उन्हाळ्यामध्ये कपडे कोणते व कशाप्रकारे घालावे

0
656
उन्हाळ्यामध्ये कपडे कोणते व कशाप्रकारे घालावे
उन्हाळ्यामध्ये कपडे कोणते व कशाप्रकारे घालावे

उन्हाळा म्हटला की आठवता म्हणजे त्या सुट्ट्या. तसेच लहान मुलांना त्यांच्या शाळेला सुट्ट्या लागतात सर्व लोक आपापल्या गावी जातात. किंवा काही लोक उन्हाळ्याच्या सुट्टी खेळण्यांमध्ये, बांगड्यांमध्ये घालवतात. तसेच उन्हाळ्यामध्ये बघायला गेले तर अनेक लग्नसमारंभ देखील असते. यामध्ये प्रश्न पडतो तो कपड्याचा, की कोणत्या प्रकारचे कपडे आपण वापरावे. कारण उन्हाळ्यामध्ये कपडे आपण जर गट्ट बसणारे  घातले तर आपल्या त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे आपल्याला अनेक त्वचेचे आजार देखील येऊ शकता. पण बर्‍याच लोकांना याचे गांभीर्य समजत नाही आणि ते त्यांना हवे तसे कपडे घालतात. 

पण त्यांनाही समजणे फार गरजेचे आहे की जे कपडे घालत आहे. त्याचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत आहे. म्हणजे जर का त्या कपड्यांपासून त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होणार असेल. तर त्यांनी त्वरित व त्यांची पद्धत बदलली पाहिजे. तर मित्रांनो आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. की नक्की उन्हाळ्यामध्ये आपले कपडे कसे असावे तसेच कोणत्या प्रकारे घालावे चला तर मग बघुया. 

उन्हाळ्यात कसे कपडे घालावे ?

चला तर मग आपण जाणून घेऊया की नक्की आपण उन्हाळ्यामध्ये कसे कपडे घातले पाहिजे चला तर मग बघुया.

गडद रंगाचे कपडे वापरू नये :

उन्हाळ्यामध्ये कपडे वापरताना हे उष्ण रंगाचे वापरू नये. उष्ण रंगाचे कपडे वापरल्यास त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. तो अशाप्रकारे की जर तुम्ही उष्ण रंगाचे कपडे परिधान केले तर जसे तुम्ही उन्हा मध्ये जाल किंवा उन्हाळ्यामध्ये कुठे काम कराल तर, उष्ण रंगाचे कपडे हे सूर्याचे किरण शोषून घेतील. यामुळे तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो. तसेच घामोळ्या घामाचे इन्फेक्शन अशा समस्यांना देखील तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते.

वाचा  स्वप्नात शिंगाडे दिसणे शुभ की अशुभ!

याच्या उलट म्हणजे तुम्ही जर शीत रंगाचे कपडे वापरले म्हणजेच पांढरा किंवा असे रंग जे कमी उष्णता शोषून घेतात जसं की पांढरा रंग हा जर तुम्ही उन्हामध्ये घालून गेले किंवा उन्हाळ्यामध्ये पांढर्‍या रंगाचे कपडे घालून काम केली तर तुम्हाला एवढी उष्णता भासणार नाही. तसेच सूर्याच्या किरणांमुळे देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण जसे सूर्याची किरणे ह्या पांढऱ्या कपड्यावर पडतील तर बरीच की किरणे या कपड्यांमध्ये शोषली जाणार नाही. म्हणजेच तुम्हाला घाम कमी येईल घामाचा इन्फेक्‍शन होण्याची संभावना देखील कमी होईल.

फिट कपडे घालू नये :

बरेच लोकं चांगले दिसण्यासाठी फिट कपडे घालतात. पण उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही फिट कपडे घालत असाल तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या शरीराला होऊ शकतो. याच प्रकारे जर तुम्ही दिवसभर फिट कपडे घालत असाल फिट पॅन्ट घालत असाल तर तुम्हाला नक्कीच घामाच्या इन्फेक्शनची संभावना असू शकते. कारण फिट कपडे घातल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हवेचे संचार कमी होते व आपल्या त्वचेमध्ये आणि कपड्यांमध्ये जर हवा जायला जागा नसेल सतत त्वचेला ते कपडे चिटकून राहतील यामुळे तुम्हाला त्वचेचा इन्फेक्शन चा देखील धोका अधिक होऊ शकतो.

