कोरफडीचे फायदे

0
639
कोरफडीचे फायदे
कोरफडीचे फायदे

नमस्कार मित्रांनो. आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशा अनेक प्रकारची झाडे असतात की ज्यामुळे आपल्याला बहुगुणी फायदे होत असतात. निसर्ग म्हटला तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती या भरपूर प्रमाणात असतात. आणि आयुर्वेदिक वनस्पतींचे आपल्या आरोग्यासाठी बहुगुणी फायदे ठरत असतात. अगदी लहानशा वनस्पतीपासून तर मोठा झाडापर्यंत प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य असते. प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगळ्या असून त्याचे फायदे देखील होत असतात.

त्यातीलच एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणजेच “कोरफड” ही होय. हो मित्रांनो, कोरफड ही तर सर्वांना ठाऊक असणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. बरेच लोक हे त्यांच्या बागेच्या परिसरात कोरफड आवर्जून लावत असतात. तर काहीजण हे त्यांच्या गॅलरीमध्ये कुंडीमध्ये कोरफड वनस्पती लावतात. अनेकांच्या घरोघरी तुम्हाला कोरफड बघायला मिळेल. ही वनस्पती काटेरी स्वरूपाची असते. कोरफडीचे फायदे देखील भरपूर प्रमाणात असतात.

कोरफड ही वनस्पती छोटी असते परंतु याचे भरपूर प्रमाणात आपल्याला फायदे होत असतात. अनेकजण बाजारातून एलोवेरा जेल विकत आणत असतात परंतु, जर घरात आपण कोरफड लावलेली असेल आपल्याला कोरफडीच्या ताज्या रसाचा उपयोग करून घेता येईल. कोरफडीचे रसाचा केसांसाठी त्वचेसाठी भरपूर प्रमाणात फायदा होत असतो. तसेच आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी देखील आपण कोरफडीचे रस सेवन करू शकतो. अर्थातच कोरफडीचे रस सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रकारचे फायदे होत असतात. तर मित्रांनो, आज आपण कोरफडीचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, कोरफडीपासून आपल्या कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

कोरफडीचे फायदे

मित्रांनो, प्रत्येकाच्या घरोघरी आपला कोरफड ही  आयुर्वेदिक वनस्पती बघायला मिळते. कोरफड हे एक आयुर्वेदिक वनस्पती असून तिचे बहुगुणी फायदे आपल्याला होत असतात. कोरफडीचे झाडांना बारीक बारीक काटे असतात. बाजारातून कोरफड जेल विकत आणण्यापेक्षा घरगुती कोरफडीच्या ताज्या रसाचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. तर मित्रानो या बहुगुणी आयुर्वेदिक कोरफडीचे आपल्या एक ना अनेक प्रकारचे फायदे होत असतात त्याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

कोरफडीचा आपल्या त्वचेसाठी फायदे

अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या कोरफड चा वापर आपण आपल्या त्वचेसाठी करू शकतो. कोरफडीचा रस त्वचेला लावल्यामुळे आपली त्वचा हे मऊ व मुलायम होण्यासाठी मदत होत असते. त्यासाठी सर्वप्रथम कोरफड तोडल्यावर ती स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर त्याचे हळुवारपणे काटे काढून चमच्याच्या साह्याने कोरफडीचा रस एका वाटीत काढून घ्यावा. आणि या कोरफडीच्या रसाचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर करावा. परंतु कोरफडीचा रस चेहऱ्याला लावण्याचे पूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा आणि त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर व मानेवर कोरफडीचा रस लावून 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्यावे. आणि चेहरा धुणे आधी चेहऱ्याला पाच मिनिटे सर्कुलर मोशन मध्ये मसाज करावा. आणि नंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्यातून टाकावा. असे तुम्ही नियमित केल्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होईल. तुमच्या चेहऱ्यावरील काळवंडलेला भाग निघून तुमचा चेहरा स्वच्छ होण्यास मदत होईल.

वाचा  नाकावर फोड येणे या समस्या वर घरगुती उपाय

त्याचप्रमाणे चेहऱ्यावर सुरकुत्या देखील नाहीशा होतील. याचा अजून जास्त फायदा होण्यासाठी तुम्ही कोरफडीचा रसामध्ये एक विटामिन ई कॅप्सूल टाकायला हवी. आणि ती व्यवस्थित एकत्र करून तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम म्हणून देखील याचा वापर करू शकतात. असे नियमित केल्यामुळे तुमचा चेहरा टाईट होण्यास मदत होईल. तसेच या क्रीम चा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील पडणार नाहीत. आणि चेहर्‍यावर जर काळे डाग असतील ते देखील निघून जाण्यास मदत होऊ शकेल. कोरफडीच्या रसाचा नेहमीच चेहऱ्यावर वापर केल्यामुळे पिंपल्स देखील येणार नाहीत. तसेच धूम्रपान मुळे जे रोम छिद्र मोठे झालेले असतात ते रोम छिद्रे कमी होण्यास देखील कोरफडीच्या रसाचा उपयोग होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचे त्वचा स्वच्छ मऊ मुलायम आणि डाग विरहित ठेवायचे असेल तर तुम्ही नियमित तुमच्या चेहऱ्याला कोरफडीचा ताजा रस लावायला हवा.

कोरफडीच्या रसाचे केसांसाठी फायदे

मित्रांनो आपल्या त्वचेसाठी कोरफडीचा रस हा किती फायदेशीर ठरतो हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. अनेक जण केसान संदर्भात समस्या निर्माण होत असतात. केस गळती होणे, केसांची वाढ न होणे, केस निस्तेज होणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस अर्ध्यातून तुटणे अशा एक ना अनेक समस्या केसान विषयी येत असतात. परंतु कोरफड एक आणि फायदे अनेक असेच म्हणावे लागेल. जर तुम्हाला तुमच्या केसान संदर्भात समस्या येत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या केसांना कोरफड विचार रसाचा वापर करू शकतात. जर तुमचे केस निस्तेज झाले असतील तर तुम्ही कोरफडीचा रस केसांना लावायला हवा. त्यासाठी सर्वप्रथम कोरफड स्वच्छ धुऊन त्याचा रस एका वाटीमध्ये काढून घ्यावा. त्यामध्ये तीन ते चार चमचे नारळाचे तेल टाकून घ्यावे. आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. याचा उपयोग तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर याचे बरोबर फायदे होऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केसांच्या मुळाशी या तेलाने मसाज करायला हवी. आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने केस धुऊन टाकावे. असे तुम्ही नियमित केल्याने नक्कीच मला तुमच्या केसात जाणवून येईल. तुमचे केस हे मऊ मुलायम व चमकदार होऊ लागतील.

वाचा  नाकावर तीळ असणे शुभ की अशुभ

जर तुम्हाला तुमच्या केसांची गळती थांबावी असे वाटत असेल तर, यासाठी देखिल तुम्ही कोरफडीचा रसाचा वापर करू शकतात. ताज्या कोरफडीचा रस एका वाटीमध्ये काढून घ्यावा. त्यामध्ये नारळाचे तेल तीन ते चार चमचे घालावे. नंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे एरंडेल चे तेल टाकून घ्यावे. आणि अजून जास्त फायदा होण्यासाठी विटामिन च्या दोन कॅप्सूल टाकून घ्याव्यात. हे व्यवस्थित एकजीव करून गॅसवर मंद आचेवर कोमट करून घ्यावे आणि या तेलाने तुमच्या केसांच्या मुळांशी मसाज करावी. याचा जास्त फायदा होण्यासाठी तुम्ही हे तेल रात्री झोपण्यापूर्वी लावावे. आणि रात्री शक्य होत असेल तर दिवसा देखील याचा वापर तुम्ही करू शकता.

