उन्हाळ्यात मेकअप कसा करावा

0
1097
उन्हाळ्यात मेकअप कसा करावा
उन्हाळ्यात मेकअप कसा करावा

नमस्कार, मैत्रिणींनो, लहान मुलींन पासून तर मोठ्यांना मेकअप करायला खूप आवडते. कोणताही कार्यक्रम असो, सण असो, वार असो, कुठे बाहेर जायचे, कॉलेजला, ऑफिसला, रिसेप्शन पार्टीला, बर्थडे पार्टीला, तसेच कोणी पाहुणे येणार आहे, तरीही आपण मेकअप करतो. मेकअप केल्यावर आपले लूक एकदम छान दिसते. तसेच मेकअप केल्यावर आपल्या चेहर्‍यावरील काळे डाग झाकले जातात. काही जण इतका डार्क मेकअप करतात, की अक्षरशः चेहऱ्यावर उमटतो. मेकअप करणे ही पण एक कला आहे. सहसा करून मेकअप साठी पावसाळा तसेच हिवाळा हे दोन ऋतू अगदी चांगले असतात. कारण त्यामध्ये मेकअप लवकर खराब होत नाही. पण समजा तुमची स्कीन तेलकट आहे, अशांना उन्हाळा फार कठीण जातो. कारण अशा वेळी जर तुम्ही उन्हाळ्यात मेकअप केला, की तुमच्या मेकअप वर सगळे विरजण येते.

कारण उन्हाळ्यामध्ये मेकअप लवकर खराब होतो. मग अशावेळी आपल्याला खूप टेन्शन येते. कारण उन्हाळा म्हटला, की लग्नसमारंभाची ही वेळ असते. मग लग्नसमारंभ असो, की बर्थडे पार्टी असो, आपल्याला जायला खूप टेन्शन येते. कारण त्यावेळी आपला मेकअप जास्त वेळ टिकून राहत नाही. कारण उन्हाळ्यामध्ये खूप घाम येतो, आणि घाम पुसून पुसून आपला सगळा मेकअप निघतो. त्यावेळी उन्हाळ्यात तुम्ही हलकासा मेकअप करायला हवा. आज आपण त्याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की उन्हाळ्यामध्ये मेकअप नेमका कशा प्रकारे करावा? चला तर मग जाणून घेऊयात ! 

उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची, काळजी कशी घ्यावी ? 

मैत्रिणींनो उन्हाळा म्हटला, की दमट हवेचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अशा वेळी आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. तसेच ज्यांची त्वचा तेलकट असते, अशा लोकांना उन्हाळा फार कठीण जातो. कारण उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल बाहेर येते. शिवाय त्यामुळे त्यांना मुरूम पुटकुळ्या लवकर होतात, आणि पुटकळ्या मुरूम झाल्यामुळे चेहऱ्यावर काळे डागही पडतात. अशा वेळी त्यांनी त्वचेची काळजी घ्यायला हवी.

वाचा  बेंबीतून पाणी येणे या समस्या ची वेगवेगळी लक्षणे व घरगुती उपचार :-

त्यांनी दिवसातून त्वचेला चार ते पाच वेळेस थंड पाण्याने धुवायला हवेत. त्यानंतर चेहरा कोरडा करून, घ्यावा उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला क्रीम जास्त प्रमाणात लावू नये. कारण त्वचेमधील रोम छिद्रे, क्रीम लावल्यामुळे बंद पडतात. त्यामुळे पुटकुळ्या लवकर होतात. तसेच जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग मुरूम डाग असतील, तर तुम्ही , काकडीचा गर, पपई, कोरफडचा गर, चेहऱ्यावर लावायला हवा. ते लावल्यामुळे त्याची जळजळ होत नाही. शिवाय पुटकुळ्या असेल, तर त्या ठिकाणी ही आराम मिळतो. 

मेकअप करताना ही काळजी घ्‍या ? 

जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात किंवा कुठे जायचे असेल, आणि मेकअप करायचा असेल, तर त्या पूर्वीही काळजी घ्या, म्हणजे तुमचा मेकअप टिकून राहील. 

मेकअप करताना फाउंडेशन चा वापर टाळावा :

 उन्हाळ्यामध्ये मेकअप करताना, तुम्ही शक्यतो फाउंडेशन चा वापर टाळावा. कारण जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि त्यावर तुम्ही फाउंडेशन लावत असाल, तर तुमचा मेकअप लवकर खराब होण्यास मदत मिळते. अशासाठी तुम्ही फाउंडेशन  न वापरता तुम्ही नॅचरली मॉश्चरायजरचा वापर करावा. त्यासाठी तुम्ही टींटेड मॉश्चरायजर वापरू शकतात. कारण त्यामध्ये तुमची त्वचेवर मेकअप टिकून राहतो, शिवाय त्याच्यात फाऊंडेशनचे गुणधर्मही असतात. तसेच फाउंडेशन मध्ये ओलसरपणा टिकवून ठेवण्याचे गुणधर्म असतात. 

उन्हाळ्यात वाटरप्रूफ मेकअप करावा :

हो, उन्हाळ्यात जास्त करून शरिरावरील घाम बाहेर निघतो. अशावेळी तुम्ही वॉटरप्रूफ मेकअप करायला हवा. जेणेकरून तुमचा मेकअप खराब होणार नाही. तसेच, तुम्ही लिपस्टिक, मॉइस्चरायझर, क्रीम, आयशाडो, पावडर यासारख्या गोष्टी घेताना, तुम्ही खात्री करून आणि वॉटरप्रूफ घ्याव्यात. कारण त्या गोष्टी चेहऱ्यावर घाम आला तरी पसरत नाही. 

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर प्रायमर लावा :

उन्हाळ्यात एकदा का तुम्ही चेहऱ्यावर मेकअप केला की, तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी मेकअप करण्यापूर्वी जर तुम्ही चेहऱ्याला प्रायमर लावला आणि मग मेकअप केला, तर तोच सेट होतो आणि मेकअप खराब होत नाही. शिवाय तुमचा मेकअप अधिक काळ टिकून राहण्यास मदत मिळते. 

वाचा  निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट किती असावे

आय-लायनर आय शॅडो वापरतानाही काळजी घ्या :

हल्ली आयलायनर लावण्याची पद्धत अगदी डार्क आणि लांबसडक असते. ज्यावेळी तुम्ही आय-लायनर लावणार, त्यावेळी ते वॉटरप्रूफ असल्याची खात्री करूनच लावा. तसेच आयशॅडो लावताना, तुम्ही अगदी लाईट वेट वापरा, ज्यामुळे तुमचा उन्हाळी लूक अगदी छान दिसतो. 

लिपस्टिक चांगली वापरा :

लिपस्टिक वापरताना नेहमी वॉटरप्रूफ वापरावी. कारण उन्हाळ्यामध्ये सारखा घाम येतो, शिवाय आपल्याला सारखी पाण्याची तहान लागते, अशावेळी तुम्ही बाहेर कोणत्याही कार्यक्रमात गेले असाल, तर लिपस्टिक वापरताना वाटरप्रूफ लावायची. जेणेकरून ती लवकर निघत नाही. शिवाय लिपस्टिक लावताना तुम्ही लाईट वेट, पेस्टल तसेच हलक्‍या शेड्स ची वापरावी. तसेच लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही दिवसभरात ओठांना लिप बाम लावून ठेवावा. त्यामुळे ओठांना नरमाई राहते. 

