची सवय काही जात नाही. उलट त्यांची उत्सुकता अजूनच वाढते, त्यांच्या दुसऱ्या कामात रस लागत नाही, ते फक्त त्या वेळेची वाट पाहतात, की आता भेटेल, तेव्हा भेटेल, तर ही सवय त्यांची मोडा.
मुलांना आपल्या आठवणींचा खेळ खेळायला सांगा :
हो मुलांना मोबाईल एवजी, आपल्या काळातले गेम खेळायला सांगा. जसे की पकडापकडी, विटी दांडू आंधळी-कोशिंबीर, लंगडी, गोट्या या सारखे खेळ त्यांना खेळायला सांगा. हे नवीन खेळ जाणून मुलांना आनंद वाटेल. शिवाय ते खेळण्यात त्यांना रस ही वाटेल. तसेच तुम्ही त्यांच्यासोबत खेळल्याने त्यांना अजून मजा येईल, व त्यांचे मोबाईलवरून दुर्लक्ष होईल, हे खेळ खेळल्यामुळे त्यांना थकवा येईल. तसेच जेवण करून, लगेच शांत झोपतील.
मुलांना छान छान गोष्टी सांगा :
हो, मुलांना तुम्ही छान छान गोष्टी सांगा. वीरशिवाजीच्या, तसेच हनुमानाच्या, गणपतीच्या, कृष्णाच्या, तेनाली रामन, पंचतंत्र, तसेच भुताच्या, गोष्टी मुलांना खूप आवडतात. तसेच मुलांना तुम्ही कॉमिक्स आणून द्यावे. त्यामधील चित्रे बघून त्यांना आनंद होईल. तसेच मुलांना बैठे खेळ, जसे की लुडो, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, बिजनेस, बॅटमिंटन, हॉकी यासारखे खेळ खेळायला द्या. जेणेकरून त्यांचे मोबाईल वरचे दुर्लक्ष होते, व त्यांना आनंदही मिळतो. शिवाय हे खेळ खेळल्यामुळे ऍक्टिव्ह होतात. शिवाय गोष्टींची पुस्तके वाचल्याने त्यांना ज्ञान मिळते.
मुलांना त्यांच्या आवडीचे गोष्टींमध्ये गुंतवा :
मित्रांनो मुलांना मोबाईल व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आवडत असेल, तर अगोदर त्या जाणून घ्या. त्यांना खेळायचे गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल, तर ते करायला द्या. त्यांना पेंटिंगची आवड असेल, तर ती द्या किंवा काही कलात्मक गोष्टी त्यांना आवडत असेल, त्यांना गायनाची आवडत असेल, तर त्यामध्ये त्यांचे क्लासेस लावा. तर ते करायला द्या. त्या नादात ते मोबाईल विसरतात, आणि त्यांची ही सवय हळूहळू कमी होत जाईल.
मुलांना गावाकडचे वातावरण दाखवा :
शहरातील मुलांना गावाकडचे वातावरण हे माहिती नसते. अशा वेळी तुम्ही त्यांना गावाकडे फिरायला न्या, तसेच गावाकडील वातावरणामध्ये मिसळून मुलं खेळायला लागतात. तसेच गावाची मातीचा सुगंध, गावाकडचा पाऊस, गावाची जेवण, हे सगळं छान असते. त्यामुळे त्यांना त्याच रस वाटतो. तसेच गावाकडे गुर, म्हशी, शेळ्या, या प्राण्यांमध्ये त्यांना खेळायला आवडेल. तसेच गावाकडील मुलांचे शिक्षण तसेच गावाकडील काही लोकांची गरिबी हे बघून त्यांना माहिती पडेल, की आपल्यातला आणि त्यांच्यातला काय फरक आहे, त्यावेळी ते हळूच समजदार होतात. त्यांना या सगळ्या गोष्टींचे ज्ञान मिळते व मुले आपोआप शांत होतात. व त्यांचे मोबाईलच्या सवयी हळू जाण्यास मदत होते.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की लहान मुलांना मोबाईल चे व्यसन जडल्यास ते कशाप्रकारे सोडवावे. तसेच मुलं जर जिद्दपणा करत असतील, तर तुम्ही त्यांना मारू नका. रागवू नका. प्रेमाने समजावून सांगा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका वाटत असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद !