टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे

0
1166
टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे
टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. अनेक जणांना चेहरा या संदर्भात काही ना काही समस्या येत असतात. प्रत्येकाने आपला चेहरा स्वच्छ व सुंदर असावा असे वाटत असते. चेहरा सुंदर करण्यासाठी बरेच जण हे बाहेरून बाजारातील प्रोडक्स आणून आपल्या चेहऱ्यावर त्याचा उपयोग करत असतात. परंतु यामुळे या प्रॉडक्ट चा चेहर्यासाठी वापर केल्यामुळे फायदा तर हा कमी होईल परंतु या पासून नुकसान देखील होऊ शकते. कारण हे केमिकल राहत असतात. आणि आपल्या चेहर्यासाठी केमिकल युक्त वस्तू वापरल्याने चेहऱ्यावर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. चला तर मग बघुयात टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे.

चेहऱ्याचा एक ना अनेक समस्या असतात. जसे की चेहरा काळवंडणे,चेहऱ्यावर पुरळ येणे, चेहरा निस्तेज दिसणे, चेहऱ्यावर काळे डाग पडणे इत्यादी प्रकारच्या समस्या येऊ शकतात. काहीजण हे पार्लरमध्ये जाऊन चेहर्यासाठी ट्रीटमेंट घेत असतात. तर काहीजण चक्क क्लिनिकमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेत असतात. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अशी पदार्थ असतात की ज्या उपयोग आपण आपल्या चेहर्यासाठी देखील करू शकतो.

आपल्या घरामधील किचन मध्ये काही वस्तू या अशा असतात की ज्याचा फक्त स्वयंपाकासाठीचा उपयोग होतो असं नाही तर आपण त्याचा उपयोग आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी देखील करू शकतो. जसे की टोमॅटो हा सर्वांनाच माहीत आहे. तर मित्रांनो टोमॅटो चा उपयोग आपण आपल्या स्वयंपाकघरात भाजी बनवण्यासाठी करत असतो. तसेच टोमॅटो पासून बनवलेले कोशिंबीर देखील खायला छान लागते. टोमॅटो आपण आहारामध्ये तर उपयोग करतोच त्याशिवाय आपण टोमॅटोचा आपल्या चेहऱ्यावर देखील उपाय करू शकतो. टोमॅटो चा उपयोग आपण आपल्या चेहर्यासाठी केल्यामुळे आपल्याला यापासून एक ना अनेक प्रकारचे विविध फायदे होऊ शकतात.

तर मित्रांनो तर आपण टोमॅटो चा उपयोग आपल्या चेहर्यासाठी नेमका कसा करू शकतो याविषयी जाणून घ्यायला हवे. तसेच आपण आपल्या चेहर्यासाठी टोमॅटोचा वापर केल्यामुळे त्याचे आपल्याला किती कशाप्रकारचे फायदे होऊ शकतात याविषयी देखील आपल्याला माहिती असायला हवी. तर आज आपण टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे कोणते फायदे होऊ शकतात याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग, टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

टोमॅटो चा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याचे काय फायदे होऊ शकतात?

मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या त्वचेचे संदर्भात समस्या येत असतात. आपल्या चेहऱ्याची त्वचा ही मुलायम सुंदर व चमकणारे असेल तर आपल्या सौंदर्यामध्ये अजून जास्तच भर पडत असते. अनेक जणांना चेहऱ्याच्या त्वचेसंदर्भात समस्या येत असतात. जसे की चेहऱ्यावर पिंपल्स येणे चेहऱ्यावर काळे डाग पडणे अशा एक ना अनेक समस्या असतात. तर आपण यासाठी आपल्या चेहऱ्यावर टोमॅटो चा उपयोग करू शकतो. टोमॅटो चा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

वाचा   गावरान तूप खाण्याचे फायदे

चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावण्याचे फायदे

तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जर टोमॅटोचा रस लावला तर नक्कीच तुमच्या चेहऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. टमाटा स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याची पेस्ट करून एक चमचा रस काढून घ्या. हा टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने चेहऱ्याला व्यवस्थितपणे लावून घ्या. मानेवर देखील तुम्ही टोमॅटोचा रस लावू शकतात. त्यानंतर ते चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे. आणि नंतर चेहऱ्याला त्याच्याने सर्कुलर मोशन मध्ये मसाज करून घ्यावी आणि चेहरा हा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन टाकावा. मित्रांनो टोमॅटोमध्ये विटामिन सी असते. जे आपल्या चेहर्यासाठी खूपच उपयोगी असते. असे तुम्ही केल्याने तुमच्या चेहर्‍यावरील जोक आवडलेला भाग असेल तो निघून जाण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होईल. तसेच चेहरा हा स्वच्छ व चमकदार देखील होण्यास मदत होऊ शकते. तर नक्कीच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावून बघू शकतात.