लांब हाताचे कपडे घालू नये :

बरेच वेळेस अनेक वेगळ्या प्रकारचे फॅशन हे मार्केटमध्ये येत असतात. यामध्येच काही लोक लाब हाताचे कपडे घालतात. असे केल्यामुळे त्यांच्या हातांना ढोपराच्या बाजूस इन्फेक्शन्स होऊ शकते. तसेच अंडर आम मध्येदेखील इन्फेक्शन चा धोका उद्भवू शकतो म्हणून उन्हाळ्यामध्ये लाब हाताचे कपडे घालने टाळावे.

जड व जाडसर कपडे टाळावे :

उन्हाळ्यामध्ये नेहमी सुती कपडे वापरावे म्हणजेच असे कपडे वापरावे ज्यामधून हवा येत जात राहिल. ज्यामुळे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. याचप्रकारे जड कपडे घालू नये. ज्यामुळे तुमच्या माने जवळील त्वचेला देखील हानी पोहोचणार नाही किंवा त्वचा लाल देखील होणार नाही. अनेक वेळेस जड कपडे घातल्याने आपल्या माने जवळील त्वचा लाल होते. मग त्या ठिकाणी खाज आली तर नखाचे देखील इन्फेक्शन त्याजागी होते म्हणून आपण उन्हाळ्यात  जड कपडे घालत नाही ना याची काळजी घ्यावी.

वाचा  जेवण करताना चे श्लोक तुम्हाला माहित आहेत का ?

उन्हाळ्यात वापरता येणारे कपडे वेगळे असतात :

चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की नक्की उन्हाळ्यामध्ये वापरता येणारे कपडे हे वेगवेगळे का असतात चला तर मग बघुया.

प्रत्येक ऋतूमध्ये वापरता येणारे कपडे हे वेगळे असतात. म्हणजेच हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे कपडे वापरतो. पावसाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कपडे वापरतो. तसेच उन्हाळ्यामध्ये देखील आपण वेगळ्या प्रकारचे कपडे वापरतो. आणि हे कपडे वेगळे ऋतूनुसार कपडे वापरणे योग्य आहे.  कारण जर तुम्ही असे नाही केले तर शरीरावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि उन्हाळ्यामध्ये मुख्यता याची अधिक काळजी घ्यावी. वेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करावे.

आपण उन्हाळ्यामध्ये इतर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरू शकतोस पण त्यामध्येही अति जाड कपडे वापरू नये. तसेच गडद रंगाचे देखील कपडे टाळावे तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरले तर सर्वात उत्तम आहे. कारण बऱ्याच वेळेस असं देखील होते की आपल्याला जर खाज आली असेल तर आपण न नखाने खाजवतो आणि नखातचे इन्फेक्शन आपल्या शरीरावर होऊ शकता. याचा परिणाम आपल्या आपल्या त्वचेवर दिसू येऊ शकतो. म्हणून जर तुम्ही योग्य प्रकारचे कपडे घातले तर तुम्हाला या समस्यांपासून सुटका मिळेल.

उन्हाळ्यात कपडे घालताना कोणती काळजी घ्यावी :

चला तर मग जाणून घेऊया की उन्हाळ्यामध्ये आपण कपडे घालताना किंवा कोणते कपडे वापरताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी.

उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे कपडे वापरताना एकदाच कपडे वापरावे म्हणजेच आठ  तासाहून अधिक वेळ कपडे अंगामध्ये घालू नये. तसेच एकदा घातलेले कपडे धुऊन चांगले सुखावून घालावे. जेणेकरून तुम्हाला त्या कपड्यापासून कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागणार नाही. जसे आपण आज बघितले त्याच प्रमाणे कपडे परिधान करावे व आपली व आपल्या शरीराची काळजी घ्यावी.

उत्तर मित्रांनो आज आपण बघितले की उन्हाळ्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालावे. याच प्रकारे आपण हे देखील जाणून घेतले की उन्हाळ्यात कपडे वेगवेगळ्या प्रकारचे का असतात. याच बरोबर आपण उन्हाळ्यात कपडे घालताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी हे देखील जाणून घेतले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  हाड फ्रॅक्चर झालंय? हाड फ्रॅक्चर आहे हे कसे ओळखतात?

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here