चेहऱ्याला हे पावडर लावा :

मैत्रिणींनो काहीजणांना मेकअप करताना भरपूर पावडर लावायची सवय असते, पण उन्हाळ्यामध्ये पावडर लावणे म्हणजे आपला मेकअप खराब होणे होय. कारण उन्हाळ्यामध्ये त्वचेला सारखा घाम येतो, आणि तुम्ही जर पावडर लावले, तर ते चेहऱ्यावर उमटते, मग मेकअप मध्ये त्याचे विरजण पडते. अशा वेळी तुम्ही पावडर तुमचा मेकअप पूर्ण करण्यासाठी ट्रान्सल्युसण्ट पावडर चेहऱ्यावर लावावे. जेणेकरून तुमचा मेकअप पूर्ण होतो. ही पावडर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर त्याची चमक येते आणि तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच लूक येते. 

तसेच टिशू पेपर सोबत बाळगा :

उन्हाळ्यामध्ये सारखा घाम येतो, आणि जर तुम्ही मेकअप केला असेल, तर तो पुसून-पासून खराब होतो, अशा वेळी तुम्ही तुमच्या सोबत टिशू पेपर बाळगावा. जरी तुम्ही हा लाइटवेट मेकअप केला आणि तुम्हाला घाम आला, तर असेही तुम्ही टिशू पेपरने चेहऱ्यावरील घाम हळुवारपणे टॅपिंग करावा. त्यामुळे तुमच्या मेकअपही निघत नाही. 

हेअर स्टाईल :

सहसा करून आता  हेअर स्टाईल चा जमाना आहे, वेगवेगळे हेअर स्टाईल्स आपल्याला बघायला मिळतात. पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही हेअर स्टाईल शक्यतो, आंबोडा पॅटर्नमध्ये करावी. कारण तुमचे केस व्यवस्थितपणे राहतात. वरचे हेअर स्टाईल मध्ये केस बांधलेले राहीले की मानेला ही घाम येत नाही. आला तरी पुसायला त्रास होत नाही, आणि हेअरस्टाईल अगदी छान शोभून दिसते. तसेच उन्हाळ्यामध्ये हेअर स्टाइल करताना शक्यतो मोकळे केस सोडणे टाळावे. केस बांधलेले राहिले, किंवा, वेणी राहिली तर तुम्हाला जास्त घामाचा त्रास होत नाही. व सारखी चीक-चीक ही होत नाही. 

वाचा  पोटात पाणी होण्याची कारणे आणि उपाय

उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर हे काळजी घ्या ? 

उन्हाळा ज्यावेळी तुम्ही कोणत्या कार्यक्रमला, लग्नसमारंभात बाहेर जातात, आणि मेकअप करून जातात. त्यावेळी बाहेरून आल्यावर तुम्ही घरी आल्यावर थोडा वेळ शांत बसावे, नाहीतर कोणी-कोणी उन्हाळ्यात उन्हातून घरी आल्यावर लगेच, थंड पाण्याने चेहरा धुतात. त्यामुळे थंड गरम मुळे आपल्याला त्रास होतो. त्यामुळे उन्हातून आल्यावर लगेच थंड पाण्यात जाऊ नये. तसेच तुम्हाला तुमचा मेकअप काढण्यासाठी शक्यतो, तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करावा, किंवा नीम ह हर्बल यासारख्या फेशवाॅस ही वापरू शकतात. कारण जर तुम्ही मेकअप लवकर नाही काढला, तर  तुम्हाला पिंपल्स होण्याच्या समस्या भरपूर होतात. शिवाय मेकअप काढल्यावर तुम्ही चेहऱ्याला काहीही लावायचे नाही. फक्त गुलाब जल लावून चेहरा तसाच राहू द्यायचा. त्यामुळे चेहऱ्याला त्याचे पोषक तत्व मिळतात व चेहरा ग्लोइंग करण्यास मदत मिळतो. 

चला, तर मग मैत्रिणिनो आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात तुमचा मेकअप कसा करावा, आणि तो टिकून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा करावा, हे सांगितले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये तुम्हाला शंका असतील, तर तुम्ही एखाद्या पार्लर स्पेशलिस्ट कडेही विचारू शकतात. किंवा त्यांच्याकडूनही करून घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये तुम्हाला काही शंका-कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावेत. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here