हे तेल लावल्यानंतर केसांना व्यवस्थित प्रकारे मसाज दिल्यानंतर एक तास भर ते तसेच राहू द्यावे आणि त्यानंतर के स्वच्छ पाण्याने व माईल्ड शाम्पू ने धुऊन टाकावेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन-चार वेळा करायला हवा. हा उपाय तुम्ही सतत केल्यामुळे नक्कीच तुमच्या केसांमध्ये मोठा फरक जाणून येण्यास मदत होईल. म्हणजे तुमच्या केसांची गळती थांबविण्यास मदत होईल त्याशिवाय केस लांब सडक देखील होण्यास मदत होईल. आणि तुमचे नुसतेच केस हेदेखील चमकदार होऊ लागतील. जर तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या केसांसाठी कोरफडीचा रसाचा वापर करून बघू शकतात.

कोरफडीच्या आपल्या आरोग्यासाठी फायदे

मित्रांनो कोरफडीच्या रसाचा आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी कसे फायदे होऊ शकतात हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. त्या व्यतिरिक्त आपण कोरफडीचा रसाचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदा करून घेऊ शकतो. अनेक जणांना अपचनाची समस्या निर्माण होत असते. आपले वचन व्यवस्थित व्हावी यासाठी आपण कोरफडीच्या रसाचे नियमित सेवन करायला हवे जेणेकरून पचन क्रिया सुलभ होण्यास मदत होईल त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी देखील वाढणार नाही. व वाढलेले वजन देखील योग्य प्रमाणात होण्यास मदत होईल.

तसेच कोरफडीच्या रसाचा सर्दी खोकल्यासाठी देखील उपयोग होत असतो कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यामुळे सर्दी खोकल्यापासून देखील आपला आराम मिळण्यास मदत होईल. कारण कोरफडी चे रसामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येत असतात. जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. शिवाय कोरफडीच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक ठरत असतात. अनेक जण संधिवाताची देखील समस्या होत असते. काहीजण लवकर संधिवात होतो तर काही जणांना वयोमानानुसार ही समस्या येत असते. तर संधिवात होऊ नये यासाठी देखील कोरफडीच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरत असते. म्हणून नियमित करायचा रसाचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून भविष्यात होणारा संधिवात यापासून आपण दूर राहू शकतो.

वाचा  स्वप्नात बिछाना दिसणे शुभ की अशुभ

कोरफडीचा रस नियमित सेवन केल्यामुळे आपण पित्ताच्या त्रासापासून देखील दूर राहू शकतो. तसेच कोरफडीच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील घातक विषारी पदार्थ बाहेर पडण्यास देखील मदत होत असते. कोरफडीच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे डायबिटीस सारखे समस्येपासून देखील आपण दूर राहू शकतो. अनेक जणांना कोलेस्ट्रॉल विषयी समस्या येत असते तर त्यासाठी देखील कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने फायदे होऊ शकतात. तसेच कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यामुळे आपण मूळव्याध या समस्ये पासून देखील दूर राहू शकतो.

अनेकजण ऍसिडिटी होत असते. तर ऍसिडिटी होऊ नये या समस्येपासून आपण दूर रहावे यासाठी देखील कोरफडीचे रसाचे सेवन फायदेशीर ठरते. थोडक्यात म्हटलं तर कोरफडीचे रसाचे नियमित सेवन केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. तसेच कोरफड हे एक आयुर्वेदिक वनस्पती असून या वनस्पतीच्या रसाचे सेवन केल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड-इफेक्ट देखील होत नाहीत. तर मित्रांनो तुम्हाला देखील आजारांपासून दूर राहायचे असेल तर नक्कीच मी कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

जाणून घ्या : वेलटोडा खाण्याचे फायदे

कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती बहुगुणकारी असून कोरफडीच्या रसाची नियमित सेवन केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. शिवाय, कोरफडीच्या रसाची आपल्या त्वचेसाठी देखील अनमोल फायदे होत असतात. आणि केसांच्या समस्यांपासून देखील आपण कोरफडीचा रस वापर केल्यामुळे दूर राहू शकतो. “छोटीशी कोरफड परंतु फायदे बहू अनमोल” तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही देखील कोरफडीचा रसाचा नक्कीच वापर करून बघू शकतात. आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरफड ही खूपच लाभदायक आपल्याला ठरू शकते.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळू शकतात.

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here