टोमॅटो आणि दही यांचा चेहर्यासाठी उपयोग व फायदे

     टोमॅटो आणि दही यापासून बनवलेले मिश्रण तुम्ही चेहर्याला लावू शकतात.  टोमॅटोची पेस्ट करून एका वाटीमध्ये टोमॅटोचा एक चमचा रस घ्यावा. त्यामध्ये थोडी दही टाकून घ्यावी. आणि अर्धा चमचा मध देखील टाकून घ्यावे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. आणि चेहरा स्वच्छ धुऊन चेहऱ्यावर ते मिश्रण लावून घ्यावे. 15 ते 20 मिनिटे तुम्ही चेहऱ्यावर ते मिश्रण तसेच राहू द्यावे आणि नंतर चेहरा धुऊन यादी सर्कुलर मोशन मध्ये मसाज करून मग स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुवावा. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होईल. बरं नंतर चेहरा हा निस्तेज दिसत असतो तर चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल. तसेच चेहऱ्यावरचे जे रोम छिद्रे असतात ते देखील बंद होण्यास मदत होईल. त्याच प्रमाणे, चेहऱ्यावरचे मुरूम असतात ते मुरूम देखील निघून जाण्यास या उपायाने मदत होऊ शकेल. हा उपाय तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच करून बघू शकतात.

वाचा  वेखंड चे फायदे

टोमॅटो आणि काकडीचा रस चेहऱ्याला लावल्याने फायदे

तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही टोमॅटो आणि काकडीचा रस देखील लावू शकतात. टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी. एका वाटीमध्ये एक चमचा टोमॅटोचा रस घ्यावा. त्यामध्ये एक चमचा काकडीचा रस घ्यावा. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. हे चेहऱ्यावर लावल्याने चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा आणि कापसाच्या गोळ्या च्या साह्याने चेहऱ्यावर टोमॅटो आणि काकडीचा रस व्यवस्थितपणे लावून घ्यावा. हे चेहर्यासाठी एक टोनर म्हणून काम करू शकते. हे चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून चेहरा चमकदार दिसू लागेल. तसेच चेहऱ्यावर ते मुरमामुळे रोम छिद्रे हे मोठी दिसू लागतात तर ते रोम छिद्रे कमी होण्यास मदत होइल. तसेच चेहऱ्यावर काळे डाग असतील तर ते काळे डाग जाण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीनदा करू शकतात. तर नक्कीच त्याचा फायदा तुमच्या चेहऱ्याला होऊ शकेल.

टोमॅटोचा रस व बेसन पीठ चेहऱ्याला लावण्याचे फायदे

मित्रांनो टोमॅटोपासून तुम्ही फेसपॅक देखील बनवू शकतात. टोमॅटोपासून फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन डाळीचे पीठ घ्यावे. त्यामध्ये दीड चमचा टोमॅटोचा रस टाकून घ्यावा. काकडीचा रस देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात. त्यानंतर अर्धा चमचा मध टाकून घ्यावे. चिमुटभर हळद घालावी. हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. त्यानंतर हे मिश्रण भ्रष्ट रसायने चेहऱ्यावर व मानेवर व्यवस्थित लावून घ्यावे. आणि 15 ते 20 मिनिटे तसेच चेहऱ्यावर राहू द्यावे. हे मिश्रण चुकल्यावर चेहरा धुण्यापूर्वी हाताच्या साह्याने ते गोलाआकार मसाज करून काढून घ्यावे.

आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. चेहरा सुटल्यावर तुम्हाला चेहऱ्यावर एक वेगळीच चमक जाणवून येईल. तसेच हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीनदा केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग देखील जाण्यास मदत होईल. तुमच्या चेहऱ्यावरचे मुरमाचे डाग असतील तेथे जाण्यास मदत होईल. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होईल. तुम्ही आता उपलब्ध नेहमी करत असाल तर चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडणार नाहीत. आणि चेहऱ्यावरची चमकही कायम टिकून राहण्यासाठी मदत होईल. तर नक्कीच तुम्ही टोमॅटोचा अशा प्रकारचा उपयोग तुमच्या चेहऱ्यावर करून बघू शकतात.

वाचा  फास्टफुड खाण्याचे नुकसान

टोमॅटोचा आपण चेहर्यासाठी जितका उपयोग सांगाल तेवढे कमीच आहे. टोमॅटोचे एक ना अनेक प्रकारचे फायदे हे तुमच्या चेहऱ्यासाठी तुम्ही करून घेऊ शकतात. उपाय घरीच असताना तुम्ही बाजारातून एवढ्या महागड्या क्रिम तरी मग का म्हणून आणाव्यात. यामुळे पैसे जास्त खर्च तर होतीलच शिवाय चेहर्यासाठी पाहिजे तेवढा जास्त उपयोग होणार नाही. तर मग मित्रांनो, तुमच्या स्वयंपाक घरातील काही वस्तूंचा उपयोग करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चमक नक्कीच आणू शकतात. चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावन्याचे किती फायदे होऊ शकतात, हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे.

जाणून घ्या : लाल केळी खाण्याचे फायदे

तर मित्रांनो टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने काय फायदे होऊ शकतात? याविषयी आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे. तसेच, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे नक्कीच कळवा शकतात.

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here